कोणी बोलावले त्याला ?

(182)
  • 127.7k
  • 46
  • 64.5k

कोणी बोलावले त्याला ? श्याम आणी किशोर दोघे लहानपणा पासूनचे मित्र. बाजूबाजूला राहणारे , एकाच शाळेतून , कॉलेज मधून शिकलेले. अतिशय जवळचे मित्र. आता दोघे कामाला लागले होते. पण तरीही न चुकता दोन चार दिवसात एकमेकांकडे फेरी ही ठरलेली. आई वडिलांन पासून सगळ्या कॉलनीला त्यांची मैत्री माहित होती. मार्च एंडिंग संपली. आणी दोघांनी काहीसा सुटकेचा श्वास सोडला. ह्या मार्च एंडिंग मध्ये बॉस नी त्यांचा चांगलाच घाम काढला होता. जास्त किशोर वैतागला होता. त्याचा बॉस एक नंबरचा खडूस... मग काय ? किशोरला त्यांनी चांगलाच राबवून घेतला होता. " खूप कंटाळा आलाय रे...." नेहमी प्रमाणे

Full Novel

1

कोणी बोलावले त्याला? (भाग 1)

कोणी बोलावले त्याला ? श्याम आणी किशोर दोघे लहानपणा पासूनचे मित्र. बाजूबाजूला राहणारे , एकाच शाळेतून , कॉलेज मधून अतिशय जवळचे मित्र. आता दोघे कामाला लागले होते. पण तरीही न चुकता दोन चार दिवसात एकमेकांकडे फेरी ही ठरलेली. आई वडिलांन पासून सगळ्या कॉलनीला त्यांची मैत्री माहित होती. मार्च एंडिंग संपली. आणी दोघांनी काहीसा सुटकेचा श्वास सोडला. ह्या मार्च एंडिंग मध्ये बॉस नी त्यांचा चांगलाच घाम काढला होता. जास्त किशोर वैतागला होता. त्याचा बॉस एक नंबरचा खडूस... मग काय ? किशोरला त्यांनी चांगलाच राबवून घेतला होता. " खूप कंटाळा आलाय रे...." नेहमी प्रमाणे ...Read More

2

कोणी बोलावले त्याला ? (भाग 2)

मागील भागावरून पुढे.... संपत ने किशोरचा हात सोडला आणी घाबरून दोन पावले मागे गेला. त्याच्या चेहऱ्यावर आता भीती स्पष्ट होती. प्रकरणाची नजाकत बघता आता श्यामलाच काही करणे भाग होते. " किशोर ! चल आपण फार्म हाऊस वर जाऊ. तिथे जाऊन आपण बोलू ? "" नको..." किशोर म्हणाला. पण त्याची नजर अजून पण दरवाज्यावर स्थिर होती. डोळ्यात स्वप्नाळू भाव होते. जणूकाही तो कोणत्या वेगळ्याच दुनियेत होता. " किशोर ! " श्याम ने एक जोरदार हाक मारली... आणी किशोर भानावर आला. " चल... आपण फार्म हाऊस वर गेल्यावर बोलू... मला पण जाणून घ्यायचे आहे. नंतर हवं तर आपण परत येऊ पण आता इथून चल...." श्याम ...Read More

3

कोणी बोलावले त्याला ? (भाग 3)

मागील भागावरून पुढे...... किशोर चीं सगळे जाणून घेण्याची तीव्र इच्छा बघून आजी पण जराशी खुश झाली. पण जराशीच... कारण ऐकल्यावर त्याची काय प्रतिक्रिया येईल हे तिला ही माहित नव्हते. " बाबू... ! खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तेव्हातर तुझा जन्म पण झाला नव्हता. त्यात तुझे आजोबा पण अचानक गेले. पदरात चार लेकरं...घरची परिस्थिती बेताची मग काय करणार? शेवटी मी कंबर कसली आणी लागले कामाला... ""'छोटीशी वाडी आणी लहानशे शेत होते. त्यात मी मरमर काम करायची... कसेबसे चालले होते. पण एकटी बाई आणी कर्ता पुरुष नाही. हे लोकांना बघवत नव्हते. त्यामुळे उगाचच कुरापती काढणे त्यांनी चालू केले. "आजी किंचित दम खायला थांबली. "'आपले शेत ...Read More

4

कोणी बोलावले त्याला? (भाग 4)

