मेहंदीच्या पानावर

(215)
  • 96.6k
  • 30
  • 38k

२४ डिसेंबर आज स्टुडीओ मध्ये आशु जोऱ्रात ओरडलीच “अग्गं हात सोडं.. कित्ती जोरात दाबती आहेस..” त्याला कारणही तस्सच होतं ‘राज’ स्ट्युडीओ मध्ये अचानकपणे आला होता, त्याचे आज रेकॉर्डींग नसताना त्याचे अनपेक्षीतपणे येणं त्याला अनपेक्षीतपणे बघणं माझ्यासाठी एक सुखःद धक्काच होता. त्याचे थोडीशी निळसर छटा असलेले डोळे, नेहमीच चेहऱ्यावर असणारी ति स्माईल, आपल्या चेहऱ्यावर आपसुकच हास्य पसरवणारी त्याची बोलताना डोळे मिचकावुन बोलण्याची पध्दत आणि कष्टाने कमावलेली शरीरयष्टी सर्वच काही छान होते.. मी पुर्ण फिदा होते त्याच्यावर. आणि त्याचा आवाज.. माय गॉड.. अंगावर हजारो गुलाबाच्या पाकळ्यांची बरसात केल्यासारखे वाटते. उगाच नाही तो आघाडीचा गायक आहे, मीच काय कित्तेक मुली त्याच्यावर फिदा असतील.

Full Novel

1

मेहंदीच्या पानावर (भाग-१)

२४ डिसेंबर आज स्टुडीओ मध्ये आशु जोऱ्रात ओरडलीच “अग्गं हात सोडं.. कित्ती जोरात दाबती आहेस..” त्याला कारणही होतं ‘राज’ स्ट्युडीओ मध्ये अचानकपणे आला होता, त्याचे आज रेकॉर्डींग नसताना त्याचे अनपेक्षीतपणे येणं त्याला अनपेक्षीतपणे बघणं माझ्यासाठी एक सुखःद धक्काच होता. त्याचे थोडीशी निळसर छटा असलेले डोळे, नेहमीच चेहऱ्यावर असणारी ति स्माईल, आपल्या चेहऱ्यावर आपसुकच हास्य पसरवणारी त्याची बोलताना डोळे मिचकावुन बोलण्याची पध्दत आणि कष्टाने कमावलेली शरीरयष्टी सर्वच काही छान होते.. मी पुर्ण फिदा होते त्याच्यावर. आणि त्याचा आवाज.. माय गॉड.. अंगावर हजारो गुलाबाच्या पाकळ्यांची बरसात केल्यासारखे वाटते. उगाच नाही तो आघाडीचा गायक आहे, मीच काय कित्तेक मुली त्याच्यावर फिदा असतील. ...Read More

2

मेहंदीच्या पानावर (भाग-२)

३१ डिसेंबरकसलं नविन वर्षाचं स्वागत आणि कसलं काय. ग्रहाणलेल्या चंद्राची कोणी कोजागीरी पोर्णीमा करते काय? आई-बाबांच्या चेहऱ्यावर माझ्या वागण्यातील बदलाचे अनेक प्रश्न आहेत ज्याची उत्तर माझ्याकडे सुध्दा नाहीत. त्यांची नजर टाळण्याचा खुप प्रयत्न करते आहे.. पण कुठवर? मन दुःखी असले की कसं सगळं जगच दुःखात बुडालेले वाटते. मागच्या अंगणात सुगंधाचा सडा घालणारा प्राजक्त सुध्दा सध्या मला दुःखीच वाटायला लागला आहे.. “प्राजक्तासारखी माझी सुध्दा स्वप्न पहाटेला गळतात,म्हणूनच प्राजक्ताची दुःखं कदाचित, मला कळतात..” आशुचे दोन मिस्ड कॉल्स दिसले नंतर मात्र परत तिने फोन केला नाही. कदाचीत माझं एकटं रहाणं तिनेसुध्दा स्विकारलेले दिसते आहे. ८ जानेवारीजुलै मध्ये ज्या चित्रपटासाठी गाणी गायली होती ...Read More

3

मेहंदीच्या पानावर (भाग-३)

१५ फेब्रुवारी रात्रभर अखंड वाहीलेल्या आश्रुंनी भिजलेली उशी सकाळी गार पडली होती. सकाळी अंथरूणातुन उठायचाच कंटाळा आला होता.. उशी कवटाळुन खुप वेळ लोळत पडले. पण शेवटी मी थांबल्याने क्षण थोडे नं थांबणार होते? पटापट आवरुन खाली आले. पार्कींग मध्ये उभ्या असलेल्या MH-01 नंबराच्या आलीशान गाडीने माझे लक्ष वेधुन घेतले. महाराष्ट्राची गाडी? इकडे?? उत्सुकतेने रजिस्टर चाळला आणि आश्चर्याचा धक्काच जणु बसायचा बाकी होता. ‘राज’ च्या नावावर दोन रुम्स बुक्ड पाहुन मी थक्कच झाले. शेरसिंगला विचारले तसे त्याने बाहेर गार्डनमध्ये बसलेल्या एका इसमाकडे बोट दाखवले. मी थोडी धावतचं.. थोडी भरभर चालत बाहेर पोहोचले आणि राजला तिथे बघुन अक्षरशः थिजुन गेले. आयुष्य ...Read More

4

मेहंदीच्या पानावर (भाग-५)

