श्यामची आई

(319)
  • 422.7k
  • 155
  • 156.6k

पुष्कळ वेळा मनुष्याचा मोठेपणा त्याच्या आईबापांवर अवलंबून असतो. त्याचे पुढचे बरे-वाईट जीवन त्याच्या आईबापांवर अवलंबून असते. त्याच्या बऱ्यावाईटाचा पाया लहानपणीच भरला जात असतो. पाळण्यात असतानाच, आईच्या खांद्यावर खेळत असतानाच, पुढील जीवनाच्या विकासाचे बी पेरले जात असते. मोठेपणा याचा अर्थ जगातील काही व्यक्तींच्या ओठांवर आपले नाव काही काळ नाचणे, असा मी करीत नाही. हिमालयाच्या दऱ्याखोऱ्यात असे प्रचंड व गगनचुंबी वृक्ष असतील, की ज्यांची नावे जगाला माहीत नाहीत रानावनांतील कानाकोप-यात असे एखादे रमणीय व सुगंधी फूल फुललेले असेल, की, ज्याचा पत्ता कोणाला लागलेला नाही. समुद्राच्या पोटात अशी गोलबंद व पाणीदार मोत्ये असतील, की ज्याची जगास वार्ता नाही.

Full Novel

1

श्यामची आई - प्रारंभ

पुष्कळ वेळा मनुष्याचा मोठेपणा त्याच्या आईबापांवर अवलंबून असतो. त्याचे पुढचे बरे-वाईट जीवन त्याच्या आईबापांवर अवलंबून असते. त्याच्या बऱ्यावाईटाचा पाया भरला जात असतो. पाळण्यात असतानाच, आईच्या खांद्यावर खेळत असतानाच, पुढील जीवनाच्या विकासाचे बी पेरले जात असते. मोठेपणा याचा अर्थ जगातील काही व्यक्तींच्या ओठांवर आपले नाव काही काळ नाचणे, असा मी करीत नाही. हिमालयाच्या दऱ्याखोऱ्यात असे प्रचंड व गगनचुंबी वृक्ष असतील, की ज्यांची नावे जगाला माहीत नाहीत रानावनांतील कानाकोप-यात असे एखादे रमणीय व सुगंधी फूल फुललेले असेल, की, ज्याचा पत्ता कोणाला लागलेला नाही. समुद्राच्या पोटात अशी गोलबंद व पाणीदार मोत्ये असतील, की ज्याची जगास वार्ता नाही. ...Read More

2

श्यामची आई - 1

श्यामची आई - रात्र पहिली साहित्यिक पांडुरंग सदाशिव साने आश्रमातील प्रार्थना झाली. सारे सोबती सभोवती मंडलाकार बसले होते. श्यामच्या सर्वांचे डोळे लागले होते. तो भ्रातृसंघ म्हणजे एक अपूर्व दृश्य होते. वाळवंटातील झरा अधिकच सुंदर व पवित्र वाटतो. अंधारात एक किरणही आशा देतो. सध्याच्या निष्प्रेम काळात मला काय त्याचे अशा काळात, असे प्रेमळ संघ म्हणजे परम आशा होय. त्या भ्रातृसंघातील प्रेमासारखे प्रेम अन्यत्र क्वचितच पाहावयास सापडले असते. तो आश्रम म्हणजे त्या गावातील जीवनाला- साचीव जीवनाला- स्वच्छ ठेवणारा जिवंत व पवित्र झरा होय. गावात सर्वत्र शांतता होती. आकाशात शांतता होती. काही बैलांच्या गळयांतील घंटांचा गोड आवाज दुरून ऐकू येत होता. वारा मात्र स्वस्थ नव्हता. तो त्रिभुवनमंदिराला सारखा प्रदक्षिणा घालीत होता. आपली अखंड प्रार्थना गुणगुणत होता. श्यामने सुरूवात केली: ...Read More

3

श्यामची आई - 2

श्यामची आई - रात्र दुसरी साहित्यिक पांडुरंग सदाशिव साने अक्काचे लग्न आश्रमातील सायंकाळची जेवणे झाली. सायंकाळच्या जेवणानंतर प्रार्थनेच्या वेळेपर्यंत फिरावयाला आश्रमातील मंडळी जात. आश्रम होता त्या गावी नदी होती. नदीचे नाव बहुळा! नदीतीरावर एक लहानसे महादेवाचे देऊळ होते. देवळाजवळ पिंपळाचे मोठे पुरातन झाड होते. त्याला पार बांधलेला होता. त्या पाराजवळ गावातील मंडळीही कधी कधी येऊन बसत असत. गोविंदा व श्याम बाहेर फिरावयास गेले होते. ते टेकडीवर जाऊन बसले होते. लहानगा गोविंदा पावा गोड वाजवीत असे. त्याने आपली बांबूची बासरी बरोबर घेतली होती व तो वाजवीत होता. कविहृदयाचा श्याम ऐकत होता. एकाएकी गोविंदा थांबला व त्याने श्यामकडे पाहिले. श्यामचे डोळे मिटलेले होते. तोंडावर गोड व मधुर असे तेज होते. चलता ना आश्रमात, प्रार्थनेची वेळ होईल. श्यामने डोळे उघडले. श्याम म्हणाला गोविंदा! बासरी म्हणजे एक दिव्य वस्तू आहे. कृष्णाच्या मुरलीने पशुपक्षी, दगड-धोंडे विरघळून जात. ते बायकांच्या गाण्यात आहे ना वर्णन: ...Read More

