महती शक्तीपिठांची

(16)
  • 149.2k
  • 3
  • 58.7k

महती शक्तीपिठांची भाग १ अन्य स्थाने वृथा जन्म निष्फलम् गतागतम्। भारते च क्षणं जन्म सार्थक शुभ कर्मदम्।। वरील पदाचा पुराणात आध्यात्मिक आणि सखोल अर्थ आहे. भारतात अनेक तीर्थक्षेत्रे आहेत. या तीर्थक्षेत्रांत शक्ती पीठाचे विशेष महत्त्व आहे. अशा शक्ती पीठात साधना करून अनेक साधू-संतांनी परमतत्वाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे. प्राचीन काळातील ऋषी-मुनींची नावे आजही मोठ्या श्रद्धेने घेतली जातात. परमतत्वाचा अनुभव प्राप्त झालेले स्वामी करपात्री महाराज उर्फ महोपाध्याय गोपीनाथ ‍कविराज यांच्या नावाचा उल्लेख आजही विसाव्या शतकात केला जातो. अनेक पाश्चात्य विद्वानांनी भारताच्या पावन भूमीवर स्वत:ला परमतत्व दर्शनाच्या अंतिम टप्प्यावर नेलेले आहे. शिवाय अनेक पाश्चात्य पंडितांनी यावर धार्मिक ग्रंथही लिहिले

Full Novel

1

महती शक्तीपिठांची भाग १

महती शक्तीपिठांची भाग १ अन्य स्थाने वृथा जन्म निष्फलम् गतागतम्। भारते च क्षणं जन्म सार्थक शुभ कर्मदम्।। वरील पदाचा पुराणात आध्यात्मिक आणि सखोल अर्थ आहे. भारतात अनेक तीर्थक्षेत्रे आहेत. या तीर्थक्षेत्रांत शक्ती पीठाचे विशेष महत्त्व आहे. अशा शक्ती पीठात साधना करून अनेक साधू-संतांनी परमतत्वाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे. प्राचीन काळातील ऋषी-मुनींची नावे आजही मोठ्या श्रद्धेने घेतली जातात. परमतत्वाचा अनुभव प्राप्त झालेले स्वामी करपात्री महाराज उर्फ महोपाध्याय गोपीनाथ ‍कविराज यांच्या नावाचा उल्लेख आजही विसाव्या शतकात केला जातो. अनेक पाश्चात्य विद्वानांनी भारताच्या पावन भूमीवर स्वत:ला परमतत्व दर्शनाच्या अंतिम टप्प्यावर नेलेले आहे. शिवाय अनेक पाश्चात्य पंडितांनी यावर धार्मिक ग्रंथही लिहिले ...Read More

2

महती शक्तीपिठांची भाग २

महती शक्तीपिठांची भाग २ पुराणानुसार ५२ शक्ति पीठ आहेत असे मानले जाते . मात्र तंत्रचूड़ामणि मध्ये एकंदर शक्ती पिठांच्या संदर्भात सांगितले गेले आहे . एकूण बावन्न शक्तीपीठे खालीलप्रमाणे १) किरीट विमला (भुवनेशी )शक्तीपीठ पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यातील किरीटकोण गावाजवळ सती आईचा मुकुट पडला. मुर्शिदाबाद कोलकत्त्या पासून २३९ कि.मी. अंतरावर आहे. आणि येथून जाण्यासाठी सुमारे ६ तास लागतात. इथे आईचे रूप “विमला” आहे ,सोबत शिवशंकर“संवर्त ”रुपात विराजमान आहेत . हे शक्तीपीठ ओडिसा राज्यातील पुरी शहरातील जगन्नाथ मंदिरात आहे . जगन्नाथाला दाखवलेल्या प्रसादाचे सर्वप्रथम देवी विमला ग्रहण करते व त्यानंतरच भक्तांना प्रसाद वाटला जातो . येथील विरजा ही देवी विमला आणि ...Read More

