सुंदर कथा

(53)
  • 42.6k
  • 86
  • 17k

मग तू देतोस की नाही तुझे शेत? मी म्हणून तुला इतकी किंमत देत आहे. अरे, आजूबाजूला आता सगळीकडे माझी जमीन! मध्ये तुझेच हे शेत आडवे येते. मी सांगतो ऐक. आढेवेढे नको घेऊस! केशवचंद्र म्हणाले. माझी जमीन विकणार नाही. गावातली सगळी जमीन तुम्ही या ना त्या मार्गाने आपलीशी केलीत. आता माझ्या या सोन्यावाणी तुकड्यावरही तुमची गिधाडी दृष्टी आली. राग नका मानू दादा परंतु खरे ते मी सांगतो. वाडवडिलांपासून चालत आलेली ही जमीन. ही का मी विकू? जमीन म्हणजे आई. आईला का कोणी विकतो? राहू द्या एवढी जमीन. पोटापुरे ती देते. मुलेबाळे तेथे येतात, खपतात, खेळतात. सत्तेची जमीन सोडू नये, दादा! भीमा म्हणाला.

Full Novel

1

सुंदर कथा - 1

मग तू देतोस की नाही तुझे शेत? मी म्हणून तुला इतकी किंमत देत आहे. अरे, आजूबाजूला आता सगळीकडे माझी मध्ये तुझेच हे शेत आडवे येते. मी सांगतो ऐक. आढेवेढे नको घेऊस! केशवचंद्र म्हणाले. माझी जमीन विकणार नाही. गावातली सगळी जमीन तुम्ही या ना त्या मार्गाने आपलीशी केलीत. आता माझ्या या सोन्यावाणी तुकड्यावरही तुमची गिधाडी दृष्टी आली. राग नका मानू दादा परंतु खरे ते मी सांगतो. वाडवडिलांपासून चालत आलेली ही जमीन. ही का मी विकू? जमीन म्हणजे आई. आईला का कोणी विकतो? राहू द्या एवढी जमीन. पोटापुरे ती देते. मुलेबाळे तेथे येतात, खपतात, खेळतात. सत्तेची जमीन सोडू नये, दादा! भीमा म्हणाला. ...Read More

2

सुंदर कथा - 2

एक होता राजा. त्याला एक मुलगा होता. एकुलता एक मुलगा म्हणून राजा-राणी त्याला जीव की प्राण करित. परंतु लाडामुळे बिघडला. राजा मनात म्हणाला, 'याला घालवून द्यावे. टक्केटोणपे खाऊन शहाणा होऊन घरी येईल.' राजाने राणीला हा विचार सांगितला. आज ना उद्या सुधारेल तो. नका घालवू त्याला दूर! ती रडत म्हणाली. तुम्हा बायकांना कळत नाही. आज त्याला हाकलून देणे तुला कठोरपणाचे वाटले तरी तेच हिताचे आहे. तो म्हणाला. राणी काय करणार, काय बोलणार? रात्रभर तिला झोप आली नाही. सकाळी राजा मुलाला म्हणाला, राज्यातून चालता हो. आपण आता शहाणे झालोत असे वाटेल तेव्हा घरी ये! तुमची आज्ञा प्रमाण, असे म्हणून पित्याच्या पाया पडून तो आईचा निरोप घ्यायला गेला. तो आईच्या पाया पडला. आईने त्याला पोटाशी धरले. ...Read More

3

सुंदर कथा - 3

फार दिवसांपूर्वीची गोष्ट. त्या काळात मोठमोठे यज्ञ होत असत. बाराबारा वर्षेही चालत. यज्ञप्रसंग म्हणजे उत्सवाचे. जणू जत्राच तेथे भरे. लोक यायचे-जायचे. परस्परांस भेटायचे. तेथे बसलेल्या दुकानांतून माल न्यायचे. तेथे होणाऱ्या कथाकीर्तनांतून, पुराणप्रवचनांतून धर्म शिकायचे. तेथे खेळ असत, कुस्त्या असत. नवीन नवीन नाटके व्हायची व चांगली ठरतील त्यांना बक्षिसे मिळावयाची. अशी त्या काळातील गंमत. एकदा देवांच्या मनात आले की, कधी झाला नाही एवढा मोठा यज्ञ करावयाचा. त्यांनी दानवांना विचारलं की, याल का यज्ञाला? दानव हो म्हणाले. मानवांनाही निरोप आला. मानवांनीही जायचे ठरविले. देव, दानव, मानव सारे एकत्र जमणार? कधी झाली नव्हती अशी गोष्ट होणार होती. ...Read More