शोध चंद्रशेखरचा!

(301)
  • 171.9k
  • 16
  • 80.8k

शोध चंद्रशेखरचा! १.---- विकीने आपली कार 'सावधान! घाट आरंभ!' या सूचनेच्या पाटीजवळ थांबवली. त्याच्या कानाजवळचे केस पांढरे झाले होते. बाकी वय सांगणाऱ्या खुणा शरीरावर कोठे दिसत नव्हत्या. पैसा आणि दारू, हीच काय ती त्याची दोन व्यसने होती. पैसा 'कमावण्यात' त्याला कधीच रस नव्हता. पण 'मिळवण्या' साठी तो अगणित फंडे करायचा. अनाथाश्रमातल्या बालपणाचे ओरखडे घेऊन तो जगला आणि वाढला होता. त्याला या जगाची भाषा चांगलीच आवगत झाली होती! कळायला लागल्यावर, रहीम चाच्यांच्या ग्यारेज मध्ये काम मिळाले. देशी विदेशी गाड्यांची अनॉटॉमी डोक्यात फिट होत गेली. गाड्यांच्या ट्रायलने, ड्रायव्हिंग परफेक्ट करून घेतले होते. त्याने हिप पॉकेट मधून काढून, चापटी बाटली तोंडाला लावली. एक

Full Novel

1

शोध चंद्रशेखरचा! - 1

शोध चंद्रशेखरचा! १.---- विकीने आपली कार 'सावधान! घाट आरंभ!' या सूचनेच्या पाटीजवळ थांबवली. त्याच्या कानाजवळचे केस पांढरे झाले होते. वय सांगणाऱ्या खुणा शरीरावर कोठे दिसत नव्हत्या. पैसा आणि दारू, हीच काय ती त्याची दोन व्यसने होती. पैसा 'कमावण्यात' त्याला कधीच रस नव्हता. पण 'मिळवण्या' साठी तो अगणित फंडे करायचा. अनाथाश्रमातल्या बालपणाचे ओरखडे घेऊन तो जगला आणि वाढला होता. त्याला या जगाची भाषा चांगलीच आवगत झाली होती! कळायला लागल्यावर, रहीम चाच्यांच्या ग्यारेज मध्ये काम मिळाले. देशी विदेशी गाड्यांच ...Read More

2

शोध चंद्रशेखरचा! - 2

शोध चंद्रशेखरचा! २.---- सकाळी साडेपाच वाजता तिचा मोबाईल वाजला. कंट्रोल रूमचा नंबर होता. " इन्स्पे.इरावती! बोला, इतक्या सकाळी काय निघालं?" "गुड मॉर्निंग, मॅडम. मी राकेश बोलतोय. सॉरी टू डिस्टर्ब् यु. घाटात एक अपघात झालाय." राकेश इराच्याच बॅचचा. आणि छान मित्र पण होता. त्याला प्रमोशन नव्हते मिळाले म्हणून, तो अजून तिला जूनियरच राहिला होता इतकेच. तरी तो टँलेन्टेड होता. "अरे, यार, घाटात अपघात होतातच. मला का सकाळी, सकाळी त्रास देतोयस?" " इरा, जरा जागी हो. खरे तर रात्रीच तुला फोन करणार होतो. पण तुझ्या नाईट ड्युटीवाल्या शिंदेकाकाला तिकडे पाठवलाय. तू त्याला फोन कर. तो सगळं सांगेल. सुपरिंटेंडन्ट जोग मला बोलावतोय, ...Read More

