लव्हस्टोरी - प्रेमवेडा

(136)
  • 51.7k
  • 51
  • 28.7k

अग ऐकं तरी तो तिच्या मागे जात बोलला ती मात्र आपल्याच धुंदीत चालत घरी निघाली होती. हे रोजच झालं होत.प्रिया तिच नाव सगळेच तिला पियू म्हणूनच हाक मारत. प्रिया दिसायला सर्व सामान्य मुलींसारखी. गोल सुबक चेहरा, नाजूक गुलाबी ओठ, छोटस नाक आणि तितकाच राग ही नाकावर. सोनेरी केस, अशी ही आम्हची प्रिया. अगदी एखादया बाहुली सारखी सुन्दर.आणि हो तो तर राहिलाच की आपला हिरो. अमोघ उर्फ अमु. दिसायला सावळा, सडपातळ बांधा पण तेवढाच चार चौघात उठुन दिसणारा असा हा अमु.... तर झाल अस की दोघे एकाच शाळेत शिकत होते, मात्र तो होता शेवटच्या वर्गात आणि ती होती नववीत. त्याने एकदा कधी

Full Novel

1

लव्हस्टोरी - प्रेमवेडा - 1

अग ऐकं तरी तो तिच्या मागे जात बोलला ती मात्र आपल्याच धुंदीत चालत घरी निघाली होती. हे रोजच झालं तिच नाव सगळेच तिला पियू म्हणूनच हाक मारत. प्रिया दिसायला सर्व सामान्य मुलींसारखी. गोल सुबक चेहरा, नाजूक गुलाबी ओठ, छोटस नाक आणि तितकाच राग ही नाकावर. सोनेरी केस, अशी ही आम्हची प्रिया. अगदी एखादया बाहुली सारखी सुन्दर.आणि हो तो तर राहिलाच की आपला हिरो. अमोघ उर्फ अमु. दिसायला सावळा, सडपातळ बांधा पण तेवढाच चार चौघात उठुन दिसणारा असा हा अमु.... तर झाल अस की दोघे एकाच शाळेत शिकत होते, मात्र तो होता शेवटच्या वर्गात आणि ती होती नववीत. त्याने एकदा कधी ...Read More

2

लव्हस्टोरी - प्रेमवेडा - २

२0 फेब्रुवारी , शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा दिवस. मी देखील त्या दिवशी लवकर तय्यारी करून शाळेत निघालो, शाळेत पोहोचताच मित्रांना त्यांच्यासोबत गप्पा मारण्यात व्यस्थ झालो. सर्वजण छान नटून थटून आलेले. सर्व पटांगण मुला-मुलींनी भरलेलं होत... सहजच म्हणून नजर गेटकडे गेली आणि ती दिसली...ती...तिने गुलाबी रंगाची नऊवारी साडी नेसली होती, आपल्या सोनेरी केसांचा गोल असा आंबोडा घालून त्यावर मोगऱ्याचा गजरा माळला होता. पानेरी नयनात काजळाची हलकी लकीर ओढली गेलेली, अनं त्या गुलाबांच्या पाकळी सारख्या ओठांवर गुलाबी रंगाची लिपस्टिक अजुन शोभुन दिसत होती.. नाकात नथ घातलेली आणि कपाळावर लावलेली चंद्रकोर अजुनच तिच्या सौंदर्यात भर घालत होती..अशा तिच्या सौंदर्ययाने मी तिच्याकडे एकटक बघत ...Read More

