घुंगरू

(112)
  • 100.9k
  • 15
  • 39.4k

#@ घुंगरू@# सौ.वनिता स. भोगीलबापू घाम पुसत वाड्यात शिरले तस रत्नमाला धावत दारात आली ,तेवढ्यात माई म्हणाली आग रत्ना किती तो पायाचा आवाज..... पोरीच्या जातीला शोभत का? कस नाजूक सारख चालव...माईच्या बोलण्यानं रत्नमालाच तोंड पडल... तस बापू माईला हसून म्हणाले ,अग माई माझी रत्ना पोरगी नाही पोरगा आहे माझा, ..... तस माई म्हणाली अस बोलूनच तिला तू लाडाऊन ठेवलस रे बापू.. आतून मालती रत्नमालाची आई पाण्याचा तांब्या हातात घेऊन आली, माई बरोबर बोलता तुम्ही, दोघं बाप लेकीचं काय चालय काही समजत नाही,आणि हो हिच्या लग्नाचं काही बघायचं की नाही ?... मालती एवढं बोलून उत्तराची अपेक्षा न करताच आत निघून गेली.सखाराम बापू आणि मालती यांची एकुलती एक लाडकी

New Episodes : : Every Sunday

1

घुंगरू

#@ घुंगरू@# सौ.वनिता स. भोगीलबापू घाम पुसत वाड्यात शिरले तस रत्नमाला धावत दारात आली ,तेवढ्यात माई म्हणाली आग किती तो पायाचा आवाज..... पोरीच्या जातीला शोभत का? कस नाजूक सारख चालव...माईच्या बोलण्यानं रत्नमालाच तोंड पडल... तस बापू माईला हसून म्हणाले ,अग माई माझी रत्ना पोरगी नाही पोरगा आहे माझा, ..... तस माई म्हणाली अस बोलूनच तिला तू लाडाऊन ठेवलस रे बापू.. आतून मालती रत्नमालाची आई पाण्याचा तांब्या हातात घेऊन आली, माई बरोबर बोलता तुम्ही, दोघं बाप लेकीचं काय चालय काही समजत नाही,आणि हो हिच्या लग्नाचं काही बघायचं की नाही ?... मालती एवढं बोलून उत्तराची अपेक्षा न करताच आत निघून गेली.सखाराम बापू आणि मालती यांची एकुलती एक लाडकी ...Read More

2

घुंगरू - 2

#@घुंगरू@#भाग 2 सौ. वनिता स. भोगीलमालतीला दिवस गेले ही तर चांगली गोष्ट आहे ,,,मग अस का वाटतंय काहीतरी चुकतंय..... नाही काहीही चुकत नाही,,,, पण आजच का अस घडतय,,, जाऊ दे असेल काही ..... अस मनाशीच कुजबुजत माई तशाच निघून गेल्या, घरात सगळं आनंदच वातावरण होत... बापुनि तर सगळ्या शेतातील मजुराला पेढ वाटून वर जास्तीचे पैसे पण ठरवले,,, ,,,, कारणच तेवढं मोठं होत न.. ...नवस सायास करून पण पोटी पोर होत नव्हतं आणि आता होणार आहे या आनंदात बापूला काय करू अन काय नाही असं वाटत होतं.........सगळे आनंदात होते पण मालती मात्र चिंतेत होती........ रात्री माईंनी गोडधोडाच जेवण केल..... ...Read More

3

घुंगरू - 3

#@घुंगरू@#भाग 3 सौ.वनिता स. भोगील मालतीला शेतात जायची घाई झाली होती,, माईकडे तीच लक्ष सुद्धा भराभर काम आटोपून भाकरी बांधून घेतल्या.. वर चटणी. कांदा अन आंब्याच्या खाराच्या दोन फोडी घेऊन भाकरी गुंडाळून घेतली,, पाटीत सगळं ठेऊन पाण्याचा तांब्या भरला, अन सगळं घेऊन शेतावर निघाली, ... आज मालतीला न्याहरी करायची सुद्धा आठवण नव्हती, माईच्या ध्यानात होत , पण मालतीच्या वागण्यात फरक बघून माई काहीच बोलत नव्हत्या.... मालती आपल्याच तंद्रीत वाड्याबाहेर निघाली, तस माईन हाक दिली , मालती सांच्याला लवकर ये..... . व्हय माई येईल लवकरच म्हणून मालती झपाझप पावलं टाकत निघाली........ माईन वाड्याबाहेर येऊन बघितलं .. मालती ...Read More

