अधांतर

(117)
  • 211.1k
  • 14
  • 84.7k

कामयाबी के आसमाँ ने उडणा सिखा दिया। जमीन से जुडे रहना, जिंदगी ने सिखा दिया। यशस्वी होणं म्हणजे नक्की काय?? आपल्याला हवं ते मिळवणं, आपलं ध्येय गाठणं, आणि एकदा तिथे पोहोचलं की सुखी आयुष्य जगणं... हेच का ते यशस्वी होणं? म्हणजे बहूतेक लोकांची 'यशाची' वाख्या हीच असावी...असेल तर हरकत नाही...पण खरंच हे 'यशस्वी' होण्याची प्रक्रिया एका विशिष्ट जागेवर येऊन थांबते का?? मला नाही वाटत...किंवा यश मोजता येत का ? नाही...नक्किच नाही...यशाचा मार्गच मुळात अनंत असतो, त्यात गंतव्य हे काही ठरवलेलं नसतं... आणि ज्याला हे कळाल, त्याचे पाय नेहमी जमिनीवरच राहतात, त्याला मिळवलेल्या गोष्टींचा गर्व कधीच निर्माण होत नाही...आणि ज्याने छोट्याश्या

Full Novel

1

अधांतर - १

कामयाबी के आसमाँ ने उडणा सिखा दिया। जमीन से जुडे रहना, जिंदगी ने सिखा दिया। यशस्वी होणं म्हणजे नक्की आपल्याला हवं ते मिळवणं, आपलं ध्येय गाठणं, आणि एकदा तिथे पोहोचलं की सुखी आयुष्य जगणं... हेच का ते यशस्वी होणं? म्हणजे बहूतेक लोकांची 'यशाची' वाख्या हीच असावी...असेल तर हरकत नाही...पण खरंच हे 'यशस्वी' होण्याची प्रक्रिया एका विशिष्ट जागेवर येऊन थांबते का?? मला नाही वाटत...किंवा यश मोजता येत का ? नाही...नक्किच नाही...यशाचा मार्गच मुळात अनंत असतो, त्यात गंतव्य हे काही ठरवलेलं नसतं... आणि ज्याला हे कळाल, त्याचे पाय नेहमी जमिनीवरच राहतात, त्याला मिळवलेल्या गोष्टींचा गर्व कधीच निर्माण होत नाही...आणि ज्याने छोट्याश्या ...Read More

2

अधांतर - २

कामयाबी का मतलब, जितने वाला क्या जाने। बिखरने का मतलब तो, समेटने वाला ही जाने । सगळं काही उद्धवस्त नव्याने उभ राहण्याचे जे प्रयत्न असतात त्यालाच आयुष्य म्हणावं..हातातुन सगळं काही वाळू सारख निसटून गेल्यावरही सावरायचं कस हे ज्याला कळाल त्याला कोणतंही संकट हतबल करू शकत नाही...पाहिजे फक्त संयम....आपण स्वतःला सिद्ध करू शकू असा एक दिवस नक्कीच प्रत्येकाच्या आयुष्यात येतो, आपलं नशीब ही संधी आपल्याला एकदा तरी नक्कीच देतो, फक्त ती संधी ओळखायला आणि त्याच सोनं करायला आपल्यात धमक असली पाहिजे...आयुष्य आपल्यासाठी कितीही कठीण असलं, त्याच्या वाटेत चालताना कितीही रखरखीत उन्हाने आपण भाजल्या गेलो तरी कुठेतरी वटवृक्षाच्या सावलीत थोड्या तरी गारव्याची ...Read More

3

अधांतर - ३

अपनो से लड़कर भला , कौन योध्दा जिता है। सब कुछ खोकर ही तो, सबने सम्मान पाया हैं। "होम व्हेअर वन स्टार्टस फ्रॉम. " प्रख्यात कवी टी. एस. एलिअट, यांचं हे वाक्य... प्रत्येक गोष्टीची सुरुवात ही घरातूनच होते...माझ्या आयुष्याच्या दोन्ही पर्वाची सुरुवात घरातूनच झाली होती. एक घर जिथे माझा जन्म झाला, माझं बालपण गेलं, जे माझं असुनही मला परक झालेलं....आणि एक घर जे फक्त नावाला माझं होतं पण तिथे माझं अस्तित्व गमावून बसली होती...आज एवढया दिवसांनी घरी जाताना खूप हुरहूर लागली होती, पण अपेक्षा मात्र होती की मी आज जे काही मिळवलं आहे ते पाहून सगळे माझा भूतकाळ विसरतील...स्वतःला ...Read More

