एडिक्शन - पर्व दुसरे

(241)
  • 199.3k
  • 29
  • 96.1k

के जिंदगी ने कुछ ऐसीलेली है इक करवटके अब बहोत कुछ पाकर भीसब कुछ अधुरा सा लगता है ... उगवता सूर्य हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात नव्याने जगण्याची आशा निर्माण करून जातो ..हे सुर्यदेवता तुही माझ्या आयुष्यात नवीन सकाळ घेऊन यावी हीच प्रार्थना तुझ्यासमोर करते आहे ..पुन्हा एकदा मुंबई आणि मागे बराच काळ लोटलेला .. किलबिल अनाथआलंय ..आजूबाजूला छोट्या - छोट्या मुलांचे आवाज ऐकून मन प्रसन्न होऊ लागलं होतं ..दोन दिवसाआधीच इथे एका मुलाला आणण्यात आल ..बिचार्याला त्याच्याच घरच्यांनी कचरा कुंडीत फेकून दिल होत ..आमच्या एका सहकार्याने त्याला रात्रीच इथे आणलं आणि तो या जगाचा भाग झाला ..खूपच गोड

Full Novel

1

एडिक्शन - पर्व दुसरे - भाग 1

के जिंदगी ने कुछ ऐसीलेली है इक करवटके अब बहोत कुछ पाकर भीसब कुछ अधुरा सा लगता है ... उगवता सूर्य हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात नव्याने जगण्याची आशा निर्माण करून जातो ..हे सुर्यदेवता तुही माझ्या आयुष्यात नवीन सकाळ घेऊन यावी हीच प्रार्थना तुझ्यासमोर करते आहे ..पुन्हा एकदा मुंबई आणि मागे बराच काळ लोटलेला .. किलबिल अनाथआलंय ..आजूबाजूला छोट्या - छोट्या मुलांचे आवाज ऐकून मन प्रसन्न होऊ लागलं होतं ..दोन दिवसाआधीच इथे एका मुलाला आणण्यात आल ..बिचार्याला त्याच्याच घरच्यांनी कचरा कुंडीत फेकून दिल होत ..आमच्या एका सहकार्याने त्याला रात्रीच इथे आणलं आणि तो या जगाचा भाग झाला ..खूपच गोड ...Read More

2

एडिक्शन - पर्व दुसरे - भाग 2

अजिंक्य बाथरूमकडे जाऊ लागला आणि त्याला स्नेहाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला ..तो तसाचं धावत तिच्याकडे परतला ..काही अंतरावरूनच तो पिल्लुला हसवन्याचा प्रयत्न करू लागला आणि तीही त्याच्याकडे बघून हसू लागली ..अजिंक्यकची नौटंकी पाहून सर्व हसायला लागले होते त्यामुळे तो थोडा शरमला पण पिल्लूला हसताना पाहून मात्र तिच्या त्या निरागस हसण्याची एक वेगळीच मजा मला त्याला अनुभवास येत होती आणि त्याने सर्वांकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली ..." अरे बापरे !!! किती गोड हसतय ना माझं पिल्लू !! माझ्याकडे येणार आहेस तू ? " , अजिंक्य बोबड्या शब्दात म्हणाला ..तिने हे ऐकताच हात समोर केले आणि अजिंक्य तिला घेऊन अंगणात गेला ...Read More

3

एडिक्शन - पर्व दुसरे - भाग 3

लग्न किती सुंदर शब्द आहे ना ? ..आणि त्यातही प्रेम विवाह झाला असेल की मग आयुष्यातील प्रत्येक क्षणच खास जातात ..ज्या व्यक्तीचे रात्रंदिवस स्वप्न पाहिले असतात त्यांच्यासोबतच ते क्षण जगताना एक वेगळीच मज्जा जाणवते...अजिंक्यला मृणालच ते लाजन , ईर्षा करण सर्व काही आवडू लागलं ..ती एकदा का त्याचा कुशीत आली की मग घडलेल सर्व काही माफ असे .. आज रविवार होता शिवाय घरी आई - बाबा नसल्याने अजिंक्यने मृणालला बाहेर फिरविण्याचा प्लॅन केला होता .त्याला मृणालसोबत संपूर्ण दिवस घालविता येणार असल्याने तो आज फारच खुश होता ..रात्री मृणाल देखील कुशीत झोपल्याने तिचा मूड मस्त वाटत होता ...Read More

