आघात - एक प्रेम कथा

(326)
  • 225.5k
  • 55
  • 103.1k

आघात एक प्रेम कथा परशुराम माळी प्रस्तावना ‘आघात’या प्रा. परशुराम माळी यांच्या कादंबरीविषयी लिहिताना मला खूप आनंद होत आहे. याचे कारण या कादंबरीकाराला मी रोज पाहतेय. कदाचित नुसती कादंबरी वाचली असती तर गोष्ट वेगळी होती. पण परशुराम याचीसंवेदनशीलता, नम्रपणा, त्यांचं सोसणं, सोशीकपण मी पाहते. तो खूप संकोची आहे. तो जेव्हा जेव्हा मला भेटतो, दिसतो तेव्हा दरवेळी तो मला नमस्कार करतो. दरवेळी नमस्कार कशाला करतोस? असं मी म्हणाले, तरी त्याच्या हातून तसं घडतं. त्याचं पोरकेपण, त्याचं कष्ट, त्याची जिद्द, त्याचा उच्चशिक्षितपणा, त्याचं स्वत:बद्दलचं मत, त्याच्याकडे पाहून वाटतं हा कुणालाही दुखावणारा नाही. अशी व्यक्ती म्हणून त्याची वैशिष्ट्ये एवढ्यासाठी नोंदवतेय की या कादंबरीचा

Full Novel

1

आघात - एक प्रेम कथा - 1

आघात एक प्रेम कथा परशुराम माळी प्रस्तावना ‘आघात’या प्रा. परशुराम माळी यांच्या कादंबरीविषयी लिहिताना मला खूप आनंद होत आहे. कारण या कादंबरीकाराला मी रोज पाहतेय. कदाचित नुसती कादंबरी वाचली असती तर गोष्ट वेगळी होती. पण परशुराम याचीसंवेदनशीलता, नम्रपणा, त्यांचं सोसणं, सोशीकपण मी पाहते. तो खूप संकोची आहे. तो जेव्हा जेव्हा मला भेटतो, दिसतो तेव्हा दरवेळी तो मला नमस्कार करतो. दरवेळी नमस्कार कशाला करतोस? असं मी म्हणाले, तरी त्याच्या हातून तसं घडतं. त्याचं पोरकेपण, त्याचं कष्ट, त्याची जिद्द, त्याचा उच्चशिक्षितपणा, त्याचं स्वत:बद्दलचं मत, त्याच्याकडे पाहून वाटतं हा कुणालाही दुखावणारा नाही. अशी व्यक्ती म्हणून त्याची वैशिष्ट्ये एवढ्यासाठी नोंदवतेय की या कादंबरीचा ...Read More

2

आघात - एक प्रेम कथा - 2

आघात एक प्रेम कथा परशुराम माळी (2) रोषणाईने घर सजलं होतं. इतका मोठा वाढदिवस. मला आश्चर्य वाटत होतं. आमच्या सारे मित्रमैत्रिणी आले होते. तसं पहायला गेलं तर आम्हालाच थेाडा उशीर झाला होता. मित्रांच्या आग्रहाखातर मी गेलो होतो. पण तरीही सुमैयाने मला वाढदिवसाला बोलविले नसल्याची खंत मनात होतीच. ती माझ्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. केक कापण्यात आला, सगळयांनी सुमैयाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. शुभेच्छा देण्याची माझी वेळ आली. हातात हात दिल्यानंतर हात थरथरू लागले. मी थोडं बावरल्यागत झालो. मी बावरलेला पाहून माझे मित्र आणि खुद्द सुमैयाही हसू लागली. तिने जवळच असलेल्या बॉक्समधून केक काढला आणि मला भरवला. मी मित्राबरोबर थोडा पुढे ...Read More

3

आघात - एक प्रेम कथा - 3

आघात एक प्रेम कथा परशुराम माळी (3) दुसऱ्या दिवशी कॉलेजात गेल्यानंतर पहिला प्रश्न? प्रशांत, सुमैयाने तुला घरी का थांबविलं रोहनने सगळया मित्रमैत्रिणींच्याकडे एक हसरा कटाक्ष टाकत मला प्रश्न केला होता. माझ्या उत्तरासाठी सगळे आतुरलेले होते. हे त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून समजत होतं. सुमैयाला तिच्या आई-वडिलांशी माझी ओळख करून द्यायची होती म्हणून थांबवून घेतलं होतं. पण वाढदिवसाचा कार्यक्रम उशिरा संपल्यामुळे मलाही तिथे वेळ झाला. तिच्या घरच्यांच्या आग्रहाखातर मला थांबावं लागलं. या उत्तरावर थोडेचे कोणी समाधानी होणार होते? कोणाच्याच चेहऱ्यावर समाधानाची छटा दिसत नव्हती. सारेजण संशयी नजरेने पाहिल्यासारखे पाहतहोते. त्यांना माझ्याकडून त्या दिवशी काय झालं हे काढून घ्यायचं होतं. एवढ्यात सुमैया आली. ...Read More

