शेतकरी माझा भोळा

(49)
  • 151k
  • 12
  • 56.6k

१)शेतकरी माझा भोळा! रात्रीची वेळ होती. अमावस्येचा अंधार सम्दीकडं पसरला होता. गावात सम्दीकडं सामसूम होती. रातकिड्यांच्या आवाजासोबत पारावरील पोथीकऱ्याने मधूनच उंचावलेला आवाज रातरची शांतता भंग करत होता. देवळात पाच-सात म्हाताऱ्या आणि चार-दोन म्हातारेच काय ते पोथीपुढे बसून होते. पारासमोरील घरात राहणारा गणपत बायकोशेजारी बाजेवर पडला होता."धनी, औंदा हायब्रीडीचा उतार लै चांगला यील आस वाटत..."व्हय. आज सम्दी हायब्रीड कापून टाकली हाय. उंद्या या फार तं परवाच्या दिसी खळं व्हईल. च्यार- आठ रोजात घर हायब्रीडीनं भरून जाईल बघ.

Full Novel

1

शेतकरी माझा भोळा - 1

१)शेतकरी माझा भोळा! रात्रीची वेळ होती. अंधार सम्दीकडं पसरला होता. गावात सम्दीकडं सामसूम होती. रातकिड्यांच्या आवाजासोबत पारावरील पोथीकऱ्याने मधूनच उंचावलेला आवाज रातरची शांतता भंग करत होता. देवळात पाच-सात म्हाताऱ्या आणि चार-दोन म्हातारेच काय ते पोथीपुढे बसून होते. पारासमोरील घरात राहणारा गणपत बायकोशेजारी बाजेवर पडला होता."धनी, औंदा हायब्रीडीचा उतार लै चांगला यील आस वाटत...""व्हय. आज सम्दी हायब्रीड कापून टाकली हाय. उंद्या या फार तं परवाच्या दिसी खळं व्हईल. च्यार- आठ रोजात घर हायब्रीडीनं भरून जाईल बघ. ...Read More

2

शेतकरी माझा भोळा - 2

२)शेतकरी माझा भोळा! साडे आठ-नवाची येळ आसल, समदं सीतापूर जागं झालं व्हतं. जो तो आपापल्या कामामध्ये गुंग होता. गडी-मान्स ढोरायच्या मांघ व्हती. शेण काढणं, झाडझूड करणं ही कामही चालली व्हती. मालक आपापल्या गडयाला दिसभरात काय काम करायची त्ये सांगत व्हते. बाया-मान्स सैपाक-पाण्याच्या माघ लागल्या व्हत्या. गणपत बी ईचार करत बसला व्हता, बिडी फुकत व्हता. दिसभर काय कराव आन् काय न्हाई या विचारात पडला व्हता. पर काय करावं त्ये ठरत न्हवतं. येकदा वाटायचं शेतामधी जावं पर दुसरे ...Read More

3

शेतकरी माझा भोळा - 3

३) शेतकरी माझा भोळा! येकदा का कास्तकारायचे आगुंठे घिवून त्यांचे हात पुढील काम व्हायला वेळ त्यो किती लागणार? फाता-फाता क्यानालचं काम बी पुर झालं. येक एक्कर म्हन्ता म्हन्ता गणपतचा तीन येक्करचा तुकडा क्यानालात गेला. त्यो बी वावराच्या बराबर मधून. भावा-भावाची वाटणी होवावं त्या परमानं ! क्यानालच्या दोही बाजूनं समान जिमिन ऱ्हायली. क्यानालचं बांधकाम सुरु आस्ताना गावातल्या शिरिमंतांची मजा झाली. क्यानालात पाणी वाहील तवा वाहील पर बांधकामाच्या वाहत्या गंगेमंदी लोकायनं हात धुवून घेतले. सीतापूरपरमानं क्यानालच्या पट्ट्यात येणाच्या समद्या गावाची चांदी झाली. ...Read More