4

घुंगरू - 4

#@घुंगरू@# भाग 4सौ. वनिता स. भोगील.... माई समोर मालती दिसत होती, आतून पोटात गोळा यायचा, पोटुशी सून अश्या लोकांकड गेली असेल....... विचारांच थैमान चालू होत,विचारात गाव कधी आलं अन वाडा कधी आला हेच समजल नाही...... दार ढकलून माई आत गेल्या, रांजनावरल मडक घेऊन गार पाणी घशाखाली उतरवल पण घसा कोरडाच वाटत होता माईला.... दिवसभर माई दारातच बसून राहिल्या, न्याहरी,दुपारी एक घास पोटात गेला नव्हता, ,, दिवस मावळतीला गेला तस माईच काळीज धडधडू लागल...... मालती आल्यावर तिला ईचारु का नग, दुसरच काय केल असल तर? ,, तेवढ्यात बापू आणि मालती दोघ सोबत येताना माईला दिसली... बापूकडे बघून त्यांना जास्तच काळजी वाटू लागली,मालती गेली होती हे ...Read More

5

घुंगरू - 5

#@घुंगरू@#भाग 5सौ. वनिता स. भोगील,, मालती माळावरून आली ती खूप आनंदात दिसत होती, तिच्या चेहऱ्यावरचं तेज बघून म्हणाले, बघ माई तू उगच काळजी करत होतीस.... बघ मालू किती खुश हाय पर तुझं आपल काय बी आसत..... बापू बाहेर निघून गेले, मालती तयारीला लागली.. . मुहूर्ताचा दिवस उजाडला, सकाळ पासूनच घाई गडबड चालू होती, सगळ सजवण्यात शेजारच्या बायका मदतीला बोलवल्या होत्या माईन....... थोड्याच वेळात दारातून जोरजोरात बोलल्याचा आवाज येऊ लागला, माई कोण बोलत आहे हे बघायला दाराकडे गेल्या...... दारात भरजरी चमकणाऱ्या कपड्यात सहा सात किन्नर होते, हासत च आत आले , टाळ्यांचा आवाज जोरात करत मालतीला हाका मारू लागले, माई ...Read More

6

घुंगरू - 6

#@घुंगरू@#भाग 6सौ वनिता स. भोगील......मालतीला पाय उचलत नव्हता,,कशीबशी आतल्या खोलीत माईंनी नेली,... बाहेरच्या दारात जाऊन माईंनी मुलाला हाक दिली, मुलाला बोलावून सांगितले बापू गावाच्या चौकात आसल लागलीच बुलीव त्याला सांग लय घाई हाय लगीच य......... मुलगा धावत बापूंकडे गेला,, निरोप ऐकून बापू धावतच घराकडे आले, माई तोवर बंबात पाणी गरम करायला ठेवत होती,... बापू म्हणाले,,काय ग माई लई घाईत बोलीवलस? काय झालं ग? त्यावर माई म्हणाल्या आर बापू मालती ला कळा यिऊ लागल्यात ,,,, .. बाळंत व्हायची येळ जवळ आली बघ..पर तू आताच जाऊन शेजारच्या गावातून वैद्याला घिऊन ये,मनजी काय इपरित नग घडाय..... बापू "व्हय माई "म्हणून लगेच निघाले.......आतून ...Read More