२१ फेब्रुवारी इतक्या दुरवर बाईक वरचा असुनही प्रवासाचा शीण असा जाणवलाच नाही. खाचखळग्याच्या रस्त्यातुन, ओढ्यानाल्यातुन प्रवास करताना शरीराला होणारा निसटता स्पर्श शरीरावर प्राजक्ताच्या फुलांची उधळण करत होता. क्षणभर जाणवलं, तुम्हाला हवा तो जोडीदार बरोबर असेल तर आयुष्यातले या ही पेक्षा मोठे खाच-खळगे कसे अनेक लोकं सहजतेने पारं करत असतील! ‘निधी मेहता’, पुर्णपणे मी तिच्याबद्दल विसरुनच गेले आहे. जणु काही ती अस्तीत्वातच नाही. जणु काही तिच आणि राजचं काही नातं आहे हेच मला ठाउक नाही. मी त्यांच्या नात्याबद्दल पुर्णपणे अनभिज्ञ झाले होते. तिच्याबद्दल मी राजकडे एक शब्दही विचारला नव्हता आणि राजनेही तिच्याबद्दल कधी माझ्याकडे विषय काढला नव्हता. माझ्या मनामध्ये सध्या ...Read More

5

मेहंदीच्या पानावर (भाग-५)

२८ फेब्रुवारीआजचा शेवटचा दिवस. आम्ही एकत्र असलो तरी शक्यतो एक-मेकांपासुन दुर रहाण्याचाच प्रयत्न करत होतो. का? कश्यासाठी? आज त्याचा माझा एकमेकांना फारसा असा स्पर्श झालाच नाही, मला अगदी हवा-हवासावाटत होता आणि त्याच्या डोळ्यात बघुन मी खात्रीने सांगु शकते की त्यालाही.. पण तोस्वतःला प्रयत्नपुर्वक माझ्यापासुन लांब ठेवु पहात होता. असो, आम्ही गप्पा मात्र खुप मारल्या. राज सतत काही तरी माझ्या डोळ्यात शोधण्याचा प्रयत्न करत होता.. आणि कदाचीत नकळत मी सुध्दा. दुपारचं जेवण आम्ही एकत्रच घेतलं, म्हणजे तसं एकत्रच जेवतो, पण सर्व जण इतके राजच्या आजु-बाजुला असतात की तो माझ्या समोर असुनही माझा नसतो. आज मात्र आम्ही जरा वेगळे होऊनच जेवलो. ...Read More

6

मेहंदीच्या पानावर (भाग-६)

१५ मार्चदोन दिवस होऊन गेले, राजचा फोन नाही. मी काय बोलले ते कळाले ना राजला? मी कागद बरोबर दिला त्याला? काय गडबडीत, वेंधळेपणाने दुसरेच काही हातात कोंबले त्याच्या फोनच्या प्रत्येक रिंगने वाढलेली उत्सुकता आणि ‘तो’ फोन राजचा नाही हे पाहुन चेहऱ्यावर पसरलेली नाराजी मी नाही लपवु शकत. दिवस-रात्र मी मोबाईलला कवटाळुनच आहे, जणु काही तो नाहीसा झाला तर माझं आयुष्यच संपुन जाईल. स्टुडीओमध्ये नजर सतत राजलाच शोधत असते. पण तो दिसलाच नाही. मी विचीत्र तर नाही ना वागले? आमच्या मैत्रिचा मी चुकीचा तर नाही ना अर्थ काढला? माझ्या मुर्खपणामुळे थोडेफार का होईना जवळ आलेला राज माझ्यापासुन दुरावणार तर नाही ...Read More

7

मेहंदीच्या पानावर (भाग-७)

’तुझी गाडी राहु देत इथे, चल माझ्याबरोबर, जरा चक्कर मारुन येऊ’, असे म्हणुन राज त्याच्या गाडीत शिरला, मी सुध्दा मागोमाग गाडीत जाउन बसले. राजने गाडी परत गावात न घेता घाटातुन वर न्हेली. बर्‍याच वेळ वर वर गेल्यावर राजने त्याची गाडी एका लांब.. मोकळ्या पठारावर उभी केली. तेथुन खालच्या गावातील प्रखर दिवे सुध्दा छान मंद, अंधुक भासत होते. आसमंत कसल्याश्या सुगंधाने भरुन गेला होता. थंडगार वार्‍याने अंग अंग मोकळं झाल्यासारखे वाटत होते. मी केसांना बांधलेली रिबीन काढुन टाकली आणि इतक्यावेळ आकसुन बसलेले केस वार्‍याच्या झुळकीबरोबर उडु लागले. मनावर बसलेली वैचारीक धुळ सुध्दा उडुन गेली आणि एकदम हलकं हलकं वाटायला लागलं. ...Read More

8

मेहंदीच्या पानावर (भाग-८ शेवटचा)

२६ मार्चगेल्या दोन चार दिवसांत विशेष असे काही घडले नाही. स्टुडीओमध्ये राज दिसतो, पण त्याच्या चेहर्‍यावर मला माझ्यासाठी काळजीच आणि जी मला आज्जीब्बात आवडली नाही. मला अशी कोणी किव केलेली आज्जीब्बात आवडत नाही. कदाचीत ’तु नही तो और सही’ नाही म्हणता येणार मला, पण म्हणुन मला इतकं नको रे लाचार करुन टाकुस की आरश्यासमोर उभे राहील्यावर माझ्याच नजरेला मी नजर नाही देऊ शकणार! २७ मार्चटळटळीत दुपारी खिडकीतुन खाली बघत बसले होते. निष्पर्ण झालेली झाडं, पानगळतीमुळे कचरामय झालेले रस्ते, तुरळक वाहतुकीत वेगाने जाणार्‍या वाहनांच्या मागोमाग उडणारी धुळ आणि पानांची रांग, जागो जागी दिसणारे उसाच्या रसांची गुर्‍हाळ उन्हाळ्याची चाहुल देत ...Read More