4

शेतकरी माझा भोळा - 4

४)शेतकरी माझा भोळा! आबासाहेब दोन तीन दिसात मुंबईहून आले. त्येंच आमदारकीच तिकीट पक्क झाल व्हतं. त्ये शेहरात ऊतरल्याबरूबर त्येंच्या चमच्यांनी क्यानालचा सम्दा परकार त्याच्या कानी घातला. तव्हा आबासाहेब म्हन्ले, "आस हाय काय? फातो काय करायचे ते." गावात आल्याबरूबर त्येनी गणपत आन ज्येंचा पैका मिळाला नव्हता त्या समद्याना बलीवल. ज्ये गडबड करण्याजोगे व्हते. त्येंना पैले बलीवलं आन् त्येंचा पैका दिवून त्येंची त्वांड बंद केले... सर्कारनं मोर्च्च्यावाल्यायचा म्होरक्या फोडल्यावाणी! आस्ते आस्ते सम्दे लोक जमा झाले तव्हा सरपंच बाहेर ...Read More

5

शेतकरी माझा भोळा - 5

५) शेतकरी माझा भोळा! कोंडबा मोटारीतून उतरला आन् पायी घराकडं निघाला. स्टँडपासून गाव चार फरलांग दूर व्हत. तेव्हढ अंतर पायी चालाय लागायच. न्हाई म्हणाया दोन ऑटो व्हते पर त्ये मान्सी पाच रुपै घेयाचे. तेव्हढे पैयसे कोंडबापाशी नसायचे त्यो हमेशा पायीच निघायचा. त्या दिशीबी त्यो पायीच सीतापूरकडं निंघला. दोन-आडीच फरलांग आला आन् त्येच ध्यान सडकेला चिकटून असलेल्या त्येच्या जिमिनीकड गेलं. दोन-आडीच येकरचा त्यो तुकडा नुस्ता खडकाळ व्हता. ह्ये मोठाले धोंडे पडले व्हते. कोंडबाच्या घरी आठरा-ईस्व दरिद्री असल्यामुळे त्येच्या आज्ज्यापासून म्हंजी जवळ-जवळ ...Read More

6

शेतकरी माझा भोळा - 6

६) शेतकरी माझा भोळा! वावराचा बैयनामा झाला आन् तात्यासायबाच्या दोन हजारात बेण्याचा सौदा झाला. बेण आणून त्येनं वावरात लावल. तात्यासायेबाच्या वळखीनच कोंडबाला बैंकनं जीपसाठी बी रीन देलं. पच्चीस हजार रुपै भरावं लागले पर काम झालं. धाव्या दिशी गणपतच्या घराम्होरी जीप ऊबी ऱ्हायली. तव्हा गणपत, यस्वदा, कोंडबा आन् सखीला बी आसमान ठेणगं झालं. सीतापूरात ह्ये बी येक नवलच झालं. समदं गाव जीप फायला उल्टलं. जसा काय गणपतीच्या घरी कोन्ता मोठ्ठा महाराज आला व्हता. सांच्या पारी आबासायेबाचं बलीवण आलं.गणपतला फाताच आबा ...Read More

7

शेतकरी माझा भोळा - 7

७) शेतकरी माझा भोळा! कारखाना झाला व्हता. चेरमनपदी आबासायेबाची निवड झाली. त्येच्यासंग दुसरे धा डैरेक्टर बी नेमले व्हते. कारखान्याचा पैयलाच हंगाम! क्यानालच्या पाण्यावर ऊस लावलेले शेतकरी बी लै व्हते. समद्यांना ऊस पोचवायची गडबड व्हती. सीतापूरात पैल्या नंब्रावर आसणाऱ्या गणपतच्या फडानं मातर मान टाकाय सुरुवात केल्ती. एव्हढया बिगीनं कार्खाना ऊस ऊचलायची काय बी चिन्न न्हवती. ऊसाला एखाद-दुसरं पाणी देवून दीड-दोन म्हैन्यात पुना ऊसाला टवटवीत कराव म्हणून गणपत आन् यस्वदा क्यानालला पाणी सुटायची वाट फात व्हते. मातर पाणी ...Read More

8

शेतकरी माझा भोळा - 8

८) शेतकरी माझा भोळा! कलाकेंदरातून घिऊन गणपत सीतापूरला आला. त्येला येसीतच आबासायेबाचा गडी भेटला. तो म्हण्ला, "गणपत, आर कोठ कोठ धुंडावं तुला. चल, आबासाबानं तुला बलीवलंय." गड्याच्या माघ मांघ गणपत सरपंचाकडं गेला. त्येला फाताच सरपंच म्हण्ले,"गणपत, काय ठरवलस बा जीपीच?""मालक, म्या काय...""म्या बैंकत फायलं, तुमी आतापस्तोर येकच हप्ता भरला हाय. त्यो बी सम्दा याजात गेला. आजच्या घडीला त्या जीपीपरीस नई जीप घेतल्याली परवडती. पर आस हाय तू मझा माणूस हाय. तुही हर वक्ती फसगतच झाली म्हून म्या ...Read More