4

श्यामची आई - 3

श्यामची आई - रात्र तिसरी साहित्यिक पांडुरंग सदाशिव साने मुकी फुले बारकू, भाकर खाल्ली की नाही रे ना आश्रमात शिवाने विचारले. आई, वाढ ना लौकर. तिकडे सुरूसुध्दा होईल गोष्ट. बारकू आपल्या आईला घाई करू लागला. कसल्या रे रोज उठून गोष्टी ऐकता रोज तुझी घाई. जा उपाशीच. नाहीतर आल्यावर भाकर खा. बारकूची आई म्हणाली. बारकू खरंच निघाला. त्याला त्या भाकरीपेक्षा गोष्टीच आवडत. त्याच्या पोटाला भाकर पाहिजे होती परंतु त्याच्या हृदयाला श्यामच्या गोष्टीच पाहिजे होत्या. बारकू व शिवा जलदीने निघाले. वाटेत ठेच लागली तरी त्याचे शिवाला भान नव्हते. ...Read More

5

श्यामची आई - 4

श्यामची आई रात्र चवथी साहित्यिक पांडुरंग सदाशिव साने त्या दिवशी शनिवार होता, एकादशी होती. श्यामने गोष्ट सांगावयास केली. जरा थांब. बारकू यावयाचा आहे. काल तो भाकर न खाताच आला होता. शिवा म्हणाला. तो पहा आलाच. ये बारकू ये माझ्याजवळ बैस. असे म्हणून गोविंदाने बारकूस आपल्याजवळ बसविले. श्याम सांगू लागला: ते पावसाळयाचे दिवस होते. कोकणातील पाऊस तो. मुसळधार पाऊस ओतत होता. जिकडे तिकडे पाण्याचे लोट खळखळाटत वहात होते. पावसातून डोक्यावर इरली घेऊन कुडकुडत आम्ही शाळेत गेलो. त्या वेळेस कोकणात छत्र्या फार बोकाळल्या नव्हत्या. इरली फारच सुंदर व साधी असतात. आमचा धाकटा भाऊ जरा आजारी होता म्हणून तो आमच्या बरोबर शाळेत आला नाही. दादा व मी शाळेत गेलो. ...Read More

6

श्यामची आई - 5

श्यामची आई रात्र पाचवी साहित्यिक पांडुरंग सदाशिव साने मथुरी श्यामची प्रकृती जरा बरी नव्हती. राम म्हणाला, आज गोष्ट नाही तरी चालेल. तू पडून रहा. अरे आईची आठवण म्हणजे सकल दु:खहारी मलम आहे. भक्ताला देवाचे स्मरण होताच त्याचे दु:ख हरपते, तसेच आईचे स्मरण होताच माझे. आज आईची एक सुंदर आठवण आली आहे. बसा सारे. असे म्हणून श्यामने सुरूवात केली. मित्रांनो! मनुष्य गरीब असला, बाहेर दरिद्रा असला, तरी मनाने त्याने श्रीमंत असावे. जगातील पुष्कळशी दु:खे हृदयातील दारिद्रयामुळे उत्पन्न झाली आहेत. हिंदुस्थानची बाहेरची श्रीमंती सारे जग नेवो परंतु भारतीय हृदयातील थोर व अतूट संपत्ती कोणी न नेवो म्हणजे झाले. ...Read More

7

श्यामची आई - 6

श्यामची आई रात्र सहावी साहित्यिक पांडुरंग सदाशिव साने लहानपणापासून दोन्ही वेळा स्नान करण्याची मला सवय लागली आहे. श्यामने केली. संध्याकाळी मी खेळावयास जात असे. छाप्पोपाणी, लंगडी, धावणे, लपंडाव, लक्षुंबाई ताक दे, डेरा फुटला मडके दे, असे नाना प्रकारचे खेळ आम्ही खेळत असू. खेळ खेळून आलो म्हणजे मी आंघोळ करीत असे. आई मला पाणी तापवून ठेवीत असे. आई घंगाळात पाणी आणून देई व माझे अंग चोळून वगैरे देई. दोन्ही वेळा स्नान करण्याची पध्दत फार चांगली. रात्री निजण्याचे आधी आंघोळ झालेली असली तर शरीर स्वच्छ, निर्मळ व हलके वाटते. निजावयाच्या आधी आपण प्रार्थना म्हणतो, हे मनाचे स्नान, शरीर व मन स्वच्छ असली म्हणजे झोप कशी गाढ येते. ...Read More

8

श्यामची आई - 7

श्यामची आई रात्र सातवी साहित्यिक पांडुरंग सदाशिव साने पत्रावळ: कोकणात पुष्कळशा घरी पत्रावळीवर जेवण्याची पध्दत आहे. साधेपणात किती तरी व स्वच्छता असते . ताटांना ती कल्हई लावा व ती पोटात दवडा घाण सारी. माझ्या वडिलांना पत्रावळीवर जेवणे फार आवडे. बायकांनासुध्दा त्रास कमी. ताटे घासावयास नकोत. वडील सकाळी शेतावर जावयाचे. इकडे तिकडे फिरून, कामधाम करून ते दहाच्या सुमारास परत घरी येत असत. येताना फुले, पत्रावळीसाठी पाने, कोणा कुणब्याने दिली असली किंवा शेताच्या बांधावर केलेली असली तर भाजी असे घेऊन घरी यावयाचे. वडील मग स्त्रात करून संध्या, पूजा वगैरे करावयास बसत. आम्ही शाळेतून आलेली मुले पत्रावळी लावावयास बसत असू. ताज्या पानांची हिरवीगार पत्रावळ व त्याच पानांचा द्रोण. ...Read More

9

श्यामची आई - 8

श्यामची आई - 8 (क्षमेविषयी प्रार्थना) बाहेर पिठूर चांदणे पडले होते. मंदिराच्या गच्चीवर सारी मंडळी बसली होती. दूरचा नदीप्रवाह चांदीच्या दिसत होता. नदीला विश्रांती माहीतच नाही. सारखे वाहणे तिला माहीत. तिची प्रार्थना, कर्ममय प्रार्थना, सारखी चोवीस तास सुरू असते. कर्म करीत असताना ती कधी गाणी गुणगुणते, कधी हसते, खेळते, कधी गंभीर होते, कधी रागाने लाल होते. नदी म्हणजे एक सुंदर व गंभीर गूढ आहे. श्याम त्या नदीकडे पाहातच उभा होता. सृष्टिसौंदर्य श्यामला वेडे करीत असे. कधी रम्य सूर्यास्त पाहून जणू त्याची समाधी लागे व पुढील चरण त्याच्या तोंडातून बाहेर पडत:- राहूनी गुप्त मागे करितोसि जादुगारी । रचितोसि रंगलीला प्रभु तू महान् चितारी । किती पाहू पाहू तृप्ती न रे बघून । शत भावनांनि हृदय येई उचंबळून ॥ ...Read More

