अहमस्मि योध:

(71)
  • 132.2k
  • 17
  • 47.9k

अहमस्मि योध: ही एक साय-फाय कथा आहे. यातले सगळे प्रसंग पूर्णपणे काल्पनिक आहेत.समीर देवधर..एक " हॅपी गो लकी " मुलगा, आनंदाने त्याचे जीवन व्यतीत करत असतो.. आई- बाबा..त्याचा एक खोडकर पण गुणी कुत्रा..टॉमी आणि त्याचे मित्र हेच त्याचे विश्व असते..पण नियतीने त्याच्या आयुष्यात वेगळंच काहीतरी वाढून ठेवलेलं..माणसाच्या आयुष्यात उतार चढाव येत असतात पण ते इतके अनपेक्षित आणि भयानक असतील असं समीरने स्वप्नात देखील विचार केलं नसेल..एक गुन्हेगारी क्षेत्राशी संबंधित असलेला धूर्त वैज्ञानिक आणि त्याची टोळी.. भूतकाळातून उक्रून काढलेले काही रहस्य.. त्याचं जगणं कठीण करून ठेवतात..हा खेळ चालू ठेवणारे एकामागून एक असे आणखी खेळाडू

New Episodes : : Every Thursday

1

अहमस्मि योध: भाग -१

अहमस्मि योध: ही एक काल्पनिक कथा आहे. यातले सगळे प्रसंग पूर्णपणे काल्पनिक आहेत.समीर देवधर..एक " हॅपी गो लकी " आनंदाने त्याचे जीवन व्यतीत करत असतो.. आई- बाबा..त्याचा एक खोडकर पण गुणी कुत्रा..टॉमी आणि त्याचे मित्र हेच त्याचे विश्व असते..पण नियतीने त्याच्या आयुष्यात वेगळंच काहीतरी वाढून ठेवलेलं..माणसाच्या आयुष्यात उतार चढाव येत असतात पण ते इतके अनपेक्षित आणि भयानक असतील असं समीरने स्वप्नात देखील विचार केलं नसेल..एक गुन्हेगारी क्षेत्राशी संबंधित असलेला धूर्त वैज्ञानिक आणि ...Read More

2

अहमस्मि योध: - भाग - २

अहमस्मि योध: भाग - २ " समीर..अरे उठ रे बाळा !! " कॉलेज ला नाही का जायचं ?... खाली लवकर.. " समीरची आई म्हणाली. "हो..आई उठतोच..पाच मिनिटात तयार होऊन येतो खाली.." समीर उत्साहात बोलला खरा पण बेड वरून उठण्याची त्याची अजिबातच इच्छा नव्हती..समीर तयार होऊन नाश्ता करायला खाली आला..घाई-घाई ने त्याने नाश्ता संपवला आणि कॉलेज ला निघाला.कॉलेज तसं त्याच्या घरापासून लांबच होतं, म्हणून तो बाईक घेऊन जायचा. कॉलेजच्या गेट जवळ दिग्या त्याची वाट बघत होता..समीर येताच तो बोल्ला.."या या शेठ..सुप्रभात.." "गुड मॉर्निंग..दिग्या.." - समीर गाडी पार्क करत म्हणाला.. दोघं ...Read More

3

अहमस्मि योध: भाग - ३

स्वतः ला सावरत समीर गाडीच्या बाहेर आला. अंधारात जी आकृती त्याच्या गाडी समोर तयार झाली होती ती आता नाहीशी होती. समीरला दरदरून घाम फुटला होता.. सगळं एकदम अंधुक होतं आणि काही क्षणांनी थोडं फार दिसू लागतं. वयस्कर होते कोणीतरी पण तरीही ताठ उभे होते. छातीपर्यंत येणारी पांढरी झालेली दाढी आणि तितकेच लांब केस , बळकट स्नायू..गळ्यात रुद्राक्षाची माळ आणि डोक्यावर भले मोठे शिवगंध रेखाटलेले... ७ ते ८ फूट उंचीचे ते अत्यंत तेजस्वी दिसत होते. त्यांनी सफेद रंगाचा पेहराव केला होता. " समीर , ये आमच्या समोर येऊन उभा राहा.." - ती व्यक्ती म्हणाली. " क...कोण..आहात तुम्ही..तुम्हाला माझा नाव कसं ...Read More