3

शोध चंद्रशेखरचा! - 3

शोध चंद्रशेखरचा! ३---- आपल्या लांब सडक बोटात धरलेली किंगसाईझ सिगारेट, कस्तुरीने जवळच्या ash ट्रे मध्ये चिरडून विझली. मनातली चरफड निर्जीव सिगारेट वर काढली होती. पसरट बुडाच्या जड काचेच्या ग्लासातल्या, जीनच्या घोटकडे, जडपापण्यांनी एक नजर टाकली. तिच्या धुंद डोळ्यांना पापण्यांचे ओझे पेलवत नव्हते. त्या क्षणा क्षणाला मिटत होत्या. अट्टाहासाने तिने पुन्हा डोळे उघडले. जीनच्या बाटलीत राहिलेली जीन ग्लासात ओतून घेतली, आणि तो ग्लास पुन्हा तोंडाला लावला. रोस्टेड काजूचे चार दाणे तोंडात टाकून ते सावकाश चघळू लागली. आज पुन्हा चंद्रू घरी आला नव्हता. म्हणजे आजून पर्यंत तरी. एखादी बिझनेस मिटिंग असेल तर, होतो त्याला घरी यायला उशीर. पण तो अकरापर्यंत परततो. ...Read More

4

शोध चंद्रशेखरचा! - 4

शोध चंद्रशेखरचा! ४---- इन्स्पे.इरावती तिच्या पोलीस स्टेशनला पोहंचली, तेव्हा दुपार टाळून गेली होती. येतायेत तिने सोबत आणलेली ऑइल असलेली आणि तो रक्ताळलेले कपड्याचा तुकडा परीक्षणासाठी, फॉरेन्सिस लॅब मध्ये दिला होता. फिंगर प्रिंट आणि ब्लडचा रिपोर्ट सकाळपर्यंत येणार होता. शिंदेकाकाच्या तपासाची माहिती पण, रात्री जेव्हा ते येतील, तेव्हा कळणार होती. आता फक्त त्या अपघातग्रस्त गाडीच्या रजिस्ट्रेशनची माहित मिळू शकणार होती. तिने राकेशला फोन करून लक्षात ठेवलेला गाडी नंबर सांगितला. आणि माहिती काढण्यास सांगितले. तो RTOच्या ऑफिसिअल साईट वरून माहिती काढू शकणार होता. राकेश डिपार्टमेंटचा सायबर जीन होता. पद नसले तरी, तो हौसेने हे काम करायचा. त्याला या कामात गती होती. ...Read More

5

शोध चंद्रशेखरचा! - 5

शोध चंद्रशेखरचा! ५-- "सर, आज एक कॉन्फरन्स आहे. संध्याकाळी आणि डिनर सुद्धा. मी तुमच्या वतीने कन्सेंट कळवलाय. एक नवीन आपल्याला मिळू शकते." चैत्राली चंद्रशेखरला सांगत होती. चंद्रशेखरच्या कपाळावर आठ्या पडल्या. कालच तो दुबईहून आला होता. पुन्हा तो प्रवास त्याला नको होता. पण एक छानशी बिझिनेस ऑपॉर्च्युनिटी त्याला सोडवत नव्हती. शिवाय चैत्रालीची फोरसाईट वादातीत होती. "ओके, फ्लाईट कधीची आहे?" "सर, औरंगाबाद फ्लाईट्स अनियमित असतात. म्हणून बुकिंग केलं नाही. बाय रोड जावे लागेल. हार्डली सहा -सात तास लागतील. आणि तुम्हाला लॉंग ड्राईव्हचा आनंदपण घेता येईल! तुम्हाला आवडते ना ड्राइव्ह करायला? पहा,नसता ड्राइव्हर अररेन्ज करता येईल म्हणा!" "का? आपला ऑफिसचा सुलतान कोठे ...Read More

6

शोध चंद्रशेखरचा! - 6

शोध चंद्रशेखरचा! ६--- कॅफे रुद्राक्ष, विकीच्या घरा पासून फक्त हाकेच्या अंतरावर होते. पैशाची बॅग पाठीशी लावून घरी येता येणार दुसरे कारण असे होते कि, गाडी सफाईचा नादात त्याचे कपडे खराब झाले होते, ते पण त्याला चेंज करता येणार होते. तो घरात घुसला, तोंडावरून पाण्याचा हात फिरवला, तोच ओला हात डोक्यावरच्या केसातून पण फिरवला. कपडे बदलले. फसाफसा अंगभर डियो मारला. त्याने मनगटावरल्या घड्याळात नजर टाकली. घरापासून मोजून सात मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर कॅफे रुद्राक्ष होते. आजून त्याच्या कडे बराचसा वेळ होता. खुर्चीत तांगडे फाकवुन बसत, त्याने टीव्ही ऑन केला. ब्रेकिंग न्यूज चालू होत्या. त्याकडे लक्ष न देता, त्याने आधी सिगारेट पेटवली. ...Read More