10

श्यामची आई - 9

बारकू आला की नाही आज त्याला मी दुपारी रागे भरलो होतो. एका गाईला तो मारीत होता. गाय दुस-याची तरी ती देवता आहे. जा रे बारकूला त्याच्या घरून आणा. श्याम म्हणाला. तो बाहेर बसला आहे ऐकत, आत यावयास लाजतो आहे. शिवा म्हणाला. ...Read More

11

श्यामची आई - 10

मला पण ने रे भाऊ गोष्ट ऐकायला. रोज रोज तू जातोस. आई, सांग गं भाऊला मला घेऊन जायला. भाऊच्या पाठीस लागली होती. तेथे पेंगायला लागशील. तू कशाला येतेस तेथे भाऊ म्हणाला. ने रे तिलासुध्दा, तीही ऐकेल. चांगले असेल ते सा-यांनी ऐकावे. मी सुध्दा आले असते पण हे घरातले आवरता रात्र होते बाहेर. भाऊची आई म्हणाली. ...Read More

12

श्यामची आई - 11

राम ! तो दिवा बाजूला कर. माझ्या डोळयांवर उजेड नको. श्याम म्हणाला. आज बाहेर जरा पाऊस पडत होता. गार वाहत होता. म्हणून मंडळी आतच बसली होती. रोज आकाशाच्या खालीच प्रार्थना व हे कथाप्रवचन होई! श्यामला दिव्याचा त्रास होत असे. राम दिवा बाजूस करू लागला परंतु भिका कसचा ऐकतो! इथे दिवा असला, म्हणजे तुमच्या तोंडावरचे हावभाव आम्हांला दिसतात. कानांनी ऐकतो व डोळयांनी बघतो. तुमच्या शब्दांचा परिणाम होतो. त्याचप्रमाणे तुमच्या तोंडावरच्या आविर्भावाचाही होतो. केवळ ऐकण्याने काम होत असते, तर नाटक अंधारातही करता आले असते. भिका म्हणाला. ...Read More

13

श्यामची आई - 12

कोकणामध्ये पावसाळयात विहिरी तुडुंब भरलेल्या असतात. हातानेसुध्दा पाणी घेता येते, इतक्या भरतात. पावसाळयामध्ये पोहण्याची कोकणात मौज असते. नवीन मुलांना वेळेसच पोहावयास शिकवितात. नवशिक्याच्या कमरेला सुखड किंवा पिढले बांधतात व देतात त्याला विहिरीत ढकलून. विहिरीत पोहणारे असतातच. सहा सहा पुरूष खोल पाणी असले, तरी तळाशी जाऊन खर घेऊन येणारे अट्टी पोहणारे असतात. पाण्यात नाना प्रकारच्या कोलांटया उडया मारणारेही असतात. कोणी विहिरीत फुगडया खेळतात, कोणी परस्परांच्या पायांना पाय लावून उताणे होऊन, माना वर करून होडया करितात. नाना प्रकार करितात. माझे चुलते पट्टीचे पोहणारे होते. वडिलांना पोहता येत असे. परंतु मला मात्र पोहता येत नव्हते. ...Read More

14

श्यामची आई - 13

जो गृहस्थ असतो त्याने दक्षिणा घ्यावयाची नसते, दक्षिणा भिक्षुक ब्राह्मणाला घेण्याचा अधिकार. कारण त्याला इतर उत्पन्न नसते व वेदविद्येशिवाय धंदा नसतो. म्हणून ब्राह्मणाला दक्षिणा द्यावी, असे सांगितले आहे. इतर देशांतही उपाध्याय आहेत इतर धर्मांतही ते आहेत. काही ठिकाणी त्यांना सरकारातूनच पगार मिळतो आपल्याकडे समाजच ब्राह्मणाला देई. श्यामने आरंभ केला. ...Read More

15

श्यामची आई - 14

आमच्या आईला श्रीखंडाच्या वड्या फार चांगल्या करता येत असत. आईचा पाक कधी बिघडत नसे. वड्या खुसखुशीत सुंदर व्हावयाच्या. त्या करून देण्यासाठी आईला पुष्कळदा शेजारीपाजारी बोलावीत असत व आईही आनंदाने जात असे. दुसऱ्याच्या उपयोगी पडणे हा तर तिचा मोठा आनंद. ...Read More

16

श्यामची आई - 15

लहानपणी मी देवाची भक्ती फार करीत असे. निरनिराळ्या पोथ्या वाचून भक्तीचे बीज हृदयात पेरले गेले होते व ते हळूहळू होते. शाळेतील मुले माझ्या घरी जमत व मी त्यांना देवादिकांच्या, साधुसंतांच्या गोष्टी सांगायचा. मी घरी एक लहानसे खेळातले देऊळ केले होते. लहानसे मखर केले होते. त्याला बेगड वगैरे लावून ते सजविले होते. सुंदर शाळिग्राम या देवळात मी ठेविला होता. तो शाळिग्राम फार तेजस्वी दिसत असे. चंद्रहासप्रमाणे तो शाळिग्राम आपणही आपल्या तोंडात नेहमी ठेवावा, असे मला वाटे. ...Read More