मागील भागावरून पुढे.... यथाअवकाश सगळे मुंबईला पोचले... येणारी पौर्णिमा अजून वीस दिवस लांब होती. त्याच्या आंत त्यांना सगळे सामान चार दिवस आधी पुन्हा गावाला पोचायचे होते. किशोरच्या घरी मंदाकिनीला बघून एकदम गदारोळ माजला. सगळ्यांना वाटले की, तो लग्नच करून आला की काय. पण सगळ्यांना शांत करत त्याने मंदाकिनी कोण आणी काय परिस्थिती आहे ते समजावून सांगितले. तसें सगळे शांत झाले. आज पर्यंत त्याच्या आईबाबानां पण आपल्या गावाचा विसर पडला होता. पण अचानक असे प्रकरण समोर आलेले बघून सगळे हतबल झाले. काहीशे सावरत त्यांनी किशोरला ह्या सगळ्यातून बाजूला व्हायला सांगितले. पण किशोर बधला नाही. त्यामुळे आता जास्त कोणी काही बोलले नाही. झालेल्या पहिल्याच ...Read More

5

कोणी बोलावले त्याला ? (भाग 5)

मागील भागावरून पुढे.... जसे श्याम आणी संपत ने बाहेरून तांदळाचे रिंगण घातले. त्यांनी मोबाईलच्या फ्लॅश लाईट ने त्यांना इशारा श्याम आणी संपत आपल्या गळ्यातील तावीज घट्ट पकडून उभे होते. जसा संपत आणी श्यामचा इशारा मिळाला तसा किशोर त्वरेने आजी कडे आला. " आजी त्याचा बाहेर जायचा रस्ता बंद केला आहे." किशोर उत्साहात म्हणाला. " ठीक आहे. चल आता वेळ आलीय... " आजी पण म्हणाली. आता तिच्या जीर्ण शरीरात काहीशी तरतरी आली. आजी त्या दोघांच्या पुढे दरवाजा उघडून बाहेर आली. आणी तिच्या मागे किशोरने बाहेर पाय ठेवला आणी तो दचकला. समोर असलेला समंध बघून त्याची बोबडी वळली. दहा एक फूट उंच , भक्कम शरीर ...Read More

6

कोणी बोलावले त्याला ? ( भाग 6 )

मागील भागावरून पुढे..... दुसऱ्या दिवशी किशोर मुंबईला जायला निघाला. जाण्या आधी तो काही वेळ आजी बरोबर बोलत बसला होता. बाबू ! सगळ्यांना एकदा घेऊन ये इकडे... खूप वर्ष झाली कोणी इकडे फिरकले नाही. "" आजी ! मी माझा पूर्ण प्रयत्न करीन. "" बाबू ! अजून पण खुप काही गोष्टी आहेत ज्या मला तुम्हाला सांगायच्या आहेत. सगळे इकडे आले तर मला त्यांना त्या समजावून सांगता येतील... त्यात त्यांचेच भलं आहे... "" मी समजावून सांगीन त्यांना.. आणी आता तर इथे येण्यात काही धोका पण नाहीय. त्यामुळे त्यांना इकडे यायला काहीच अडचण नसावी असे मला वाटते आहे. आणी शेवटी तु त्यांची आई , आजी आहेस ...Read More

7

कोणी बोलावले त्याला? (अंतिम भाग )

मागील भागावरून पुढे...... दुसऱ्या दिवशी मंदाकिनी सकाळी लवकर उठली.आपले स्नान , जेवण वैगरे आटपून ती आजी कडे गेली... " ! मी आलेय. "" ह्म्म्म.... मंदाकिनी , आता मी काय बोलतेय ते नीट लक्षात घे... मी तुला काही मंत्र शिकवणार आहे. ते तू चांगल्या प्रकारे पाठांतर करून घे.... "" पण आजी मला ते मंत्र कशाला पाठ करायचे आहेत? "" वेळ आली की मी सांगीन.... सध्या मी जसे म्हणतेय तसें ते मंत्र माझ्या मागून म्हणत जा..."असे म्हणून आजीने मंत्र म्हणायला सुरवात केली. दुपारी दोघी जेवायला थांबल्या. आणी पुन्हा संध्याकाळी परत मंत्र पठण चालू केले. सलग दोन दिवस असे करून आजीने तिच्या कडून ते ...Read More