7

शोध चंद्रशेखरचा! - 7

शोध चंद्रशेखरचा! ७-- इरावती त्या सिक्रेट मिटिंग साठी, जोग साहेबांच्या घरी पोहंचली तेव्हा, जोग साहेबांसोबत, एक साधासा दिसणारा माणूस, आवाजात बोलत होता. तिला पहाताच तो एकदम गप्प झाला. "या इन्स्पे.इरावती. आणि इरा हे आहेत मिस्टर राजे!" "म्हणजे, गुप्तहेर विभागातले!" "हो तेच हे!" "सर, तुमचे नाव खूप ऐकले होते. आज प्रत्यक्ष भेट होत आहे." इरावती भारावून गेली होती. "कमनिग तो द पॉईंट. दुबईतून -----------" नंतर ते तासभर बोलत होते. इरावती आणि जोगसाहेब फक्त ऐकत होते! आपल्या हद्दीत काय उत्पात घडू शकतो, याच्या कल्पनेनेच इरावती हादरली होती. ००० ती गुप्त मिटिंग संपवून इरावती आपल्या स्टेशनकडे निघाली. तिने मिटिंग साठी मोबाईल सायलेंट ...Read More

8

शोध चंद्रशेखरचा! - 8

शोध चंद्रशेखरचा! ८---- " साला हमारा ऑर्डरवला पाकीट क्या किया? हमको बोगस माल दिया!" तो चौताळलेला पठाण गरजला. दुबईच्या मॉलच्या, मागल्या गल्लीत मेहबूबचे ते छोटेखानी लेदर गुड्सचे 'अफगाण लेंदर्स' हे दुकान होते. त्याच्या दुकानातील कातडी वस्तू, या हाताने तयार केलेल्या असत. प्रत्येक नग एक 'क्राफ्ट' पीस होता. जाणकार आवर्जून त्याच्या दुकानाकडे वाकडी वाट करत. काही शेख लोक त्याच्याकडून आपल्या आवडी प्रमाणे आणि डिझाईन प्रमाणे वस्तू बनवून घेत.असेच एक स्पेशल बेल्ट आणि पुरुष वापरतात ते मनीपर्सची ऑर्डर मिळाली होती. साधारण किमतीच्या दसपट पैसे त्याला मिळणार होते! फक्त त्याला त्यांनी दिलेला कागद त्या पाकिटाच्या लेदरच्या दोन लेयरच्या आत लपवून ते पाकीट ...Read More

9

शोध चंद्रशेखरचा! - 9

शोध चंद्रशेखरचा! ९-- इरावतीच्या डोक्यात प्रचंड गोंधळ मजला होता. चंद्रशेखरच्या अपघाताच्या घटने संदर्भात जे तुकडे हाती आले होते ते, स्पष्ट करण्यास पुरेसे नव्हते. अजूनही चंद्रशेखरचा ठाव ठिकाणा लागलेला नव्हता. अर्जुना आणि शिंदेकाकाच्या गोंधळाने तो किडन्यापर हातून गेला होता. तो या गोंधळाच्या वेळेस कॅफे रुद्राक्ष मधेच असण्याची शक्यता होती. मुळात हि 'किडन्यांपिंगची' कथाच इतकी ठिसूळ होती कि, त्यावर विश्वास ठेवणे कठीण होते! एक तर किडन्यापर खंडणीसाठी फोन करतच नाही! हि गोष्ट कस्तुरीला सांगितल्यावर, मग तो तिला फोन करतो. हे कसे? कस्तुरी खंडणीची रक्कम बागेत भरून ती देण्यास इतकी का उच्छुक वाटली? कस्तुरीची माहिती जी अर्जुनाने मिळवली होती, त्यावरून काही गोष्टी ...Read More