4

आघात - एक प्रेम कथा - 4

आघात एक प्रेम कथा परशुराम माळी (4) तिथे मी भेटू शकलो नाही. पुन्हा ते भर पावसात हॉस्टेलकडे चालत आले. माझ्या बॅगेवर जेवण ठेवलं आणि निघून गेले. त्यादिवशी आजोबा भेटू शकले नाहीत याचं दु:ख तर वाटलंच. पण त्या भर पावसात ते चार मैल भिजत चालत आले याची कल्पना मी त्यावेळी करू शकलो नाही. तरी आज मला त्या कल्पनेनं शहारे येतात. कारण त्यावेळी त्यांचं वय होतं ७९ वर्षे. उन्हाळयाची सुट्टी पडली की आम्ही आनंदून जायचो. उन्हाळयाच्या सुट्टीत गावी आल्यानंतर मी शेतामध्ये आजी-आजोबांना मदत करणं, जनावरांना गवत आणणं हा दररोजचा दिनक्रम ठरलेला. आजी-आजोबा यांचे चेहरे उजळून जायचे. त्यांच्या चेहऱ्यावर खूप मोठे समाधान ...Read More

5

आघात - एक प्रेम कथा - 5

आघात एक प्रेम कथा परशुराम माळी (5) पण आता तिला मी आश्चर्याचा धक्का द्यायचं ठरविलं. तिच्या मैत्रिणीला शबानाला जाऊन पण सुमैयाला काही न सांगण्याच्या अटीवर तिला सुमैयाचं आवडतं गाणं कोणतं ते विचारून घेतलं. तिचं आवडतं गाण होतं ‘मोहब्बते’ चित्रपटातील ‘हम को हमीसे चुरालो दिल में कही तु छुपालो.’ सांस्कृतिक कार्यक्रमाचा एकदाचा दिवस उजाडला. कार्यक्रम सुरू झाला. मला ज्यांनी भाग घेण्यास विरोध केला होता त्यांना आश्चर्य वाटणं साहजिकच होतं. पण त्यांनी मला काहीच करण्याचा त्यावेळी मात्र प्रयत्न केला नाही. मी मात्र माझ्या मैत्रिणीच्या शोधात होतो. कार्यक्रम सुरु होऊन एक तास झाला तरी सुमैया आली नव्हती. डान्स शो, मिमिक्री शो, फॅशन ...Read More

6

आघात - एक प्रेम कथा - 6

आघात एक प्रेम कथा परशुराम माळी (6) सतिशने सगळया साथीदारांना आदेश दिला. तसे ते एका पाठोपाठ गाडीत बसले आणि विलंब न करता निघून गेले. मी विव्हळत, तडफडत त्या निर्जन जागी झाडीत पडलो होतो. संध्याकाळचे आठ वाजले होते. भीतीचे काहूर माजले होते. चारी दिशांवर अंधार पसरत होता. त्यांना थोडी देखील माझी द्या आली नाही. गुडघे फोडले होते. पाठीत काठ्यांचे व्रण उठले होते. अमानुषपणे त्यांनी मारहाण केली होती. जायचे तर कुठे? या पडलेल्या गडद अंधारात वाट कशी शोधून काढणार? रात्रभर थंडीनं कुडकुडत पडावं लागणार. एखादं श्वापद आपणाला गिळंकृत करणार तर नाही ना? असे अनेक नाना तऱ्हेचे विचार आणि प्रश्न मनाला भेडसावत ...Read More

7

आघात - एक प्रेम कथा - 7

आघात एक प्रेम कथा परशुराम माळी (7) प्रथम वर्ष बी.ए.ची वार्षिक परीक्षा अवघ्या महिन्यावर येऊन ठेपली होती. साऱ्यांच्या नजरा लागल्या होत्या. पण इकडे माझा दुसराच उद्योग सुरू होता. मी माझ्या ध्येयउद्दिष्टांपासूनच विचलित होत होतो. पण नाही आता पुन्हा अशी चूक होता कामा नये, असा मनाशी निश्चय केला. थोडे दिवस सगळयांपासून अलिप्त राहून फक्त अभ्यासावर भर दिला. बारावीमध्ये सर्वप्रथम आलेला मी विद्यार्थी होतो. त्यामुळे अपेक्षांची पूर्तता करणं हे मी माझं कर्तव्य मनात होतो. माझ्याकडून निराशा कोणाचीही होऊ नये. पूर्वीप्रमाणेच सगळयांच्या मनात माझं स्थान असावं. मी अभ्यासाचा जोर वाढवित होतो. वेळापत्रकाप्रमाणे अभ्यास करणे सुरू होते. मित्रांबरोबर सकाळी लवकर उठून कॉलेजला जाणे, ...Read More