4

एडिक्शन - पर्व दुसरे - भाग 4

मूवी पाहून झाली होती आणि आता दोघांच्याही पोटात कावळे ओरडू लागले ..अजिंक्यने सर्व प्लॅंनिंग केली होती त्यामुळे त्याने जाण्यासाठी लगेच गाडी काढली ..गाडी हळूहळू शहर ओलांडून गावाकडे जाऊ लागली ..अजिंक्य मृणालला भरपूर वेळा मोठं - मोठ्या हॉटेल्समध्ये जेवायला घेऊन गेला होता पण त्या स्थळाबद्दल मृणालला काहीच माहिती नव्हतं त्यामुळे ती अजिंक्यला त्याबद्दल विचारू लागली.. अजिंक्यला तिला सरप्राइज द्यायचं असल्याने आज तो काहीच बोलत नव्हता आणि ती रागाने त्याच्याकडे पाहू लागली ..अजिंक्यने देखील काही पाहिलंच नाही असद दाखवून गाडी चालविण्याकडे लक्ष केंद्रित केलं ..हळूहळू एक - एक गाव ओलांडत ते त्या स्थळापर्यंत पोहोचले ..अजिंक्य गाडी पार्क करायला गेला ...Read More

5

एडिक्शन - पर्व दुसरे - भाग 5

अजिंक्य रियाकडे बघून किंचित हसू लागला ..हे बघून रियाला अजिंक्यचा राग येऊ लागला आणि ती बाहेर जायला निघाली ...ती जाणारच तेवढ्यात अजिंक्यने तिचा हात पकडत तिला थांबविले ..तिची नजर आताही त्याच्याकडे नव्हती आणि तो म्हणाला वो मोहब्बत भी क्याजो हर किसीं से बया की जायेये तो हाल है दो दिलो काजो अकसर जमाना समझ न पायेहम भी थे कभी डुबेऊस दर्द भरी मेहफिल मेबस फरक इतना है कीहम किसीं से केह नही पाये .. " तुला उत्तर हवं आहे ना ? ..बस मग इथे ", अजिंक्य म्हणाला आणि ती बाजूच्याच चेअरवर जाऊन बसली ...ती त्याच्याकडे बघू लागली ...Read More

6

एडिक्शन - पर्व दुसरे - भाग 6

अजिंक्यच्या तोंडून पहिले शब्द निघाले , " रिया तुमच्यात काय बोलणं झालं ? " ..त्याच्या अचानक प्रश्नाने रियाच लक्ष गेलं ..त्याला तिच्याकडे पाहण्याची भीती वाटत होती म्हणून त्याने गाडी चालवितच प्रश्न विचारला ..मधातच त्याने एकदाच तिच्याकडे लक्ष दिलं आणि ती तेव्हाच बाजूला बघू लागली ..अजिंक्यला शंका येऊ नये म्हणून ती चेहऱ्यावर खोटं हसू आणत म्हणाली , " सॉरी अजिंक्य पण आमचं सिक्रेट आहे ते ..त्यामुळे ते मी तुला सांगू शकणार नाही .." त्याला तिचा राग आला होता पण तरीही राग आवरत तो गाडी चालवू लागला..पुन्हा एकदा गाडीत निरव शांतता निर्माण झाली . अजिंक्यला ते वातावरण नकोस ...Read More

7

एडिक्शन - पर्व दुसरे - भाग 7

आयुष्यात वादळांना खूप महत्त्वाचं स्थान असत..एकदाच वादळ येऊन निघून गेल की मागे साचलेली संपूर्ण घाण निघून जाते आणि बाकी शांत , स्वच्छ वातावरण ..आयुष्यही असच एक कोड ..इथे प्रत्येक व्यक्ती जवळ असतो पण आयुष्यात वादळ आलं की आपले कोण आणि परके कोण याची जाणीव होते ..रियाच्या अजिंक्यच्या आयुष्यात येण्याने मृणाल - अजिंक्यच प्रेम आणखीच घट्ट झालं होतं ..वरून खलनायिका जरी ती वाटत असली तरीही तीच त्यांना नकळत एकमेकांजवळ आणत होती ..तेही जगू लागले बेभान होऊन .. साधारणता तीन महिने उलटून गेले होते ..या काळात अजिंक्य फक्त काम आणि कामच करीत होता परंतु मुलीप्रति , बायकोप्रति आणि कुटुंबाप्रति ...Read More

8

एडिक्शन - पर्व दुसरे - भाग 8

पुन्हा एकदा मुंबई ...हळूहळू मागे एक - एक इमारत जाऊ लागली आणि अजिंक्य - मृणाल दोघेही आठवणींच्या जुन्या क्षणात लागले ..जस - जस ऐअरपोर्ट जवळ येऊ लागलं तस - तसा मृणालचा चेहरा बदलू लागला ..ती शांत होती पण मनात कुठेतरी भीतीने घर करून सोडलं होत ..कुणीतरी पुन्हा या शहरात आपल्याला ओळखेल आणि आपलं वर्तमान पूर्णतःच बदलून जाईल याची तिला भीती वाटत होती ..बऱ्याच प्रयत्नानंतर तिला जीवनसाथी , कुटुंब , आणि तिचाच अंश लाभला होता आणि त्यापासुन दुरावणे म्हणजे आयुष्याचा शेवटच होता ..तिच्या चेहऱ्यावर भीतीचे जाळे पसरले होते आणि अजिंक्यने तिच्या हातावर आपला हात ठेवला ..त्यात त्याचा विश्वास होता ...Read More

