श्री दत्त अवतार

(71)
  • 223.9k
  • 15
  • 84.3k

श्री दत्त अवतार भाग १ श्री दत्तावताराचे प्रयोजन श्री दत्तात्रेय ही देवता कशी आहे, तिचे स्वरुप काय आहे, तिचे कार्य काय आहे, हे देवता स्वरुप कशामुळे हृदयात साकारते, या देवतेच्या प्रसंन्नतेचा प्रसाद म्हणुन काय प्राप्त होते,याविषयी असे म्हणले जाते की ... आत्मानंदा कडे घेऊन जाणारा ॐकार जो जगाच्या उत्पत्ती-स्थिति-लय या चक्रातून सुटका करून घेण्यासाठी भक्तांच्या बुद्धीला प्रेरक आहे. तोच एकमात्र देव, भक्तांची सत्च्चिदानंद सुखाशी एकी घडविणारा दत्त आहे. हा अखंड निराकार आत्मस्वरुप आहे. भक्तांचा आधार आहे. आणि भक्तिने जाणला जातो. श्रीदत्त अवताराचा आणि श्रीदत्तात्रेय देवतेचा उद्भव, उगम आणि प्रवास अद्भुत आहे. पहिल्या स्वयंभु मनूपासून श्रीदत्तात्रेयांचा आविर्भावकाल असून

Full Novel

1

श्री दत्त अवतार भाग १

श्री दत्त अवतार भाग १ श्री दत्तावताराचे प्रयोजन श्री दत्तात्रेय ही देवता आहे, तिचे स्वरुप काय आहे, तिचे कार्य काय आहे, हे देवता स्वरुप कशामुळे हृदयात साकारते, या देवतेच्या प्रसंन्नतेचा प्रसाद म्हणुन काय प्राप्त होते,याविषयी असे म्हणले जाते की ... आत्मानंदा कडे घेऊन जाणारा ॐकार जो जगाच्या उत्पत्ती-स्थिति-लय या चक्रातून सुटका करून घेण्यासाठी भक्तांच्या बुद्धीला प्रेरक आहे. तोच एकमात्र देव, भक्तांची सत्च्चिदानंद सुखाशी एकी घडविणारा दत्त आहे. हा अखंड निराकार आत्मस्वरुप आहे. भक्तांचा आधार आहे. आणि भक्तिने जाणला जातो. श्रीदत्त अवताराचा आणि श्रीदत्तात्रेय देवतेचा उद्भव, उगम आणि प्रवास अद्भुत आहे. पहिल्या स्वयंभु मनूपासून श्रीदत्तात्रेयांचा आविर्भावकाल असून ...Read More

2

श्री दत्त अवतार भाग २

श्री दत्त अवतार भाग २ श्री दत्तात्रय एक सर्वसमावेशक दैवत आहे. आकाश,भूतलावरील व्यवहार आणि वैराग्यदेही वर्तन अशा तीन्ही दत्ताची श्रेष्ठता गाजते आहे. त्यांनी चोवीस गुरू केले म्हणतात. थोडक्यात, सृष्टीमध्ये जिथं चांगलं मिळालं, त्याचा दत्तांनी आदर केला. इतरांच्यातले चांगले गुण गुरूपदी मानल्यामुळे, दत्त स्वत:च परमगुरू झाले. स्वत:च्या अंगावर लोकांच्या लाजेपुरती लंगोटी, आणि समोरच्या लायक मागणार्‍याला, लंगोटीपासून थेट लक्षाधीश, कोट्याधीश यापर्यंत हवं ते मिळणार. स्वत:ला काहीच नको, याचं अक्षरश: मूर्तीमंत प्रतीक म्हणजे दत्त! अंगावर लंगोटीशिवाय चिरगुटही नाही. अशा निरिच्छपणानं इतरांची न्याय्य इच्छापूर्ती करता न येईल, तरच आश्चर्य. म्हणजेच त्रिमुखी दत्ताच्या पहिल्या दोन महामुखाएवढं, वर्तनाचं हे तिसरं महामुख महत्वाचं आहे, दत्ताजवळ ...Read More