4

अधांतर - ४

जिंदगी के स्कुल की, बस एक ही शर्त है। इम्तिहान देकर ही, सबक पढना होता है। प्रख्यात कादंबरीकार अर्नेस्ट म्हणतात, "सम्पूर्ण काळोखातच प्रकाशाला शिरता येतं.." म्हणजे अंधार असल्याशिवाय प्रकाशाला काही महत्त्वच नाही असं माझं स्पष्ट मत आहे. काय म्हणतात अभय सर, 'पोटेन्शीयल'....ते म्हणतात आपलं खर पोटेन्शीयल आपण किती यश मिळवलं त्यात नाही तर आपल्या अपयशांना कश्याप्रकारे पचवलं यात आहे...त्यांच्या याच गोष्टी मला खराब परिस्थिती सोबत दोन हात करायला प्रोत्साहन देतात..खूप वेळा अस होत की पहिल्या प्रयत्नातच यश मिळत आणि खूप वेळा मात्र यशस्वी होण्याच्या रस्त्यात स्वतःला झिजवावं लागतं...आणि पहिल्या परिस्थितीपेक्षा दुसरी परिस्थिती आपल्याला जास्त प्रगल्भ बनवते अस माझं मत ...Read More

5

अधांतर - ५

सिरत नही, हमेशा, सुरत देखता है। इसिलिये शायद, प्यार अंधा होता है। प्रेम ! जगातल्या सगळ्या प्रकारच्या भावनांचा कल्लोळ आणि प्रेम ही भावना एकीकडे...अस म्हणायला हरकत नाही की या दुनियेत प्रत्येक भावनेचा उगम प्रेमातून झाला आहे...आणि माझं स्पष्ट मत आहे की बहुतांश वेळा प्रेम हे समोरचा व्यक्ती कसा दिसतो यातून निर्माण होतं...पण ते प्रेम नसतंच मुळी... ते आकर्षण असत ज्याला आपण प्रेम समजतो...आणि खूप वेळा या आकर्षणाला बळी पडतो...कोणचा स्वभाव समजून घेणं, त्याचे विचार समजून घेणं ही नंतरची गोष्ट पण सुरुवात तर दिसण्यावरूनच होते ना...आणि इथेच घात होतो...प्रेमाची परिभाषा समजून घेण्यासाठी खूप परिपक्व व्हावं लागतं, आणि यासाठी महत्त्वाचा असतो ...Read More

6

अधांतर - ६

अधांतर-६ किसीके वजूद से निकलकर, मैने अस्तित्व अपना बनाया है । अतीत के आँधी से क्या डरना, जब तुफान मेरा हमसाया है। हेलन किलर म्हणतात, "सहज आणि शांतपणे चारित्र्य विकसित केले जाऊ शकत नाही. केवळ परीक्षेच्या आणि दु: खाच्या अनुभवातूनच आत्म्याला बळकटी मिळवता येते, महत्वाकांक्षा प्रेरित केली जाते आणि यश मिळते." अगदी खरंय ते...खूप वेळा आपण फक्त सूख कस मिळवता येईल याचाच विचार करतो...आपले प्रयत्न यासाठीच असतात की काहीही करून आपलं आयुष्य सुखकर झालं पाहिजे...आणि त्यात यशस्वी ही होतो, मग जोपर्यंत सगळं काही सुरळीत सुरू असतं तोपर्यंत आपण तो आनंद उपभोगत असतो...मग जेंव्हा नकळत संकटं आपल्यावर आक्रमण करतात तेंव्हा ...Read More

