संगीत शारदा

(7)
  • 69.7k
  • 17
  • 21.6k

संगीत शारदा (गोविन्द बल्लाल देवल) संगीत शारदा हे आद्य नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांचे एक गाजलेले संगीत नाटक आहे. मराठी नाट्य इतिहासात या नाटकाला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. यात प्रसिद्ध गायक अजित कडकडे यांनीही काम केले होते.

Full Novel

1

संगीत शारदा - अंक - 1

संगीत शारदा - अंक - पहिला (गोविन्द बल्लाल देवल) संगीत शारदा हे आद्य नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांचे एक गाजलेले संगीत आहे. मराठी नाट्य इतिहासात या नाटकाला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. यात प्रसिद्ध गायक अजित कडकडे यांनीही काम केले होते. ...Read More

2

संगीत शारदा - अंक - 2

संगीत शारदा गोविंद बल्लाळ देवल अंक दुसरा रवेश पहिला ( स्थळ : गंगापुरांतील एक रस्ता ) दीक्षित : ( ) या क्षेत्रीं येऊन जवळ जवळ महिना होत आला. इतक्या अवधींत आम्हीं काय केलें ? कां, पुष्कळ केलं. पहिली गोष्ट ही कीं, व्यवस्थित वळण बांधून येथील सरकारी हेरंबमहालांत आमच्या श्रीमंतांची स्थापना केली. कांहीं माहिती मिळवून, त्या माहितीला थोडं धोरण जुळवून आणि आंत आमची स्वतःची कल्पना मिसळून श्रीमंतांना शोभण्यासारखं व लोकांना पटण्यासारखं एक नांव शोधून काढलं. तें कोणतं ? तर मंडलेधरकरांचे सापत्न बंधु जयघुंडिराज. या क्षेत्रीं आल्या दिवसापासून विद्वान‍ , शास्त्री, हरिदास, पुराणीक, अशांची योग्य संभावना; तसेंच दानधर्म, अन्नसंतर्पण, इत्यादिकांची गर्दी सुरू ठेवल्यानं श्रीमंतांच्या औदार्याचा ...Read More

3

संगीत शारदा - अंक - 3

संगीत शारदा गोविंद बल्लाळ देवल अंक तिसरा प्रवेश पहिला ( स्थळ : कुबेरांचा वाडा ) ( मंदाकिनी, वल्लरी, तुंगा, जान्हवी, शरयू वगैरे मुली गौरीची मांडणावळ मांडून ) मंदाकिनी : आतां बायकांना म्हणावं हवं तेव्हां या. आमच्याकडून तयारी आहे. वल्लरी, तें वाळ्याचं अत्तर गंघांत घातलंस ना ? वल्लरी : हो हो, बघ हवं तर ! ( वास दाखविते । शरयू : मंदाकिनी, पोरीसोरींना सरसकट एकेक तुरा द्यायचा म्हणतेस, पण तुरे सगळे हतकेच ना ? मंदाकिनी : ते कां ? माळ्याला आणखी इतके आणायला सांगितले आहेत. बरं, आतां मांडणावळींतलं कांहीं राहिलं नाहीं ना ? बघतें हो. अग सगळंच मुसळ केरांत ! गौरीपुढें मिठाईचं तबक ठेवायला विसरलोंच. शरयू, जा बरं तेवढं घेऊन ये. ...Read More

4

संगीत शारदा - अंक - 4

संगीत शारदा - अंक - 4 प्रवेश पहिला ( स्थळ : कांचनभटाचें घर ) कांचन० : या अलीकडच्या पोरी म्हणजे मोठया धाडसी त्या शुभंकराच्या मुलीला पोरीपोरींनी सहज म्ह्टलं कीं तुला नवरा पाहिला आहे तो बायकांसारखं बोलतो. हें ऐकल्याबरोब तिनं जाऊन जीव दिला ! तसं जर कांहीं वेडा आमच्या पोरीच्या डोक्यांत शिरलं तर आमचं हुंडायाचं, तैनातीचं, आणि त्यावर श्रीमंत होण्याचं मनोराच्या जागच्या जागीं ढांसळून जायचं. तें कांहीं नाहीं. आजचा आणि उद्यांचा दिवस डोळ्यांत तेल घालून पोरीला जपलं पाहिजे, एकदां तिच्यावर अक्षता पडून आमच्या पदरांत पुरी रक्कम पडली, म्हणजे अर्धा निश्चिंत झालों. मग तिनं कांहीं केलंन तरी फार तर तैनातीलाच गोता बसेल. ( आंत पाहून ) काय ग ए, आज तरी जेवली का नीट ...Read More

5

संगीत शारदा - अंक - 5

प्रवेश पहिला ( स्थळ : रस्ता ) कांचन० : ( वेडयाच्या वेषानें ) पद्य --- ( बारोप्रिया व्यागत ) घट तीन धनानें भरले नसती ठावे कोणा, गुप्त ते तळघरीं पुरले ॥ध्रु०॥ उरलें कन्याधन करिं पडतां ॥ व्याजवृद्धि वर्षासन येतां ॥ कांहीं थोडया काळे, पाहीन दैन्य मम सरलें ॥१॥ भुजंग बरा झाला कीं त्याच्या गळ्यांत पोरगी बांधतो आणि राहिलेला हुंडा घेतों चोपून. पण तो म्हणेल दीक्षितांकडून घे आणि दीक्षित आहेत कैदेंत. मग बरं यांतल्या रिकाम्या थैल्या किती आहेत पाहत नाहींत कुणीं ( सोडीत ) जयंताच्याऐवजीं मुलगीच झाली असती तर छान झालं असतं, अरे ! या थैलींत दगड कुणीं भरून ठेविले ! ( हंसून ) बायको म्हणते तुम्हांला वेड लागलं आहे बाहेर जाऊं नका. ( पाहून ) आली रे आली ! तीच आली. मला खांबाशीं बांधून डागायचा बेत आहे तिचा. हं ! पळातर इथून त्या देवळांत लपून बसूं. ...Read More