10

शोध चंद्रशेखरचा! - 10

शोध चंद्रशेखरचा! १०--- माणिकने चंद्रशेखरला घेऊन जाणाऱ्या गाडीची पाठ सोडली नव्हती.घाट उतरून त्या तरुणाची गाडी जेथे थांबली, तेथे हॉस्पिटल तर, एक दोनमजली बांगला होता! साला काय झमेला आहे? हा तरुण चंद्रशेखरला घेऊन या घरापाशी का आलाय? माणिकचे अनुमान चुकल्याने तो बेचैन झाला. त्या तरुणाने चंद्रशेखरला गाडीतून काढून गेटच्या पोलला टेकून ठेवले. पोलवरली कॉल बेल दाबून तो झटकन गाडीत बसून निघालाही! आता आपण काय करायचे? माणिकच्या नजरेसमोर, चंद्रशेखरला हॉस्पिटलमध्ये नेणे गरजेचे होते! त्याने मागचा पुढचा विचार न करता, आपली गाडी बाजूला घेऊन थांबवली. झटक्यात दार उघडून, तो त्या गेट पर्यंत पोहंचला. त्याने चंद्रशेखरला खांद्यावर टाकले, तेव्हड्यात बंगल्याचे समोरचे दार उघडून ...Read More

11

शोध चंद्रशेखरचा! - 11

शोध चंद्रशेखरचा! ११-- किरकोळ अपघाताने गायत्रीचे आयुष्य उद्धस्थ झाले होते. अपघातात तिचे दोन्ही पाय गेले होते. आणि ती व्हीलचेयरवर पप्पाच्या माघारी तिने, त्यांच्या कंपनीचा डोलारा नुस्ता संभाळलाच नव्हता तर, तो वाढवून नावारूपाला आणला होता. मॅनेजमेंट मास्टर्स डिग्रीच्या शेवटच्या वर्षांपासून ती चंद्रशेखरच्या सम्पर्कात होती. मृदू बोलणारा, समोरच्याला न दुखावता, आपले टार्गेट गाठणारा हा तरुण तिला आवडला. हौशी होता. रसिक होता. नाटकात कामे पण करायचा. अभिनयाच्या अनेक ट्रॉफी त्याला मिळाल्या होत्या. तिने त्याच्याबरोबर लग्न केले. अर्थात पप्पांची संमती घेऊन. चंद्रशेखरच्या सॉफ्ट स्किलचा गायत्रीला, तिच्या व्यसायात फायदा होत होता. हळूहळू चंद्रशेखरचे कंपनीत वजन वाढत गेले. सगळे सुरळीत आहे, असे वाटत असताना तो ...Read More

12

शोध चंद्रशेखरचा! - 12

शोध चंद्रशेखरचा! १२---- चंद्रशेखरला हुडकायचे म्हणजे, विकीला त्या रात्रीच्या दोन मजली इमारती पर्यंत जाऊन चौकशी करावी लागणार होती. त्यात एक अडचण होतीच. त्याने जेव्हा चंद्रशेखरला गेटच्या पोलला टेकून ठेवले होते, तेव्हा रात्र होती. सर्वत्र सामसूम होती! कोणाला विचारणार? फक्त घरातल्या माणसालाच विचारावे लागणार होते. त्यांच्या कडूनच काही तपास लागू शकणार होता. तो भराभर तयार झाला. ट्रायलसाठी आणलेली गाडी सुरु केली. तो त्या घराकडे निघाला तेव्हा, गाडी पाठोपाठ एक बाईक येत होती. त्याला ती एकदोनदा मिररमध्ये दिसली सुद्धा. पण ती आपल्याला फालो करत असल्याचा त्याला संशय सुद्धा आला नाही! तो त्याच्याच विचारात होता. त्याला ती व्यक्ती कोण आहे हे कळले ...Read More