4

अहमस्मि योध: भाग - ४

त्या कागदावर आजोबांचं नाव वाचून समीर पुर्ण भांबावून गेला होता.. " समीर...ही कागदंं जरा विचित्रच आहेत...कदाचित प्राचीन लिपी मधे लिहलं आहे...आणि त्यातच हा दुसरा कागद एखाद्या नकाश्या सारखा दिसतोय..." - दिगंबर. समीरने ती कागदं हातात घेतला आणि निरखून पाहू लागला..त्याच्यावर नजर फिरवताच त्याच्या कपाळावर आठ्या उमटल्या होत्या. " या इतक्या भयान जंगलात हा वाडा..आणि इथे हे सगळं.. आजोबांचं नाव असलेल्या या कागदा वरून हे स्पष्ट आहे की याचा आपल्याशी काहीतरी संबंध नक्कीच आहे.." समीर म्हणाला. " बाकी अजून काही दिसत नाहीये इथे आपल्या कामाचं.." -दिग्या. "चल बाहेर जाऊन त्या गणपत कडून अजून काही माहिती मिळते का बघू.." - समीर. ...Read More

5

अहमस्मि योधः भाग -५

घरातून निघून समीर रेल्वे स्टेशनकडे चालत निघाला. आसपास नीरव शांतता पसरली होती..रस्त्यावर काही ठिकाणी दुकानांच्या बंद शटर बाहेर झोपलेली होती. अधूनमधून एखाददुसऱ्या कुत्र्याचे भुंकणे ही ऐकू येत होते. अचानक पावसाची रिमझीम चालू झाली..घाईगडबडीत निघाल्यामुळे समीर छत्री सोबत आणायला विसरला होता..पावसाची पर्वा न करता त्याने रेल्वे स्टेशनकडे धाव घेतली. थोड्यावेळाने तो रेल्वेच्या फलाटावर पोहोचला आणि तिकीट काढून घेतलं. ट्रेन अजून आली न्हवती म्हणून त्याने स्थानकावरील चहा विक्रेत्याकडून चहा घेतला. चहाने त्याला थोडी तरतरी आली पण तरीही झोप नसल्याने त्याचे डोळे लाल झाले होते. तितक्यात त्याला लांबून ट्रेन येताना दिसली आणि तो ट्रेन पकडण्यासाठी थोडा सावध झाला. ट्रेन मध्ये जास्त गर्दी ...Read More

6

अहमस्मि योधः भाग - ६

ठरल्याप्रमाणे समीर आणि दिग्या पान टपरी जवळ पोहोचतात..तिथे रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला दिग्याचा मित्र अनिल, जो हॉस्पिटल मध्ये वॉर्ड बॉय तो त्यांचीच वाट बघत उभा होता..पटकन दोघं जाऊन त्याच्यासमोर उभे राहतात.. " चल..सांग लवकर काय माहिती मिळाली ??" - दिग्या उत्सुकतेने त्याला विचारतो.. " तसं त्याला मी आधी खूप वेळा पाहिलंय. त्याचं नाव धोंडीबा असं काहीतरी आहे..तू म्हणाला म्हणून मी चोरून त्याचे रिपोर्ट्स पाहिले..दोन वर्षांपूर्वी आमच्याच हॉस्पिटल मध्ये चेहऱ्याची प्लास्टिक सर्जरी झाली होती.. ( प्लास्टिक सर्जरी ही शल्यक्रिया आहे ज्यामध्ये मानवी शरीराचा जीर्णोद्धार, पुनर्रचना किंवा बदल यांचा समावेश आहे. ) अधून-मधून चेकअप साठी येत असतो तो.." - अनिल गंभीर स्वरात ...Read More