3

महती शक्तीपिठांची भाग ३

महती शक्तीपिठांची भाग ३ ८) मानसा-दक्षयानी शक्तीपीठ मातेचे हे शक्तीपीठ तिबेटमध्ये असलेल्या मानसरोवराजवळ स्थापित आहे. या ठिकाणीच पाषाणावर आई सतीचा उजवा हात पडला. शिवाची मानस कन्या म्हणून मानसा देवीची पूजा केली जाते. त्याची उत्पत्ती डोक्यातून झाली म्हणूनच त्याला 'मानसा' हे नाव पडले. मानसा देवी प्रामुख्याने सापांनी झाकलेली आहे आणि ती कमळावर बसलेली आहे . तिच्या संरक्षणामध्ये सात साप नेहमी उपस्थित असतात. महाभारतात अशी कथा सांगतात . पांडू वंशातील पांडवांपैकी एक अर्जुन आणि त्याची दुसरी पत्नी सुभद्रा जी श्रीकृष्णाची बहीण आहे,त्यांना एक मुलगा होता ज्याचे नाव अभिमन्यू होते . तो महाभारत युद्धात मारला गेला. अभिमन्यूचा मुलगा परीक्षित होता , ...Read More

4

महती शक्तीपिठांची भाग ४

महती शक्तीपीठांची भाग ४ 1३)ज्वालामुखी - सिद्धिदा (अंबिका) शक्तीपीठ ज्वालामुखी शक्तीपीठ हे कांगडा जिल्हा , हिमाचल प्रदेश आहे . कांगडा जिल्ह्यात कालीधर डोंगराच्या पायथ्याशी हे रमणीय 'शक्तिपीठ' आहे . आईचे रूप इथे 'सिद्धिदा अंबिका' आहे ,सोबत शिवशंकर 'माणिकट '”उन्मत्त “रुपात विराजमान आहेत. या ठिकाणी आई सतीची जीभ पडली होती. यास ज्वालाजी शक्तीपीठ म्हणतात . या विशेष मंदिरात दहा ज्योती आहेत, परंतु आतमध्ये अनेक ज्वाला उमटत आहेत, ज्या मंदिराच्या पाठीमागून गेल्या आहेत. तसे हे दिवे अनंत काळापासून जळत आहेत असे मानतात . पौराणीक आधारा नुसार असा विश्वास आहे की सात बहिणी आईबरोबर ज्वाला म्हणून राहतात. या ज्वाला ...Read More

5

महती शक्तीपिठांची भाग ५

महती शक्तीपिठांची भाग ५ १९)त्रिपुरा - त्रिपुरा सुंदरी शक्तीपीठ त्रिपुराच्या उदयपूर जवळ राधाकिशोरपूर गावात आईचा डावा पाय खाली पडला. आईचे रूप “त्रिपुरासुंदरी “असुन सोबत शिवशंकर “त्रीपुरेश “रुपात विराजमान आहेत . हे शक्तीपीठ त्रिपुरा आसाम आणि मिझोरमच्या सीमेवर आहे . महाविद्या समाजात त्रिपुरा नावाच्या अनेक देवी आहेत , त्यापैकी त्रिपुरा-भैरवी, त्रिपुरा आणि त्रिपुरा सुंदरी विशेष उल्लेखनीय आहेत. देवी त्रिपुरासुंदरी म्हणजे ब्रह्मा स्वरूप, भुवनेश्वरी विश्वमोहिनी. तीच देवी, महाविद्या, त्रिपुरसुंदरी, ललितांबा इत्यादी अनेक नावांनी आठवतात. शक्ती संप्रदायात त्रिपुरासुंदरीला एक विलक्षण महत्त्व आहे. दक्षिण-त्रिपुरा उदयपूर शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर, राधा किशोर गावात माताबाढि पर्वत शिखरावर उदयपूर शहराच्या दक्षिण-पश्चिमेस राज-राजेश्वरी त्रिपुर सुंदरीचे भव्य मंदिर ...Read More

6

महती शक्तीपिठांची भाग ६

महती शक्तीपिठांची भाग ६ २६ ) कुरुक्षेत्र – सावित्री शक्तीपीठ हे शक्तीपीठ श्री देवीकुपा भद्रकाली मंदिर "सावित्री पीठ", "देवीपीठ", पीठ" किंवा "आदी पीठ" म्हणून देखील ओळखले जाते. याच भद्रकाली मंदिरात श्रीकृष्ण व बलरामाचे मुंडण झाले होते . असे मानले जाते की कुरुक्षेत्रातील शक्तीपीठ श्री देवीकुपा भद्रकाली मंदिरात आई सतीची टाच पडली . पौराणिक कथेनुसार महाभारताच्या युद्धाला जाण्यापूर्वी भगवान श्रीकृष्णासह पांडवांनी त्यांच्या पूजेसाठी येथे प्रार्थना केली आणि त्यांच्या रथांचे घोडे दान केले. त्यामुळे भक्तांच्या इच्छा पूर्ण झाल्यावर सोने ,चांदी, माती इत्यादी बनवलेले घोडे देण्याची एक पुरातन परंपरा बनली. इथे आईचे रूप “सावित्री “असुन सोबत शिवशंकर “स्थाणु” रुपात विराजमान आहेत. २७)मणीवेदिका ...Read More