13

शोध चंद्रशेखरचा! - 13

शोध चंद्रशेखरचा! १३--- "मॅडम, विकीको क्यू लोकप मे बंद किया?" राहीमचाचाच्या आवाजात गहिवर होता. "चाचा, इसने एक आदमी को किया है! और हमें ओ आदमी चाहिये! तेरा विकी बोलता है, उसे कुछ याद नाही! " इन्स्पेक्टर इरावती त्या म्हाताऱ्याला समजावून सांगत होती. "ना. विकी बदमाश हो सकता है, पर झूट नाही बोलता. उसे भूलनेकी आदत है! इलाज भी कर रहा है! बिन मा बाप का बचपण गुजारा है! दुनियाने खूब ठोकरे मारी है उसे! रोटी,और पैसे कि दुनियाने इसे, लालची बना दिया है! बाकी दिलसे थोडा रुखा है, पण बुरा नाही है! उसे छोड दो मॅडमजी! मेरे लिये ओ ...Read More

14

शोध चंद्रशेखरचा! - 14

शोध चंद्रशेखरचा! १४--- सीट बेल्ट लावून, चंद्रशेखर BMW च्या स्टियरिंगवर हात ठेवून, क्षणभर डोळे मिटून बसला. कितीतरी दिवसांनी, तो ड्राइव्ह करणार होता. साल, त्या सुलतानाला काढून टाकला पाहिजे, कायमचा. म्हणजे गाडीतरी हाती लागेल. सत्तर -ऐन्शी -शंभरवर आज रेस करणार. फार्मुला वन मध्ये पार्टीसिपेट करण्याचे त्याचे स्वप्न, या कंपनीच्या कामांत राहूनच गेले होते. खरं सांगायचं तर भन्नाट वेगानं कार पळवण्यात जो थरार आहे तो, साला, त्या दारूत नाही आणि त्या दुबईवालीत पण नाही! तिच्या आठवणीने त्याचे अंग शहारले. त्याने सावकाश गाडी सुरु केली. तो मेन रोडकडे निघाला. एक पांढरी स्विफ्ट त्याला साईड मिरर मध्ये ओझरती दिसली, पण त्याने फारसे लक्ष ...Read More

15

शोध चंद्रशेखरचा! - 15

शोध चंद्रशेखरचा! १५--- कस्तुरीने फोन बंद केला. तिचे डोके जड पडले होते. आधी चंद्रशेखरच्या किडन्यांपींगचा फोन. किडन्यापर या इरावतीच्या सुटला. आता हा दुसराच माणूस फोन करतोय! काय तर चंद्रशेखरची बॉडी ताब्यात आहे म्हणे याच्या! काय खरे काय खोटे परमेश्वरच जाणे. चंद्रशेखर मेल्याचे दुःख नाही. पण पोलिसी ससेमिरा मागे लागणार. या पोलिसांची डोकी वेडीवाकडी चालतात. चंद्रशेखरच्या मृत्यूने, सर्वात ज्यास्त फायदा आपल्यालाच होणार आहे. हे सत्य आहे. मग आपणच या अपघाताचे षडयंत्र रचले, असा आरोप पोलीस ठेवू शकणार होते! आता तर तो मेल्याचे कळतंय! म्हणजे खुनाचा आरोप सुद्धा अपेक्षित आहे! बापरे! आपले आता काय होणार? कस्तुरी धास्तावून गेली. आत्ता आलेला फोन ...Read More

16

शोध चंद्रशेखरचा! - 16

शोध चंद्रशेखरचा! १६--- "हू, बोल!" इन्स्पेक्टर इरावतीने मोबाईल कानाला लावला.तो कॉल तिच्या एका इंफॉर्मरचा होता.आज सकाळी लवकरच इरावती ऑफिसला होती. काही पेपरवर्क बाकी होते. "मॅडम, गायत्रीदेवी आणि चंद्रशेखरचे लव्ह मॅरेज होते. मुळात गायत्रीच्या वडिलांच्या कंपनीत, चंद्रशेखर नौकर होता. गायत्रीनेच त्याला कंपनीत घेतले होते. गायत्रीच्या लग्नानंतर त्यांचे वडील वारले. कंपनी गायत्रीकडे आली. गायत्रीचा अपघात झाला. त्यात तिचे पाय गेले. यात चंद्रशेखरचा हात असल्याची वंदता होती. तिच्या गैरहजेरीत कंपनी दुबळी झाली. पावर ऑफ अटॉर्नीच्या जोरावर चंद्रशेखरने कंपनी विकून टाकली! ज्या कंपनीनीने गायत्रीची कंपनी टेकओव्हर केली, आज तिचा मालक चंद्रशेखर आहे! गायत्रीशी घटस्फोट घेऊन, चंद्रशेखरने कस्तुरीशी लग्न केले. चंद्रशेखरच्या विश्वासघाताचे दुःख विसरण्यासाठी, ...Read More

