प्रेम असे ही

(272)
  • 96.9k
  • 47
  • 47.3k

प्रिय वाचक मित्रांनो , ही माझी दुसरी प्रेमकथा.. जी वाचकांना आवडली होती.. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे माझ्या कडे जुना बॅकअप नाही आहे. कथा तर मला माहित आहे पण पात्राची नावे वैगरे काही गोष्टी विसरलो आहे.. त्यामुळे पात्राची नावे बदलून जशी जशी आठवत जाईल तसें तसें लिहीत जातं आहे... आरती त्या भव्य गेट समोर काही वेळ उभी राहिली.. कसला दिमाख होता त्या इमारतीचा... सगळी काचेची चकाचक बिल्डिंग... अद्यावत पोशाखात असणारे गार्डस.. इमारती समोर असणारे लहानसे गार्डन आणी त्यात मेहनतीने रुजवलेली फुलझाडे.. त्यांना बघितल्यावर मन एकदम प्रसन्न होऊन जायचे... " मॅडम... तुमचे काही काम आहे का ? " तिला गेट जवळ ताटकळत उभी असलेली बघून एक

Full Novel

1

प्रेम असे ही (भाग 1)

प्रिय वाचक मित्रांनो , ही माझी दुसरी प्रेमकथा.. जी वाचकांना आवडली होती.. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे माझ्या कडे जुना नाही आहे. कथा तर मला माहित आहे पण पात्राची नावे वैगरे काही गोष्टी विसरलो आहे.. त्यामुळे पात्राची नावे बदलून जशी जशी आठवत जाईल तसें तसें लिहीत जातं आहे... आरती त्या भव्य गेट समोर काही वेळ उभी राहिली.. कसला दिमाख होता त्या इमारतीचा... सगळी काचेची चकाचक बिल्डिंग... अद्यावत पोशाखात असणारे गार्डस.. इमारती समोर असणारे लहानसे गार्डन आणी त्यात मेहनतीने रुजवलेली फुलझाडे.. त्यांना बघितल्यावर मन एकदम प्रसन्न होऊन जायचे... " मॅडम... तुमचे काही काम आहे का ? " तिला गेट जवळ ताटकळत उभी असलेली बघून एक ...Read More

2

प्रेम असे ही (भाग 2)

मागील भागावरून पुढे....... आरती घरी आली तेच मोठा विजय झाला त्या अभिर्भावात.. तिचा प्रसन्न चेहरा... बघूनच बाबा काय ते गेले... " बाबा मला जॉब मिळाला..." ती घरात शिरल्या शिरल्या म्हणाली.. " अरे वाह.... अग ऐकलेस का ? " बाबा नी आईला हाक मारली. " देवा जवळ साखर ठेव... आरतीला जॉब मिळाला आहे.. "" अग बाई खरंच की काय ? " आई चकित झाली.. कारण काल रात्री दोघींचा विषय झाला होता.. त्यात तिचे शिक्षण, अनुभव नसणे वैगरे बघून दोघीनाही अजिबातशक्यता वाटत नव्हती. पण कॉल आलाय म्हणून ती गेली होती तेव्हडाच इंटरव्यू चा अनुभव म्हणून... पण लकीली तिला हा जॉब मिळाला होता. आणी त्यात त्या करण ...Read More

3

प्रेम असे ही (भाग 3)

मागील भागावरून पुढे... " तिचे नाव आराध्या...." तो शांत पणे म्हणाला..त्याचे डोळे पुन्हा पाणावले.. काय माहित पण त्याची अवस्था तिला पण वाईट वाटले. " आम्ही दोघे कॉलेज ला एकत्र होतो.. सुरवातीला निखळ मैत्री होती. पुढे कधी आम्ही एकमेकात गुंतत गेलो कळलेच नाही.. कॉलेज संपले तरी आम्ही सोबत होतो.. मी पाहिले असा नव्हतो ग.. हे पिणे , रात्रीचे पार्ट्या वैगरे हे सगळे तिला विसरायला करावे लागते.. पियालो की कळतच नाही कधी झोप लागते. खुप प्रेम करायचो ग मी तिच्यावर... "" मग असे झाले तरी काय ? " आरतीने त्याची लिंक न तोडता त्याला बोलता ठेवत होती. " गेली ती... माझ्या बरोबर लग्नाच्या आणाभाका घेऊन ...Read More

4

प्रेम असे ही (भाग 4)

मागील भागावरून पुढे... त्याच्या घरून आरती तिच्या घरी आली.. " काय ग खूप उशीर केलास ? जेवायला वाढू ?" विचारले. " नको मी जेऊन आलीय ... अग तो खुप आजारी होता. आता बरा आहे पण अशक्तपणा आहे. त्यात चार दिवस धड जेवण नाही.. म्हणून मग मी जेवण बनवले. मग त्याच्या बरोबरच थोडे खाल्ले...."" आरती तुझ्या बाबतीत काय घडलेय हे लक्षात ठेव.. जास्त कोणावर विश्वास ठेवू नकोस..." आई तिला सूचक इशारा देत म्हणाली... " हो ग... आई... मला माहित आहे... पण तो तसा मुलगा नाही... खूप चांगला आहे....खूप दिवसांनी आरतीने कोणत्या तरी मुलाची चांगला आहे. " म्हणून स्तुती केली होती. आई ते बघून जरा ...Read More

