प्रेरक- विचार

(23)
  • 51.7k
  • 5
  • 19.7k

प्रेरक-विचार -भाग-१ ----------------------------------- मित्र हो - नमस्कार - समाजात वावरतात असतांना आपले व्यक्तित्व संतुलित , संयमशील , असले तर आपली एक वेगळीच अशी इमेज सर्वत्र निर्माण होते , उत्तमोत्तम ग्रंथ , पुस्तके , थोर-व्यक्तिमत्वांची चरित्र , जीवन-कार्य यांच्या पासून आपण आपल्यातील व्यक्तिमत्वाची जडण-घडण होते, अशाच काही मौल्यवान [रेरक-विचारावर आधारित असे हे ललित लेख क्रमश आपल्या साठी घेऊन आलो आहे . प्रेरक-विचार -भाग -१ , कसा वाटला जरूर कळवणे , याचा भाग-२ लवकरच आपल्या पर्यंत घेऊन येतो आहे. स्नेहांकित - अरुण वि.देशपांडे - पुणे. ९८५०१७७३४२ ----------------------------------------- लेख-१ जिद्द ,कठोर परिश्रम . वगेरे .....!------------------------------------------------------------------- मित्र हो- नमस्कार..तसे पाहिले तर आपण सामान्य माणसे

Full Novel

1

प्रेरक- विचार - भाग- १

प्रेरक-विचार -भाग-१ ----------------------------------- मित्र हो - नमस्कार - समाजात वावरतात असतांना आपले व्यक्तित्व संतुलित , संयमशील , असले आपली एक वेगळीच अशी इमेज सर्वत्र निर्माण होते , उत्तमोत्तम ग्रंथ , पुस्तके , थोर-व्यक्तिमत्वांची चरित्र , जीवन-कार्य यांच्या पासून आपण आपल्यातील व्यक्तिमत्वाची जडण-घडण होते, अशाच काही मौल्यवान [रेरक-विचारावर आधारित असे हे ललित लेख क्रमश आपल्या साठी घेऊन आलो आहे . प्रेरक-विचार -भाग -१ , कसा वाटला जरूर कळवणे , याचा भाग-२ लवकरच आपल्या पर्यंत घेऊन येतो आहे. स्नेहांकित - अरुण वि.देशपांडे - पुणे. ९८५०१७७३४२ ----------------------------------------- लेख-१ जिद्द ,कठोर परिश्रम . वगेरे .....!------------------------------------------------------------------- मित्र हो- नमस्कार..तसे पाहिले तर आपण सामान्य माणसे ...Read More

2

प्रेरक- विचार - भाग-२

प्रेरक-विचार - भाग-२ --------------------------------------- लेख- १.समारंभ आणि कार्यक्रम ..!---------------------------------------------प्रसंगानुसार आपण अनेक ठिकाणी जातो. अशावेळी एक गोष्ट हमखास अनुभवावी ..जी अगदी कॉमन आहे. मी घेतलेला हा अनुभव .तुम्ही सुद्धा अनेकदा घेतला असेल. एखद्या समारंभाच्या ठिकाणी फक्त यजमान आपल्याला परिचित असतात, किंवा त्या परिवारातील एखादाच मेम्बर आपल्या मित्रपरिवारातील असल्यामुळे आपण समारंभाला आलेलो असतो , बाकी त्यांच्या परिवारातील इतरांशी आपला परिचय नसतो, ओळख तर नसतेच , केवळ एक -परिचित -म्हणून निमंत्रित तरीही अनोळखी असे आपले त्या ठिकाणी स्थान असते . हे असे समारंभ ,कार्यक्रम ..जास्त करून पारिवारिक - असतात , आपल्या परिचितांच्या -स्नेहीजानाच्या -आणि नातेवाईक या अशा -वर्तुळातील एखाद्या महत्वाच्या व्यक्ती ...Read More

3

प्रेरक -विचार भाग - ३

नवरा-बायको पुढे आई-बाबा या भूमिकेत शिरतात .आणि या नवीन जबाबदारीच्या ओझ्याने गोंधळून जातात ,काहीजण तितके दक्ष होऊन लक्ष देण्याचा अतिरेक करतात आणि आपल्या बालकांना परेशान करून टाकीत असतात .. आई-बाबांचे आपल्या मुलांकडे लक्ष असणे , ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे ..मुलं घरात आणि बाहेर कशी वागतात ?, शाळेत कशी वागतात ,सगळ्यांशी त्यांचे मित्रत्वाचे नाते आहे काय ? मुलांना योग्य संगत लाभली आहे का ? या काळजीच्या आणि चिंता करण्याच्या गोष्टीकडे प्रत्येक आई-बाबांचे लक्ष असणे गरजेचे आहे. यासाठी .,वेळेवर लक्ष दिले तरच .. मुलं भरकटणार नाहीत ,आणि दुर्लक्ष झाले तर वेळेवर लक्ष दिले नाही याचा आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल हे पण लक्षात ठेवावे . ...Read More

4

प्रेरक- विचार - भाग - ४ था

प्रेरक-विचार - भाग-४ था ---------------------------------- लेख- मनापासून ------------------------------------------------- मन करुणेचा डोह , मन मायेचा सागर मन प्रवाही , मनात भरती प्रेमाची ... अशी अवस्था मोठी आनंद देणारी आहे. मनापासून या शब्दातूंच आपल्याला उत्स्फूर्त-भावनेचा स्पर्श होत असतो .आता हेच बघा की , मी काय, तुम्ही काय ,अगदी कुणी असो, आपण जे कार्य आपल्या हातात घेतो ते पूर्ण करण्यासाठीचे सर्व प्रयत्न आपण अगदी मनापासून करीत असतो , -तन-मन-धन अर्पण करून स्वतःला कार्यात झोकून देतो .अशी अवस्था कधी असते ? याचे उत्तर आहे जेंव्हा आपण काम मनापासून करीत असतो. आपले काम पाहून बघणारे म्हणतात ..क्या बात है..इसको बोलते काम. ...Read More

5

प्रेरक- विचार . भाग - ५ वा

मित्र हो - नमस्कार , प्रेरक -विचार भाग -५ वा आपल्या अभिप्रायासाठी देतांना खूप आनंद होतो आहे. हे लेखन कसे वाटले ?, आपले अभिप्राय जरूर कळवणे. १. लेख - शाळेत जाणऱ्या मुलांचा डबा . --------------------------------------------------- रोजच्या दैनंदिन वेळापत्रकाच्या ताब्यात राहून आपण सारेजण अतिशय कंटाळून गेलेलो असतो ,घर ते कार्यालय आणि परत कार्यालय ते घर या येण्याजाण्याच्या रस्त्यावरून कधी काळी आरामात आणि रमत-गमत जाता येत होते असे म्हणायची वेळ फक्त मोठ्या शहरातील लोकांच्यावर आहे असे मुळीच नाही , लहान मोठ्या शहरातील, गावातील स्थिती फारशी वेगळी नाही तिथल्या मानाने आता तिथेही गर्दी आणि गोंधळ आहेच आहे . ...Read More