17

शोध चंद्रशेखरचा! - 17

शोध चंद्रशेखरचा! १७--- इरावती पोलिसस्टेशनच्या जवळ आली तेव्हा, तिला एक कार वऱ्हांड्यात उभी रहात असलेली दिसली. आणि त्यातून कोणीतरी होते. दारे उघडत असताना कारवाल्याला, इरावती साईड मिरर मध्ये दिसली असावी. कारच्या उघड्या खिडकीतून, कोणीतरी फायरिंग केली. इरावतीने बाईक फेकून, जमिनीवर लोटांगण घेतले. त्या दरम्यान तिने होल्डरमधून गन हाती घेतली होती. कारच्या दाराच्या खाली दिसणाऱ्या पायावर तिने फायर केला. उतरणारा माणूस पटकन पुन्हा गाडीत घुसला आणि वेगात गाडी निघून गेली! धूळ झटकत इरावती उभी राहील. तोवर शकील, शिंदेकाका, आणि आशा पोलीस स्टेशन मधून धावत बाहेर आले. कसला आवाज होता, मॅडम? आशाने निरागसपणे विचारले. अरे देवा! तो बुलेट फायरिंगचा आवाज होता! ...Read More

18

शोध चंद्रशेखरचा! - 18

शोध चंद्रशेखरचा! १८--- घड्याळात पाचचा सुमार होता. कस्तुरी बैचैन झाली होती. अनोळखी फोनचा ती मागोवा घेणार होती. पर्स मधले ढिगल्यावरले, छोटे पिस्तूल पाहून तिला आधार वाटला. वेळ पाडलीतर बेधडक चाप दाबायचा, हे तिने ठरवून टाकले होते. बगलेत पर्स मारून ती निघाली. भिवंडी पर्यंत पोहचायला साधारण तासभर लागणार होता. पण मुंबईच्या ट्रॅफिकचा भरोसा नव्हता, म्हणून ती थोडेसे लवकरच निघाली होती. समजा, ती भिवंडीत लवकर पोहंचली तर, एखादे सिसिडे गाठून कोल्ड कॉफी विथ व्हॅनिला घेण्याचे तिने ठरवले. तिच्या अपेक्षेप्रमाणे ती सव्वासहाला भिवंडी एरियात पोहंचली. मजूर लोकांची वस्ती होती, तरी तिला एक रस्त्यालगतचे सिसिडे सापडलेच. तेथे अंडरग्राऊंड पार्किंगची सोय होती. ती गाडी ...Read More

19

शोध चंद्रशेखरचा! - 19

शोध चंद्रशेखरचा! १९ --- संधी प्रकाशात पीटरचे ते गोडाऊन भूत बंगल्या सारखे दिसत होते. मुख्य रस्त्याच्या खोल आतल्या बाजूला होते. दोन किलोमीटरवर समुद्रकिनारा होता. गोडाऊन पर्यंत कच्चा रास्ता होता. त्या कच्या रस्त्यावरून, एक छोटा जुना तरी दणकट टेट्रा ट्रक तोल सांभाळत गोडाऊनच्या मागच्या बाजूला भिंतीला खेटून उभा राहिला. त्यातून दोन काळ्या सावल्या उतरल्या आणि आपल्या कामाला लागल्या! त्यांनतर साधारण अर्ध्या तासाने, एक मारुती झेनच जून डबडं पीटरचा झोपड्या जवळ थांबलं. त्यातून आधी सिगारेटचं पेटत टोक आणि त्यामागे सुलेमान बाहेर आला. दुसऱ्या बाजूने बक्षी उतरला. तेरा ये सिग्रेट बुझा! सौ किलोमीटरसे जलता सिग्रेट लॉकेट होता! काम के वखत मत पिया ...Read More