8

आघात - एक प्रेम कथा - 8

आघात एक प्रेम कथा परशुराम माळी (8) ‘सुरेश, आज सुमैयाचा मूड काही वेगळाच होता. ती मला या अवतारात कधीच नव्हती. ती खूपच भावूक झाल्यासारखी दिसत होती. मला वाटतंय घरामध्ये तिचं काही बिनसले असले. मला सारखं म्हणत होती.’’ ‘‘तुला माझ्यापेक्षा मित्रांची जास्त फिकीर आहे. मला विसरू नको. माझी आठवण आली तर मला आठवत रहा. हे तिचं विचित्र बोलणं मला काहीच समजत नव्हतं.’’ माझं हे बोलणं सारे अगदी मन लावून ऐकत होते. हॉस्टेलजवळ आलं तसं आमचं बोलणं थांबलं, पाहतो तो जवळजवळ सगळे विद्यार्थी सुट्टीला गेले होती. आम्ही गडबडीने खोलीमध्ये गेलो. भरभर अर्ज करू लागलो. इतक्यात कांबळे सर आमच्या खोलीमध्ये आले. ‘‘अरे ...Read More

9

आघात - एक प्रेम कथा - 9

आघात एक प्रेम कथा परशुराम माळी (9) पण ही गोष्ट मला कधी ना कधी तरी सांगायचीच होती. म्हणून म्हटलं टाकूया एकदाची. प्रशांत, तू एक माझा जीवाभावाचा मित्र आहेस या नात्याने मला थोडंसं तुला सूचना करावीशी वाटत आहे. हे बघ प्रशांत, तू एक गरीब कुटुंबातला,बाहेरगावी शिकण्यासाठी आलेला विद्यार्थी आहेस. तुझी आणि माझी परिस्थिती काही वेगळी नाही. पण तुला आईवडील नाहीत, मला आहेत एवढाच फरक. मला वारंवार संशय येतोय तो हाच की सुमैया तुला प्रेमपाशात ओढून फसविण्याचा अथवा तुझा जो वर्गामध्ये प्रत्येक वर्षी प्रथम क्रमांक येतो तो येऊ नये, तुझे अभ्यासापासून लक्ष विचलित व्हावं, तू तुझ्या ध्येय उद्दिष्टांपासून दूर व्हावंस यासाठी ...Read More

10

आघात - एक प्रेम कथा - 10

आघात एक प्रेम कथा परशुराम माळी (10) ‘‘ठीक आहे! तुला जसं वाटतंय तसं तू वागू शकतोस. आमचं काही मत आम्ही जे योग्य आहे ते तुला सांगण्याचा आणि तुझी चूक तुला दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. तुझ्या या भोळया स्वभावाचा ती गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करते आहे. तू जरी जाणूनबुजून कोणती चूक केली नसलीस तरी नकळत तुझ्या हातून चूक घडत आहे. इथून पुढं कसं वागायचं ते तुझं तू ठरवं.’’ ‘‘बसं कर आता अनिल, खूप झालं तु चं बोलणं. इथून पुढं मला काहीच सांगण्याचा अगर माझी चूक काढण्याचा तुम्हाला काहीच अधिकार नाही. मी कसं वागायचं, कसं रहायचं हे माझं मी बघतो. तुमचा आणि ...Read More

11

आघात - एक प्रेम कथा - 11

आघात एक प्रेम कथा परशुराम माळी (11) त्यांनी सिद्ध करून मगच सुमैयाशी न बोलण्याचा आणि दूर राहण्याचा सल्ला दिला पण मी इतका बेभान का झालो होतो? आता हा भयानक एकांत मला सतावत होता. त्या तिघांनाही मी खूप दुखविलं होतं. नको नको तेबोललो होतो. माझं चुकलं तिथं त्यांनी समजावलं होतं. पण एका क्षणाला मीकसा काय बदललो. एकमेकांच्या विचाराने आणि सल्ल्याने या गोष्टीवर पडदा पाडता आला असता. या आणि अशा अनेक विचारांनी माझं मन मला खात होतं. अभ्यासात लक्ष लागत नव्हतं. सतत बैचेन आणि उदास होतो. एक दिवस खूप आजारी पडलो. दोन दिवस कॉलेजला गेलो नाही. सुरेश, संदिप, अनिलच्या ही गोष्ट ...Read More