3

श्री दत्त अवतार भाग ३

श्री दत्त अवतार भाग ३ तेव्हा ते तिघेजण (ब्रह्मा-विष्णु-महेश) म्हणाले "ती पतिव्रता कशी आहे ते आम्ही पहातो व व्रतभंग आम्ही जरूर करतो." अशी प्रतिज्ञा करून ते तिघे मिळून मृत्युलोकात यवयास निघाले. त्या तिघांनी ब्राह्मणाची रूपे घेतली. शुभ्र धोतर, अंगावर रेशमी उपरणे, यज्ञोपवीत आणि हातात कमंडलू अशा थाटांत ते तिघे अत्रिमुनींच्या आश्रमात आले. भर दुपारची वेळ ! ऊन मी म्हणत होते. अशा वेळीं आपल्या आश्रमांत आलेले ब्राह्मण अतिथी पाहून अनुसूयेने त्यांना मोठ्या आदराने बसावयास आसन दिले. त्यांचे चरण धुतले व भक्तिभावाने त्यांचे पूजन केले. त्यांना पाटावर बसवून जेवण वाढले. पण तिला अतिथी म्हणाले- "आम्हीलांबून आलो असुन, तुझे ...Read More

4

श्री दत्त अवतार भाग ४

श्री दत्त अवतार भाग ४ श्री दत्तात्रेय यांच्या अवतारांचे जन्म.त्यांचे वास्तव्य,त्यांची विश्रांती स्थाने त्यांची कार्ये आणि त्यासंबंधात असलेल्या विविध यासाठी काही गावे ओळखली जातात . दत्तसंप्रदायात या गावांना अतिशय महत्व आहे . दत्तभक्त यातील प्रत्येक गावाला भेट द्यायची मनीषा बाळगून असतात . १)माहूर (नांदेड) महाराष्ट्र हे क्षेत्र सद्गुरु दत्तात्रेयांचे अवतार स्थान आहे. महासती अनुसयेच्या सत्व परिक्षेसाठी आलेल्या ब्रह्मा, विष्णू, आणि महेश यांनी संतुष्ट होऊन महासती अनुसया आणि अत्री ऋषी यांच्या विनंतीस मान देऊन याच ठिकाणी त्यांच्या पुत्राच्या रूपाने दत्त अवतार धारण केला. हे क्षेत्र फार प्राचीन आहे. ह्या क्षेत्रास दत्तात्रेयांचे विश्रांती स्थान सुध्दा म्हणतात. ह्या ठिकाणी रेणुका मातेचे मूळ ...Read More

5

श्री दत्त अवतार भाग ५

श्री दत्त अवतार भाग ५ ९) माणिकनगर (बिदर )सोलापूर कर्नाटक हैद्राबाद बस मार्गावर हुमनाबाद या तालुक्याच्या ठिकाणा पासून १ कि.मी अंतरावर माणिक नगर हे क्षेत्र आहे. कर्नाटक राज्यात हे क्षेत्र येते. सकलमत संप्रदाय संस्थापक दत्तावतारी सिध्दपुरुष श्री माणिक प्रभूजी यांची ही कर्मभुमी आहे राम नवमीच्या दिवशी सद्गुरु दत्त प्रभुंनी बया बाईंना (माणिक प्रभूंची आई) दृष्टांत देऊन मी तुझ्या उदरी पुत्र रुपाने जन्म घेईल असा आशिर्वाद दिला. २२डिसेंबर १८१७ साली (मार्गशीर्ष शुध्द चतुर्दशी) दत्त जयंतीच्या दिवशी बसवकल्याण जवळील लाडवंती या गावी श्री माणिकप्रभूंचा जन्म झाला. माणिक नगर, बसवकल्याण, बिदर या परिसरा मध्ये प्रभुनीं अनेक अवतार लीला केल्या आहेत. त्यापैकी एक ...Read More