7

अहमस्मि योधः भाग - ७

समीर आणि दिगंबर दारा जवळ गेले आणि पाहिलं तर समोर स्नेहा उभी होती. " स्नेहा तू..!! " - समीर डोळ्यांनी स्नेहा कडे बघत म्हणाला.. " अशी अचानक कशी काय आलीस..न सांगता..?" - दिग्या. " का..तू न सांगता काल निघून गेलास..हा समीर काही न बोलताच घाईघाईने फोन ठेवून देतो..ते चालतं का..? " - स्नेहा जरा रागातच म्हणाली. " मी ऐकलंय तुमचं बोलणं.." हे ऐकुन समीर आणि दिग्या क्षणभर का होईना पण..जरा घाबरलेच. "काय..ऐकलंय तू..?" - समीरने विचारलं. " हेच..की तुम्ही इथे फिरायला जायचं नियोजन करताय..! " - स्नेहा म्हणाली. तिच्या आवाजातला रोष काही कमी नव्हता. " अच्छा..ते होय..!! " - ...Read More

8

अहमस्मि योधः भाग - ८

समीर गाडीत जाऊन बसला. डोळे बंद केले..एक दीर्घ श्वास घेतला आणि पुन्हा गाडी सुरू केली. थोडं पुढे गेल्यावर सहजच नजर आरश्यावर पडली.. दृश्य धक्कादायक होतं..डोळ्यांवर विश्वास बसला नाही.खिडकीची काच खाली करून त्याने बाहेर डोकावून मागे पाहिलं.. त्या अज्जी तिथे नव्हत्या त्यांची झोपडी ही गायब..!! हे सगळं एकदम मायावी वाटत होता..आपण तिथे काहीवेळा पूर्वीच नाष्टा केला होता. आणि आता एकदम सगळंच अदृश्य..! हे सगळं कसं शक्य आहे असा विचार समीरच्या मनात आला..दिग्या आणि स्नेहा दोघं बोलण्यात व्यस्त होते. हे त्यांना कळण्याच्या आत समीरने गाडीचा वेग वाढवला आणि तिथून गाडी लवकर काढली. त्या लहान मुलाने दिलेला नकाशा त्यांने बघितला होता त्याच ...Read More

9

अहमस्मि योधः भाग - ९

स्नेहा त्या कागदावरच मजकूर वाचून जागीच गोठल्यागत झाली होती. " अरे यार..स्नेहा आपल्याला थोडा वेळ इथेच थांबावं लागेल इंजिन गरम झालाय..त्यामुळे गाडी स्टार्ट होत नाही.." - समीर म्हणाला. स्नेहाचं काहीच प्रतिउत्तर आलं नाही.. " स्नेहा.... स्नेहा.." - समीर ने पुन्हा आवाज दिला.. त्याने बोनेट लावून घेतला..स्नेहा त्या कागदाकडे निरखून पाहत होती..हे बघून समीर घाबरला.. " स्नेहा काय बघतेस तू..? ठेवून दे ते..काही नाहीये त्यात.." - समीर अडखळत्या स्वरात म्हणाला. "थांब समीर..गेली काही दिवस तुझ्या वागणयातला बदल मला जाणवत आहे..तू असा कधीच नव्हतास..काही प्रॉब्लेम होता तर मला आधीच सांगायचं ना.." - स्नेहा. "तू काय बोलतेस..मला काहीच कळत नाही.." - समीर ...Read More

10

अहमस्मि योधः भाग - १०

सगळेच भयचकित नजरेने एकमेकांकडे पाहात होते. आता हळूहळू काही गोष्टी स्पष्ट होऊ लागल्या होत्या. दोन हजार वर्षांपूर्वी चे तेच त्यांच्या समोर होतं..समीर, दिग्या, स्नेहा आणि मंगेश काहीच बोलत नव्हते. काही मिनिटं त्या खोलीत एक जडशीळ शांतता पसरली. " एक मिनिट.. ह्यात लिहल्या प्रमाणे महाराज नंदक यांनी समुद्राच्या किनारी राजवाडा बांधला होता..आणि हा वाडा पण.." - समीर गंभीर स्वरात म्हणाला. " हो..तो राजवाडा याच ठिकाणी असल्याची शक्यता नाकारता येत नाही.." - स्नेहा म्हणाली. " म्हणजे ते सात दरवाजे आणि अग्निघराकडे जाणारा रस्ता ही इथेच असेल.." - दिग्या. " हजारो वर्षांत जमिनीच्या उलथापालथीत भूभागात खूप बदल झाले आहेत.. ही वास्तू जरी ...Read More