9

एडिक्शन - पर्व दुसरे - भाग 9

त्याला बघून मृणालचे हात - पाय थरथरायला लागले होते ..आणि तो अधिकच जवळ येऊ लागला ..ती तिथेच स्तब्ध उभी आणि तिने अजिंक्यच्या हाताची पकड अधिकच मजबूत केली ..तो तिच्या समोर येत म्हणाला , " मी थोड्या वेळेपूर्वीच तुला बघितलं पण तूच आहेस की नाही याची शंका होती म्हणून बोलू शकलो नाही ..किती दिवस झालेत मी तुला वेड्यासारखं शोधतोय ..नंबर पण बदलून घेतला आहेस आणि फ्लॅटला पण लॉक आहे ..आहेस तरी कुठे आणि काम देखील मधातच सोडून गेलीस .." ती आताही फक्त त्याच्याकडे पाहत होती ..आणि त्या व्यक्तीला तिच्यासोबत अजिंक्य आहे याचसुद्धा भान नव्हतं ..तो पून्हा एकदा म्हणाला , " ...Read More

10

एडिक्शन - पर्व दुसरे - भाग 10

अजिंक्य आणि काकू आश्रमाकडे निघाले तेव्हा अंधार पडला होता ..हळूहळू गुलाबी थंडीही वाढू लागली होती ..काकू दिवसभर थकल्या असल्याने कारमध्येच डोळा लागला तर अजिंक्य निवांत गाडी चालवू लागला ..काहीच क्षणात गाडी आश्रमाजळवळ पोहोचली ..अजिंक्यने गाडी पार्क केली आणि काकूंना उठवू लागला ..काकू आपले डोळे चोळत उठल्या आणि समोरच दृश्य बघून थक्क झाल्या .आज संपूर्ण आश्रम लायटिंगने सजवलं होत ..आश्रमाकडे बघून त्यांना स्वतःच्याच डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता आणि त्या एक एक पाऊल समोर टाकू लागल्या ।.काकू समोर जाऊ लागल्या आणि मृणाल व निशा महाराष्ट्रीयन पद्धतीने साडी परिधान करून समोर आल्या ..त्यांच्या हातात फुलांनी सजवलेली आरतीची थाळी होती ..काकू ...Read More

11

एडिक्शन - पर्व दुसरे - भाग 11

मुंबईहून परतल्यावर लगेच दुसऱ्या दिवशी अजिंक्य ऑफिसला जॉइन झाला ..बॉसने मिटिंग घेऊन पून्हा एक नवीन साईट मिळाल्याची बातमी दिली बातमी एकूण सर्व खुश होते फक्त अजिंक्यला आनंद झाला नव्हता ..नवीन प्रोजेक्ट म्हणजे पुन्हा जास्त मेहनत आणि जास्त वेळ द्यावा लागणार होता त्यामुळे तो थोडा नाराज झाला ..सराणी ह्याही प्रोजेक्टच काम अजिंक्यकडे सोपवल होत ..आणि विशेष म्हणजे हे प्रोजेक्ट हेद्राबादला पूर्ण करायचं होतं ..त्यामुळे प्रत्येक आठवडयाला दोन दिवस तरी तिथे जाऊन राहावं लागणार होतं आणि म्हणूनच अजिंक्य थोडा नाराज झाला .. मुंबईहून परतल्यावर अजिंक्य आपल्या कामात फारच व्यस्त झाला होता ..सकाळी उठून लवकर ऑफिसला जाणे आणि सायंकाळी उशिरा परतणे ...Read More

12

एडिक्शन - पर्व दुसरे - भाग 12

रियाने फोन रिसिव्ह केला आणि मृणालची झोपच उडाली ..एवढ्या रात्री ती अजिंक्यच्या रूममध्ये कशी आणि तिचा बोललेला प्रत्येक शब्द होता का ..की ती माझ्याशी खोट बोलली असे बरेच प्रश्न तिला सतावू लागले ..अजिंक्यवरचा विश्वास तिळमात्रही कमी झाला नव्हता पण रियावर अजूनही तिचा पूर्ण विश्वास बसला नव्हता ..त्यामुळे ती साशंक होती ..गेले वर्षभर तिने आपला भूतकाळ घरच्यांपासून लपवून ठेवला होता आणि त्याच ओझं तिला आतूनच तीळतीळ तोडत होत ..अजिंक्यच्या साथीने तिने स्वताला कसतरी सावरलं होत पण आता आपल्यापासून अजिंक्यच दूर जाईल अस तिला वाटू लागलं आणि गेल्या वर्षभरात लपवून ठेवलेल्या सत्याने पुन्हा एकदा मनात उडी घेतली ..अजिंक्य माझ्यापासून ...Read More