7

अधांतर - ७

अधांतर-७ सच्चा दिल ही जाने, सादगी की अहमियत। ठगणे वाला क्या जाने, प्यार की मासुमियत । श्रीकृष्ण म्हणतात," शौर्याने तुम्ही प्रेम मिळवता तेंव्हा ते त्या प्रेमाच अपहरण असतं आणि जेंव्हा प्रेमाने शौर्य मिळवता तेंव्हा ते खरं जिंकणं असतं..." खर आहे....चालकीने तुम्ही थोड्या वेळासाठी कोणाला आकर्षित करू शकता, फार फार तर मोहात पाडू शकता, परंतु कोणाला आपल्या प्रेमात पाडण्यासाठी तुम्हाला सहज आणि सरळ राहावं लागतं...काय म्हणतात ते 'डाऊन टू अर्थ' अगदी तसचं....पण आजकाल प्रत्येक मुलाला हे वाटतं की जर तो चांगला कमवणारा असेल, मोठ्या पदावर काम करणारा असेल, त्याच्याकडे चांगली धन संपत्ति असेल तर त्याला कोणतीही मुलगी मिळू शकते किंवा ...Read More

8

अधांतर - ८

चेहरे के रंग से अगर, इंसांन पहचान लेते। उम्मीद की कश्ती, कही डुबने ना देते। आपल्याला आयुष्यात माणसं कशी हे जास्त शिकवल्या जातं, पण माणसं ओळखायची कशी हे तर आपण आपल्याला आलेल्या अनुभवावरून शिकतो...पण जर माणसं ओळखायला शिकलो असतो तर वाईट परिस्थितीतुन गेलो ही नसतो, आणि वाईट परिस्तिथी अनुभवली नसती तर आयुष्य आपल्याला काय देतंय हे कळाल नसतं...कसा आहे ना मनुष्य स्वभाव पण! ज्याच्याकडून जास्त अपेक्षा ठेवतो तोच सगळ्यात जास्त बेजबाबदार पणे वागतो आपल्यासोबत...ज्याला जास्त जीव लावतो तोच आपली पर्वा करत नाही, आणि तीच व्यक्ती आपला जास्त अपेक्षाभंग करते...की असं म्हणायचं, आपण तसे अधिकार देतो त्या व्यक्तीला आपल्याला दुखवायला....असंही ...Read More

9

अधांतर - ९

अधांतर-९ ममता का वरदान पाकर, क्यूँ सदा अभिशापित हूं मै। विस्तृत बनाके जीवन सबका, फिर भी क्यूँ सिमीत हूं स्त्री ही पुरुषांइतकीच कणखर आणि सामर्थ्यवान असू शकते ही कल्पनाही आपल्या समाजात मान्य नाही...आणि जेंव्हा एखादी स्त्री ही कल्पना सत्यात उतरवण्यात यशस्वी होते तेंव्हा समाजव्यवस्थेला तो धोका वाटायला लागतो, पुरुषप्रधान संस्कृती लोप पावेल ह्या भीतीने लोकं मग त्या स्त्रीचं कर्तृत्व हे तिचं पराक्रम नसून तीच चरित्रहनन आहे हे सिद्ध करण्यासाठी कोणत्याही थराला जातात...वारंवार स्त्री आणि पुरुषांची तुलना केली जाते, या तुलनेत पुरुषांची बाजू किती वजनदार आहे याचा युक्तिवाद सुरू होतो....पण स्त्री आणि पुरुष यांची तुलनाच होऊ शकत नाही ही साधी ...Read More

10

अधांतर - १०

अधांतर-१० हसरतो के धागो मे हर क्षण, व्यथा का कण कण पिरोया करे। शिव-शक्ती मे विभेद जहाँ, वहां मेरा कौन करे? जस कळायला लागलं तेंव्हापासून 'मुलीच्या जातीने हे करू नये, ते करू नये, असं वागावं, तसं वागू नये' याच सूचना ऐकायला मिळाल्या...ठीक आहे, मुलींना वळण लावण्यासाठी या गोष्टी ही गरजेच्या आहेत, चांगले संस्कार घडावे त्यासाठी थोडा दबावही गरजेचा आहे, मुलींवरही आणि मुलांवरही...! पण आज पर्यंत मला एक गोष्ट कळली नाही की ही 'मुलीची जात' नेमकी असते काय? नाही म्हणजे, मुलांना आणि मुलींना तर देवाने (कदाचित देवीनेही) सारखंच बनवलं आहे ना! त्यांची मनं, त्यांची बुद्धी ही सारखीच असावी, कारण दोघेही ...Read More