20

शोध चंद्रशेखरचा! - 20

शोध चंद्रशेखरचा! २०--- राकेश ऑन लाईन होता. कंट्रोलरूमला डिफेन्स सेलचा स्पेशल मेसेज होता. 'बक्षी भिवंडी एरियात पीटर नामक माणसाच्या स्टोरेजच्या गोडाऊन जवळ आहे. अलर्ट रहा!.' राकेशने झटक्यात इरावतीच्या फोनचे लोकेशन चेक केले. कारण तिने, चंद्रशेखरच्या प्रकरणात बक्षी असल्याची शंका राकेश जवळ व्यक्त केली होती. बापरे! इरावतीच्या मोबाईलचे लोकेशन, भिवंडीच्या त्याच 'पीटर कोल्ड वेयर हाऊस' दिसत होते! त्याने तिच्या पोलीस स्टेशनला फोन लावला. शकील ने त्याचा कॉल उचलला. "शकील, इरा धोक्यात आहे! ताबडतोब तिला कव्हर करा! मी तुझ्या मोबाईलवर ते लोकेशन पाठवतो. असतील तेव्हडे निघा. बाकी कुमक काही वेळात पोहचेल." शकील आणि शिंदेकाका लगेच निघाले.शकीलने गि पि यस वर, राकेशने ...Read More

21

शोध चंद्रशेखरचा! - 21

शोध चंद्रशेखरचा! २१--- सकाळी इरावती ऑफिसात पोहंचली. कामाचा ढीग तिची वाट पहात होता. आशाने सगळे रिपोर्ट्स तिच्या टेबलवर व्यवस्थित ठेवले होते. काल तीन मृतदेह कोल्ड स्टोरेजच्या गोडाऊन मध्ये सापडले होते. त्यातील तिच्या अपेक्षेप्रमाणे एक चंद्रशेखरचा होता. बाकी दोघांचीही ओळख पटली होती. एक, त्या कोल्ड स्टोरेजचा मालक पीटर होता. ड्रग्ज ट्रांस्पोर्टेशनच्या संदर्भात त्याचे बरेच रेकॉर्ड पोलिसात तयार होते. दुसरा सुलेमान होता. अनेक गुन्ह्यात, तो पोलिसांना हवा होता. बांगलादेश, नेपाळ बरोबरच तो, दोनदा पाकिस्तानातही जाऊन आला होता. दुबईला तर नेहमीच! माणिकचे फारसे पोलीस रेकॉर्ड नव्हते. 'मी माणिक' याव्यतिरिक्त त्याची कोठेच नोंद नव्हती! हा आणि विकी अश्या केस मध्ये कसे आलेत? हे ...Read More

22

शोध चंद्रशेखरचा! - 22 - अंतिम भाग

शोध चंद्रशेखरचा! २२--- इरावतीने ते पाकीट हातात घेतले. हीच ती वस्तू असण्याची शक्यता होती, जी चंद्रशेखर कडून विकीने घेतली तिने ते पाकीट आलटून पालटून पहिले, सामान्य प्रकारचे ते पाकीट होते. अशी पाकीटे, शेकडोंच्या संख्येने फुटपाथवर मिळाली असती. पण असे काहीतरी यात विशेष आहे, कि ज्यासाठी दुबईतून बक्षी सारखा खतरनाक माणूस, मुंबईत आला होता! या पाकिटाचा संबंध जर अतिरेक्यांशी असेलतर? तर हि गोष्ट राजेंच्या कानी घालणे गरजेचे होते. तिने राजेंसरांचा पर्सोनल नंबर फिरवला. राजेंनी तो फोन कट केला. क्षणभरात तिच्या मोबाईलची रिंग वाजली. "इन्स्पे. इरावती. एक गोष्ट लक्षात ठेवा. मला डायरेक्ट फोन करत जाऊ नका! कारण हे कॉल लीक होऊ ...Read More