6

श्री दत्त अवतार भाग ६

श्री दत्त अवतार भाग ६ १४ ) गरुडेश्वर (नर्मदा, गुजरात) हे क्षेत्र गुजरात राज्यात नर्मदा जिल्ह्यात येते. सुरत-अहमदाबाद या बस मार्गावर अंकलेश्वर हे गाव लागते. तेथुन बस मार्गाने राजपिपला मार्गे गरुडेश्वर ६८ कि.मी. अंतरावर आहे. या ठिकाणी योगीराज वासुदेवानंद सरस्वती यांची समाधी आहे. हे स्थान नर्मदा नदीच्या तीरावर आहे. सर्व प्रमुख दत्त स्थानात या स्थानाचा उल्लेख आहे. नर्मदा पुराणात या स्थानाचा स्पष्ट उल्लेख आहे. एक अपत्य झाल्यावर त्यांच्या पत्नीसह बालकाचे निधन झाले. समष्टी कल्याणासाठी स्वामींचा दत्त अवतार असल्याने देवाने त्यांचा गृहस्थाश्रम अल्प समयात व्यक्त केला गवला असे मानतात . असे महान योगी सन १९१४ मध्ये गरुडेश्वर येथे चिरकाल निद्रेत ...Read More

7

श्री दत्त अवतार भाग ७

श्री दत्त अवतार भाग ७ २) परशुराम ऋषिश्रेष्ठ जमदग्नी आणि रेणुका यांचा पुत्र म्हणजे परशुराम. त्यांना एकूण चार पुत्र होते. परशुराम यांना विष्णूचा अवतार मानलेले आहे. जमदग्नी ऋषि हे अत्यंत कोपिष्ट होते. एकदा त्यांची पत्नी रेणुका पाणी आणण्यासाठी नदीवर गेली असता तिला उशीर झाला म्हणून ते अतिशय रागवले, त्यांनी आश्रमात असलेल्या आपल्या पुत्रांना आपल्या आईचा वध करायला सांगितले. पुत्रांनी मातृवधाला नकार दिला. थोड्या वेळाने बाहेर असलेला परशुराम आश्रमात आला तेव्हा जमदग्नी ऋषींनी त्याला आपल्या मातेचा वध करायची आज्ञा केली. त्याने क्षणाचाही विलंब न लावता आपल्या परशुने आपल्या आईचे मस्तक धडावेगळे केले. ते पाहिल्यावर जमदग्नी ऋषींचा राग शांत झाला. त्यांनी परशुरामाला ...Read More

8

श्री दत्त अवतार भाग ८

श्री दत्त अवतार भाग ८ ५) कार्तवीर्य सहस्रार्जुन कृतयुगामध्ये कृतवीर्य या नावाचा एक महापराक्रमी राजा होऊन गेला. त्याच्या पत्नीचे शीलधारा असे होते. कृतवीर्य हा अतिशय पराक्रमी राजा होता त्याला शंभर पुत्र झाले होते. परंतु एकदा काहीतरी गैरसमजुतीमधुन च्यवनऋषींनी त्याला शाप दिला आणि सर्व पुत्र भस्मसात झाले. महाराणी शीलधारा याज्ञवल्क त्रदृषींची पत्नी मैत्रेयी हिला शरण गेली. मैत्रेयी ही ब्रह्मवादिनी आणि ज्ञानी होती. मैत्रेयीने तिला श्रीदत्तात्रेयांची उपासना करायला सांगितली आणि पुत्रप्राप्तीचे व्रत करायला सांगितले. कृतवीर्य आणि महाराणी शीलाधरा यांनी मन:पूर्वक निष्ठेने ते व्रत केले. तेव्हा भगवान श्रीदत्तात्रेय संतुष्ट झाले. त्यांनी पराक्रमी आणि तेजस्वी पुत्र होईल असा आशिर्वाद दिला. हा मुलगा म्हणजेच ...Read More