5

प्रेम असे ही (भाग 5)

मागील भागावरून पुढे..... करण आणी आरती दोघात आता चांगलेच जमू लागले. दोघे आता अगदी मोकळ्या मनाने एकमेकांशी गप्पा मारायचे... काही स्पेशल काही बनवायचे असेल तर ती सुट्टीत त्याच्या घरी जायची.. अगदी बिनधास्त... मग दोघे मिळून खूप मज्जा करायचे.. एकमेकांना मदत करत जेवण बनवणे असो , की एखादा पिक्चर बघणे असो... आता ती त्या घरात पण चांगलीच रुळली होती.. आधी त्याच्या घरात खूप अजागळता होती... तो कपडे कुठे पण फेकत असे... कोणतीही वस्तू जागेवर नसे....पहिल्याच वेळी तिच्या ते लक्षात आले होते पण तेव्हा तो आजारी असल्याने त्याने घर आवरले नसेल असे तिला वाटले... पण नंतर तिच्या लक्षात आले की ही त्याची सवयच ...Read More

6

प्रेम असे ही (भाग 6)

मागील भागावरून पुढे..... करण ने आपले प्रेम व्यक्त केले आणी तो लग्नाला तयार झाला. इथूनच त्यांच्या प्रेमाचा नवीन अध्याय झाला.. आता ऑफिस सुटल्यावर पण तो किंव्हा ती एकमेकांसाठी थांबणे... मग गप्पा मारत घरी येणे... कधीतरी जेवायला बाहेर जाणे नाहीतर फिरायला बाहेर जाणे असे चालू झाले... हळूहळू सगळ्या ऑफिस मध्ये त्याची चर्चा चालू झाली... करण च्या पप्पाच्या कानावर पण ह्या गोष्टी आल्या... त्याला बोलून काही फायदा नव्हता.. कारण आधीच त्याचा एकदा प्रेमभंग झाला होता आणी त्या नंतर त्याची झालेली अवस्था बघता.. परत त्याला तिच्या पासून दूर करणे जरा धोकादायक होते . पोरगा हातून जाण्याचा संभव होता म्हणून त्यांनी हे प्रकरण जरा ...Read More

7

प्रेम असे ही (भाग 7)

मागील भागावरून पुढे.... ती येणार पण त्याबद्दल करणच्या मनात बिलकुल हुरहूर वैगरे लागली नाही.. पुन्हा पुन्हा प्रेमात तोंडावर पडल्यामुळे कदाचित पण आता त्याला स्वतःला सावरायला यायला लागले होते .... जे घडणार आहे त्याचे हसू नाही , जे घडून गेले त्याचे रडू नाही... एकदम निर्विकार... ती कधी येणार ह्याबद्दल त्याला काहीच माहिती नव्हती... त्यामुळे तो आपल्या नेहमीच्या कामात दंग होता... गावातल्या लोकांबरोबर मासे पकडायला जायचे...समुद्रात माश्यांची भरलेली जाळी बोटीवर खेचायची... संध्याकाळी माश्यांची भरलेल्या टोपल्यात बंदरात आणायच्या... जाळी नीट करायची.. बर्फ होडीत भरायचा.... अशी अत्यंत मेहनतीची कामे करून त्याच्या शरीरात खूप बदल झाला होता... त्याचे आधीचे स्नायू आता तरारून फुगले होते... शरीराला एक ...Read More

8

प्रेम असे ही (भाग 8) (अंतिम भाग )

मागील भागावरून पुढे...... तो आडोसा... योग्य वेळी पडलेला काळोख... पावसात भिजलेली ती दोघे... आता मोह कोणाला टाळता येणार होता...? तिनेही आता स्वतःला पूर्णपणे त्याच्या हवाली केले होते.. त्याचा हात तिच्या कमरेत गुंफला होता. त्याने सावकाश तिला आपल्या जवळच ओढली आणी तिच्या अधीर ओठावर आपले ओठ ठेवले... त्याच्या त्या स्पर्शाने तिच्या मनात कितीतरी फुलपाखरे उडाली ... आधीच मन अधीर झाले होते त्यात त्याचा स्पर्श... तिने आपले डोळे बंद केले.... तिचे ते सहज झालेले समर्पण बघून तो काहीसा सुखावला... आता त्याचे दोन्ही हात तिच्या पाठीवर आले होते. प्रतिउत्तर म्हणूंन तिचे ही दोन्ही हात त्याच्या पाठीवरून फिरत होते... पावसाचा जोर वाढला तसें ते दोघे ...Read More