7

महती शक्तीपिठांची भाग ७

महती शक्तीपिठांची भाग ७ ३२) विभाष- कपालिनी शक्तीपीठ पश्चिम बंगालमधील पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यात आईचा डावा घोटा पडला. हे शक्तीपीठ कोलकातापासून जवळ आहे,आणि बंगालच्या उपसागराजवळ रन्नारायण नदीच्या काठावर आहे. हे शक्तीपीठ हे विशाल मंदिर आहे. हे दक्षिण पूर्व रेल्वेच्या कुडा स्टेशनपासून २४ कि.मी. अंतरावर आहे. इथे आईचे रूप 'कपालिनी'असुन शिवशंकर 'भीमरूपा' आणि 'सर्वानंद' रुपात विराजमान आहेत . ३३) कलामाधव – देवी काली शक्तीपीठ हे शक्तीपीठ मध्य प्रदेश राज्य, या अमरकंटक येथे स्थित आहे असे मानले जाते. हे शोन नदी तटावरील एका गुहेत आहे मध्य प्रदेशातील अमरकंटकमधील कलामाधवमधील शोन नदीजवळ सती आईचा डावा नितंब पडला.. इथे आईचे रूप 'काली' असुन ...Read More

8

महती शक्तीपिठांची भाग ८

महती शक्तीपिठांची भाग ८ ३९)जनस्थान- भ्रामरी शक्तीपीठ महाराष्ट्रातील नाशिक येथे जनस्थान येथे आईची हनुवटी पडली होती . हे शक्तीपीठ पंचवटी मध्ये आहे . इथे आईचे रूप “ भ्रामरी” असुन शिवशंकर ‘विकृताक्ष”रुपात विराजमान आहेत . या मंदिराला शिखर नाही . सिंहासनावर नव-दुर्गांच्या मूर्ति असुन मध्यभागी भद्रकालीची मूर्ति आहे . ४०)रत्नावली – कुमारी शक्तीपीठ बंगालच्या हुगळी जिल्ह्यातील खानकुल-कृष्णानगर रोडवर आईचा उजवा खांदा पडला. हे रत्नावली शक्तीपीठ हे हिंदूंचे एक प्रमुख धार्मिक स्थळ आहे. पश्चिम बंगाल राज्यातील हुगळी जिल्ह्यात खानकुल-कृष्णनगर रत्नाकर नदीच्या काठावर एक मंदिर आहे. ज्याला रत्नावली शक्तीपीठ म्हणून ओळखले जाते. सर्व उत्सव रत्नावली शक्तीपीठात साजरे करतात, विशेषत: नवरात्रोत्सवात दुर्गापूजा आणि ...Read More

9

महती शक्तीपिठांची भाग ९

महती शक्तीपिठांची भाग ९ ४९)विराट- भरतपूर अंबिका शक्तीपीठ हे शक्तीपीठ राजस्थानमधील विराट नगर, भरतपूर येथे आहे. राजस्थानची राजधानी जयपुर गुलाबी नगरी म्हणून ओळखले जाते . या नगरीच्या उत्तरेस महाभारतकालीन विराट नगराचे प्राचीन विध्वंस झालेले अवशेष आहेत . त्या जवळ एक गुहा आहे , ज्याला भीम की गुफ़ा म्हणले जाते . याच विराट गावात हे शक्तिपीठ स्थित आहे . या ठिकाणी आई सतीच्या डाव्या पायाची बोटे पडली . इथे आईचे रुप “अंबिका”असुन सोबत शिवशंकर “अमृत” रुपात विराजमान आहेत . जयपुर आणि अलवर या दोन्ही ठिकाणा पासुन विराट ग्राम इथे जाण्यासाठी मार्ग आहेत . भरतपुरला लोहागढ़ या नावाने ओळखले जाते . ...Read More