13

एडिक्शन - पर्व दुसरे - भाग 13

अजिंक्य सकाळी - सकाळी बाहेर फिरायला निघाला होता ..मृणालनेही बाहेर जाण्यासाठी हट्ट केला होता पण तिची तब्येत पूर्णपणे बरी नसल्याने अजिंक्यने तीच काहीच एकल नाही आणि एकटाच फ़िरायला बाहेर निघाला ....फिरायला गेल्यानंतर बऱ्याच दिवसांनी तो मित्रांशी भेटला होता त्यामुळे कितीतरी वेळ तो तिथेच मित्रांशी बोलत बसला.. मित्रांशी गप्पा मारण्यात वेळ कसा निघून गेला त्यालाच कळले नाही ..अजिंक्य घरी परतला तेव्हा सूर्य बऱ्यापैकी वर आला होता ..घरी येताच तो सोफ्यावर निवांत बसत टिव्ही पाहू लागला ..तर मृणाल त्याच्या हातात चहा देत म्हणाली , " काय साहेब आज ऑफिसला जायचं नाही का ? " आणि अजिंक्य तिच्या हातातला कप ...Read More

14

एडिक्शन - पर्व दुसरे - भाग 14

भरपूर दिवसानी अजिंक्यशी मनमोकळा संवाद झाल्याने मृणाल खुश होती ..त्याने तिला अस्वस्थ असण्याच कारण विचारलं असताना तिने चुप्पी साधली ..पण तिने पुढे काही दिवसाच मनात होणारी घालमेल त्याला सांगायचं ठरवलं ..ती त्यासाठी एका अचूक संधीची वाट पाहू लागली ..फक्त प्रश्न हा होता की ती संधी तिला मिळणार की नाही ? काही दिवस झाले होते ..अजिंक्यच्या जवळच्या मैत्रिणीचा विवाह सोहळा होता ..घर बाजूलाच लागून असल्याने सर्व तयारी मध्ये तो त्यांना मदत करत होता ..विवाह रविवारला असल्याने त्याला सुट्टीच टेंशन नव्हतं शिवाय हॉलमधली सर्व अरेंजमेंट पण नीट झाली होती ..अजिंक्य सकाळपासूनच हॉलमधील सर्व तयारी पाहत होता ..सकाळपासून कामात असलेल्या अजिंक्यला ...Read More

15

एडिक्शन - पर्व दुसरे - भाग 15

अजिंक्य मृणालच्या नात्याला आणखी पाच वर्षे होऊन गेली ..या पाच वर्षात बरच काही बदललं होत ..तिच्या आयुष्यात असे काही होत गेले की नकळत तिला समाजाचे विचार त्रास देऊ लागले ..अजिंक्यला काहीच न सांगितल्याने तिचे विचार तिच्या मनातच राहून गेले आणि त्यांचा तिच्या तब्येतीवर परिणाम होऊ लागला ..तीन वर्षं मृणालला काहीच जाणवलं नव्हतं पण मागील दोन वर्षांपासून तिला या सर्व गोष्टींचा त्रास होऊ लागला होता ..अजिंक्य ती मनातलं कधीतरी सांगेलच या आशेवर जगत होता पण संपूर्ण वेळ तिच्यावर लक्ष ठेवण त्यालाही शक्य होत नव्हत..प्रज्ञा मोठी होऊ लागली होती आणि तिच्या भविष्यासाठी अजिंक्य जीवापाड मेहनत करू लागला ..सरानी कंपनीची ...Read More

16

एडिक्शन - पर्व दुसरे - भाग 16

मॅरेज अनिवर्सरीचा प्रोग्रॅम संपला होता ...अजिंक्यही बाबांसोबत झोपी गेला ..निशा आणि मृणाल सोबतच झोपणार होते ..प्रवासाने निशाला लवकरच झोप पण मृणालला काही झोप लागली नव्हती ..मृणालची मानसिक स्थिती आधीच बरी नव्हती त्यात समीरच्या घृणास्पद वागण्याने ती घाबरून गेली होती ...त्याची ती नजर तिच्या समोरून जातच नव्हती ...त्याच्या नजरेत तिला हवस दिसत होती आणि ती हवस मिटविण्यासाठी तो काहीही करू शकत होता ..हीच हवस तिने मुंबईला असताना सर्वांच्या डोळ्यात पाहिली होती आणि तीच स्थिती बऱ्याच वर्षानंतर आल्याने ती अवघडून गेली ..रात्रीच्या अंधारात देखील तिला तोच तो दिसत होता ..आजूबाजूला सर्विकडे आज तोच तो होता ..तिच्या मेंदूवर त्याने अधिराज्य स्थापन ...Read More