11

अधांतर - ११

अधांतर-११ खमोशी के दरीचो से, कभी शब्दो को सुना है? मैने रात की बारीश मे, ख्वाबो को भिगते देखा । अति का भला न बोलना, अति की भली न चूप....'मुलींनी जास्त बोलू नये' हे जस शिकवल्या जात तस 'मुलींनी जास्त सहन करून शांत ही राहू नये' हे का शिकवल्या जात नाही?? आणि जर कधी सहन न करता राग व्यक्त केला तर लगेच 'संस्काराचे प्रमाणपत्र' वाटायला तयार सगळे....मला तर एकच कळतं, 'राग' हा संस्काराचा भाग नाही, ती एक भावना आहे ज्याला आपण व्यक्त करून वाट मोकळी करून देतो....प्रेम, मोह, दुःख, आनंद जश्या ह्या भावना आहेत तसच 'राग' ही एक भावनाच ...Read More

12

अधांतर - १२

भटकती राहों को मेरी, एक मंजिल दे गया । मिला था एक अजनबी, जो मुझे पहचान दे गया। आपण आहोत हे समजण खूप सोपं, पण आपण काय आहोत हे जेंव्हा आपण समजून घेतो, तेंव्हा जाणीव होते आपल्याला आपल्या धैर्याची, आपल्या शक्तीची....जन्मल्यावर आपल्याला नाव मिळणं हे स्वाभाविक आहे, पण त्याच नावलौकिक करणं हे आपल्या हातात आहे, पन मग हे सगळं इतकं सहजासहजी होत का?? नाही, नक्कीच नाही....आपल्याला नाव कमवायच असेल तर लागते एक जिद्द, एक प्रेरणा.... आणि जेंव्हा ही प्रेरणा आपल्याला मिळते तेंव्हा आपण पेटून उठतो, आपलं अस्तित्व सिध्द करण्यासाठी झुगारून टाकतो सगळी बंधनं, आणि मग सुरू होतो प्रवास आपल्या ...Read More

13

अधांतर - १३

सोचा ना था ये कहाणी, ऐसा भी रंग लायेगी । छोटी सी एक मुलाखात, इतना गहरा रिश्ता दे जायेगी। वेळा अनावधानाने भेटी घडतात, असं वाटतं आता भेटल्यावर पून्हा कुठे आपण या व्यक्ती ला भेटणार आहोत? जेंव्हा काहीही विचार न करता, काहीही न ठरवता आपण जेव्हा आपले मार्ग एकाच व्यक्तीच्या मार्गावर जातात तेंव्हा समजायचं काहितरी नक्कीच घट्ट नातं तयार होणार आहे आपलं त्याच्यासोबत.... माझंही तेच झालं... विक्रमचं आणि माझं नातं हे विधिलिखित होतं हे मी नाही बोलणार, कारण विक्रमने सगळं काही प्लॅन करून मिळवलं होतं...नाव, चांगली नोकरी, चांगलं पद, आणि त्यानंतर मी...मला शरीराने मिळवलं त्याने पण माझं मन त्याच होईल ...Read More

14

अधांतर - १४

गज़ब की धूप मे,छाँव सा मिला।खुद को पाया मैने,ऐसा आईना मिला।कधी तरी आयुष्यात एक काळ असा येतो की एका एक घडणाऱ्या घटना सगळ्या निराशा पसरवून जातात, कुठेतरी हा विश्वास व्हायला लागतो की आता आपल्या सोबत काही चांगलं घडणारच नाही....आणि तीच गोष्ट सत्य समजून आपण ही त्याच निराशेच्या प्रवाहात वाहत जातो, त्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाण्याचा प्रयत्न तर दूर, विचार ही करत नाही...अशा वेळी गरज असते फक्त एका कवडस्याची जिथून अंधार भेदून एक किरण आपल्या काळोखात शिरेल आणि आपलं आयुष्य बदलवून टाकेल... कधी कधी ती आशेची किरण आपल्याला शोधून काढावी लागते तर काही वेळेस ती अकस्मातपणे आपल्या समोर येऊन उभी ...Read More

