एक चुकलेली वाट

(175)
  • 157.5k
  • 28
  • 96.8k

" अहो.... सोडा ना..." लाडीकसा नखरा करत तिने अनिकेतला ढकलल. पण तो तिच्या विरोधाला असा थोडीच जुमाननार होता. त्यानेही आपल्या पिळदार बाहुंच्या ताकदीने तिला झपकन जवळ खेचलं. नाजूक गोऱ्यापान अंगकाठीची ती लगेच त्याच्या मिठीत सामावून गेली. तिच्या नजरेतील लाज हळू हळू गालांवर उतरत होती. त्याच्या मोरपिशी स्पर्शाने तिच्या अंगावर हलकासा शहारा फुलून आला होता. उमलणाऱ्या शहाऱ्यानुसार ती अजुनच त्याला बिलगत होती. त्याच्या कणखर शरीराचा उबदार रेशमी स्पर्श तिलाही आतुर करत होता. एव्हाना तिचा लटका विरोध मावळून गेला होता. त्याच्या शरीराचा अंग प्रत्यंग श्वासात भरून घेण्यासाठी ती बेभान होत होती.

Full Novel

1

एक चुकलेली वाट - 1

एक चुकलेली वाट भाग १ " अहो.... सोडा ना..." लाडीकसा नखरा करत तिने अनिकेतला ढकलल. पण तो तिच्या विरोधाला थोडीच जुमाननार होता. त्यानेही आपल्या पिळदार बाहुंच्या ताकदीने तिला झपकन जवळ खेचलं. नाजूक गोऱ्यापान अंगकाठीची ती लगेच त्याच्या मिठीत सामावून गेली. तिच्या नजरेतील लाज हळू हळू गालांवर उतरत होती. त्याच्या मोरपिशी स्पर्शाने तिच्या अंगावर हलकासा शहारा फुलून आला होता. उमलणाऱ्या शहाऱ्यानुसार ती अजुनच त्याला बिलगत होती. त्याच्या कणखर शरीराचा उबदार रेशमी स्पर्श तिलाही आतुर करत होता. एव्हाना तिचा लटका विरोध मावळून गेला होता. त्याच्या शरीराचा अंग प्रत्यंग श्वासात भरून घेण्यासाठी ती बेभान होत होती. इतक्यात..... ट्रिंग ट्रिंग.... बाजूच्या टेबलावर ठेवलेला ...Read More

2

एक चुकलेली वाट - 2

एक चुकलेली वाट भाग २ निशू, काही झालंय का ग..? अनिताने एकट्याच चाललेल्या निशाला हटकल. महाविद्यालयाच्या विस्तीर्ण आवारात मज्जा मस्ती करत हिंडणाऱ्या त्यांच्या नेहमीच्या ग्रुपला टाळून एकटीच गेटच्या दिशेने जाणाऱ्या निशाला पाहून अनिता धावत तिच्या मागे आली. अनिताच्या चार पाच हाकांना काहीच प्रतिसाद न मिळाल्याने तिने निशाच्या पाठीवर थोपटल. अचानक झालेल्या स्पर्शाने निशा दचकली. मागे अनिताच आहे हे बघून तिला जरा हायस वाटलं. मागचे दोन दिवस ती अशीच वागत होती. अचानक सगळ्यांमध्ये येणं जाणं बंद केलं होत तिने. काही नाही ग..जरा घाई आहे मला तिला उत्तर द्यायचे टाळून निशा भराभर गेटमधून निघूनही गेली. काय झालंय हिला...? ...Read More

3

एक चुकलेली वाट - 3

एक चुकलेली वाट भाग ३ " आह...." ती त्या अंधाऱ्या खोलीतील जुनाट बेडवर परमोच्च आनंद उपभोगत होती. साधारण दहा पंधराच्या आकारातील अंजली लॉज नावाच्या एका जुन्या इमारतीतील ती खोली होती. शहरापासून थोडंसं बाहेर... तो जुना लॉज आपल्या जुनाट खुणा मिरवत उभा होता. बऱ्याच वर्षांपासून साध्या रंगाचाही स्पर्श न झाल्याने भिंतीतून बऱ्याचश्या झाडांनी आपली मूळ रोवली होती. त्यांच्या मुळानी अडवलेल पाणी भिंतीतून झिरपत सगळ्या खोल्यांतून पसरलं होती. त्या ओलसर खोल्यांमधून सोय म्हणून जेमतेम उभ राहता येईल तेवढाच बाथरूम बांधला होता. खाजगीतील अविट गोडीचे क्षण उपभोगत असताना प्रकाशाची कायमच अडचण होते म्हणून पडदे व खिडक्या सदा न कदा बंद असल्याने कधी ...Read More

4

एक चुकलेली वाट - 4

एक चुकलेली वाट भाग - ४ प्रकाश बिअर शॉपीच्या समोर एका बाईक जवळ उभ राहून कित्येक वेळपासून दोन तरुण बोलत होते. बोलता बोलता मध्येच इकडे तिकडे कोणी जवळपास तर नाहीये ना ह्याचाही कानोसा घेत होते. एकंदरीत अवतारावरून ओझरत पाहिलं तरी जरा छपरी प्रकारात मोडणारे ते दोघे. प्रकाश बिअर शॉप गावातून थोडंसं बाहेर दोन शहरांना जोडणारी सीमेवर. त्यामुळे मालकाची बऱ्यापैकी कमाई होत असावी. प्रकाश बिअर शॉपी नावाचा झगमगता बोर्ड, मालकाची आर्थिक परिस्थती आणि कलेची आवड दोन्हीही दर्शवत होता. बाकीची दारूची दुकानं बंद राहतील मात्र एक ड्राय डे सोडला तर बाकी नेहमीच हे शॉप चालू असल्याने पिणाऱ्यांच्या जिव्हाळ्याच ठिकाण होत. हे ...Read More