12

आघात - एक प्रेम कथा - 12

आघात एक प्रेम कथा परशुराम माळी (12) ‘‘असं रडायला काय झालं? कारण तरी समजले का मला?’’ ‘‘प्रशांत, सुमैयानं माझ्याशी काढलं.’’ ‘‘का? कशासाठी?’’ ‘‘तसं दुसरं तिसरं काहीच कारण नाही.’’ ‘‘मग कारण आहे तरी काय?’’ ‘‘तुझं आणि माझं बोलणं.” “म्हणजे?” ‘‘तिचं मत आहे, मी तुझ्याशी बोलू नये अथवा मैत्री करू नये.’’ ‘‘का पण?’’ ‘‘देव जाणे! तिच्या मनात काय पाप आहे ते?’’ ‘‘तुला आणखी काही म्हणत होती काय?’’ ‘‘हो. पुन्हा त्याच्या नादी लागशील तर परिणाम वाईट होतील,अशी धमकी देऊन गेली.” “सुमैया आणि धमकी देणं शक्य नाही.” “शक्य आहे हे प्रशांत! तिनं चारचौघात मला तसं बोललीयं.” सुमैयाचा मला खूप राग आला होता. मी ...Read More

13

आघात - एक प्रेम कथा - 13

आघात एक प्रेम कथा परशुराम माळी (13) या वर्षी हा कार्यक्रम धुमधडाक्यात पार पडणार होता. त्यासाठी मोठी आणि जोरदार चालू होती. यावर्षी प्रमुख पाहुणे म्हणून जानीमानी बडी हस्ती येणार होती.कॉलेज प्रशासन त्या नियोजनात व्यस्त होते. मात्र यावर्षी प्रत्येक वर्षापेक्षा थोडा बदल करण्यात आला होता. प्रत्येक वर्षी ध्वजारोहण व बक्षिस वितरण कार्यक्रम सकाळीच पार पडत असे. पण बक्षिस वितरणाचा कार्यक्रम दुपारी २ वाजता ठेवण्यात आला होता. ठरलेल्या दिवशी एकदाचा कार्यक्रम सुरू झाला. गुणवंत विद्यार्थ्यांत माझंही नाव होतंच. प्रमुख पाहुणे मात्र ठरलेल्या वेळेपेक्षा तब्बल तासभर उशिरा आले. त्यामुळे कार्यक्रम २ वाजता सुरू होणारा तीन सव्वातीन वाजता सुरू झाला. सिनिअर, ज्युनिअर विद्यार्थ्यांच्या ...Read More

14

आघात - एक प्रेम कथा - 14

आघात एक प्रेम कथा परशुराम माळी (14) ऑफिसमध्ये जाताच आजोबांनी प्राचार्यांचे पाय धरले आणि रडू लागले. प्राचार्यांना विनवण्या करू ‘‘साहेब, बिनं आईबाचं पोर हाय. ह्याला लहानपणापासून मोठ्या कष्टानं आम्ही सांभाळलंय. आमचं हातावरचं पोट आहे. साहेब पोराला कॉलेजमध्ये घ्या. माझ्या पोरावर माझा विश्वास हाय. साहेब पोरं तसं वागणार नाही.’’ ‘‘माझ्याकडं बघून साहेब पोराला कॉलेजात घ्या, साहेब.’’ ‘‘हे बघा, आजोबा तु चा नातू सर्वात हुशार विद्यार्थी आहे. त्याचं वागणंही चांगलं आह. पण या प्रकरणामध्ये तो सापडल्यामुळे तो पूर्णपणे आमच्या मनातून उतरलेला आहे.’’ ‘‘साहेब आसं बोलू नका. माझ्या नातवावर इश्वास ठेवा.” ‘‘अहो, आजोबा कसा विश्वास ठेवणार. ज्यांनी तपास केलाय ती लोक खोटं ...Read More

15

आघात - एक प्रेम कथा - 15

आघात एक प्रेम कथा परशुराम माळी (15) थोडंस वाटून गेलं की आपल्याला ही असं का बोलतेय. याचाच तर आपण घेतोय, पण खरंच शोध घेता घेता ती आपल्याला आपलं करून घेतेय की काय! तिच्या बोलण्यातलं प्रेम , आपुलकी, तळमळ कोड्यात टाकत होती. परत फिरण्याची वेळ झाली, तसं जाता जाता सुमैया म्हणाली, ‘‘प्रशांत, मला एक दिवस खूप खूप बोलायचं आहे. तुझ्याशी बोलले की मगच माझं मन मोकळे होईन. तोपर्यंत मी अस्वस्थच असेन.’’ जाता जाता पुन्हा कोड्यात बोलावं तसं बोलून गेली. मी आज हॉस्टेलवर वेळाने आल्याचं बघून तिघेही चिडले. त्यात सुरेशचा पारा चढला. ‘‘प्रशांत, पुरे आता मैत्रीचे नाते. तुझ्यामुळे आम्हाला बोलून घ्यावं ...Read More