9

श्री दत्त अवतार भाग ९

श्री दत्त अवतार भाग ९ श्रीदत्तात्रेयांचे असंख्य शिष्य असून त्यांनी सर्वांवर त्यांच्या पात्रतेनुसार कृपा केली आहे. त्यांच्या शिष्यांमध्ये ब्राह्मण, अगदी अंत्यजापर्यंत सर्व वर्गाच्या शिष्यांचा समावेश आहे. या प्रत्येक शिष्याचे जीवन म्हणजे एक स्वतंत्र अवतार कथा होईल. प्रत्येक दत्तभक्ताने त्यांच्या प्रमुख शिष्यांची माहिती करून घेतली पाहिजे. कारण श्रीदत्तात्रेयांना त्यांनी ज्या पद्धतीने आणि निष्ठेने प्रसन्न करून घेतले त्यावरून साधकाला त्याच्या दत्तसाधनेसाठी उत्तम मार्गदर्शन मिळू शकेल. श्रीदत्तात्रेय अवतार निर्गुण आणि निराकार असला तरी श्रीदत्त संप्रदाय सगुणोपासक आणि गुरुभक्तिप्रधान आहे. याचबरोबर योगमार्ग, हटयोग, कठोर अनुष्ठाने आणि आत्मक्लेश याही परंपरा दत्त संप्रदायामध्ये प्रचलित आहेत. सगुण भक्ती आणि उपासना ही दत्त संप्रदायाची मध्यवर्ती भूमिका आहे. ...Read More

10

श्री दत्त अवतार भाग १०

श्री दत्त अवतार भाग १० ३) श्री दत्तात्रेय श्री दत्तात्रयांचा हा अवतार याच नावाने ओळखला जातो. अत्रिवरद अवतारात दत्तात्रेयप्रभूने अत्रिऋषींना, मी तुम्हाला स्वतःला अर्पण करून घेवून तुमच्या येथे पुत्ररुपाने अवतार घेईन असा वर दिला असल्यामुळे ते अत्रिवरद झाले होते . अत्रिवरद या अवतारात परमेश्वराने अत्रिमुनींना त्रिमूर्तीच्या रुपाने दर्शन देऊन फक्त वरच दिला. पुत्ररुपाने अवतार घेऊन मी तुमच्या वंशाला भूषविन एवढेच सांगून ते अंतर्धान पावले. त्यानंतर अत्रिमुनि व सती श्री अनसूया यांनी त्रिमूर्ती या रुपाने परमेश्वराचे सतत चिंतन केले. काही काळाने परमेश्वराने अत्रिऋषींना व अनसूयेला प्रत्यक्ष दर्शन दिले. “मी तुम्हा उभयतांच्या तपश्चर्येने व अनन्य भक्तीने प्रसन्न होऊन तुम्हांला इष्ट वर ...Read More

11

श्री दत्त अवतार भाग ११

श्री दत्त अवतार भाग ११ अनसूया मातेच्या आश्रमात जेव्हा श्री दत्तात्रेय अवतरित झाले, तेव्हा प्रभूंचे रूप पाहण्यासाठी जे इंद्रादी ऋषी-मुनी, गंधर्व, चरण, योगी आणि संत त्यांना भेटायला आले होते ,त्या सर्वांची ती उत्सुकता पाहुन श्री दत्तात्रेय यांनी एका कुमाराचे रूप धारण केले आणि त्यांना योगाचे मार्गदर्शन केले. "मी शरीररूप (स्थूल) नाही, मी समयघटिका ही नाही. मी जन्म आणि मृत्यू रहित आहे. (मी या संपूर्ण सृष्टीतील प्रत्येक परीमाणीत गोष्टींच्या च्या अंतर्भूत असलो तरी या सर्वांच्या पलिकडील आहे.) भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी मी विविध स्वरूपात अवतरतो आणि माझी ही स्वरूपे तात्कालिक किंवा समयोचित असली तरीही यामुळे माझ्या तात्विक अवस्थेवर काही प्रभाव पडत ...Read More