10

महती शक्तीपिठांची भाग १०

महती शक्तीपिठांची भाग १० या ५२ शक्तीपीठा व्यतिरिक्त आदि शंकराचार्य द्वारा वर्णित १८ महाशक्तिपीठे आहेत . यामध्ये काही पिठांचा पण उल्लेख आहे ज्यांची माहिती ५२ शक्ती पिठात आलेली आहे . तरीही यातील काही शक्तीपिठांच्या मंदिरा विषयी विशेष माहिती प्राप्त होते . त्यांची मंदिरे आणि विस्तृत माहिती अशी आहे .... १) लंका शक्तिपीठ त्रिन्कोमेली, श्रीलंका येथे सती आईची कमर पडली होती . आई येथे “शंकरी” रुपात विराजमान आहे . याविषयी ची माहिती ५२ शक्तीपीठात सामील आहे . २)कांची कामकोडी शक्तिपीठ कांची,तामिळनाडु येथे सती आईच्या शरीराचा मागील भाग पडला होता . आई इथे ...Read More

11

महती शक्तीपिठांची भाग ११

महती शक्तीपिठांची भाग ११ ) पिठापुरम आंध्र प्रदेश शक्तीपीठ इथे आई देवी “पुरुहुतीका “नावाने विराजित आहे . सती आईचा डावा हात या ठिकाणी पडला . याला पुष्करणी शक्तिपीठ म्हणून ओळखले जाते . या शक्तीपिठात आई “पुरुहुतिका” रुपात असुन शिवशंकर” कुकुटेश्वर स्वामी “नावाने विराजमान आहेत . श्री पुरुहुतिका देवीचे देऊळ कुकुटेश्वर स्वामी देवळाच्या परिसरात पूर्व गोदावरी जिल्ह्यात आंध्र प्रदेश येथील पीठापुरम येथे आहे काकिनाडा पासून साधारण हे अंतर २० किलोमीटर आहे आणि राजमुंद्री पासून ६२ किलोमीटर आहे . देवीचे मंदिर लहान असले तरी भिंतीवर अष्टदास शक्तीपिठांचे कोरीव काम केले असल्याने मोहक वाटते . याच जागेवर देवीचे मुर्ती पुरलेली होती ...Read More

12

महती शक्तीपिठांची भाग १२

महती शक्तीपिठांची भाग १२ १३) कामरुप शक्तिपीठ गुवाहाटी, आसाम इथे सती आईची योनि पडली होती . सती आई “कामरुपा देवी”रुपात इथे विराजमान आहे . कामाख्या पीठ भारतातले प्रसिद्ध शक्तिपीठ आहे . कामाख्या देवीचे मंदिर पहाडावर आहे . अंदाजे एका मैल उंच असलेल्या या पहाडाला “नील पर्वत “म्हणतात . आई इथे 'कामाख्या' रुपात आहे आणि शिवशंकर 'उमानंद' रुपात विराजमान आहेत . धार्मिक मान्यतेनुसार कामाख्या मंदिरच्या जवळच उत्तरेकडे देवीची क्रीड़ा पुष्करिणी (तलाव ) आहे . ज्याला “सौभाग्य कुंड” म्हणतात . याच्या प्रदक्षिणेमुळे पुण्यप्राप्ती होते . या मंदिरात शक्तिची पूजा योनिरूपात होते . इथे कोणतीच देवीमूर्ति नाही . योनिच्या आकारतील ...Read More

13

महती शक्तीपिठांची भाग १३

महती शक्तीपिठांची भाग १३ १८) शारदा शक्तिपीठ काश्मीर सती आईचा उजवा हात पडला . पाकिस्तानमध्ये सरस्वती देवी हे एक महाशक्तीपीठ “शारदापीठ” म्हणून ओळखले जाते . हिंदूंचे हे सर्वात मोठे तीर्थ स्थान आहे . पाकिस्तानच्या ताब्यात असलेले व काश्मीरमध्ये वसलेले हे प्राचीन हिंदू मंदिर ज्याला शारदापीठ सांस्कृतिक स्थळ म्हणतात ते ५००० वर्ष जुने आहे . सनातन परंपरेच्या अनुसार नीलम नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या या मंदिराचे महत्व सोमनाथच्या शिवलिंग मंदिरा इतकेच मानले जाते . हे मंदिर भारतीय नियंत्रण रेषेपासून १७ मैल दूर आहे . पाकव्याप्त कश्मीरच्या शारदा गावातील या मंदिराच्या ठिकाणी आता फक्त भग्नावशेष शिल्लक आहेत . विदयेची अधिष्ठात्री असलेल्या हिंदू ...Read More