16

आघात - एक प्रेम कथा - 16

आघात एक प्रेम कथा परशुराम माळी (16) ‘‘पोरा, मी जिता हाय तोपर्यंत तुझं चांगलं झाल्याचं मला या डोळ्यांनी बघायचं या गावाच्या तोंडून तुझं कौतुक झाल्याचं माझ्या कानांनी मला ऐकायचं हाय! तवाच माझ्या या आतम्याला शांती लाभलं. तुझा सांभाळ करताना मला अनेक लोक म्हणाले कशाला सांभाळतोस ह्या लेकीच्या पाराला. दे जा त्याच्या वडिलांच्या आई-बाबांकडं सोडून. काय उपयोग हाय ह्याला सांभाळून. स्वत:ची पोटं भरायची मुश्किल आणि याला काय घालणार पोटाला. पण त्या संकटाचा, वादळाचा, दु:खाचा सामना करून तुला मी पदरात घेतलं. तुझ्यासाठी सारं काही सोसलं. त्या लोकांना मला चोख उत्तर द्यायचं हाय. ह्योच माझा मी सांभाळलेला आणि आता मोठ्या पदावर काम ...Read More

17

आघात - एक प्रेम कथा - 17

आघात एक प्रेम कथा परशुराम माळी (17) पण मला त्यांना एका शब्दानेही विचारता आले नाही. ही खूप मोठी खेदाची होती. भले ते आले नसते पण विचारण्याची एक पद्धत होती. मी चुकत होतो कुठेतरी, त्यांचं जितकं माझ्यावर प्रेम आहे.तितकंचं माझ्या मनात त्याच्याबद्दल प्रेम कमी आहे का? गेल्या गेल्या त्या तिघांची माफी मागितली. ‘‘माफीची काही गरज नाही. प्रशांत, एक गोष्ट बोलायची आहे मला.’’ ‘‘बोल ना!’’ ‘‘आम्ही तुला आजपर्यंत सुमैयाचा ना सोड, तिची मैत्री सोड म्हणून सांगितले. भले तुला ते वाईट वाटलं असेल. तुझ्या मते, आम्ही तिच्याबद्दल खूप वाईट बोललो असेन, वाईट मत व्यक्त केले असेल पण तुझी असलेली तिच्याशी मैत्री आणि ...Read More

18

आघात - एक प्रेम कथा - 18

आघात एक प्रेम कथा परशुराम माळी (18) तिघांचेही अगदी चेहरे आनंदाने फुलले होते. हाच सुरेश उन्हाळयाच्यासुट्टीत यानं मला पत्र होतं आणि त्याला मी नको नको ते बोललो होतो पण तो ढासळला नाही की खचला नाही. माझ्यासाठी त्यानं नक्की त्रास घेतला होता. त्यांच्याच नाही तर इतर मित्रांसमोरही आज मान वर करून उभारण्याची हिंमत नव्हती. इकडे ते तिघेही आनंदाने न्हाऊन गेले होते. तर माझं इकडे रडणं सुरु झालं होतं. ‘‘प्रशांत रडू नको, जे घडायचं होतं ते घडून गेलं. आता तुला एका जीवनाच्या नवीन टप्प्यावर कलाटणी मिळाली आहे. तुला तुझ्या आजीआजोबांच्या आशाअपेक्षा पूर्ण करायच्या आहेत. जे घडलंय ते सारं विसरून जा असे ...Read More

19

आघात - एक प्रेम कथा - 19

आघात एक प्रेम कथा परशुराम माळी (19) पुन्हा ही मैत्रीण तुला या जगात कधीच दिसणार नाही. मी हादरून गेलो पटकन्‌ ठरविलं रविवारी भेटायला जाण्याचं कारण जीवाचं काही बरं वाईट करून घेईल म्हणूनच. परीक्षा जवळ येत होती. मनाची धास्ती वाढत होती. यात हे समोर उभं असलेलं संकट, किती वेडी मुलगी असेल ही. प्रेमात वेडी झालेली. इतकं काय आहे माझ्यात? हुशारी म्हणूनच ना. पण गरीबीनं गांजलेला मी काय देऊ शकणार हाय? खरंच प्रेम आंधळं असतं म्हणतात ही गोष्ट खरी आहे. पण त्याच प्रेमाचं वास्तवतेचं चटके खूप कठोर आणि खडतर असतात. आईबापाच्या सुखात, समृद्धीत वाढलेली ही मुलगी या बाहेरच्या कठोर जगाची ना ...Read More