12

श्री दत्त अवतार भाग १२

श्री दत्त अवतार भाग १२ “बाळ तु कोण आहेस”? त्यांचा हा प्रश्न ऐकून दत्तात्रेय म्हणाले, “ माझे स्वरुप कोणाच्याही येणारे नसल्यामूळे मला अप्रतितस्वरुप म्हणतात, मला बाह्यरूपाने किंवा उपाधीने जाणता येत नाही". “तुझा आश्रयदाता कोण आहे ते सांग”? दत्तात्रेय म्हणाले, “ मला कोणी आश्रयदाता नाही व माझा कोणी आश्रय अथवा संरक्षकही नाही.” "तुझे निवासस्थान कोणते आहे?" . "माझ्याकडे निवास नाही व माझे आश्रयदाते गुरुही नाहीत “तुझा योग कोणता व त्याच्या अभ्यासाची रीत कोणती”? दत्तात्रेय म्हणाले “ माझ्या योगाला मी चित्रयोग हे नाव दिलेले असून त्याच्या अभ्यासाची काही प्रक्रिया नाही.” यावर सिध्दांनी विचारले, “तुझा गुरु तरी कोण आहे”? त्यावर दत्तात्रेयांनी उत्तर ...Read More

13

श्री दत्त अवतार भाग १३

श्री दत्त अवतार भाग १३ ९) विश्वंभरावधूत पुढे आणखी एकदा सिध्दांना बोध देण्यासाठी दत्तात्रेयांनी 'विश्वंभरावधूत' या नावाचा अवतार घेतला व योगीजनांना बीजाक्षर मंत्रांचा (द्रां) उपदेश केला. हा अवतार चैत्र शुद्ध पौर्णिमेला, मंगळवारी, चित्रा नक्षत्रावर, दुसऱ्या प्रहरावर झाला. हा अवतार श्री अत्रिनंदन भगवान श्री दत्तात्रेय यांनी बदरिकाश्रमांतील सिध्दजन व भक्तजनांच्या कल्याणासाठी घेतला. बदरिकाश्रमी राहून खडतर तपश्चर्येने सिध्दिसंपन्न झालेल्या भक्तजनांवर अनुग्रह करण्याकरिता ज्ञानसागर रुपाने प्रकट होऊन त्यांच्या अहंकाराचा परिहार करुन व सदुपदेशाने त्यांच्या अज्ञानरुपी तिमिराचा नाश करुन त्यांना सदाचाराचे वळण लावले. यानंतर बराच काळ निघून गेल्यावर दत्तात्रेयांना त्यांचे स्मरण झाले. ते सर्व सिध्दजन आपल्या उपदेशाप्रमाणे बागून उत्तम गति प्राप्त करुन ...Read More

14

श्री दत्त अवतार भाग १४

श्री दत्त अवतार भाग १४ हातात भिक्षा पात्र धारण केलेल्या, सोबत श्वान असलेल्या, शील नावाच्या भक्ताचे (ब्राह्मणाच्या क्रोधापासून संसारगर्तेत बुडण्यापासून) रक्षण करणारा हा मायामुक्तावधूत अवतार होता . पाणीपात्रधराय त्वं ||श्वानसहिता शीलरक्षका || मायामुक्तावधूताय ||दत्तात्रेयाय नमो नम: || पाणी (संस्कृत शब्द - अर्थ - हात) म्हणजे हातात भिक्षा पात्र धारण केलेल्या, सोबत श्वान असलेल्या, शील नावाच्या भक्ताचे (ब्राह्मणाच्या क्रोधापासून तसेच संसारगर्तेत बुडण्यापासून) रक्षण करणार्‍या, मायामुक्तावधूत अवतार धारण करणाऱ्या श्री दत्तात्रेयांना माझा नमस्कार असो ११) मायायुक्तावधूत दत्तात्रेयांच्या अकराव्या अवताराचे नाव 'मायायुक्तावधूत' असे असून याचे रुप सावळे व सुंदर होते. मांडीवर एक सुंदर स्त्री घेऊन मद्य व मांस यांचे भक्षण ...Read More

