कणकच्या स्वप्नातील कल्पनेची कथा

(60)
  • 84.1k
  • 9
  • 32.4k

कणक ही खेळकर, उत्साही आणि चंचल मुलगी, मात्र लहानपणी आजीने सांगितलेल्या भुतांच्या गोष्टी,घरात असलेल्या अंधश्रद्धेच्या वातावरणाने तिला स्वप्नात असलेल्या गोष्टी प्रत्यक्षात दिसतात.तिचे जग आभासी होऊन जाते.पण खरी आगितून फुफाट्यात स्तिथी तेव्हा होते की ती, वयाच्या अगदी 20व्या वर्षी मानसिक रूग्ण बनते.या काळात तिच्या सोबत खूप अविश्वासनीय, भयानक घटना घडतात. यातच सगळ्यात तिच्यासाठी आशेचा किरण बनून आलेला 'अहिश' तिची या आजारातून सुटका करून तिची जीवन बदलाची कहाणी लिहतो. कणकच्या संघर्षाची गाथा नक्की वाचा!

New Episodes : : Every Monday

1

कणकच्या स्वप्नातील कल्पनेची कथा - 1

भाग-1 बर्‍याच दिवसांची परीक्षेला कंटाळलेली कणक मावशीचा फोन आल्याची चाहूल लागताच आनंदाने नाचू आता मस्त मावशीकडेे पाचगणीला जाणार तेथेे राहणार ,मस्त मस्त पदार्थ खाणार ,खेळणार ,काकांसोबत शेतात जाणार,सई, ईशा ,कनिष्का सोबत खेळणार, रात्री जेवण झाल्यानंतर आजीची गोष्ट ऐकणार तीही भुताची,आमरसात तूप टाकून पुरण पोळी बरोबर खाणार सोबत सार भात आणि कुरडया वाह...! हे किती छान ,सगळं मनासारखं होईल..... मज्जाच मज्जा.... हुर्रे!!! आता आपली ही सारी स्वप्न सत्यात उतरण्यासाठी फक्त काही दिवसांची मुुदत हवी.एकदा की नई आपली परीक्षा संपली का....................,मी कशाचाच विचार न करता सरळ आपलं परभणी गाठणारं. पुढचा विचार आपण नंतर करूया आधी आपण परीक्षा सन्मार्गी लावुया...." ...Read More

2

कणकच्या स्वप्नातील कल्पनेची कथा - 2

भाग-2 वत्सलाबाई यांच्या मनात इकडे तारांबळ उडत होती. मात्र कणक च्या मनात मस्त पाचगणी जायचा प्लॅन पिंगा घालत होता. यातच सकाळच्या सूर्याने हजेरी लावली. कणक मात्र आज आनंदात होती...... त्या आनंदाचे कारण असं की, तिला इतिहासाचा पेपर सोपा तर गेलाच होता आणि आज तिचा शेवटचा आणि आवडता भूगोलाचा पेपर होता...! आणि या सगळ्यांमध्ये तिच्या आनंदाला आणि उत्साहाला भर घालणारी गोष्ट म्हणजे यानंतर तिला पाचगणीला गावाकडे जायचे होते ना,मावशीकडे!!! म्हणून तिच्या आनंदाला पारवारच नव्हता..! पण वत्सलाबाई खूप चिंतेत होत्या.त्यांच्या मनात ...Read More

3

कणकच्या स्वप्नातील कल्पनेची कथा - 3

भाग-3 कणक ची परभणीला जाण्याची गोष्ट आठवताच वत्सलाबाई थोड्या संकोचून बाबांना "अहो बाबा काय बात करताय?? कनक चा आज शेवटचा भुगोलचा पेपर आहे. तिचे पेपर संपताच ती दोन-तीन दिवसात परभणी ला जाणार आहे....मागच्या एक महिन्यापासून परभणीला जाण्याचं तिच्या डोक्यात आहे. त्यामुळे ती पुढच्या दोन-तीन दिवसात लगेच परभणी गाठेल .आणि मी देखील तिला वचन दिल होतं की, तुझे पेपर झाल्यानंतर तुला मी परभणीला मावशीकडे एक-दोन महिने नाही तब्बल चार- पाच महिने पाठवेल .आणि मग काय ठरल्याप्रमाणे ती दोन-तीन दिवसात जाईल परभणीला.. आता मी काय करू????" बाबा थोडे विचार करून म्हणाले , "बरं जाऊ दे ...Read More