14

महती शक्तीपिठांची भाग १४

महती शक्तीपिठांची भाग १४ ४) सुरकंडा देवी मंदिर, धनौल्टी,मसूरी जवळ , उत्तराखंड हे स्थान चंबा - मसुरी वर आहे इथली प्राथमिक देवता देवी दुर्गा आहे . सुरकंडा देवी हे एक प्राचीन हिंदू मंदिर आहे. हे मंदिर नऊ देवींपैकी एक असलेल्या दुर्गादेवीला समर्पित आहे. सुरकंडा देवी मंदिरात देवीची प्रतिमा स्थापित केली जाते. हे मंदिर सुमारे २७५७ मीटर उंचीवर आहे. उन्हाळ्यात पहाटे ५.०० ते रात्री ७.०० आणि हिवाळ्यात ७.०० ते संध्याकाळी ५.०० अशी मंदिराची वेळ असते सुरकंडा देवी मंदिर घनदाट जंगलांनी वेढलेले आहे आणि येथून उत्तरेस हिमालयचे एक सुंदर दृश्य दिसते. मंदिराच्या दक्षिण दिशेला देहरादून आणि ऋषिकेश ...Read More

15

महती शक्तीपिठांची भाग १५

महती शक्तीपिठांची भाग १५ आदीशक्‍तिपीठांचा विचार केल्यास महाराष्ट्रात प्रमुख देवींची साडेतीन शक्‍तिपीठे आहेत.. तुळजापूरची भवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी, माहूरची रेणुका तीन पूर्ण तर वणीची सप्तशृंगी हे अर्धे शक्‍तिपीठ मानले जाते. साडेतीन शक्तिपीठे म्हणजे ॐ काराचे सगुण रूप आहे. ॐ कार म्हणजे प्रणव म्हणजेच परमात्म्याचे साकार आणि प्रकट रूप मानले जाते. ॐ कारामध्ये सार्धत्रय (साडेतीन) मात्रा आहेत. अ'कार पीठ माहूर 'उ'कार पीठ तुळजापूर 'म'कार पीठ कोल्हापूर आणि ऊर्धमात्रा सप्तशृंगी. सप्तशृंग निवासिनी देवीच्या मूळ ठिकाणाचे दर्शन सर्वांना होत नाही म्हणून ते अर्धपीठ समजले जाते . या सर्वांची माहिती खाली दिली आहे वणी (सप्तशृंगी) माहूर (देवी रेणुकामाता) श्री क्षेत्र तुळजापूर ...Read More

16

महती शक्तीपिठांची भाग १६

महती शक्तीपिठांची भाग १६ ब्रह्मदेवाच्या कमंडलूतून ही देवी उदयास आली आणि तिने दुर्गेचा अवतार घेतला असे उल्लेख पुराणात आढळतात त्यावरून तिला ब्रह्मस्वरूपिणी म्हणूनही ओळखले जाते. महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती या तीनही स्थानांचे त्रिगुणात्मक असे साक्षात ब्रम्हस्वरूपिणी रूप म्हणजे सप्तशृंग गडावरील श्री सप्तशृंगी देवी. देवीचे स्थान मनाला भावते. तसेच गडावरील १०८ कुंड, प्राचीन मंदिरे, उत्सव, मलखांब, अनेक संतांचा व सरदाराच्या दान वृत्तीच्या अनेक आख्यायिका आहेत . सप्तशृंगी देवीची स्थापना मार्कंडेय ऋषींनी केली. गडावर मार्कंडेय ऋषींनी तपस्या केली आहे . मार्कंडेय ऋषी रोज देवीला श्लोक व पुराणे ऐकवत असत म्हणून देवी मार्कंडेय पर्वताकडे कान लावून ते पुराणे ऐकत असल्याचेही म्हटले जाते.. येथेच ...Read More

17

महती शक्तीपिठांची भाग १७

महती शक्तीपिठांची भाग १७ अश्विन शुध्‍द प्रतिपदेला घटस्‍थापनेने विधीवत पूजा-अर्चना करुन हया मंगल दिनी एका दगडाच्‍या कुंडामध्‍ये मातृका भरुन विवीध पाच प्रकारचे धान्‍य टाकले जाते. त्‍या कुंडावर मातीचा कलश ठेऊन विडयाची पाने व श्रीफळ ठेवले जाते व त्‍या कुंडाच्‍या बाजूला पाच ऊस उभे करून पुष्‍पहार अर्पण केला जातो व प्रतिपदेपासून नवमीपर्यंत तेलाचे व तुपाचे अखंड नंदादीप तेवत ठेवलेजातात. त्‍याच प्रमाणे प्रतिपदेस घटस्‍थापने पासून ते दस-यापर्यंत पायस म्‍हणजे दहिभात, पुरणपोळीचा नैवेद्य नियमीत दाखविला जातो. घटस्‍थापनेपासून चार दिवसपर्यंत गडावर रेणुका मंदीरा मध्‍ये संपूर्ण, विधीवत, यथासांग पूजा विधी नियमीत केल्‍या जातात. नवरात्रातील पंचमीस/ललितापंचमीस देवीची अलंकार पूजा केली जाते. महापूजा व महाआरती केली ...Read More