9

शेतकरी माझा भोळा - 9

९) शेतकरी माझा भोळा! टरकाची वाट फाता चार-पाच दिस निघून गेले पर त्यो आलाच हाई. गणपत रोज फाटे मारुतीच्या दर्शनाला गेल्यावाणी कार्खान्यावर जायचा. दिसभरात कव्हातरी मुकीरदमाची गाठ पडायची. मुकीरदम त्येला ग्वाड ग्वाड बोलून पाटील-रावसाब म्हून वाटेला लावायचा. सांच्याला दोन-तीन टरक धाडून देत्यो आस रोजच बोलायचा. घरामंदी यस्वदाची किरकिर वाढली व्हती. सावकार बी पैक्यासाठी तंग करु लागला. जाता-येता कलाकेंदराचा मालक पैक्याच काय झाल म्हून ईचारायचा. कोंडबा रात-रात घरी येत न्हवता. आश्येच आठ-धा दिस गेले. त्या सांच्याला गणपत मारुतीच्या ...Read More

10

शेतकरी माझा भोळा - 10

१०) शेतकरी माझा भोळा! संपाचा दिस उजडला. पर संप मिटायची काय बी चिन्न दिसत न्हवते. कामगार पाच म्हैन्याचा पगार देईस्तोर आन लेबर लोक आर्धी ऊचल फायजेत म्हणून हटून बसले व्हते. डिरेक्टर मंडळ दोन पगार म्हैन्याचा पगार आन् पच्चीस टक्के ऊचल देयाया राजी झालं पर तोडगा निघत न्हवता. कामगारायचा आन् लेबरायचा नेता लै भारी व्हता. भासण करताना त्यो फाडफाड बोलत व्हता. डिरेक्टर मंडळानं कसा भ्रस्टाचार केला त्येची यादी सामानावाणी तोंड पाठ वरडू वरडू सांगत व्हता. ...Read More

11

शेतकरी माझा भोळा - 11

११) शेतकरी माझा भोळा! कोंडबा मेला, सखीची विटंबना झाली. तिला कलाकेंदराच्या मालकान धंध्याला तव्हा खरं तर गणपत आन यस्वदावर दुक्काच आबाळ कोसळलं, त्यातच त्येंचा बी अंत व्हवावं पर ज्यांच्या भाळी जित्तेपणी मरण जगायचं सटवीन लिवलेल ऱ्हाते. त्येंची अशी सुकासुखी सुटका व्हत न्हाई. कोंडबानं सोत्ताचं दुक गिळलं पर यस्वदीला संबाळायला लै दिस लागले. सोयरे दोन-चार रोज ऱ्हाऊन निघून गेले. पाच-धा रोज येड्यावानी वागणारी यस्वदा आपुआप ताळ्यावर आली आन् गणपतला त्या दुकात तेव्हढच सुक गावलं. पोटाच्या भुकेनं डोकं वर काढताच दोग बी ...Read More

12

शेतकरी माझा भोळा - 12

१२) शेतकरी माझा भोळा! मे म्हैयना सुरु व्हता. मे म्हैन्याची आनी ऊन्हाची मैतरी दाट. दोघबी येकमेकायचे जीवापाड मैतर! दोघायचं पिरेम आस्स ऊतू जात्ये की सम्द जग त्येंच्या पिरेमाचे चटके सोसत्ये पर त्येंची त्या दोघायलाबी जाण नसत्ये, त्ये आपल्याच नशेत दंग ऱ्हात्यात, सम्द ईसरुन येकमेकाला भरभरुन पिरेम देत्यात. सीतापूरात वैशाकाच्या ऊन्हाचा कोलाहल माजला व्हता. समद्यांना त्राहीत्राही करुन सोडले व्हते. फाटे नौ वाजल्यापासून बाहीर त्वांड काढायची सोय न्हवती. घरामंदी बसले तरी ऊकडल्यावाणी व्हायचं. आंगाचं नुस्त पाणी-पाणी व्हयाच. पाडवा झाला. नव साल सुरु ...Read More