17

श्यामची आई - 16

सिंहस्थात नाशिकला व कन्यागतात वाईला मोठी पर्वणी येते. त्या वेळेस उत्तरेकडची गंगा, दक्षिणेकडची गोदावरी व कृष्णा यांना भेटावयास येते, गोड कल्पना आहे. आपल्या भारतवर्षात निसर्गाला सुध्दा कोमल भावना दिल्या आहेत. निसर्गाला मानवी कुटुंबातला बनविला आहे. दूरदूरच्या नद्याही आपले एकत्व ओळखून एकमेकांना भेटावयास येतात, मग माणसांनी भेद नये का विसरू हा महाराष्ट्रीय व हा गुजराती, हा बंगाली व हा मद्रासी, हा पंजाबी व हा परदेशी, असे प्रांतिक भेद आपण व्यवहारात किती आणतो! परंतु आपल्या थोर पूर्वजांनी सर्व भारताचे ऐक्य नाना रीतींनी आपल्या मनावर ठसविण्याचे प्रयत्न केले आहेत. ...Read More

18

श्यामची आई - 17

मी लहानपणी पोथ्यापुराणे पुष्कळ वाचली परंतु संस्कृत स्तोत्रे वगैरे मला फारशी येत नव्हती. प्रणम्य शिरसा देवं,... अनन्तं वासुकिं अच्युतं केशवं विष्णु..., अशी दोन-चार लहान लहान स्तोत्रेच येत होती. अनन्तं वासुकिं हे नागाचे स्तोत्र आहे. ते एका नागपंचमीच्या दिवशी आजोबांनी मला शिकविले होते. परंतु रामरक्षा हे अप्रतिम स्तोत्र मला काही येत नव्हते. विष्णुसहस्त्रनाम मी रोज वडिलांच्या पुस्तकावरून म्हणत असे. ...Read More

19

श्यामची आई - 18

राजा व राम नदीवर गेले होते. एका शिलाखंडावर दोघे बसले होते. राजा म्हणाला, राम! मला येथून जावेसेच वाटत येथील ही नदी, ही वनराजी, हे मोर सारे पाहून किती आनंद होतो. परंतु सर्वांत मोठा आनंद म्हणजे तुमच्या संगतीचा. श्यामच्या गोष्टीही ऐकावयास मिळतील. मला त्या फार आवडतात. राम म्हणाला, त्यांना गोष्टी म्हणावे, का प्रवचने म्हणावी व्याख्याने म्हणावी का आठवणी म्हणाव्या, काही समजत नाही. ऐकताना आनंद होतो, स्फूर्ती येते. राजा म्हणाला, श्याम बोलतो, त्यात त्याचे निर्मळ हृदय ओतलेले असते. म्हणून सांगण्याला एक विशेषच माधुरी असते. म्हणून कृत्रिमतेचा लवलेशही नसतो. अरे, पण कृत्रिमता असल्याशिवाय लोकांना आवडत नाही. आजकालचे लोक कृत्रिमतेचे भोक्ते आहेत. सगळाच रुपया शुद्ध चांदीचा असेल, तर बाजारात चालत नाही. त्यात थोडी अशुद्ध धातू मिसळावी लागते, तेव्हाच तो खण् वाजतो व व्यवहारात चालतो. राम म्हणाला. माझ्या मनात एक विचार आहे. ...Read More

20

श्यामची आई - 19

माझे वय त्या वेळेस अकरा वर्षांचे होते. मला प्रथम पुण्यास मामांकडे इंग्रजी शिकण्यासाठी ठेवण्यात आले होते. माझा मोठा भाऊ शिकावयास होता. परंतु मी मामांकडे नीट वागलो नाही, त्यांच्याकडून मी दोन-तीन वेळा पळून गेलो. नाना खोट्या चहाड्या मी तेथे केल्या. शेवटी असला विधुळा भाचा आपल्याकडे नसलेला बरा. उगीच स्वतःच्या व दुसऱ्याच्याही गळ्याला एखादे वेळेस फास लावावयाचा, असे मामांना वाटले व त्यांनी मला घरी पाठवून दिले. ...Read More

21

श्यामची आई - 20

काय, सुरुवात करू ना, रे, गोविंदा श्यामने विचारले. थोडा वेळ थांबावे. ते म्हातारबाबा अजून आले नाहीत. तोंडचा एकही शब्द गमावला, तर त्यांना वाईट वाटते. गोविंदा म्हाणाला. इतके काय असे आहे माझ्याजवळ साध्या गोष्टी मी सांगतो. वेडे आहेत लोक झाले. श्याम म्हणाला. “तुम्ही सांगता, ते तुम्हांला चांगले वाटते म्हणून सांगता ना का तुम्हांलाही ते टाकाऊ वाटते स्वतःला टाकाऊ वाटत असूनही जर सांगत असला तर तुम्ही ते पाप केले, असे होईल. ती फसवणूक होईल. आपणांस जे त्याज्य व अयोग्य वाटते, ते आपणांस लोकांना कसे बरे देता येईल भिकाने विचारले. “शिवाय लोकांची श्रद्धा असते, तर ती का दुखवा त्यांना तुमचे ऐकण्यात आनंद वाटत असेल, म्हणून ते येतात, येण्यास उत्सुक असतात. गोविंदा म्हणाला. “हे पाहा, आलेच म्हातारबाबा. या, इकडे बसा. राम म्हणाला. “इकडेच बरे आहे. असा येथे बसतो. ते म्हातारबाबा म्हणाले. “श्याम, कर सुरुवात आता. राजा म्हणाला. ...Read More

22

श्यामची आई - 21

आमच्या घरी आमची एक दूरची आजी राहत असे तिचे नाव द्वारकाकाकू. आमचे वडील वेगळे झाले, तेव्हा ती वडिलांकडे आली. तिचे शेतभात होते. त्याची व्यवस्था वडील बघत. वडिलांवर तिचा लोभ होता. म्हणून ती वडिलांकडे राहत असे. या आजीचे नाव आम्ही दूर्वांची आजी असे पाडले होते. चातुर्मास्यात बायका देवाला दूर्वांची लाखोली वाहतात, कोणी पारिजातकाची लाख फुले वाहतात, कोण बटमोगऱ्याची लाखोली वाहतात, असे चालते. जिला दूर्वांची लाखोली वाहण्याची इच्छा असते, ती इतर बायकांना दूर्वा तोडावयास बोलावते व त्यांच्या मदतीने लाखोली पुरी करते. आमची आजी या कामासाठी नेहमी तयार असे. तुका म्हणे व्हावे सत्यधर्मा साह्य चांगल्या कामाला नेहमी मदत करावी. चांगल्या कामात कोणाला निरुत्साह करणे म्हणजे मोठे पाप आहे. ...Read More