17

एडिक्शन - पर्व दुसरे - भाग 17

प्रत्येक रात्रीला पडणारा अंधार मृणालच्या आयुष्यात दुःख घेऊन येत होता . रात्री झोप तिला कदाचीतच यायची ..संपूर्ण जग झोपी मृणाल मात्र रात्र नि रात्र भिंतीकडे पाहत असायची ..तिची स्वताची एक काल्पनिक दुनिया बनली ज्यात तिला नको ते विचार यायचे .त्या विचारात ती स्वताच हरवली जायची..कधी कधी ती वेड्यासारखं वागून जायची आणि संपूर्ण जग त्या वेडेपणावर हसत आहे असा भास तिला होऊ लागला ....अशाही स्थितीत समीरने तिच्या आयुष्यात येऊन पुन्हा दुःखांची नवीन शृंखला उभी केली ..त्याच्या अप्रिय विचारनी मृणालची झोप उडाली होती ..पण आज मृणाल एकटीच नव्हती जी झोपली नव्हती तर बाजूच्याच घरी समीरदेखील जागत होता ..समीर सिगारेटवर सिगारेट ...Read More

18

एडिक्शन - पर्व दुसरे - भाग 18

अखेर ती सकाळ उगवली ..पियुषला इतका आनंद झाला होता की त्याला काय करावं तेच कळत नव्हतं ..त्याने समीरला फोन मोबाइल हातात धरला पण फोन न करता तसाच ठेवून दिला ..टेबलवर बाईकची चावी त्याला दिसली आणि चावी घेऊन तो सरळ समीरकडे निघाला ..काही क्षणातच तो समीरच्या फ्लॅटवर पोहोचला आणि डोरबेल वाजवू लागला ..समीरला नशा जास्त झाली असल्याने तो बहुतेक आताही झोपूनच होता ..पियुषणे कितीतरी वेळ बेल वाजविल्यावर समीर बाहेर आला ..पियुषला सकाळी - सकाळी त्याच्याकडे बघून तो थोडा हैराण झाला ..तो काही बोलणार तेव्हड्यातच पियुष आत मध्ये येऊन सोफ्यावर बसला ..समीर आताच उठला असल्याने सरळ फ्रेश व्हायला निघाला ..आणि काही ...Read More

19

एडिक्शन - पर्व दुसरे - भाग 19

गावात मृणालबद्दल फक्त चर्चा सुरू नव्हती तर तिच्यावर वेगवगेळे आरोप देखील लावल्या जात होते ..अजिंक्य / मृणालचे ज्या - व्यक्तींसोबत वाद होते त्यांनी तर होत नव्हतं सर्व सांगायला सुरुवात केली ..त्यात अजिंक्यचे मित्र देखील होते ..त्यांनीही त्यांच्याबद्दलच्या बऱ्याच गोष्टी उघड करण्यास सुरुवात केली ..संबंध चांगले असताना चांगल्या मित्रांना सांगितलेल्या गोष्टी संबंध बिघडल्यावर पसरायला मात्र वेळ लागत नाही आणि हेच त्यांच्यासोबत होत होतं फक्त याबद्दल कुणालाच काही माहिती नव्हत ..गावात वाऱ्याच्या वेगाने जरी ही गोष्ट पसरली होती तरी अजिंक्यच्या घरी मात्र पोहोचली नव्हती .तेवढे दिवस तरी त्यांच्या घरी प्रेमाचं , सलोख्याचे वातावरण होते ..पण आता तोही क्षण येणार ...Read More

20

एडिक्शन - पर्व दुसरे - भाग 20

दुसऱ्याच दिवशी मृणालला हॉस्पिटलमधून सुट्टी मिळाली ...ती घरी आली तेव्हा घर तेच होत पण मानस बदलली होती ..दररोज आई ठहाक्याने घर उजळून निघायचं ..मात्र आता त्याच घरात राहायची इच्छा होत नव्हती ..रात्री झोप न लागल्याने अजिंक्य घरी येताच बेडवर पडला ..तर सुरज मृणालला शाळेत सोडून परत आला होता ..मृणाल एकटीच घरात काम करत बसली होती पण रोजसारखा तिला काम करण्यात आनंद जाणवत नव्हता ..स्वयंपाक करून ती बाहेर आली आणि अंगणात बसली ..समोर आई बसून होत्या ..मृणालला त्यांच्याशी बोलायची फार इच्छा होत होती तरीही त्या रागावतील म्हणून ती बोलायची हिम्मत करत नव्हती ..शेवटी हिम्मत करून तिने बोलण्याचा प्रयत्न केला पण ...Read More