20

आघात - एक प्रेम कथा - 20

आघात एक प्रेम कथा परशुराम माळी (20) ‘‘अरे पण तू तर तिला मैत्रीण मानत होतास. तिच्याबरोबरच्या प्रेमाला तुझा विरोध तिच्याबाबत वाईट बोललं तरी तुला राग यायचा. तिची मैत्री शुद्ध आहे. तिच्या मनात एकतर्फी प्रेम नाही असं तूच म्हणत होतास पण असा अचानक कसा काय बदललास तू? अशी काय जादू केली तिनं तुझ्यावर? तू सारं विसरून जावी अशी!’’ ‘‘याचं उत्तर देणं कठीण आहे सुरेश. पण तू माझा जिवाभावाचा मित्र आहेस म्हणून सांगतो. पण तू कुणाला सांगणार नाहीस असे वचन दे मला.” “हो.सांग.” ‘‘सुरेश त्या रविवारच्या रात्री मला सुमैयाने भेटायला बोलविले होते. नाही आलास तर जीवाला काहीतरी करुन घेईन असं लिहिलं ...Read More

21

आघात - एक प्रेम कथा - 21

आघात एक प्रेम कथा परशुराम माळी (21) ‘‘बघ प्रशांत, अजून विचार कर. चॅलेंज देते तुला. एक ना एक दिवस माझ्या पाठीमागून आल्याशिवाय राहणार नाहीस. सगळयांचा विरोध झुगारून येशील, कारण माझा विरह तुला सहन होणार नाही.’’ ‘‘विरहाच्या गोष्टी बोलू नको. मी तुझ्या प्रेमात पडलोय म्हणून! मी तुझ्यासारखा प्रेमात आंधळा झालोय असे समजू नको. तुलाच वाट पहावी लागेल माझी.’’ ‘‘बघूया कोणाला कुणाची वाट पाहावी लागते, येणारा काळच ठरवेल.’’ मी रागाने तिथून निघून आलो. सुमैया पूर्वीसारखी राहिली नव्हती. माझी आता तिला गरज वाटत नव्हती. बरं झालं तिचं दुसऱ्यांदा खरं रूप मला समजलं. आता इथून पुढं मात्र तिचा नाद न केलेलाच बरं. परीक्षा ...Read More

22

आघात - एक प्रेम कथा - 22

आघात एक प्रेम कथा परशुराम माळी (22) सगळयांच्या मनातून मी उतरायचा तो उतरलोच आहे. मग आता तिच्यापासून दूर राहिलो आणि जवळ राहिलो काय. जे व्हायचं तेच होणार. जे जग बोलायचं तेच बोलणार, चांगलं बोललं काय आणि वाईट बोललं काय सारखंच. काय व्हायचं ते होऊ दे पण आता तिच्याशिवाय राहणं अशक्य आहे. कॉलेज सुटलं आणि तिला जाऊन भेटलो. मैत्रिणी बरोबर होत्या. बोलणं थोडं अवघड होतं पण मला राहवलंच नाही. ‘‘सुमैया मला थोडं तुझ्याशी बोलायचं आहे.’’ ‘‘थोडं थांबशील काय आपण दुसरीकडे जाऊन बोलू.” ती थांबली, बाकीच्या मुली पुढे गेल्या. ‘‘आणखीन काय राहिलयं? मग का आलास परत.’’ ‘‘सुमैया असं बोलू नकोस, तुझ्याविना ...Read More

23

आघात - एक प्रेम कथा - 23

आघात एक प्रेम कथा परशुराम माळी (23) इंग्रजीचे प्राध्यापक शहापुरे सरांनी मला बोलवून घेतलं. ‘‘प्रशांत, एक काम कर. शिक्षण आणि गावाकडं जा जनावर राखायला. तुझी पात्रता नाही शिकायची. तुला ‘आदर्श विद्यार्थी पुरस्कार’ देऊन डोक्यावर चढवून घेतलं. पुन्हा एखाद्या गरीब मुलाला शिक्षणाला मदत करायला आमची हिंमत होणार नाही तुझ्यासारखं समोर उदाहरण असल्यामुळे. जा, पुन्हा येवू नको माझ्यासमोर.’’ प्रत्येकाचं बोलणं ऐकून घेणं सुरू होतं. दररोजचं कुणाचं तरी बोलणं ठरलेलंच होतं. हे सगळे बोलून घ्यायला, सगळं सोसायला मन तयार होतं. पण सुमैयापासून दूर राहणं जमत नव्हतं. मन मानत नव्हतं. पूर्वपरीक्षा अखेर संपली होती. पहिल्यांदाच तीन-चार विषयात फेल झालो होतो पण सुमैया मात्र ...Read More