23

श्यामची आई - 22

दिवाळीचे दिवस जवळ जवळ येत होते. शाळांना सुट्टी झाली होती. मी दापोलीस जवळच शिकत होतो. त्यामुळे सुट्टी होताच घरी मला व माझ्या धाकट्या भावांना एकेक नवीन सदरा वडिलांनी केला. परंतु त्यांच्या नेसूची धोतरे मात्र फार फाटली होती. आईने ती सतरांदा शिवली होती. सतरा ठिकाणी शिवली होती. ती आता इतकी विरली होती, की शिवणे कठीण झाले होते. आम्हां मुलांना त्यांनी नवीन कपडे केले परंतु स्वतःला नवीन धोतरे घेतली नाहीत. ...Read More

24

श्यामची आई - 23

मे महिन्याच्या सुटीत मी घरी गेलो होतो. इंग्रजी चवथीत मी गेलो होतो. मी घरी गेलो, म्हणजे आईला आधार वाटे. ती नेहमी आजारी असे. एक दिवस ताप येई दुसऱ्या दिवशी ताप निघाला की ती पुन्हा कामाला लागावयाची. ताप आला की निजावयाचे, ताप निघताच उठावयाचे. ती फार अशक्त झाली होती. मी आलो, म्हणजे तिला बरे वाटे. मी तिला पाणी भरण्यास, धुणे धुण्यास मदत करीत असे. अंगणाची झाडलोट करीत असे. आईचे पाय चेपायचे, हा तर सुटीतील माझा नेमच झालेला असे. ...Read More

25

श्यामची आई - 24

ज्या सोमवारी अवस येते, तिला सोमवती अवस म्हणतात. त्या दिवशी सोमवतीचे व्रत घेतलेल्या ब्राम्हणांच्या सुवासिनी बायका पिंपळाची पूजा करतात. अवसेला कोणत्या तरी १०८ वस्तू देवाला वाहावयाच्या असतात. मग पुढे १०८ विडे, १०८ आंबे, १०८ रुपये, १०८ दिडक्या, १०८ केळी, १०८ खण, १०८ पेढे, १०८ नारळ, १०८ लुगडी ज्याला जशी ऐपत असेल, त्याप्रमाणे देवाला द्यावयाचे. दान करावयाचे, अशी घटना आहे. ज्याचा जो उपाध्याय असेल, त्याला हे सारे मिळते. परंतु तो उपाध्यायही सर्व स्वतःच्या घरीच ठेवीत नाही. पारावर इतर उपाध्येमंडळींत तो ते वाटतो. ही पद्धत फारच सुंदर आहे. त्यागावर ती उभारलेली आहे व तीमुळे उपाध्येमंडळींत परस्परांचा द्वेष-मत्सरही करण्याला अवकाश राहात नाही. ...Read More

26

श्यामची आई - 25

संध्याकाळचे चार-पाच वाजण्याची वेळ होती. सुट्टी होती, म्हणून मी घरी गेलेलो होतो. आई देवळात दर्शनाला गेली होती. मी घरीच देवदर्शन करून आई आली तेव्हा मी तिला विचारले. आई! मी जाऊ का बाहेर कमळ्या देवधराकडे, नाही तर बन्या वरवडेकराकडे जाईन. गोंधळेकरांचा बापू येथे आला, तर त्याला बहुधा मी बन्याकडे आहे, असे सांग. जाऊ का आई म्हणाली, श्याम! तू जा. परंतु तुला एक काम सांगत्ये, ते आधी कर. बाळदादांच्या कवाडीपुढे एक म्हारीण बसली आहे. म्हातारी आहे अगदी. तिच्या डोक्यावरचा गोयला खाली पडला आहे. तिच्या डोक्यावर द्यायला हवा आहे. ती म्हारीण आजारी व अशक्त दिसत आहे. तिच्या डोक्यावर मोळी दे व घरी ये मी तुला आंघोळ घालीन, जा. आई! लोकांनी बघितले, तर मला हसतील. ...Read More

27

श्यामची आई - 26

मे महिन्याची सुट्टी होती. आम्ही सारी भावंडे त्या वेळी घरी जमलो होतो. पुण्यास मामांकडे शिकावयास राहिलेला माझा मोठा भाऊ आला होता. तो पुण्यास देवीच्या साथीत आजारी पडला होता. त्याला अतोनात देवी आल्या होत्या. अंगावर तीळ ठेवण्यासही जागा नव्हती. मोठ्या मुश्किलीनेच तो वाचला होता. मी दापोलीस जवळच शिकावयास राहिलेला होतो. मला घरी जाता येत असे. शनिवार-रविवारीसुद्धा मनात आले, तर मी घरी जाऊन यावयाचा. परंतु माझा मोठा भाऊ दोन वर्षांनी घरी येत असे. त्या वेळेस तो दोन वर्षांनी घरी आला होता. दुखण्यातून उठून अशक्त होऊन घरी आला होता. देवीच्या रोगातून उठलेल्या माणसाच्या अंगात उष्णता फार वाढते. देवीची फार आग असते. काही तरी थंड पदार्थ पोटात जावयाची आवश्यकता असते. गुलकंद देणे सर्वांत चांगले. परंतु आमच्या घरी कुठला गुलकंद पैसे कोठून आणावयाचे परंतु माझ्या आईने गरिबीचाच उपाय शोधून काढला. कांदा फार थंड असतो. कांदा फार स्वस्त आहे. ...Read More