18

महती शक्तीपिठांची भाग १८

महती शक्तीपिठांची भाग १८ ३) श्री क्षेत्र तुळजापूर (तुळजाभवानी) शक्तीपीठ महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी श्री तुळजाभवानी तुळजापूर क्षेत्र हे एक पूर्ण शक्तिपीठ आहे. ही देवी भगवती (भवानी) म्हणून प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र क्षात्रतेजाची स्फूर्ती देवता, प्रेरणाशक्ती व स्वराज्य संस्थापक राजे श्री शिवछत्रपती यांची ही आराध्यदेवता. अशी ही तुळजापूरची भवानीदेवी महाराष्ट्राची कुलस्वामीनी आहे. हे गाव बालाघाटच्या एका कड्यावर वसले आहे. मंदिराच्या काही भागाची धाटणी हेमाडपंथी आहे. ऐतिहासिक व पुरातत्त्वदृष्ट्या हे मंदिर राष्ट्रकुट अथवा यादवकालीन मानले जाते. तर काहींच्या मते हे १७ व्या किंवा १८ व्या शतकातील मंदिर आहे. भक्ताच्या हाकेला त्वरित धावून येणारी व मनोरथ पूर्ण करणारी म्हणून ही देवी ...Read More

19

महती शक्तीपिठांची भाग १९

महती शक्तीपिठांची भाग १९ ४) कोल्हापूर (श्रीमहालक्ष्मी) शक्तीपीठ साडेतीन शक्तिपीठांपैकी पूर्ण पीठ म्हणून कोल्हापूरची श्रीमहालक्ष्मी प्रसिद्ध आहे. हे देवालय शिलाहारापूर्वी करहारक (कर्‍हाड) येथील सिंदवंशी राजाने बांधले असावे असे काही संशोधक म्हणतात. कोल्हापूरचे शिलाहार देवीचे निस्सिम भक्त होते. आपणास देवीचा वरप्रसाद मिळाल्याचे त्यांनी अनेक लेखांत लिहून ठेवले आहे. सातव्या शतकात चालुक्य राजवटीत राजा कर्णदेव याने हे देवालय बांधल्याचा उल्लेखही काही ठिकाणी आढळतो. मंदिराच्या मांडणीवरून ते चालुक्यांच्या काळात इ.स. ६०० ते ७०० मध्ये बांधले असण्याची शक्यता आहे. मंदिराचे पहिले बांधकाम राष्ट्रकूट किंवा त्या आधीचा शिलाहार राजांनी सुमारे आठव्या शतकात केले असावे. पुराणे, अनेक जैन ग्रंथ, ताम्रपत्रे व सापडलेली अनेक कागदपत्रे ...Read More

20

महती शक्तीपिठांची भाग २० - अंतिम भाग

महती शक्तीपिठांची भाग २० एका पौराणिक कथेनुसार भृगुऋषींच्या मनात विचार आला की त्रिदेवांमध्ये सर्वश्रेष्ठ कोण आहे . हे जाणुन घेण्यासाठी भृगुऋषी सर्वप्रथम ब्रन्म्ह्देवांच्या गेले आणि त्यांच्यासोबत रागाने बोलु लागले . ऋषींचा असा उद्धटपणा पाहून ब्रह्मदेवांना राग आला . ते पाहील्यावर भृगुऋषिना समजले की ब्रह्मदेव आपला राग नियंत्रित करु शकत नाहीत . तेव्हा त्यांनी ब्रह्मदेवांना शाप दिला की त्यांची पूजा कोणत्याही मंदिरात होणार नाही . त्यानंतर भृगुऋषी शिवशंकरांचे दर्शन करण्यासाठी कैलासावर गेले . परंतु दरवाजातच नंदीने त्यांना अडवले आणि सांगितले की शिवशंकर आणि देवी पार्वती एकांतात आहेत . आत्ता त्यांना कोणी भेटू शकत नाही . हे ऐकल्यावर भृगुऋषि क्रोधित ...Read More