प्रेम हे..!

(774)
  • 306.2k
  • 117
  • 129.9k

प्रेम हे..!! (भाग 1) "निहू किती वेळ...?? चल आवर लवकर.. एव्हाना झुंबड उडाली असेल कॉलेज वर..? रीतू आणि अदिती पण कधीच्या थांबल्या आहेत कॉलेज जवळच्या स्टॉप वर.. मघाशीच फोन येऊन गेला त्यांचा.... शिव्या पडणार आहेत आता आपल्याला..?" अवनी जरा वैतागून दारातूनच निहीरा ला म्हणाली.. "chill यार अवनी...अगं नेमकं आजच उठायला उशीर झाला.. म्हणून उशीर होतोय... सॉरी ना! आणि तसही लिस्ट काय कुठे पळून जाणार आहे का.. ?.. बघ दहा मिनिटांत तुला पोहोचवते की नाही कॉलेज मध्ये ?" निहिरा घरातून बाहेर पडता पडता म्हणाली.. "वर नको पोहोचवू म्हणजे झालं??" अवनी अजून वैतागलेलीच होती.. "बस क्या यार... चल बस आता लवकर!" निहिरा

Full Novel

1

प्रेम हे..! - 1

प्रेम हे..!! (भाग 1) "निहू किती वेळ...?? चल आवर लवकर.. एव्हाना झुंबड उडाली असेल कॉलेज वर..? रीतू आणि अदिती कधीच्या थांबल्या आहेत कॉलेज जवळच्या स्टॉप वर.. मघाशीच फोन येऊन गेला त्यांचा.... शिव्या पडणार आहेत आता आपल्याला..?" अवनी जरा वैतागून दारातूनच निहीरा ला म्हणाली.. "chill यार अवनी...अगं नेमकं आजच उठायला उशीर झाला.. म्हणून उशीर होतोय... सॉरी ना! आणि तसही लिस्ट काय कुठे पळून जाणार आहे का.. ?.. बघ दहा मिनिटांत तुला पोहोचवते की नाही कॉलेज मध्ये ?" निहिरा घरातून बाहेर पडता पडता म्हणाली.. "वर नको पोहोचवू म्हणजे झालं??" अवनी अजून वैतागलेलीच होती.. "बस क्या यार... चल बस आता लवकर!" निहिरा ...Read More

2

प्रेम हे..! - 2

प्रेम हे.. भाग 2................. खरं तर निहिरा पेक्षा कितीतरी सुंदर मुलींनी त्याला प्रपोज केलं होतं....पण त्याला त्यांच्याबद्दल तसं काही नव्हतं... जसं आज निहिरा ला बघून वाटलं.... ? दोन दिवसांनी admissions होते... कदाचित त्यादिवशी ची ती मुलगी परत दिसेल म्हणून तो सोनिया सोबत गेला... सोनिया ला अ‍ॅडमिशन प्रोसेस साठी ऑफिस मध्ये पाठवून तो बाहेरच एका बेंच वर बसला...! त्याचं लक्ष गेट कडेच होतं.. म्हणजे ती येणार असेल तरी दिसेल किंवा इथून जाणार असेल तरी दिसेल.... थोड्याच वेळात निहिरा चा ग्रुप तिथे आला.. कॉलेज कॅम्पस मधील पार्किंग मध्ये त्यांनी आपल्या गाड्या पार्क केल्या.. आणि त्या ऑफिस च्या दिशेने जाऊ लागल्या... अ‍ॅडमिशन साठी ...Read More

3

प्रेम हे..! - 3

............ विहान ने जवळच असलेली उशी सोनिया च्या डोक्यात मारली... ? तशी ती बाहेर पळाली आणि "उद्या मला सोडायला लवकर आवर??" म्हणून ओरडतच निघून गेली.. विहान मान हलवून गालातल्या गालात हसत होता... ? ठरल्याप्रमाणे विहान आणि सोनिया लवकरच कॉलेज जवळ पोहोचले... कॉलेज गेट समोरील रोड च्या पलिकडे एका झाडाखाली विहान ने त्याची बाइक थांबवली.. दोघेही इकडे तिकडे बघत तिची वाट पाहत होते.. सोनिया ला खरं तर माहित नव्हतं ती कोण आहे.. पण ती उगीचच येणा जाणार्‍या मुली बघून अंदाज लावायचा प्रयत्न करत होती.. ?... थोड्याच वेळात त्यांचा ग्रुप आला... तसं विहान ने.. एकीकडे बोट दाखवत सोनिया ला सांगितलं ... ...Read More