15

अधांतर - १५

खोया था क्या जो, आज मिलने लगा है? उम्मीदों के उजालों मे, खुशी का साया निकला है। हरवलेलं नक्कीच असं म्हणतात, मला याची प्रचिती येत होती अभय सरांना भेटून... त्यांच्याशी बोलल्यावर, त्यांच्या सहवासात मला ही वाटत होतं जो आत्मविश्वास मी कुठेतरी मागे सोडून आली होती तो आता मला पुन्हा नव्याने गवसतोय...तस लहानपणापासूनच घरच्यांनी खूप 'प्रोटेक्टिव्ह' वातावरणात ठेवलं त्यामुळे कधी लोकांच्या दुःखाशी किंवा त्यांच्या अडचणींशी जास्त गाठ पडलीच नाही...आणि तसही आपल्या मध्यमवर्गीय कुटुंबात हेच शिकवतात की आपण भलं आणि आपलं काम भलं...त्यामुळे हे कोणाला जाऊन मदत करणं किंवा कोणाला शिकवणं हे समाजकार्य कधी केल्याच गेले नाहीत...जेंव्हा मी अभय सरांच्या NGO ...Read More

16

अधांतर - १६

अहंम की छत गिरने का, शोर नही हो पाता है । शोहरत का आसमाँ तो, बस एक वहम होता । मला असं वाटतं यश मिळवणं फार सोप्प आहे पण ते टिकवणं म्हणजे ब्रह्मव्रत...!! असं का?? तर, मला वाटतं यश म्हणजे भ्रमाचा भोपळा...ज्या दिवशी हा भ्रमाचा भोपळा फुटला त्यादिवशी हे यश आणि त्याचा अभिमान किती अर्थहीन आहे याची जाणीव होते... त्यामुळे ज्याच्या जवळ विवेक आहे त्यालाच यश हाताळता येतं असं मला वाटतं...विक्रमने जितक्या लवकर सगळं काही मिळवलं तितक्या लवकर त्याने सगळं गमावलं ही !!...त्याला चांगल्या वाईट मधला फरक कळलाच नाही किंवा मी असं बोलेन की ते समजून घेण्याची विवेकबुद्धी नव्हतीच ...Read More

17

अधांतर - १७

सभी सिकंदर यहा पर,कोई नही है फकीर।साये मे भी दिखती, है रोशनी की लकीर।मला अभय सर नेहमी बोलायचे कोणी कमी समजलं म्हणून आपण कमी होत नाही, किंवा आपण काही मोठं काम केलं म्हणून महान होत नाही, खरं तर एक मनुष्य केवळ आपली कर्म करू शकतो, आपण महान आहे की लहान आहे हे फक्त एक 'टॅग' आहे ज्याची किंमत बदलत जाते...आणि आपण फक्त चांगले कर्म घमंड न करता करायचे, तेच आपल्याला अनमोल बनवतील ज्याची कुठेच किंमत लावता येणार नाही, ते अनमोल असतील....हेच शब्द होते जे माझा आत्मविश्वास वाढवत होते, पण विक्रम मला कमी लेखण्याची एकही संधी सोडत नव्हता...आणि याचं एकच कारण ...Read More

18

अधांतर - १८

"जब सह ना पाते दाह हमारा, दफन अरमानो कर देते है। रिवाजो की घंटी गले मे, और, सभ्यता की बांध देते है।" मी लहानपनापासून बघत आली आहे, घरी काही संकट आले, घरात कोणी आजारी आहे किंवा घरातले पुरूष काही अडचणीत आहेत, माझ्या घरात उपास, तापास, नवस, नैवेद्य सगळे घराच्या बायकांनीच केलेत, अजूनही करतात, मलाही तशीच 'ट्रेनिंग' मिळाली....जेंव्हा 'हे सगळं आपणच का करावं?' हा प्रश्न विचारला घरात तेंव्हा 'जास्त बोलू नये' किंवा 'हे अभद्र प्रश्न विचारू नये' अशी ताकीद मिळाली...त्यामुळे मुकाट्याने सगळं काही अनुसरण करायची सवय लागली, आणि हे मझ्यासोबतच नाही, प्रत्येक मुलीसोबत होत तिच्या जन्मल्यापासून, आणि त्यामुळे होते काय, ...Read More