21

एडिक्शन - पर्व दुसरे - भाग 21

मृणालच्या शब्दांनी समीरला मिरची लागली आणि तो पाय काढत घराकडे पसार झाला ..आपण तिच्या आयुष्यात इतकं मोठं वादळ आणलं तिच्या चेहऱ्यावर भीती नसून ती आणखीच कठोर झाली आहे हे पाहून तो संतापला ..त्याच डोकं पुन्हा एकदा गरगर फिरू लागल..डोक्यात वेगवेगळे विचार येऊ लागले आणि नाईलाजाने पियुषला फोन लावला ...पियुषला फोन लावून त्यांच्यात काहीतरी बोलणं झालं ...बराच वेळ झाला तरीही त्यांचं बोलणं सुरूच होत ..पियुष त्याला बरच काही समजावत होता पण तो काहीच एकूण घ्यायला तयार नव्हता ..त्याला तर फक्त मृणालने त्याच्या पायावर पडून नाक घासण हवं होतं ..पियुषणे त्याला दोन गोष्टी सांगितल्या होत्या आणि ते दोन्ही पर्याय एकूण ...Read More

22

एडिक्शन - पर्व दुसरे - भाग 22

अजिंक्यच म्हणणं बरोबर निघालं ..लोक बोलून - बोलून थकून गेले आणि दोघानिही त्याकडे लक्ष न दिल्याने सर्व आपोआपच आपल्या व्यस्त झाले ..कंमेंट पास करण सुरू होत पण त्याचा फार प्रभाव त्यांच्या आयुष्यावर पडत नव्हता ..अजिंक्य आपल्यासाठी लढतोय हे पाहून तर मृणाल आणखीच जिद्दीने सर्व प्रसंगांना सामोरे जायला उभी झाली होती ..नात्यांची परीक्षा दुःखाच्या काळातच होते हे आईच्या वागण्यावरून पटलं होत ..विश्वास ठेवणारे कुणाच्याही शब्दात न येता आपल्या शब्दांवर टिकून राहतात हे अजिंक्यच्या वागण्यावरून तिला कळून चुकलं ..परिस्थिती कशीही असो पण जेव्हा हा विश्वास नात्यांची परीक्षा घेऊ लागतो तेव्हाच तर प्रेमाची परिक्षा सुरू होते आणि नंतरच प्रेम या ...Read More

23

एडिक्शन - पर्व दुसरे - भाग 23

अजिंक्यने प्रज्ञाला बंदिस्त करू नको अस नक्कीच सांगितलं होतं पण आईच काळीज काही मानेना आणि तिने गुपचूप आपला तोच सुरु ठेवला ..तिला कोणत्याही स्थितीत प्रज्ञाला गमवायचं नव्हतं त्यामुळे ती तिची ढाल बनून प्रज्ञाच्या सभोवती राहू लागली ..प्रज्ञाला कुणी काही बोलल तरी मृणाल त्यांची चांगलीच खबर घेत होती ..प्रज्ञाही आईसोबत फार खुश राहू लागली ..ती याबद्दल सहसा अजिंक्यला काहीच सांगत नसे पण अजिंक्य अचानक तिच्या आधी घरी आला की मग मात्र मृणाल पेचात सापडायची ..ती त्या रात्री अजिंक्यशी बोलणंच टाळत असे आणि अजिंक्य तिला अस पाहून रागवायच्या ऐवजी मनातल्या मनात हसून तिची गंमत घेण्यात समाधान मानायचा ..ती जरी ...Read More

24

एडिक्शन - पर्व दुसरे - भाग 24

डोळ्यात अश्रू आणि मनात यातना ..प्रज्ञाच्या तोंडून " वैश्या " हा शब्द एकूण जणू कुणी गालावर चपराक लावली अस जाणवू लागल ..अशी चपराक जिने गालावर वळ तर आले नव्हते पण हृदयात मात्र ती खोलवर शिरली होती ..मृणालच्या अश्रूंनी देखील आता तिची साथ सोडायला सुरुवात केली ..दररोज डोळ्याबाहेर येऊन ते देखील कंटाळले होते ..आणि मृणाल मूर्तीसारखी सोफ्यावर बसली ..तिच्या डोक्यात फक्त एकच विचार येत होता ..इशक की बाजी का भीबडा अजीब असर हैहम आये थे सब को सवारनेपर हमीने सब को उजाडा है मृणाल अशा जागी होती जिथे तिला समजून घेण्याऐवजी सर्वच तिला आणखीच दुखावू लागले होते आणि ती ...Read More