28

श्यामची आई - 27

आमच्या घरात त्या वेळी गाय व्याली होती. गाईच्या दुधाचा खर्वस घरी केला होता. आईला माझी आठवण येत होती. मला फार आवडत असे. मी लहान होतो, तेव्हा गवळवाडीची राधा गवळण माझ्यासाठी तिच्या घरी खर्वस असला तर घेऊन येत असे. ती राधा गवळण पुढे लवकरच मेली. ...Read More

29

श्यामची आई - 28

त्या वर्षी पाऊस आधी चांगला पडला परंतु मागून पडेना. लावणी झाली होती परंतु पुढे शेतातील चिखल वाळून खाचरातील पाणी नाहीसे झाले. माळावरील गवत सुकून जाऊ लागले. लोकांना काळजी वाटू लागली. शेतकरी आकाशाकडे आशेने बघत होता. कोठे काळा डाग दिसतो का, पाहत होता. पाऊस हा आधार आहे. पावसामुळे जग चालले आहे. पाऊस नाही तर काही नाही. जीवनाला पाणी पाहिजे. पाण्याला शब्दच मुळी जीवन हा आम्ही योजला आहे. मला संस्कृत भाषेचा कधी कधी फार मोठेपणा वाटतो. पृथ्वीला, पाण्याला वगैरे जे शब्द आहेत, त्यांत केवढे काव्य आहे. पृथ्वीला क्षमा हा शब्द ज्याने योजला, तो केवढा थोर कवी असेल! तसेच पाण्याला जीवन हा शब्द ज्याने लावला, त्याचेही हृदय किती मोठे असेल! पाण्याला किती गोड गोड नावे आम्ही दिली आहेत! पाण्याला अमृत, पय, जीवन, अशी सुंदर नावे ज्यांनी दिली त्या पूर्वजांचे मला कौतुक वाटते. ...Read More

30

श्यामची आई - 29

आमच्या गावापासून काही थोड्या अंतरावर लाटवण म्हणून एक गाव आहे. तो फडक्यांचा गाव. तेथे फडके इनामदार अजून राहतात. हरिपंत प्रसिद्ध सरदार त्यांच्यांतीलच ते आहेत. आमच्या वडिलांचा व त्यांचा घरोबा असे. लाटवणचे बळवंतराव फडके वडिलांकडे नेहमी येत असत. आम्हां मुलांजवळ ते प्रेमाने गप्पा मारीत. त्यांना अहंकार नव्हता. फार साधे व भोळे होते. त्यांच्या बोटातील अंगठी काढून घेऊन मी लपवून ठेवीत असे. तेव्हा मला म्हणायचे, श्याम! तुला पाहिजे की काय अंगठी त्यांनी असे विचारले, म्हणजे ती माझ्या बोटात मी घालीत असे परंतु एकाही बोटात ती बसत नसे! ती खाली पडे. अरे, जाडा हो जरा, मग बसेल हो ती. असे मग ते हसून म्हणावयाचे. ...Read More

31

श्यामची आई - 30

मे महिन्याची सुट्टी संपून मी परत दापोलीस शिकावयास गेलो. शाळा सुरू झाली. पावसाळाही सुरू झाला. तप्त जमिनीला मेघ शांतवू तापलेल्या जमिनीवर पाणी पडे व कसा सुंदर वास सुटे! नवीनच पाऊस जेव्हा सुरू होतो, तेव्हा मातीचा एक रम्य सुंदर वास सुटत असतो. गंधवती पृथ्वी या वचनाची त्या वेळेस आठवण येते. फुलाफळात जो रस व जो गंध असतो, एक प्रकारचा स्वाद असतो तो पृथ्वीच्याच पोटातला. घरून दापोलीस येताना या वेळेस मी एक निश्चय करून आलो होतो. सुट्टीत घरी असताना एके दिवशी लहान भाऊ नवीन सदऱ्यासाठी हट्ट धरून बसला होता. त्या वेळेस त्याची समजूत घालताना आई म्हणाली, तुझे अण्णा-दादा मोठे होतील, रोजगारी होतील, मग तुला सहा महिन्यांनी नवीन सदरा शिवतील. आता नको धरू हट्ट. मित्रांनो! माझ्या लहानपणी कपड्याचे बंड फार माजले नव्हते. आम्हांला कोट माहीतच नव्हता. कित्येक दिवस सदराही वर्षा दोन वर्षांनी नवीन मिळावयाचा. थंडीच्या दिवसांत धोतर चौघडी करून गळ्याशी बांधून शाळेत जावयाचे. ...Read More

32

श्यामची आई - 31

राजाला आज परत जावयाचे होते. त्याला वाईट वाटत होते. श्यामच्या आईच्या सगळ्या आठवणी ऐकावयाला आपण नाही, म्हणून त्याला वाईट होते. परंतु कर्तव्य कठोर आहे. कर्तव्यासाठी सारे मोह दूर टाकावे लागतात. चांगल्या गोष्टींचे मोह दूर ठेवावे लागतात. मोह वाईट गोष्टींचेच असतात, असे नाही तर चांगल्या गोष्टींचेही असतात. ...Read More

33

श्यामची आई - 32

त्या दिवशी सावकाराचा माणूस कर्जवसुलीसाठी आमच्याकडे आला होता. तो दूत आमच्या घरी आला म्हणजे आईला मेल्याहून मेल्यासारखे होत असे. सुख नाही. कर्ज म्हणजे जिवंतपणीचा नरक होय. मेले तरी कर्ज काढू नये. उपवास काढावे परंतु ऋण नको. ऋणाने एकदाच सुख होते, ते म्हणजे ऋण घेताना. त्यानंतर ते नेहमी रडविते भिकेस लावते. कर्जाने स्वाभिमान जातो, मान हरपतो. कर्जाने मान नेहमी खाली होते. कर्ज म्हणजे मिंधेपणा. दीनपणा. ...Read More