4

कणकच्या स्वप्नातील कल्पनेची कथा - 4

हा भाग वाचण्यासाठी मागील भागांची कल्पना घ्यावी... भाग-4 आपण काकांना जाऊन सांगू या विचाराने जेव्हा कणक परत येत होती, तेव्हाच तिला तिच्या मागे कोणीतरी येत असल्याची जाणीव झाली....! तिच्या अंतर्मनाला जरी जाणीव झाली होती, पण तिचं बाह्यमन मागे न बघण्याचं सिग्नल मेंदूला देत होतं. अचानक कोणीतरी लांब असलेलं जवळ असल्याचा भास तिला झाला. तिचा घसा कोरडा पडला. हृदयाचे ठोके तिच्या कानांना साफ ऐकू येत होते.रात्रीचा गार हवेचा गारवा तिच्या मनाला विलक्षण जाणवत होता. तिच्या मनाला एक गोष्ट तर कळली होती की, आपल्यामागे जे पण आहे ते आपल्या विचारांपासून वेगळ ...Read More

5

कणकच्या स्वप्नातील कल्पनेची कथा -5

हा भाग वाचण्यासाठी मागील भागांची कल्पना घ्यावी... भाग-5 दुपारची वामकुक्षी घेऊन ते काकांकडे निघणारच होते, पण जशी कणक चालायला लागली..... तिच्या पायाला कळा येत होत्या आणि तिला नीट चालता देखील येत नव्हतं.कसं जाणार ,मग आता काकांकडे? सगळ्यांना प्रश्न पडला. 'चार-पाच दिवसांनंतर कणक ला थोडा नीट चालता यायला लागलं... का मग जाऊ.' असं सगळ्यांचे ठरलं... असं पण तिच्या काकांचे मित्र त्यांना खूप दिवसातून भेटायला आले होते. त्याच्यामुळे आज तिच्या चुलत काकांकडे जाण्याची युक्ती पूर्णपणे रद्द झाली होती. गावातले लोक म्हटल्यावर त्यांचा पाहुणचार तर कसा असतो, हे काही सांगायला नको. आणि आज तर काकांचे मित्र ...Read More

6

कणकच्या स्वप्नातील कल्पनेची कथा - 6

हा भाग वाचण्यासाठी मागील भागांची कल्पना घ्यावी... भाग-6 "श....वि....ता....मा....व....शी...."कणकची बोबडीच वळली. " अगं कणक एवढ्या लवकर विसरली तू तुझ्या सविता मावशीला..?" कणकने घाबरत मागे वळून पाहिले तर, गवाणमध्ये (जेथे गाई बैलांचा चारा ठेवलेला असतो असे गोठ्यातील ठिकाण) सविता मावशींचे मृत शरीर पडलेले दिसले. खूपच घाबरुन गेली ती... थरथरत होती... तिच्या सर्वांगाला घाम फुटला. तिथून पळणारच तोच, गवाणमधून आवाज आला......................... "कणक का पळते आहेस एवढी? आणि तेही मला पाहून. मी तर तुझी सविता मावशी आहे ना? आठवतयं का?? बघ मी आणि कविता मावशी ...Read More

7

कणकच्या स्वप्नातील कल्पनेची कथा - 7

हा भाग वाचण्यासाठी मागील भागांची कल्पना घ्यावी... भाग-7 "अरे काही नाही रे.... तुला माहितीये ना मला भूतांची स्वप्न पडतात त्यांचाच प्रकोप असेल हा...." " म्हणजे?" नयन थोडा गंभीर आवाजात म्हणाला... "अरे म्हणजे की, तुला माहिती ना मला........" तेवढ्यात आजीने कणकला गोळ्या घ्यायला बोलवले. "बर‍ं जाऊ दे ते सोडा.....! चला... झोपा लवकर. उद्या बोलू आपण. चला ईशा, कनिष्का, सई खाटा टाका लवकर.मी आलेच......" कणक आजीच्या खोलीकडे आली. "मला तरी वाटतयं की तिने, काहीतरी भयानक बघितले. मला काहीतरी वेगळ वाटतयं." वत्सलेला आजी फोनवर आजचा घडलेला प्रकार सांगत होत्या. ...Read More

8

कणकच्या स्वप्नातील कल्पनेची कथा - 8

हा भाग वाचण्यासाठी मागील भागांची कल्पना घ्यावी... भाग-8 कणक मनात भयाने पुटपुटत होती. तिने सर्व गोष्टी ऐकल्या होत्या, ज्या त्या तिघी बोलत होत्या. कोणीतरी आलय याची चाहूल लागताच, तिघींनी विषय बदलला. आणि मावशी बोलल्या, "अगं वत्सला पाच-सहा महिन्यांपासून काही तराटनगरीच्या काकांचा फोन नाही आला बरं का... काय माहिती? माझ्या मते त्यांना फोन करून घ्यावा." "काय? तराटनगरी....?" "अगं होऽऽऽ ...ते मागच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत गेले ना राहायला..तराटनगरीला.......!" "अगं पण ते तर इकडे खाली शेतातल्या बंगल्यात राहायचे ना?" वत्सलाबाई हातवारे करत प्रश्न विचारत होत्या. "हो ...Read More