25

एडिक्शन - पर्व दुसरे - भाग 25

मृणाल - प्रज्ञाचे संबंध थोडे फार सुधारू लागले होते त्यामुळे मृणाल त्यातून स्वतःला सावरू लागली ..अजिंक्य ऑफिसच्या कामात राहायचा ..प्रज्ञा - मृणालमध्ये अशी स्थिती असतानाही अजिंक्य काहीच का बोलत नाही हे बघून मृणाल गोंधळली होती ..अजिंक्य नेहमीच स्पष्ट मत दर्शविणार्यातला होता तेव्हा त्याच शांत बसणं म्हणजे नक्कीच काहीतरी त्याच्या मनात शिजत होत ते काय होत याचा शोध ती घेऊ लागली होती तरीही तिच्या हाती काहीच लागलं नव्हतं .. ..प्रज्ञा भीतीमुळे का असेना पण मृणालशी बोलू लागली होती तर प्रज्ञाबद्दलची गोष्ट अजिंक्यला सांगावी हे मृणालच्या मनातही आलं नव्हतं पण प्रज्ञाला याबाबत शाश्वती नसल्याने ती शंकेच्या रुपानेच मृणालकडे पाहत ...Read More

26

एडिक्शन - पर्व दुसरे - भाग 26

अजिंक्य तिचा हात धरून बाहेर निघाला तेव्हा सर्वांना वाटलं की तो मृणाललाच बाहेर काढणार पण त्यालाही बाहेर जाताना पाहून म्हणाली , " बाबा तुम्ही पण जाणार आहात ? ..नका जाऊ न आम्हाला तुमची फार गरज आहे ..विशेषतः मला !! " आणि अजिंक्य तिच्यावर हसत म्हणाला , " बेटा मला तुझा मुळीच राग आला नाही ..मान्य आहे की तुला खूप त्रास झाला पण विचार केल्यावर तुला लक्षात येईल की मी मृणालला घरी आणलं नसतंच तर यातलं काही घडलं नसत ..मुंबई शहरातच असतो तर सर्व काही छानं असत तेव्हा नकळत का होईना याला सर्वस्वी जबाबदार मी आहे आणि अप्रत्यक्षरित्या ...Read More

27

एडिक्शन- पर्व दुसरे - भाग 27

प्रज्ञा जसजशी मोठी होऊ लागली तसतसा तिच्या वागण्यात फरक जाणवू लागला ..हेच ते वय असत जेव्हा मूल बाहेरच्या जगात आनंद शोधू लागतात ..तेव्हा त्यांना समजावून सांगण , त्यांच्यावर अधिक नजर ठेवण फार गरजेच होऊन जात ..पण प्रज्ञाचे आईवडील सोबत नसल्याने तिला बर वाईट यातला फरक सांगणार कुणीच लाभलं नाही आणि ती त्यालाच जीवन समजत जगू लागली . ..तिच्यासाठी सलीलच प्रेमच सर्व काही बनत गेलं ..पण ती हे विसरत गेली की प्रेम एका मर्यादेपर्यंत आनंद देऊन जात आणि जेव्ह प्रेम आपली मर्यादा तोडू लागत तेव्हा ते सर्व काही अस्ताव्यस्त करून जात ..व्यक्ती त्या नशेत काय करतो आहे हे त्याला ...Read More

28

एडिक्शन - पर्व दुसरे - भाग 28

स्वतःच्या मर्जीने लग्न केल्यावर सुरुवातीचे दिवस फारच मजेशीर वाटू लागतात .आधी केवळ मनाने जुडणारे दोन व्यक्ती जेव्हा शरीराने जुळू तेव्हा त्यांच्यात अनोखं बंधन निर्माण होत जात आणि म्हणूनच ते जीवन प्रत्येकालाच हवं असत ..प्रज्ञा - सलील देखील त्यांना अपवाद नव्हते ..अजिंक्यने पैसे पाठवले असल्याने त्यांना काही दिवस काहीच टेन्शन नव्हतं ...स्वतःची रूम बघून तिथे ते आनंदाने राहू लागले .. त्यांना नव्यानेच एकमेकांचा सहवास इतका आवडू लागला की ते एक क्षण देखील एकमेकांना सोडत नसत ..त्यामुळे ते क्षण त्यांच्या आयुष्यातलं सुंदर पर्व होत गेलं ....सलील - प्रज्ञाला लग्न करून समाधान तर मिळालं होतं पण सर्वांकडून जो सपोर्ट हवा ...Read More

29

एडिक्शन - पर्व दुसरे - भाग 29

मृणाल जिवाच्या आकांताने अजिंक्य अजिंक्य ओरडत होती पण समोरून अजिंक्य काहीच बोलत नव्हता ..तर बाजूची गर्दी त्याला वाचवा अस म्हणताना तिला फोनवर एकूण येत होतं.. यावरून अजिंक्यचा अपघात झाला असल्याचं तिला कळालं होतं पण तो काहीच बोलत नसल्याने तिच्या मनात बऱ्याच शंका निर्माण झाल्या होत्या ..तरीही तिने त्याच नाव घेन थांबवलं नव्हतं ..तिचा प्रयत्न सफल झाला आणि समोरून कुणाचा तरी आवाज आला ..तो बोलू लागला , " ताई ..इथे तुमचा नंबर वाईफ म्हणून सेव्ह आहे तेव्हा तुम्हाला सांगायचं आहे की तुमच्या पतीचा फार मोठा अपघात झाला आहे ..त्याची स्थिती फारच गंभीर आहे ..तेव्हा तुम्ही शक्य होईल ...Read More