19

अधांतर - १९

"इतना आसान नही, अपणे तरीकेसे जिना, अपनोको ही, खटकती है मनमर्जी हमारी।" कुठे तरी वाचलं होतं हे, कोणी लिहिलंय नाही...पण, नुसतं वाचायला छान वाटलेलं वाक्य खर ही होऊ शकते याची अनुभूती मला आता माझ्या आयुष्यात येत होती...जोपर्यंत मी सगळ्यांच्या गोष्टी काळ्या दगडावरची रेष म्हणून डोळे झाकून मान्य करत होती तोपर्यंत सगळं ठीक होतं, घरचे आणि नवरा बोलेल ती पूर्व दिशा असं समजत होती तेंव्हा मी अगदी आदर्शवादी होती...पण स्वतःच्या माकलीच गहाण ठेवलेलं आयुष्य जेंव्हा स्वतःच्या मर्जीने जगण्याचा प्रयत्न केला तेंव्हा मात्र मी सगळ्यांच्या नजरेत वाईट झाली, अचानकपणे माझे संस्कार, माझे आदर्श, इतकंच काय तर माझं चरित्र ही चुकीचं झालं...वाह ...Read More

20

अधांतर - २०

"कुछ तो जादू होगी, ठगने मे तुम्हारे, इतना लूट गये की, भरोसा भी ना बचा।" धन, संपत्ती, पैसा चोरीला तर तो पुन्हा कोणत्या ना कोणत्या मार्गाने परत मिळवू शकतो, आणि जो चोर आहे त्याला शिक्षा ही मिळते... पण विश्वास चोरीला गेला तर तो कसा मिळवायचा??? नाही माहीत याच उत्तर...पण एक नक्की सांगू शकते, जो विश्वास चोरतो त्याला तर काहीच फरक पडत नाही पण ज्याचा चोरल्या जातो तो मात्र सगळीकडूनच हरतो आणि असा हरतो की दुसऱ्यांवर सोडा स्वतःच्या अस्तित्वावरचा ही विश्वास उडून जातो...इतकी चलाखी, इतकी लबाडी करून आपण स्वतःचं प्रतिबिंब आरश्यात पाहू शकतो, स्वतःच्या नजरेत आपली काही किंमत असू शकते??? माझ्या समजण्या ...Read More

21

अधांतर - २१

"सवाल जवाब का, किस्सा खतम होगा। जब वक्त मेरा आयेगा, तरिकेसे हिसाब होगा।" राग..!! कितीही नकारात्मक भावना असली किंवा म्हणेल की आपण ते नकारात्मक बनवलं आहे... पण तरीही मला वाटते राग हे आपल्या भावनात्मक परिपक्वतेचं चमत्कार आहे...राग करणं ही एक सहज प्रतिक्रिया आहे, पण त्या रागाचा वापर योग्य वेळी, योग्य माणसावर आणि योग्य कारणासाठी व्हायला हवा आणि हे संतुलन राखणं अतिशय कठीण आहे...माझाही राग खूप उफाळून येत होता आणि त्याच रागात मी स्वतःच्या तब्येतीचा विचार न करता निघाली होती न्याय मागायला मागचा पुढचा काही विचार न करता, पण ते तितकं सोप्प ही नव्हतं...विक्रमने जितकं विचार करून हे हा खेळ ...Read More