13

शेतकरी माझा भोळा - 13

१३) शेतकरी माझा भोळा! पांदीहून आल्या आल्या यस्वदा गणपतला म्हण्ली, लोक कपासीच्या थैयल्या आणाय चाललेत. तुमी बी जाता का? न्हाई तं ऐक करा...""कसं करु सांग. आता तू सांगावं आन् म्या आयकावं...""बर! बरं!। लै आले आईकणारे. आस्स करा, पैयले कोन्ला तरी ईच्चारा आन् मंग जा." "बरं..." आस्सं म्हणत जरा वेळानं गणपत तात्यासायेबाकडे गेला. रामराम करत म्हन्ला, "मालक, कपाशीची कोणती जात चांगली?""का रं?""औंदा सरकी लावावं म्हन्तो.""चांगली गोस्ट हाय की. जिमीन पडीक ऱ्हाण्यापरी काही बाही घेतलंच पायजे ""मंग येक सांगा, येच्च फोर चांगला की डब्बल फोर?""त्याच ...Read More

14

शेतकरी माझा भोळा - 14

१४) शेतकरी माझा भोळा! दुम्हार लावलेल्या सर्कीनं मातर गणपतवर किरपा सर्की आशी मास्त निघाली की बास! गणपत आन् यस्वदा ज्याम खुस झाले. दुसऱ्यायच्या मांघून लावलेली आसून बी सरकी सम्द्याच्यापेक्सा जोरानं वाढत व्हती.. एकूणीस-ईसचा फरक व्हता. लोकायनं कापसालं खत देयाला सुरुवात केली."यस्वदे, आग सम्दे कापसाला खत देयालेत.""खरं की? मंग आपूनबी देवू की.""पैका कोठून आणावं?""अव्हो, सोसायटीकडं फा की आसल तं आसल.""सोसायटी मंदी खताचा दाणाबी न्हाई. कालच चेअरमनला ईच्यारलं. तालुक्याच्या हापीसातल्या हामालायचा संप चालू हाय म्हण.""या लोकायलाबी ह्योच टैम मिळाला न्हव संप कराया. ...Read More

15

शेतकरी माझा भोळा - 15

१५) शेतकरी माझा भोळा! दोन-च्यार रोजात गणपतचा कापुस येचून झाला. सम्द कपाशीन भरलं. पाचव्या रोजी फाटेचे धा वाजत व्हते. यस्वदा म्हण्ली, "आव्हो, कपासीची सरकारी खरेदी आजूक सुरु झाली का न्हाई?""व्हईल, दोन च्यार दिसात.""काय सांगावं बाई, सम्दा कापुस यीवून पडला पर ह्ये सरकार आजूक बी जाग झालं न्हाई. केंद्र सुरु झाल्यावर बी धा-धा दिस नंबर लागत न्हाई, आज कापुस जाया फायजे व्हता. पर सरकारला सांगावं कुणी?""गणप्या... आरं गणपती...""कोण? किसान देवा? या व्हो या.""आता या म्हन्ताल तरी बी आलू. ...Read More

16

शेतकरी माझा भोळा - 16 - अंतिम भाग

१६) शेतकरी माझा भोळा! थकला-मांदला गणपत शेहरात पोचला यार्डाकड जाताना त्येन ग्यासतेल, बिंडल, येक काड्याची डब्बी घेतली. गणपत यारडात पोचला तेव्हा ड्रावर म्हन्ला, "पाटील, बिगीनं जावा. गेरडरचा माणुस यिवून गेला. फोल्डर घिवून बलीवलंय. पाटील, काय तरी जाळभाज करुन टाका." गणपत गेरडरसायेबाच्या म्होरी उबा ऱ्हायला. गेरडरसायेबाफुडी फोल्डर ठिवलं. फोल्डर फात सायेब म्हन्ले, "तुम्हीच का गणपत? त्या लाल ट्रॅक्टरमधला पांढराशुभ कापुस तुमचाच का?""व्हय. व्हय ! सायेब, त्योच. सायेब, बुडापस्तोर सम्दी कपास तस्सीच हाय, येका बोंडाला तं डाग न्हाई का ...Read More