15

श्री दत्त अवतार भाग १५

श्री दत्त अवतार भाग १५ १४) देवदेवेश्वर दत्तात्रेयांचा 'देवदेवेश्वर' नावाचा चौदावा अवतार आहे. भाद्रपद शुद्ध चतुर्दशीला, शततारका नक्षत्रावर, शुक्रवारी सूर्योदयाच्या वेळेस श्रीगुरू, नर्मदा नदीच्या तीरावर माहूरच्या जंगलात अवतरीत झाले. ब्रम्हदेवादी सर्व देवता, गौतम ऋषींचे पुत्र शतानंद महर्षी इत्यादी सर्व श्रीगुरूंचे दर्शन घेण्यासाठी येथे आले. याकाळात श्रीगुरूंनी नर्मदा नदीमध्ये तसेच आसपासच्या अनेक तीर्थांमध्ये स्नान केले आणि इतर अनेक ऋषी-मुनींना दर्शनही दिले. कृष्णाम्लाच्या वृक्षांनी हा परिसर परिपूर्ण असल्याने या स्थानाला 'कृष्णाम्लाकी तीर्थ' असे नाव पडले.सदगुरु मार्कडेय ऋषिंनी सांगितलेली कथा आहे. माहूर क्षेत्राच्या परिसरात विशेषत: शतानंदाला दर्शन देऊन अनुगृहित करण्यासाठी भगवान श्रीदत्तात्रेय हे देवदेवेश्वराच्या रुपाने प्रकट झाले. याच अनुषंगाने स्वर्गातील इंद्रादि देव ...Read More

16

श्री दत्त अवतार भाग १६

श्री दत्त अवतार भाग १६ पूर्णमद: पूर्णमिदं पूर्णात् पूर्ण मुदच्यते || पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवाव शिष्यते ||' याचा अर्थ असा की पूर्णातुन पूर्ण काढल तरी तिथे पूर्णच शिल्लक उरते . काहीच नसलेल्या या 'शून्य' शब्दाची कीमत महाप्रचंड आहे. या शुन्याने कशालाही गुणले किंवा भागले असता उत्तर शून्यच येते किंवा जे येते ते सांगता येत नाही. हेच तत्व उपनिषदांनी 'पूर्णमदः' वाक्याद्वारे सांगितल आहे. हेच शून्य इतर कोणत्याही संख्येपुढे ठेवले, तर त्याची किंमत दहापट वाढते. याचाच गुढ़ार्थ असा की, तुम्ही किती होता, त्यावर अत्रिनंदनाच्या अनुग्रहाचा परिणाम ठरतो. म्हणजेच सदगुरूतत्वाने अनुग्रह केल्यानंतर, भक्ताची किंमत किती वाढेल हे त्या भक्तावरच अवलंबून आहे. कमतरतेचा ...Read More

17

श्री दत्त अवतार भाग १७

श्री दत्त अवतार भाग १७ १०) समुद्र समुद्रात सर्व नद्या आपले पाणी घेऊन येतात. अथांग आहे तरी आपली मर्यादा सोडीत नाही. त्याप्रमाणे मनुष्याने खूप प्राप्ती झाली तरी खूप प्रफुल्लीत होऊ नये. आपल्या ध्येयाकडे सतत लक्ष ठेवावे. ११) पतंग दिव्याच्या ज्योतीच्या रूपावर भाळून पतंग स्वत:ला जाळून घेतो. त्याचप्रमाणे स्त्रियांच्या रूपावर भाळून आपला नाश करू नये. संयम राखावा. १२) भृंग निरनिराळ्या फुलांवरून भृंग मकरंद सेवन करतो. त्याप्रमाणे लहान - मोठ्या सगळ्या ग्रंथांचे सार लक्षात ठेवावे, व त्याप्रमाणे आचरण असावे. १३) मातंग मातंग म्हणजे हत्ती. हा बलवान, बुद्धिवान व आकारानेही मोठा आहे. पण त्याला पकडण्याकरता मोठ्या खड्ड्यात नकली हत्तीण करून ...Read More