24

आघात - एक प्रेम कथा - 24

आघात एक प्रेम कथा परशुराम माळी (24) यावर सर म्हणाले, जाधव साहेब तुमच्या मुलगीचं आणि प्रशांत कदम नावाच्या मुलाचं प्रकरण चालू आहे. ते संबंध कॉलेजभर गाजत आहे. बेधडक कॉलेज परिसरात गप्पा मारत फिरणं, तास रेग्युलर अटेन्ड न करणं,बेशिस्त वर्तन करणं चालू आहे. मान्य आहे, तु ची मुलगी अभ्यासात प्रगतीवर आहे, पण प्रथम क्रमांकाचा मुलगा यावेळी दुसरा, तिसराही क्रमांक मिळवू शकलेला नाही. तो चक्क चार विषयात नापास झालेला आहे. या दोघांनाही सरळ मार्गावर आणणं जरूरीचं आहे. तेव्हा तुमच्या मुलीला ताकीद देऊन बघा. आमच्या परीने आम्ही मुलाला ताकीद करू. कुणाचंही शैक्षणिक नुकसान होता कामा नये. तशी सुमैयाची आई म्हणाली, ‘‘हा! आता ...Read More

25

आघात - एक प्रेम कथा - 25

आघात एक प्रेम कथा परशुराम माळी (25) दुसऱ्या दिवशी सुमैया भेटलो. ती भेटताच तिचा पहिला प्रश्न होता, ‘‘काय झालं काय रुम?’’ ‘‘हो मिळाली.’’ ‘‘किती भाडे म्हणतात?’’ ‘‘दीडशे रुपये.’’ ‘‘कुठे मिळाली?’’ ‘‘रविवार पेठेत साळुंखेंच्या अपार्टमेंटच्या पाठीमागे त्यांच्याच मालकीची एक खोली आहे तिथे.’’ ‘‘मग पैशाचं काय केलंस?’’ ‘‘शंभर रुपये दिले नंतर पन्नास रुपये देण्याच्या अटीवर.’’ ‘‘पाण्याची आणि बाथरुमची वगैरे सोय आहे काय?’’ ‘‘हो आहे.’’ ‘‘दुसरी काही अडचण?” ‘‘तू असल्यावर कसली आली अडचण?’’ ‘‘बरं ठीक आहे. हे घे पन्नास रुपये देऊन टाक घरमालकाला आणि हो विसरलेच बघ, हे चारशे रुपये घे आणि महिन्याभराचं जेवणाचं फिक्स करून टाक कोणत्याही खानावळीत. आता पुन्हा मला ...Read More

26

आघात - एक प्रेम कथा - 26

आघात एक प्रेम कथा परशुराम माळी (26) मला काहीच समजेना. सरांची परवानगी घेतली आणि गावची एस.टी.धरली. आजीला निपाणीच्या हॉस्पिटलमध्ये केलं होतं. मी पुरता घाबरू गेलो होतो. आजोबांशिवाय जवळ कोणीच नव्हतं. आजीला सलाइन लावले होते. नुकतीच तिला झोप लागली होती. मी आजोबांकडे आजीच्या तब्येतीची विचारपूस केली. ‘‘असं अचानक कशी आजारी पडली आजी?’’ ‘‘काय सांगायचं पोरा, बरं वाटत नसताना घरात बाजाराला पैसा नाही म्हणून कामाला गेली. आजारी असल्याचं मला लवकर सांगितले नाही. दवाखान्याला कुठला पैसा आणायचा म्हणून अंगावरच काढली. जास्त त्रास व्हायला लागल्यावर मग सांगितले. ताप-थंडी वाढला होता. म्हणूनच एवढ्या मोठ्या हॉस्पिटलात घेऊन यायची वेळ आली.’’ ‘‘मग पैशाचं कसं काय जोडणी ...Read More

27

आघात - एक प्रेम कथा - 27

आघात एक प्रेम कथा परशुराम माळी (27) शेवटचा पेपर संपला आणि मी कुणाशीही न बोलता, कुणालाही न भेटता धावत आलो होतो. दुसऱ्या दिवशी गावी जायचंहोतं. आजीआजोबांच्या प्रश्नांची उत्तरं काय द्यायची? पुन्हा खोटं बोलणं आलंच पण निकाल खोटा बोलणार नव्हता.दुसऱ्या दिवशी जायची तयारी करत होतो. सुमैया भेटायला येईल पण काल परीक्षा संपल्यापासून दिसलीच नव्हती. मनाशी ठरविलं होतं. तिला भेटल्याशिवाय गावाकडं जायचं नाही.इतक्यात अनिल माझ्या खोलीवर धावत खोली शोधत आला. ‘‘प्रशांत लवकर आवर तुला आताच्या आता गावी जायला हवं.’’ मी पूर्णपणे घाबरून गेलो. ‘‘अरे, पण का?’’ ‘‘आजीची तबयेत पुन्हा बिघडलीय. तुला लवकरात लवकर गावी बोलवलंय चल लवकर.’’ तसं मी साहित्य घेतले ...Read More