30

एडिक्शन - पर्व दुसरे - भाग 30

तुझको पाकर लगता थामैने जी ली अपनी जिंदगीतुझको खोकर मैने जाना हैतेरे बिना तो मै कुछ भी नहीहाथो से छुट गयेरास्ते सुनसान हो गयेमै चलती जा रही हु अंधेरी रात मेआवाज गुंज रही है फिर भी तू मेरे पास नही याद आते है वो दिनजब भी तुम छेडा करते थेगुस्सा होकर भी तुममुझसे अकसर प्यार जताते थेअब ना वो गुस्सा हैना कही प्यार हैतुम छुपे हुये हो इस पलना कुछ होश है ना मेरा खयाल हैक्या गुनाह हो गया मुझसे अब तो बता दे ए हमसफरकिस राह पर मिलोगे तुमभेज देना मुझे वो खबर मै दौडी चली आउंगी तुझसे मिलने के लियेबस केह ...Read More

31

एडिक्शन - पर्व दुसरे - भाग 31

अजिंक्यला जाऊन आज तेरा दिवस झाले होते ..रियाने अजिंक्यची तेरावी करण्याचा विचार मृणालला एकविला होता पण त्याला या सर्वांवर नसल्याने तिने रियाला साफ नकार दिला त्याऐवजी काही पैसे आणि कपडे जवळच्या आश्रमात भेट देण्याविषयी मृणालने रियाला सांगितले ..म्हणून आज दोघीही सकाळी - सकाळी आश्रमात पोहोचल्या होत्या ..अजिंक्यच्या जाण्याने दोघांच्याही जीवनात एक जागा खाली झाली होती आणि त्याच अस अचानक जाण दोघांनाही आतून तोडून गेलं होतं ..मागील काही दिवस त्या शांतच होत्या पण आज आश्रमात आल्यावर छोट्या - छोट्या मुलांचा आवाज ऐकून त्यांच्याशी खेळून काही क्षणकरिता का होईना दोघीही आपलं दुःख विसरू शकल्या होत्या ..काही अंतरावरच वृद्धाश्रम देखील ...Read More

32

एडिक्शन - पर्व दुसरे - भाग 32

अजिंक्य गेल्यानंतर मृणालचा चेहरा आज पहिल्यांदाच एवढा खुलला होता ..अजिंक्य ज्या प्रेमासाठी सर्वांशी भांडला होता ते प्रेम शेवटी जिंकलच एक अजिंक्य त्यांच्याच घरी जन्माला आला होता ..जो पुन्हा आपल्या प्रेमासाठी जगाशी भांडणार होता ..हा विचार तिच्या मनात येताच अंगात सरसरी निर्माण झाली ..पण एक खंत मात्र मागे राहिली ती आईबाबांना शेवटच भेंटण्याची ..सुरज घरी जायला निघणार तेवढ्यात मृणाल त्याला म्हणाली , " सुरज दोन मिनिटं थांबशील ..मी पण येते ..मला आजची रात्र तिथेच घालवायची आहे .." सुरजने होकार दिला आणि ती साडी चेंज करायला आत गेली .. काही क्षणातच ते सुरजच्या गाडीने घराकडे निघाले ..जास्त काही ...Read More

33

एडिक्शन - पर्व दुसरे - भाग 33 - अंतिम भाग

( कथेचा आजचा भाग मोठा आहे त्यामुळे कंटाळून शब्द सोडून देऊ नका ..मी कालपासून इतकं टाइप केलं आहे याचं नक्की राखा ..आणि मी आनंदाने सांगेल की या भागाच्या प्रत्येक शब्दात तुम्हाला काहीतरी नक्कीच मिळेल तेव्हा आज कंटाळा बाजूला ठेवा आणि मनमोकळं वाचा ..) मृणाल खडबडून जागी झाली आणि अजिंक्यच्या शब्दाने तीच डोकं जड होऊ लागलं ...आतापर्यंत तिच्या डोक्यात बराच गोंधळ निर्माण झाला होता पण अजिंक्यच्या शब्दांनी तिचा सर्व गोंधळ दूर केला आणि ती पोहोचली नकळत तिच्याच भूतकाळात .....ती मनातच विचार करू लागली की माझी काहीही चूक नसताना जेव्हा मला माझी आई सोडून गेली तेव्हा बाबांनी माझ्यावर ...Read More