18

श्री दत्त अवतार भाग १८

श्री दत्त अवतार भाग १८ श्रीदत्तात्रेय यांचे पासून पुढे तीन अवतार झाले. प्रथम श्रीगुरू श्रीपाद श्रीवल्लभ महाराज हा द्वितीय श्रीगुरू नृसिंहसरस्वती महाराज व तिसरा अवतार श्री स्वामी समर्थ महाराज १)प्रथम अवतार श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी कलीयुगात भक्ताचा उध्दार करण्यासाठी आद्य देव श्री ब्रम्हा, विष्णु, शिव या त्रिमूर्तीनी श्री दत्तात्रय याचा अवतार घेतला. ब्रम्हदेव 'चंद्र' झाला. श्रीविष्णू 'दत्त' झाला आणि महेश 'दुर्वास' झाला. काही दिवसांनी चंद्र व दुर्वास मातेला म्हणाले, "आम्ही दोघे तपाला जातो. तिसरा 'दत्त' येथेच राहील. तोच त्रिमुर्ती आहे असे समज." अनुसूयेने अनुज्ञा दिली असता चंद्र व दुर्वास ताप करण्यासाठी निघून गेले. त्रिमुर्ती दत्त मात्र आई-वडिलांची सेवा ...Read More

19

श्री दत्त अवतार भाग १९

श्री दत्त अवतार भाग १९ श्रीनृसिंह सरस्वती दत्तोपासनेचे संजीवक होते. तेराव्या शतकाच्या अखेरीस दत्तोपासनेच्या पुराणप्रवाहात संजीवन ओतण्याचे कार्य श्रीनृसिंह केले. समग्र महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात ते दीपस्तंभासारखे मार्गदर्शक ठरले. श्री नृसिंह सरस्वतीचा अवतार काल शके १३०० ते १३८० (इ.स. १३७८ ते १४५८) असा आहे. श्रीगुरुचरित्र हा अपूर्व ग्रंथ दत्तसंप्रदायाचा वेदतुल्य, प्राणप्रिय ग्रंथ आहे. प्रापंचिकांचा आणि पारमार्थिकांचा तो मनोकामना पूर्ण करणारा चिंतामणीच आहे. या वेदतुल्य गुरुचरित्राचे चरित्रनायक आहेत श्री नृसिंह सरस्वती. श्री गुरूचरित्रात अध्याय ११ ते ५१ या अध्यायात त्यांचे समग्र लीलाचरित्र आलेले आहे. श्री नृसिंह सरस्वती संन्यासधर्माचे सर्वोत्तम आदर्श होते. पूर्वावतार श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपाशीर्वादाने शनिप्रदोष व्रत करून शिवोपासना करणारी कुरूगड्डीची ...Read More

20

श्री दत्त अवतार भाग २० - अंतिम भाग

श्री दत्त अवतार भाग २० श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराजांचा अवतार हा श्री दत्त परंपरेत चौथा मानला जातो. ही परंपरा पुढीलप्रमाणे आहे. वेद आणि पुराणकाळात श्रीदत्त ही विभूती होऊन गेली. अत्रिऋषी आणि अनसूया यांचा पुत्र म्हणजे श्रीदत्तगुरू हे होत. ऐतिहासिक दृष्टीने पाहता दत्तपरंपरेतील पहिले सत्पुरुष म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ होते . पूर्वेकडील प्रांतात पीठापूर येथे १४व्या शतकात त्यांचा जन्म झाला. त्यांनी आपला अवतार संपविताना ‘पुन्हा-भेटेन’ असे अभिवचन भक्तांना दिले आणि त्याप्रमाणे तेच पुढे नृसिंहसरस्वती या नावाने कारंजानगर येथे (कारंजा-वऱ्हाड) जन्मास आले. त्यांच्या अवतारकार्याचा कालावधी इ.सन १३७८ ते १४५८ हा आहे. त्यांनी गाणगापूर येथे श्रीपाद श्रीवल्लभांच्या पादुकांची स्थापना केली. इ. सन ...Read More