प्रित

(49)
  • 27.8k
  • 3
  • 11.1k

"प्राची उठ किती उशीर झालाय बघ उठ बघू आता लवकर." आई प्राचीला झोपेतून उठण्यासाठी आवाज देत असते पण प्राचीवर मात्र त्या आवाजाचा काहीच परिणाम नसतो. प्राचीला आवाज देऊन वैतागलेली आई प्राचीच्या रूमच्या बाहेर निघून जातात. जातानी त्या रूमच्या खिडकीचा पडदा उघडतात. खिडकीतून येणारी सूर्याची किरणे प्राचीच्या चेहऱ्यावर रेंगळतात. त्यामुळे मुळातच सुंदर असलेल्या प्राचीचं सौंदर्य अजून खुलून दिसतं. आई प्राचीच्या रूम मधून निघून खाली किचन मध्ये येतात. तिथे अमृता नाश्त्याची तयारी करत असते. अमृता प्राचीच्या मोठ्या भावाची म्हणजे श्री ची बायको. अमृता व श्री कॉलेज पासून सोबत असतात व एक वर्षापूर्वी त्यांनी घरच्यांच्या मर्जीने लव मॅरेज केलेले असते. आईंना किचन मध्ये

New Episodes : : Every Saturday

1

प्रित - भाग 1

"प्राची उठ किती उशीर झालाय बघ उठ बघू आता लवकर." आई प्राचीला झोपेतून उठण्यासाठी आवाज देत असते पण प्राचीवर त्या आवाजाचा काहीच परिणाम नसतो. प्राचीला आवाज देऊन वैतागलेली आई प्राचीच्या रूमच्या बाहेर निघून जातात. जातानी त्या रूमच्या खिडकीचा पडदा उघडतात. खिडकीतून येणारी सूर्याची किरणे प्राचीच्या चेहऱ्यावर रेंगळतात. त्यामुळे मुळातच सुंदर असलेल्या प्राचीचं सौंदर्य अजून खुलून दिसतं. आई प्राचीच्या रूम मधून निघून खाली किचन मध्ये येतात. तिथे अमृता नाश्त्याची तयारी करत असते. अमृता प्राचीच्या मोठ्या भावाची म्हणजे श्री ची बायको. अमृता व श्री कॉलेज पासून सोबत असतात व एक वर्षापूर्वी त्यांनी घरच्यांच्या मर्जीने लव मॅरेज केलेले असते. आईंना किचन मध्ये ...Read More

2

प्रित - भाग 2

अदित्य व त्याचे आई वडील प्राचीच्या घरून गेल्यावर प्राचीचे बाबा श्री वर खूप चिडतात. एवढं सर्व झाल्यावर त्यांना अदित्य लग्नासाठी होकार येईल याची आशा सोडून दिलेली असते व यासाठी ते अमृता व श्री ला जबाबदार मानत असतात. झालेल्या प्रकाराने प्राची ही दुखावलेली असते. प्राचीला हेच समजत नव्हतं की दादा, वहीनी व अदित्य जर काॅलेज फ्रेंडस् होते तर आज दादा अदित्य वर एवढा का चिडला होतो. रात्री अमृता व श्री आपल्या रूममध्ये बोलत बसलेले असतात. श्रीचा राग अजूनही शांत झालेला नसतो. अमृता ही संभ्रमात असते व भूतकाळातील काही घटना आठवून दुःखी झालेली असते. "हा ईथे येऊच कसा शकतो? याला ...Read More

3

प्रित - भाग 3

शाॅपिंग झाल्यावर प्राची आणि अमृता काॅफी शाॅप मध्ये येतात तेव्हा श्री आधीच तिथे आलेला असतो व त्याच्या सोबत अदित्य अदित्यला श्री सोबत बघुन प्राचीला आश्चर्य वाटतं. ती स्वतः ला एक चिमटा काढते. अदित्य आणि श्री काहीतरी बोलत असतात. प्राची आणि अमृताला आलेलं बघून ते गप्प बसतात. श्री प्राची व अमृताला बसायला सांगतो. प्राची श्रीला म्हणते, "तूम्ही दोघं एकत्र कसे?" "का? आम्ही सोबत नाही बसू शकत का?" श्री तिची गम्मत करत असतो. "नाही तसं नाही पण.." प्राची "पण काय हं? आम्ही मित्र आहोत. आमच्यात रुसवे फुगवे चालूच राहणार. " अमृता "म्हणजे वहीनी तू पण" प्राची "हो, मी पण." अमृता ...Read More

4

प्रित - भाग 4

दुसर्या दिवशी सकाळी श्री माॅर्निंग वाॅकच्या वेळस अदित्यला भेटायला जातो. तेव्हा अदित्य वाॅक करून श्रीची वाट बघत एका बेंचवर असतो. त्याच्या हातात एक फोटो असतो. तो फोटो पाहत असताना त्याच्या डोळ्यात पाणी येतं. श्री येऊन अदित्य जवळ उभा राहतो व त्याला हाक मारतो. श्रीला बघून अदित्य घाईघाईत हातातील फोटो आपल्या खिशात टाकतो व डोळ्यात आलेलं पाणी पुसतो व श्री कडे बघतो. "गूड माॅर्निंग श्री" अदित्य "गूड माॅर्निंग! बोल काय काम काढलं? म्हणून तू मला सकाळी सकाळी ईथे बोलवून घेतलं.?" श्री "काम तूझ्याच फायद्याच आहे. तू बोलला म्हणून मी प्राचीला भेटलो. त्यबदल्यात आपल्यात बिझनेस डील झाली." अदित्य "हो मग, ...Read More