22

अधांतर - २२

"माना बडे सख्त है, तेरे इम्तिहान जिंदगी। टूट के बिखरने वाले, लेकिन हम भी नही।" कधी ऊन तर कधी ग्रीष्मातली दुपार तर कधी शरदेच्या रात्रीसारखा गारवा देणारा..कोणी म्हणतं आयुष्य हे नदीच्या प्रवाहासारखं असतं सतत वाहणारं..हो बरोबर आहे, पण त्यात नुसतंच वाहून चालत नाही, कधी त्या प्रवाहात येणाऱ्या अडथळ्यांचा आढावा ही घ्यावा लागतो थांबून, कधी कधी प्रवाहाच्या विरोधात ही जावं लागतं आणि यामुळे आयुष्य वाहत नाही तर घडत जातं...आयुष्य तर तसंच घडतं जसं आपण घडवत जातो...खरं तर काही रूप रंग असतात का आयुष्याला??? नाही...पण तरीही त्यातले छुपे रंग उधळायचे असतील तर एक सकारात्मक दृष्टिकोन हवा..आयुष्य एकदाच मिळते आणि त्यालाही जर ...Read More

23

अधांतर - २३

"कुछ इस कदर जिंदगी ने, आईना दिखाया है मुझे। अपनो ने ठुकराया और, गैरो ने संभाला है मुझे।" माझं मानणं आहे, आपल्या रक्ताच्या नात्याव्यतिरिक्त काही नाते असे असतात जे रक्ताच्या नात्यापेक्षा ही जड ठरतात...रक्त कितीही घट्ट असलं, तरी हे जे मनाचे ऋणानुबंध असतात ते त्या रक्ताची भिंत तोडून, मनाला छेदून आत्म्यापर्यंत पोहोचतात.. आणि प्रत्येकाच्या आयुष्यात असं एक नातं तरी असतं हा माझा समज, नव्हे, विश्वास आहे...कधी ते नातं आपल्याला मित्रांमध्ये, मैत्रिणींमध्ये भेटतं, कधी आपल्या सहकाऱ्यांमध्ये, तर कधी आपले गुरुवर्य या नात्याची जाणीव करून देतात आपल्याला, असे नाते आपल्याला आयुष्याच्या प्रत्येक वळणावर, पदोपदी आपलं मार्गदर्शन करतात, आपल्याला बळ देतात, फक्त ...Read More

24

अधांतर - २४

"या तो हम ज्यादा ही सिधे थे, या किस्मत की मक्कारी थी। हर बार तुमसे धोका खाया, सच की उम्मीद हारी थी।" चांगुलपणाच्या कितीही गोष्टी केल्या आणि चांगुलपणावर माझा कितीही विश्वास असला तरी या कलयुगात एक गोष्ट नक्कीच अनुसरण करावी, ती म्हणजे "जशास तसे वागणे" ....हो, अगदी खरं बोलते मी, कारण अतिजास्त सरळ चालण्याने धर्मराज युधिष्ठिर आपलं सगळंच गमावून बसले होते...बरं तेंव्हा त्यांना सगळं मिळवून द्यायला आणि त्यांना मार्गदर्शन करायला साक्षात लीलाधर तिथे होते, पण आता तस नाही ना..!! आताच्या काळात कोणी येत नाही मार्गदर्शन करायला, आणि तसा मार्गदर्शक भेटायला नशिबही लागतं... आणि नुसतं नशीब तसं असून चालत नाही, ...Read More

25

अधांतर - २५ (अंतिम भाग)

"फूलों में ढली हुई ये लड़कीपत्थर पे किताब लिख रही है।फूलों की ज़ुबान की शायरा थीकाँटों से गुलाब लिख है।"आज जेंव्हा स्वतःच्या आयुष्याचा प्रवास पाहते तेंव्हा उर्दू गझलकारा इशरत आफ़रीं यांच्या या ओळी आठवतात...आज असं बघितलं तर सगळंच आहे माझ्याकडे, म्हणजे भौतिक सुखं तरी सगळीच आहेत...तरीही एकटीच आहे....असायलाही पाहिजे..हे सगळं मिळवण्यासाठी, स्वतःच्या निवडलेल्या मार्गांवर चालण्याची किंमत मोजली आहे मी...'काही मिळवायचं असेल तर खूप काही गमवाव लागतं' हे खरंच कळत होतं मला...पण या सगळ्यांत एक जाणीव झाली होती, की आयुष्य हे गुलाबाच्या फुलसारखच आहे, सुंदर आहे पण काटेही भरपूर आहेत...आणि त्या काट्यांवर चालूनच मला आयुष्याची किंमत कळली आहे...तीन वर्ष....!! तीन ...Read More