5

एक चुकलेली वाट - 5

एक चुकलेली वाट भाग - ५ दिवसभर निरनिराळ्या प्रकारे चौकशी करूनही दिपकने तोंड उघडल नव्हतं. दमलेले देसाई आणि अनिकेत बाहेर येऊन बसले. दीपक एवढा निगरगट्ट माणूस त्यांनी आजवर पहिला नव्हता. काही म्हणजे काहीच बोलत नव्हता आणि तसंही पोलिसांकडे फारसे काही पुरावे नसल्याने ते जबरदस्ती करू शकत नव्हते. संध्याकाळची उन्हं उतरून गेली होती. दिवसभराने पक्ष्यांसोबत माणसंही घराच्या ओढीने परतत होती. पक्षांच्या पंखांच्या फडफडीतून आणि माणसांच्या पावलाच्या आवाजाने त्यांची घरी जाण्याची घाई कळून येत होती. केवळ पोलीस स्टेशनमधल्या कोणाला घरी जावस वाटत नव्हतं. नंबरचा सुगावा लागल्यानंतर झालेला हर्ष, फुटल्यावर फुग्यातील हवा निघून जावी तसा निघून गेला. आता पुन्हा कुठून सुरुवात करावी ते ...Read More

6

एक चुकलेली वाट - 6

एक चुकलेली वाट भाग - ६ " का सारखं सारखं बोलवताय मला पोलीस स्टेशनला... आधीच ह्या प्रकरणात खूप बदनामी माझी ते ही फुकट फाकट... याचे परिणाम खूप वाईट होतील... सांगून ठेवतोय.." दीपक नाईक पिसळल्यासारखा पोलीस स्टेशनमध्ये जोरजोरात ओरडत होता. आधीच वर्तमानपत्रांतून त्यांच्या अतिशोयक्तीच्या नियमांप्रमाणे बऱ्याच गोष्टी छापून आल्या होत्या. त्यामुळे आतापर्यंत त्याच्यासमोर झुकणारे लोक, त्याच्याच तोंडावर त्याच्याच विरुद्ध चर्चा करत होते. आजवर पुष्कळ गोष्टी त्याने राजरोस केल्या होत्या पण ह्या कानाची खबर कधी त्या कानाला गेली नाही. पण आता मात्र उगाचच तो पोळला जात होता." एकदाच सगळ खर सांगून टाक.. नाही बोलवणार परत.." अनिकेत शांतपणे उत्तरला. पोलीस स्टेशनच्या त्या दहा ...Read More

7

एक चुकलेली वाट - 7

एक चुकलेली वाट भाग - ७ जुनाट लाकडी खुर्चीवर ती भेदरल्यासारखी बसून होती. वाऱ्याने अस्ताव्यस्त होऊन क्लिपमधून बाहेर निघालेले उनाड पोरांप्रमाणे वाऱ्यावर स्वार होते. कपाळावरून ओघळणारे घामाचे ओघळ तिच्या मानेवरची वळणं पार करत तिच्या घट्ट चिकटलेल्या कपड्यांमध्ये विरून जात होते. खांद्यावरून ढळलेली ओढणी नीट करायचही तिला भान नव्हतं. आपली चोरी पकडली गेल्याने निमुटपणे आपला गुन्हा कबुल करण्यावाचून तिच्याकडे पर्यायच उरला नव्हता. आज अनिकेतसोबत मोरेबाईही होत्या. आपली भूमिका त्यांच्या हातात देऊन अनिकेत खुर्चीवर मस्तपैकी रेलून हातातील चणे संपवत होता. " मिसेस मोरे... हं..." ऐटीत मान किंचितशी डोलवत त्याने मोरेबाईंना इशारा केला. मोरेबाई एखाद्या हरहुन्नरी कलाकारासारख्या आपल्या प्रवेशासाठी तयारच होत्या." मीनाक्षी बाई.... सगळ खर ...Read More

8

एक चुकलेली वाट - 8 - अंतिम भाग

एक चुकलेली वाट भाग ८ अंतिम कसल्याश्या जोरदार माराने आणि थंडगार जाणिवेने तो थरथरला. एक सौम्य गार कळ त्याच्या गेली आणि तो भानावर आला. काही वेळापूर्वी तो बेशुद्ध होऊन पडला होता. आणि त्याला शुद्धीत आणण्यासाठी थंडगार पाण्याचा मारा अखंड चालू होता. त्या पाण्याने त्याचे कपडे पूर्णतः भिजून गेले होते. हलकीशी थंडगार झुळूक त्याच्या अंगाला चाटून गेली आणि त्याच्या अंगावर सर्रकन काटा आला. एव्हाना त्याला शुद्धीत आलेलं पाहून देसाईंनी त्याचे ओले राकट केस आपल्या हातात गच्च पकडुन ओढले. अचानक झालेल्या तेवढ्याशा वेदनेनेही तो विव्हळला. त्याने डोळे किलकिले करत उघडण्याचा प्रयत्न केला... धूसर अंधारात त्याला एक ओळखीची आकृती दिसली.. त्याच्या अंधुक ...Read More