28

आघात - एक प्रेम कथा - 28

आघात एक प्रेम कथा परशुराम माळी (28) प्रिय मित्र प्रशांत पत्र लिहिण्याचं कारण की कोणता दोष होता असा माझा? चूक होती माझी? की तू मला न सांगता असा रागारागाने गेलास. हेच तुझं नि:स्वार्थी प्रेम काय? तूच काय माझ्यासाठी काहीही करायला तयार असणारा प्रियकर? तुझी गरज भागताच तू निघून गेलास! पण मी काय करायचे? संसाराचं सुखी स्वप्न रंगविणारा तू. कुठं गेलं ते तुझं प्रेम? इतकी आतुरता होती, गावची, घरची मग प्रेम का केलंस माझ्याशी, का माझा कामापुरता वापर केलास तू? मी आजपर्यंत तुझी कोणती गोष्ट नाही म्हटली का? तुझ्या सर्व इच्छा मी पूर्ण केलेल्या आहेत.प्रसंगी सगळयांचा विरोध डावलून. तू माझ्याशी ...Read More

29

आघात - एक प्रेम कथा - 29

आघात एक प्रेम कथा परशुराम माळी (29) काठावर का असे नापण आपण पास होईन. जगाच्या नजरेत असं अचानक बदनाम होणार मी.अलिकडं असं अचानक काय झालं होतं हे माझं मलाच समजतचं नव्हत होणार, नापास होण्याइतकं आपण पेपर लिहिलेलं नाहीत. काठावर का असे ना पण आपण पास होईन. जगाच्या नजरेत असं अचानक बदनाम नाही होणार मी.अलिकडं असं अचानक काय झालं होतं हे माझं मलाच समजतचं नव्हतं. माझा स्वभाव चिडचिडा झाला होता. कोणीही काहीही सांगितलं, बोललं की मी चिडायचो. नको ते बोलायचो, पण खुद्द आजोबांच्याही बाबतीत तसं माझं व्हायला लागलं. मी कधीच आजोबांसमोर एक भ्र काढत नव्हता. पण त्यांच्यावरही चिडायचो, ओरडायचो. इतर ...Read More

30

आघात - एक प्रेम कथा - 30

आघात एक प्रेम कथा परशुराम माळी (30) शेजारीपाजरी घरात सांगायला यायचे. आजोबा काकुळतीला आल्यागत सारं ऐकायचे. प्रत्येकाला माझी समजून लावायचे. पण मी हे सारं थोडंच मनावर घेणार होतो. मला फक्त डोळ्यासमोर दिसत होती सुमैया. एकेकदा वाटायचं माझी वाट बघून ती दुसरा कोणीतरी जोडीदार तरी निवडणार नाही ना? किंवा आईवडील घाईगडबडीने तिचे लग्न तर लावून देणार नाहीत ना? असं वरचेवर मनाला वाटायचे. खरंच आपण वेळ करता कामा नये. नाही तर एकदा वेळ गेली की आयुष्यभर पश्चाताप करत बसायची वेळ येईल ही भिती वाटायची.अगोदरचं पत्र पाठवून सुमैयानं आपली नाराजी व्यक्त केली होती. पण आता आपण सावध व्हायला हवं होतं की, ती ...Read More

31

आघात - एक प्रेम कथा - 31 - अंतिम भाग

आघात एक प्रेम कथा परशुराम माळी (31) ‘‘बरं ते जाऊ दे, आता जे झालंय तीच गोष्ट बोलत बसण्यात काहीच नाही. पुढली दिशा काय ते ठरवं.’’ ‘‘आता कुठली आलीया पुढची दिशा, माझ्या दिशांवर अंधार पसरलायण आता.’’ ‘‘असं बोलून खचू नको काहीतरी हालचाल केल्याशिवाय तुला पर्याय नाही. बघ प्रयत्न करू. तुम्हा दोघांमध्ये आणखी माझी अडचण नको. बसा बोलत तुम्ही. मी जाते, मला वेळ होतोय.’’ स्नेहल निघून गेली. आता होतो फक्त सुमैया आणि मी. ‘‘काय रे अभ्यास अजिबात केला नाहीस का? तू नापास होशील अशी कल्पनादेखील केली नव्हती. माझीही सगळी स्वप्न भंग केलीयस. पुढचं प्लॅनिंग सगळं विस्कटून टाकलंयस.’’ ‘‘म्हणजे काय बोलतीस तू?’’ ...Read More