चिनू

(36)
  • 59.1k
  • 8
  • 28.5k

"चिनू उठ आता," आई हाक मारत होती आणि चिनू आपली लाडात येत कूस बदलत तशीच झोपत होती.शेवटी आई तिथे आली आणि चिनुला उचलून घेत एक गोड पापा घेतला, चिनुची झोप काही जात नव्हती. ती लाडात येऊन आईला अजून बिलगत होती. "उठा उठा डोळे उघडा बघू" आई. एवढ्यात रकमा तिथे आली आणि चिनुला आवरायला घेऊन गेली. रकमा त्यांची मोलकरीण. बऱ्याच वर्षांपासून ती त्यांच्याकडे आहे. एकटी आहे बिचारी, नवरा दारुडा होता, काही काम करायचा नाही आणि रोज मारहाण पण करायचा. रकमा बिचारी खूप वैतागली होती. सारखं दारू पिण्यामुळे लवकरच तो देवाघरी गेला. तिला मूल-बाळ पण काही नव्हतं. मीनाने तिला खूप समजावलं होतं दुसरं लग्न कर म्हणून, पण तिची अजिबात इच्छा नव्हती म्हणून तिने लग्न केलं नाही, त्यामुळं ती यांच्याकडेच राहते. घरची सगळी कामं करते, चिनुला सांभाळते. बागकामाची पण तिला आवड आहे.

Full Novel

1

चिनू - 1

चिनू Sangita Mahajan (1) "चिनू उठ आता," आई हाक मारत होती आणि चिनू आपली लाडात येत कूस बदलत तशीच होती.शेवटी आई तिथे आली आणि चिनुला उचलून घेत एक गोड पापा घेतला, चिनुची झोप काही जात नव्हती. ती लाडात येऊन आईला अजून बिलगत होती. "उठा उठा डोळे उघडा बघू" आई. एवढ्यात रकमा तिथे आली आणि चिनुला आवरायला घेऊन गेली. रकमा त्यांची मोलकरीण. बऱ्याच वर्षांपासून ती त्यांच्याकडे आहे. एकटी आहे बिचारी, नवरा दारुडा होता, काही काम करायचा नाही आणि रोज मारहाण पण करायचा. रकमा बिचारी खूप वैतागली होती. सारखं दारू पिण्यामुळे लवकरच तो देवाघरी गेला. तिला मूल-बाळ पण काही नव्हतं. मीनाने ...Read More

2

चिनू - 2

चिनू Sangita Mahajan (2) असेच दिवस निघून जात होते, चिनू आता १५ वर्षांची झाली. आई-बाबा गेल्यापासून ती थोडी शांत होती पण हळूहळू ती आता सगळ्या गोष्टीत रमू लागली. आता तर जास्तच समंजसपणे वागत होती. रोज ती शाळेतल्या गमती-जमती रकमा आणि आपल्या काकीला सांगायची, ती शाळेतून घरी आली कि घर कसं अगदी भरून जायचं, काकी पण तिला बघून खूपच खुश असायची. तिला वेगवेगळे पदार्थ बनवून खायला द्यायची. तिची वेणी-फणी करायची. तिचे खूप लाड करायची. उल्हासला मात्र चिनू घाबरायची. चिनू चा वाढदिवस जवळ आला होता, त्याची तयारी घरी सुरु झाली. रकमा, रागिणी, उल्हास आणि चिनू असे सगळे मिळून जाऊन कपड्यांची खरेदी ...Read More

3

चिनू - 3

चिनू Sangita Mahajan (3) इकडे पोलिसांचा तपास वेगाने सुरु झाला. सगळ्यात आधी त्यांनी चिनुच्या मैत्रिणींकडे चौकशी केली. मैत्रिणींनी सांगितले आणि रकमा आमच्यासोबतच निघाल्या होत्या. यांच्यासोबत निघाल्या होत्या त्याअर्थी रस्त्यातच काहीतरी झालं असलं पाहिजे. पोलीस विचार करत होते. पोलिसांची टीम त्या ठिकाणी गेली जिथे चिनू पिकनिकला गेली होती. तिथे त्यांनी चिनु आणि रकमाचा फोटो दाखवून सगळीकडे चौकशी केली. पण तिथे काहीच सुगावा लागला नाही. पिकनिक स्पॉटच्या जवळ इकडे तिकडे बऱ्याच ठिकाणी शोधून झाले. सर्व पोलीस स्टेशनला खबर देऊन ठेवण्यात आली होती. सगळ्या खबरी लोकांना पण कामाला लावलं. पोलिसांना हेच समजेना कि घरी यायला निघालेल्या मुली मधेच गायब कशा झाल्या. तपास ...Read More

4

चिनू - 4

चिनू Sangita Mahajan (4) रकमाला थोडे हायसे वाटते, कारण इतके दिवस एकटीच बिचारी घुसमटत होती. तिसऱ्या दिवशी घरमालक येतो न्यायला लगेच रकमा पोलिसांना इशारा करते, पोलीस लक्ष्य ठेऊनच होते. लगेच ते घरमालकाच्या भोवती गोळा झाले. घरमालक पण थोडा गोंधळला. "मी इन्स्पेक्टर देशपांडे, मला सांग हे घर भाड्यानं कोणी घेतलं होतं? आणि खरं खरं सांगायचं, काही होशियारी नाही करायची." देशपांडे आपली ओळख देत बोलले. "साहेब मी त्याला ओळखत नाही पहिल्यांदाच बघितला त्याला." घरमालक म्हणाला. "त्याची काही कागदपत्र वगैरे आहेत का?" देशपांडे. "नाहीत" घरमालक. "काही चौकशी न करता घर कसं दिलं भाड्याने? बरं त्याचे वर्णन करू शकता ना?" देशपांडे. "हो साहेब" ...Read More

5

चिनू - 5 - अंतिम भाग

चिनू Sangita Mahajan (5) त्या छोट्या पोरीला मारायला सांगितलं होतं म्हणून मी फक्त तिलाच मारायची ऑर्डर दिली आणि या बाईला लांब गावी नेऊन ठेवली, जिथे तिच्यावर नजर ठेवता येईल अशा ठिकाणी. आम्ही ज्याचे पैसे मिळतात त्यालाच फक्त मारतो." "पण का मारली तिला?" देशपांडे. "ते माहित नाही साहेब." राका. "आणि बाकीचे साथीदार कुठे आहेत? त्यांचा फोन नंबर पण दे. आणि कुठं भेटतील ते, लवकर सांग" देशपांडे. त्याने सगळं सांगितलं. देशपांडे त्या साथीदारांना पकडायला स्वतः निघाले, जाताना राकावर नीट लक्ष्य ठेवायला सांगितले. सोबत अजून ३ जण होते. राकाने सांगितल्याप्रमाणं ते तिघं एका दारूच्या दुकानात येणार होते. यांनी त्यांचे फोटो पण सोबत ...Read More