34

श्यामची आई - 33

श्याम अलीकडे खिन्न दिसत असे. आईच्या आठवणीचा तर तो परिणाम नसेल आईचे दुःखी व कष्टी जीवन मनासमोर येऊन तो कष्टी नसेल झाला! श्याम! तुझ्या तोंडावर हल्ली हास्य खेळत नाही. तू उदासीन का दिसतोस तुला काय होते आहे मनात कोणते विचार तुला त्रास देत आहेत रामने विचारले. राम! आपल्या देशात अपरंपार दुःख, दैन्य, दारिद्र्य आहे. मी माझ्या आईच्या आठवणी सांगत आहे. त्या माझ्या भारतमातेच्याच जणू आहेत. ही भारतमाता दैन्यात, दास्यात, कर्जात बुडाली आहे. तिच्या मुलांना खायला नाही, प्यायला नाही, धंदा नाही, शिक्षण नाही. माझे आतडे तुटते, रे! हे दुःख माझ्याने पाहवत नाही. माझी छाती दुभंगून जाते. पारतंत्र्याने भारताची केवढी हानी झाली आहे! जिकडे तिकडे कर्ज, दुष्काळ व रोग! लहान लहान मुले जन्मली नाहीत तो मरत आहेत! कोणाच्याही तोंडावर जराही रया नाही. तेज, उत्साह कोठे दिसत नाही. ...Read More

35

श्यामची आई - 34

श्यामने सुरुवात केली: आमचे कर्ज दिवसेंदिवस वढतच चालले होते. कारण वेळच्या वेळी व्याजही देता येत नसे. आमची काही होती. वडिलांनी पहिल्यानेच यांतील एकदोन मोठी शेते विकली असती, तर बहुतेक सारे कर्ज वारता आले असते आणि शिवाय पोटापुरते शेतभात राहिले असते परंतु वडिलांच्या मनाला ते प्रशस्त वाटत नव्हते. जमीन विकणे म्हणजे त्यांना पाप वाटे, अपमान वाटे. त्या रात्री आईचे वडील-आमचे आजोबा-आमच्या घरी आले होते. त्यांना आम्ही नाना म्हणत असू. माझ्या वडिलांना चार गोष्टी सांगण्यासाठी ते आले होते वडिलांची समजूत घालता आली तर पाहावी या विचाराने ते आले होते. आजोबा मोठे हुशार, साक्षेपी गृहस्थ होते. व्यवहारचतुर, हिशेबी व धोरणी ते होते परंतु त्यांना स्वतःच्या बुद्धीचा मोठा अहंकार होता. त्यांच्या म्हणण्याविरुद्ध कोणी बोलले, तर त्यांना ते खपत नसे. स्वभावही थोडा रागीट होता. ...Read More

36

श्यामची आई - 35

मी औंध संस्थानात शिकावयास गेलो होतो परंतु तेथून माझी उचलबांगडी देवाला करावयाची होती. मी तेथे कसे तरी दिवस होतो. ते मी सांगत बसत नाही. साऱ्याच गरिबांना तसे दिवस काढावे लागतात. मला माझ्या आईच्या आठवणी सांगावयाच्या आहेत. त्या आठवणींपुरता माझा जो संबंध येईल, तो मात्र मला सांगणे भाग आहे. पुण्यास माझ्या मावशीजवळ माझा सर्वांत धाकटा भाऊ सदानंद होता. पूर्वीचा यशवंत आता पुन्हा आईच्या पोटी आला, असे आम्हां सर्वांस वाटत असे. परंतु प्लेगमध्ये पुण्यास एकाएकी सदानंद आम्हांला सोडून गेला! दत्तगुरू, दत्तगुरू म्हणत गेला. ते पाहा मला बोलावीत आहेत, मी जातो! असे म्हणत तो गेला. मी औंधला होतो, तेथेही प्लेग सुरू झाला. एक सोन्यासारखा मुलगा गेला व दुसरा दूर तिकडे एकटा तेथेही प्लेग आहे, हे ऐकून माझ्या आईचा जीव खालीवर होत होता. सदानंदाचे दुःख ताजे होते. किती दिवस झाले, तरी तिच्या डोळ्यांचे पाणी खळेना. परंतु ते दुःख कमी होत आहे, तो तिला माझी चिंता जाळू लागली. चिंतामय तिचे जीवन झाले होते. प्लेगमुळे औंधची शाळा बंद झाली. ...Read More

37

श्यामची आई - 36

आजचे पेळू चांगले नाहीत, सूत सारखे तुटत आहे. नीट पिंजलेले दिसत नाहीत. गोविंदा! तू पिंजलास ना कापूस विचारले. आजचे पेळू श्यामचे आहेत. त्यांनी आज पिंजले. गोविंदा म्हणाला. इतक्यात राम तेथे आला, त्याने ते बोलणे ऐकले. अलिकडे श्यामचे मन दुःखी आहे. ते त्याचे दुःखी मन त्याला काम चांगले करू देत नाही. हातून काम चांगले व्हावयास मनही प्रसन्न पाहिजे. राम म्हणाला. सर्व सिद्धीचे कारण मन करा रे प्रसन्न ...Read More

38

श्यामची आई - 37

शेवटी आमच्यावर मारवाड्याने फिर्याद करण्याचे ठरविले. कोर्टात फिर्याद दाखल झाली. व्याज व मुद्दल मिळून चार हजारांची त्याने फिर्याद दिली. सुरू झाला. कोर्टात सावकाराचे देणे योग्य ठरले व सारी होती नव्हती ती मिळकत जप्त करून तिचा लिलाव व्हावा, असा निकाल देण्यात आला. त्या दिवशी गावात दवंडी पिटली जाणार होती! आईला दोन दिवस एक घासही गेला नाही. डोळ्याला डोळा लागला नाही. आई जगदंबे! शेवटी या डोळ्यांदेखत अब्रूचे धिंडवडे होणार ना या कानांनी ती दुष्ट दवंडी ऐकावयाची! माझे प्राण ने ना ग आई! नको हा जीव! अशी ती प्रार्थना करीत होती. पुरुषोत्तम शाळेत गेला होता. घरी आईला खूप ताप भरून आला व ती अंथरुणावर पडली. ती तळमळत होती व रडत होती. सकाळी नऊ वाजायची वेळ होती. ...Read More