7

घुंगरू - 7

#@ घुंगरू@# भाग 7 सौ. वनिता स. भोगीलअस नका जाऊ,बापू येईल एवढ्यात मंग जा.... नाही आमचं काम झालं मालू बी ठीक हाय ,यिऊ की पूना कवातरी.......... माईजवळच्या पोरीच्या डोक्यावरून हात फिरवत माया काढून कडकड बोटांचा आवाज केला, आन म्हणला माई आक्षी रत्नावानी नात हाय बघा, अस म्हणून सगळे भराभर निघून गेले.... माई लेकराला घेऊन मालती जवळ गेल्या,मालतीला म्हणाल्या .... पांग फेडलस वाड्याच माले...... पोरगी दिलीस माझ्या बापूच्या कुळाला लक्ष्मी दिलीस ,,,, आज लय आनंदात हाय बघ......... चल हिला तुझ्याजवळ घे, म्या पाणी काढते न्हाऊ घालायच दोघी ला,,, माईच्या चेहऱ्यावरचं तेज बघून मालती खूप आनंदी झाली, पाणी ...Read More

8

घुंगरू - 8

#@ घुंगरू@# सौ.वनिता स. भोगील ....रत्नमाला..... बापू , माई आणि मालतीच्या काळजाचा तुकडा..... मालतीला आईपण मिळालं होतं, बापुना बाप होण्याचं भाग्य आणि माई तर नातीच्या स्वप्नात गुंग असायच्या.......दिवसा मागून दिवस जात होते, रत्ना रांगु लागली, माईंनी तिच्यासाठी साठवणीतल्या पैशातून पैंजण आणले, नातीच कोड कौतुक करण्यात माई रमून जात,... रत्ना लुटू लुटू चालू लागली, गोर गोमट बाळ गुटगुटीत अगदी वाडा फिरवून माईना दमवून टाकायच...... बापू तर काय रत्ना म्हणजे जीव च होता त्यांचा, हळू हळू रत्ना मोठी झाली बोबडे बोल सोडून चांगलं बोलू लागली, बापुना रत्नाचा नाव गावातल्या शाळेत घातलं, रत्ना घरच्यांची लाडकी तशीच गावातल्या सगळ्यांची लाडकी होती....... बापू ...Read More

9

घुंगरू - 9

#@ घुंगरू@#भाग 9 सौ. वनिता स. भोगील गाडी आलेली पाहून मालती वाड्याच्या दाराशी आली, रत्ना उतरली, मागे बापू पण बैलगाडीतून उतरले, बापुच्या हातातली पिशवी घेत मालती म्हणाली.... लय येळ लावलासा? भर ऊन डोईवर घेतलं, दुखणी येत्याल अशान , आवाज ऐकून माई जपमाळ गुंडाळत बाहेर आल्या, आला का बाप लेकीचा बाजार? दिस घालीवला, काय बाकी न्हाय ठेवल वाटत आणायचं??.... त्यावर बापू म्हणाले.. माई रत्नाचा बाजार काय संपणा,,,, कसतरी घेऊन आलो बघ ........ तोवर तर रत्नानं पिशवीतून सगळं समान बाहेर काढायला सुरवात केली, आई बघ म्या काय काय आणलं, ही बघ रिबीनी, हय नकपालिस... ...Read More

10

घुंगरू - 10

#@ घुंगरू@#भाग 10 सौ. वनिता स. भोगीलरत्नाचा काही नाही पटल तरी बापूंन पुढे मालतीच चालत नसे..... एक दिवस माय लेकी असताना रत्नाने चाळ बांधले, अन नाचाचा ठेका धरला, मालतीला अगोदरचत्याचा राग येई, त्यात आज घरात दुसरं कुणी नव्हतं, मालतीने रत्नाला खूप समजावल पण ती काही केल्या ऐकेना,,,.... मग मात्र मालतीला राहवलं नाही, तिने तशीच रत्नाच्या कानफटात ठेऊन दिली, कळायला लागल्यापासून आई कधी ओरडून बोलू नाही आणि आज मारलं कस हे रत्नाला पण कळत नव्हतं...... मालती मागच्या दारात जाऊन स्वतःच रडू लागली,,, रत्ना तिच्या जवळ गेली... ए आई ,आग का रडतीयास, मला सांग की, म्या काय ...Read More