4

प्रेम हे..! - 4

............ मैदानावर एकच जल्लोष झाला .. सर्वांनी त्याला अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं !!.. पण तो मात्र सारखा निहिरा कडे होता .. ? " नॉट बॅड !! ?" म्हणत निहिरा हसली .. पण यावेळी मात्र तीने त्याच्याकडेच बघून स्माईल दिली ...!! ?? तिच्या गालावरची खळी पाहून मात्र विहान ची विकेट गेली .. ?... निहिरा आणि तिचा ग्रुप आनंदात तिथून निघून गेले ..त्यादिवशी भांडणाच्या नादात तिने विहान ला इग्नोर केलं होतं... आज पहिल्यांदा निहिरा ने विहान ला नीट बघितलं होतं .. आणि नकळतच तिच्या चेहर्‍यावर smile आली होती.. ती घरी आली.. तिला राहून राहून त्याचाच चेहरा आठवत होता.. खरच काय भारी ...Read More

5

प्रेम हे..! - 5

.........निहिरा समोर आता दुसरा ऑप्शनच नव्हता .. तिने चावी सोनिया ला दिली .. एक दीर्घ श्वास घेतला आणि विहान मागे जाऊन बसली.. थोडं अंतर ठेवूनच?? 'हेही नसे थोडके' असा विचार करत विहान ने बाईक स्टार्ट केली.. सोनिया कडे बघून हळूच फ्लाइंग किस दिला ?.. सोनिया हसली आणि मान हलवत निघून गेली...? खरं म्हणजे निहिराही विहान सोबत जायला मिळालं म्हणून खुश झाली होती..?पण तिने चेहर्‍यावर तसं दाखवलं नाही.. मात्र मनोमन सोनिया चे आभार मानायला ती विसरली नाही ? ?.. सर्व जणांनी वीस मिनिटांवर असलेल्या 'रसोई' हॉटेल कडे प्रस्थान केले!.. बाकी सर्वांनी पुढे निघून जावे म्हणून विहान मुद्दामच थोडं हळू बाइक ...Read More

6

प्रेम हे..! - 6

.............. तिने लगेचच ती चेन गळ्यात घातली आणि स्वतःला त्या आरशात बघितलं.. आणि आरसा बनून विहान च आपल्याला बघतोय तिला वाटलं... आणि तिने लाजेने आपली मान खाली घातली.. ??.....विहान ने दिलेलं पहिलं गिफ्ट म्हणून तिने त्या वस्तू एकदा हृदयाशी कवटाळून धरल्या.. ? खूप छान वाटत होतं तिला! पण तरीही मनात विचार आलाच... आपण त्याच्यासाठी स्पेशल आहोत म्हणून त्याने हे दिलंय आपल्याला की जसा तो म्हणाला होता तसं सहजच दिलंय ?.. पैसेवाल्या मुलांसाठी हे सर्व कॉमन असतं खरं तर.. एखाद्या मुलीला असं गिफ्ट्स देणं.. तिच्यासोबत टाईमपास करणंही!!..बर्‍याचदा ही मुले एखाद्या मुलीच्या मागे मागे करतात.. प्रेमाचं नाटक करतात.. आणि त्यांचा स्वार्थ ...Read More

7

प्रेम हे..! - 7

.......... आजही तो तिची प्रॅक्टिस बघायला आला होता.. पण आज तिचा पार्टनर काही कारणामुळे आला नव्हता... मग तिने एकटीनेच सुरुवात केली... सरांनी song प्ले केलं....... प्रीत की लत मोहे ऐसी लागी हो गई मैं मतवारी.. बल-बल जाऊँ अपने पिया को हे मैं जाऊँ वारी-वारी.. मोहे सुध बुध ना रही तन मन की ये तो जाने दुनिया सारी.. बेबस और लाचार फिरूँ मैं हारी मैं दिल हारी...... हारी मैं दिल हारी....... आणि निहिरा ने ताल धरला...... ?सुरुवात तिची एकटीचीच असायची... आणि मग तिचा पार्टनर तिला जॉईन व्हायचा.. तेरे नाम से जी लूँ तेरे नाम से मर जाऊँ... विहान गर्दीतून धावत ...Read More