39

श्यामची आई - 38

श्याम आजारी पडला. अंगात तापही होता. डोळे मिटून तो पडला होता. श्याम! पाय चेपू का गोविंदाने नको, माझे पाय चेपून काय होणार! माझी सेवा नको करायला. तुम्ही आपापली कामे करा. त्या मोहन पाटलाचा ताका लौकर विणून द्या. जा, माझ्याजवळ बसून काय होणार! राम राम म्हणत मी शांत पडून राहीन. श्याम म्हणाला. श्याम! कोणी आजारी पडले, तर आपण जातो. आपल्या आश्रमातील कोणी आजारी पडला, तर त्याच्याजवळ नको का बसायला रामाने विचारले. अरे, इतका का मी आजारी आहे! तुमचे माझ्यावर प्रेम आहे. मी कितीही जेवलो, तरी पोटभर जेवलो, असे तुम्हास वाटत नाही. मी बरा असलो तरी बरा आहे, असे वाटत नाही. मी आजारी नसलो तरी तुम्ही आजारी पाडाल. वेडे आहात, काही वातबीत झाला, तर बसा जवळ. तुम्ही कामाला गेलात, तरच मला बरे वाटेल. गोविंदा, जा तू. राम, तूही पिंजायला जा! श्यामच्या निक्षून सांगण्यामुळे सारे गेले. सायंकाळी श्यामला जरा बरे वाटत होते. ...Read More

40

श्यामची आई - 39

श्यामच्या गोष्टीस सुरुवात झाली होती. दूर कुत्री भुंकत होती. वडार लोक उतरले होते त्यांची ती कुत्री होती. रात्रंदिवस माझ्या आईची शुश्रूषा करीत होती. ती जणू उपजत शुश्रूषा कशी करावी, ह्याचे ज्ञान घेऊन आली होती. जन्मजात परिचारिका ती होती. आईला स्वच्छ असे अंथरूण तिने घातले. स्वतःच्या अंथरुणावरची चादर तिने आईखाली घातली. उशाला स्वच्छ उशी दिली. एका वाटीत खाली राख घालून थुंकी टाकण्यासाठी ती आईजवळ ठेवून दिली. तिच्यावर फळीचा तुकडा झाकण ठेवला. दररोज ती वाटी मावशी स्वच्छ करीत असे. दारे लावून दोन दिवशी आईचे अंग नीट कढत पाण्यात टॉवेल भिजवून तो पिळून त्याने पुसून काढी. तिने बरोबर थर्मामीटर आणले होते. ताप बरोबर पाही. ताप अधिक वाढू लागला, तर कोलनवॉटरची पट्टी कपाळावर ठेवी. ...Read More

41

श्यामची आई - 40

त्या लिंबाला पाणी घाला रे, सुकून जाईल नाही तर. त्या नवीन फणसाच्या माडालाही घाला. आई वातात बोलत होती. वातात, तिने स्वतःच्या हाताने नवीन लावलेली झाडे ती तिला दिसत होती. आजारी व अशक्त होती, तरी त्या झाडांना ती पुरण घाली. त्यांना पाणी घाली. त्यांची पाने किडे खातात की काय, ते पाही. आईच्या हातची किती तरी झाडे परसात होती! मी दापोलीस असताना चंदनाचे माडे नेले होते. इतर सारे मेले पण आईने लावलेला तेवढाच जगला होता. प्रेअमाने लावलेला म्हणून का तो जगला पहाटेची वेळ होती. वातात आई बोलत होती. त्या बोलण्यात मेळ नसे. क्षणात झाडांना पाणी घाला म्हणे तर क्षणात ती पहा दवंडी देताहेत, मला कानांत बोटे घालू दे. असे म्हणे. पुरुषोत्तम फक्त निजला होता. बाकी सारी मंडळी आईच्या भोवती होती. ...Read More

42

श्यामची आई - 41

आईजवळ मी नव्हतो. मी दूर शिकत होतो. आईची सेवा न करता मी शिकत होतो. परंतु आईची सेवा करता यावी शिकत होतो. त्या दिवशी रात्री माझ्या स्वप्नात आई आली व मला म्हणाली, का, रे, नाही भेटायला आलास तुला त्यांनी कळविले नाही का त्या दिवशी रागावून गेलास. अजून नाही का राग गेला लहान मुलांचा राग लौकर जातो मग तुझा रे कसा नाही जात ये, मला भेट. सकाळी उठल्यावर ते स्वप्न आठवून मला कसेसेच होई. आज आई फार आजारी नसेल ना, असे मनात येई. पंख असते तर आईजवळ उडून गेलो असतो, असे वाटे. परंतु किती दूर जावयाचे! दोन दिवस जावयाला लागले असते. ...Read More

43

श्यामची आई - 42

गड्यांनो! आज शेवटची आठवण सांगावयाची आहे. हे स्मृतिश्राद्ध आज मी समाप्त करणार आहे. माझ्या हृदयाकाशात स्मृतीचे अनंत तारे आहेत. ठळक ठळक तारे मी दाखविले. आज उरलेला एक ठळक तारा दाखवावयाचा आहे. माझ्या आईवर बायामाणसांचे प्रेम होतेच, परंतु पशुपक्ष्यांचेही होते. मोर्या गाईवर आईचे व आईवर त्या गाईचे किती प्रेम होते ते मी मागे सांगितले आहे. आता मांजरीची गोष्ट सांगावयाची. मागे या मांजरीचा उल्लेख मी केला आहे. तिचे नाव मथी. मथी आईची फार आवडती. आईच्या पानाजवळ जेवावयाची. इतरांनी घातलेला भात ती खात नसे. आई जेवावयाला बसली म्हणजे मथी जेवायला येई. ...Read More