3

लव्हस्टोरी - प्रेमवेडा - ३

आई: अरे वाह!! बर चल हात-पाय धुवून घे, मी चहा बिस्कीटे देते खाऊन घे आणि अभ्यासाला बसा...अमु: हो आई,.. अस बोलुन तो सर्व आवरायला गेला. आई ने छान गरम आलं घालून चहा केलेला. तो पिऊन आपला अमु अभ्यासाला बसला. पण काही केल्या त्याचं लक्ष अभ्यासात नव्हतंच तो तिच्यातच हरवुन गेलेला... तिचा विचार करण्यात एवढा गुंतलेला की आई हाक मारतेय हे देखिल त्याला कळलं नाही... आई: अरे अमु.. काय लक्ष कुठेय तुझं कधीची हाक मारतेय मी..?अमु: (भानावर येत) अह.. सॉरी आई.. लक्षच नव्हतं माझं ते आता वार्षिक परीक्षा जवळ येत आहेत ना तर अभ्यासाची तय्यारी करण्यात मग्न होतो.. काय बोलत होतीस?आई: अरे तुझे ...Read More

4

लव्हस्टोरी - प्रेमवेडा - ४

वर्षा वर्गात आली. जरा रागातच तिने आपला कटाक्ष प्रियाकडे टाकला. तस प्रियाने कान पकडुन माफी मागितली. पण वर्षा जरा होती म्हणून ती काही बोलली नाही. शाळा सुटली तशी वर्षा घरी जायला निघाली, पियू पण सोबत निघाली पण कोणी कोणासोबत बोलत नव्हतं. पियू: अग वर्षा काय झाल बोल ना..?वर्षा: (जरा रागावून) काय झाल विचारतेस, तू मला त्या अमोघ सोबत एकट सोडून पळालीस ना..? अस वागतात का आपल्या बेस्ट फ्रिएन्ड सोबत. मला नाही बोलायच तुझ्यासोबत. पियू- सॉरी ना, माफ कर ना ग मला.. प्लीज ..... हवं तर कां पकडू का मी.. हे बघ पकडले... वर्षा: बर बर... असुदे परत कधी अशी वागलीस ना तर ...Read More

5

लव्हस्टोरी - प्रेमवेडा - ५

वर्षा: हे बघ दोन दिवसांनी माझ्या दादाचा वाढदिवस आहे. छोटीशी पार्टी असेल घरी. दादा चा खास मित्रच येणार आहेत तो तर त्याचा जिग्री दोस्त आहे म्हणजे नक्कीच येणार तो. तू पण ये. मग त्या निमित्ताने का होईना तु बोलशील त्याच्याशी... अशी वाटली आयडिया..??(वर्षा ने टाळीसाठी हात पुढे करत विचारले) पियू: आयडिया तर छान आहे.. पण मी अस कस बोलू त्याच्याशी .. जरा भीती वाटतेय ग मला... वर्षा: अरे तो काय खाणार नाहीये तुला आणि मी असेल ना तिकडे मग कशाला टेंशन घेतेस... आणि तसही मुलगा चांगला आहे असं काही करणारा नाही वाटत. पियू: पण....वर्षा: बस झाल तुझ 'पण' आणि अजून काही... तू ...Read More

6

लव्हस्टोरी - प्रेमवेडा - ६ (अंतिम भाग)

सर्व मुलांचा दंगा चालू होता, त्यात सागरच्या आईने सर्वाना पोहे आणुन दिले. पोहे खाऊन सर्वांनी जरा कामात मदत करावी त्यांची भाबडी अपेक्षा. सागरचे सगळे मित्र आणि आपला अमू. सर्वांनी आप-आपले पोहे संपवत कामाला लागले. पण अमूची नजर कोणाला तरी शोधत होती. तो इकडे तिकडे बघत कोणाला तरी शोधत होता. सागर: कोणाला शोधतो आहेस का?अमू: नाही नाही... कुठे काय..सागर: ती आणि पिंकी बाजारात गेल्यात आई सोबत येतील थोडयावेळात...आता बोलालं हि पिंकी कोण.. पिंकी म्हणजे आपली वर्षा. तिला घरी सर्व लाडाने पिंकी बोलत. अमू: ह् बर बर... सागर: मग आज बोलणार आहेस का???अमू: मन तर खूप आहे बोलायचं पण नको. एखाद्यावर आपण किती जबरदस्ती ...Read More