पार - एक भयकथा

(143)
  • 281.3k
  • 61
  • 206.7k

पार - एक भयकथा भाग १ दुपारचे चार वाजायला आले होते. सामानाने खचाखच भरलेली तवेरा आणि पॅगो आता जवळ-जवळ मोकळी झाली होती.चार कामगारांच्या मदतीने अरविंदने सगळं सामान घरात ठेवलं.मोकळ्या रानात एकाला एक लागून जेमतेम चार कौलारू घरे होती. त्यातल्या एका घरात थोड्यादिवसा साठी अरविंदचे कुटुंब शिफ्ट झाले होते. मनीषाने सगळ्यात आधी गॅस आणि आणलेली सिंगल शेगडी लाऊन घेतली.“साहेब येतो आम्ही” सामान आत लाऊन झाल्यावर कामगार बोलले.“थांबा चहा टाकलाय तेवढा घेऊन जा ” मनीषा बोलली.तिच्या आपुलकीने त्यांना खूप बरे वाटले. ध्रुव आणि आर्या अंगणात पकडापकडी खेळत होते. शहरातल्या मुलांना मोकळ्या मैदानात वावरताना पंख फुटल्या प्रमाणे वाटत होते. मालती मावशी मनीषाला मदत

Full Novel

1

पार - एक भयकथा - 1

पार - एक भयकथा भाग १ दुपारचे चार वाजायला आले होते. सामानाने खचाखच भरलेली तवेरा आणि पॅगो आता मोकळी झाली होती.चार कामगारांच्या मदतीने अरविंदने सगळं सामान घरात ठेवलं.मोकळ्या रानात एकाला एक लागून जेमतेम चार कौलारू घरे होती. त्यातल्या एका घरात थोड्यादिवसा साठी अरविंदचे कुटुंब शिफ्ट झाले होते. मनीषाने सगळ्यात आधी गॅस आणि आणलेली सिंगल शेगडी लाऊन घेतली.“साहेब येतो आम्ही” सामान आत लाऊन झाल्यावर कामगार बोलले.“थांबा चहा टाकलाय तेवढा घेऊन जा ” मनीषा बोलली.तिच्या आपुलकीने त्यांना खूप बरे वाटले. ध्रुव आणि आर्या अंगणात पकडापकडी खेळत होते. शहरातल्या मुलांना मोकळ्या मैदानात वावरताना पंख फुटल्या प्रमाणे वाटत होते. मालती मावशी मनीषाला मदत ...Read More

2

पार - एक भयकथा - 2

पार - एक भयकथा भाग - २ “बाय मनु दोन तासात तुम्हाला घ्यायला येतो,काही लागलं तर फोन कर” मनीषा आणि मालती मावशीला सकाळी गावाच्या बाजारात सोडले.“मम्मा आज बाबा आम्हाला त्याच्या साईट वर नेणार आहे ” खिडकीतून मान बाहेर काढून आर्या मनीषाला कौतुकाने सांगू लागली“हो माहितीये मला, बाबांन जवळच रहा जास्त लांब जाऊ नका ” आर्याने बाहेर काढलेली मान हाताने आत सारत मनीषाने मुलांना सुचना दिली आणि दोघी खरेदीला निघाल्या.“मावशी जास्त भाज्या नको घ्यायला फ्रीज नाही तर खराब होतील ”“बाजार काय तसा लांब नाय म्हनल तर मी बी येईन एकली, मोजक्या भाज्या अन किरणाच घेऊया ”दोघी खरेदी करू लागल्या. सगळं समान ...Read More

3

पार - एक भयकथा - 3

पार - एक भयकथा भाग ३ मालती मावशी आल्या, आल्यावर सगळा प्रकार तिने त्यांना सांगितला.“ताई, लई मोठी चूक इथे येऊन जेवढ्या लवकर इथून निघता येईल तेवढं बघा, पारावर वारं आहे, आज पर्यंत खूप जन झाडावरून पडून गेलेत, आता त्या वडाच्या झाडावर काय आहे फळ का फूल का म्हणून चढाव एखाद्याने आणि झाडावरून एखाद दुसरं जण पडणं आपण समजू शकतो पण वीस पेक्षा जास्त बळी घेतलेत त्या झाडान, आधी ती झापाटते वेडं करते आणि पौर्णिमेच्या रात्री झाडावर सूर-पारंब्याचा खेळ मांडून आयुष्याच्या डावातूनच उठवते, ताई साहेबांना लागण व्हायच्या आत परत निघा मला माहितीये तुमचा विश्वास नाय ह्या गोष्टींवर पण ईशाची परीक्षा ...Read More

4

पार - एक भयकथा - 4

पार - एक भयकथा भाग ४ रात्री अडीच वाजता मनीषाची थोडी झोप मोडली. अर्धवट झोपेतच ती अरविंदच्या खांद्यावर टाकायला गेली पण तिचा हात थेट बिछान्यावर पडला ती घाबरून उठली अरविंद शेजारी न्हवता. बाकी सगळे शांत झोपलेले होते.तीने हळूच मालती मावशीला उठवले दोघी अंगणात आल्या.“परसाकड पाहून येते ” मावशी घराजवळील परसाकडे बघायला गेल्या तिथे दरवाजा उघडा होता आत कोणीच न्हवते.रामन्ना आणि शिर्पाद पहाऱ्यावर बसले होते. बसल्या बसल्या त्यांचा डोळा लागला होता.“अरविंदला पहिला का ” तीने त्यांना विचारले.“साहेब साईट वर चाललो एवढंच बोलले बाकी काही बोलले नाय ” रामन्ना डोळे चोळत सांगू लागला.“ती बॅटरी द्या इकडे आणि घरात पोरं एकटीच आहेत ...Read More

5

पार - एक भयकथा - 5 - अंतिम भाग

पार - एक भयकथा भाग ५ ते घरा जवळ पोहचले,घर रिकामे होते ती शेजारच्या घरी रामन्ना कडे गेली तिला धक्का बसला कारण कामगारांच्या घराचे दरवाजे उभे आडवे लाकूड ठोकून बंद करण्यात आले होते आणि ते लोक चिंतातूर होऊन खिडकीत येऊन थांबले होते.“वैनी.... अहो साहेब झपाटलेत... वाचवा आम्हास्नी ” मनीषाला बघून शिर्पाद खिडकीत येऊन गया वया करू लागला.“त्यांच्या अंगात बारा हत्तीच बळ आलय हातात कुऱ्हाड घेऊन आम्हा सगळ्यांना दांडाळत इथे आणून आत कोंडलय पळून जाणाऱ्या हनम्याच्या पायावर कुऱ्हाडीने घाव घातलाय ” तो सांगू लागला.“रामन्ना पोर कुठ आहेत ” मुलांच्या चिंतेने मनीषाच्या पोटात गोळा आला.“वैनी, घाई करा पोरांना घेऊन साहेब रानात ...Read More