8

प्रेम हे..! - 8

............ विहान ने मेसेज परत परत वाचला... आज निहिरा ने पहिल्यांदाच त्याला मेसेज केला होता.. तसे ग्रुप चॅट वगैरे असायचे त्यांचे.. पण एकमेकांनी पर्सनली मेसेज नव्हता केला कधी.. आज विहान चं 'सोने पे सुहागा' असं झालं होतं...!! ?? विहान ने लगेच रिप्लाय केला.. ?माय प्लेजर डिअर ! तू ही काही कमी नाहीस ? यू वेअर जस्ट आॅसम!! मलाही आवडलं तुझ्यासोबत डान्स करायला.. ? थँक यू फॉर कॉम्प्लिमेन्ट ? चल बाय.. झोपतेय? गुड नाईट! ? Yeah.. गुड नाईट! विहान ला खाली 'मिस यू' लिहावंसं वाटत होतं.. पण त्याने कंट्रोल केलं.. ? ...Read More

9

प्रेम हे..! - 9

.......... "अ‍ॅक्च्युअली थोडं बोलायचं होतं तुझ्याशी... कॉलेज जवळच्या कॅफे मध्ये येशील का दहा वाजता? प्लीज...एकटीच ये.." "ओके ... नो .. येते.." "ओके बाय.." "बाय".. म्हणत दोघींनीही फोन ठेवला.. निहिरा विचारात पडली... 'कशासाठी बोलावलं असेल सोनिया ने.. ? सिंगापूरवाल्या प्रोजेक्ट बद्दल तर बोलायचं नसेल ना...' सोनिया ही त्या लास्ट इयर च्या प्रोजेक्ट मध्ये पार्टीसिपेट करणार होती.. 'पण त्यासाठी एवढ्या अर्जंट कशाला बोलावेल... ?.... किंवा कदाचित विहान च्या बर्थडे साठी काही प्लान करायचा असेल आणि आपली मदत हवी असेल.. हो... असही असू शकतं.. ' निहिरा निरनिराळे तर्क लावतच तयार झाली.. आई ला सांगून ती आपली स्कूटी घेऊन निघाली.. कॉलेज जवळच्या कॅफे समोर आपली स्कूटी लावून ती आत ...Read More

10

प्रेम हे..! - 10

........... निहिरा ने हळूच हसून त्याच्याकडे बघितलं फक्त... तिच्या हसण्याला होकार समजून त्याने तिचा हात हातात घेतला.. त्याचा तो निहिरा ला खूप सुखावह वाटला...... आणि दोघेही तिथून बाहेर पडले...! ? विहान ला तिचा हात सोडावासा वाटत नव्हता... हा हात कायम असाच आपल्या हातात असावा असं त्याला वाटत होतं..! पण तिला निघायचं होतं... तिने एकदा त्याच्याकडे बघितलं.. तसा त्याने तिचा हात सोडला... आणि ती त्याला 'बाय' करून निघून गेली... विहान खुश होता.. जरी ती स्पष्ट 'हो' बोलली नसली तरी 'नाही' सुद्धा बोलली नव्हती... याचाच त्याला जास्त आनंद होत होता...!! ? सोनिया त्याच्या घरी आली तेव्हा त्याने तिला सर्व सांगितलं.. नाही ...Read More

11

प्रेम हे..! - 11

.......... तिच्या अशा वागण्याने विहान पुरता गोंधळून गेला असला तरी त्याच्या वाढदिवसाचं बेस्ट गिफ्ट आज त्याला निहिरा कडून मिळालं काही न बोलताही ती खूप काही बोलून गेली होती.... पाच मिनिटांनी विहान ही बाहेर आला... आणि सर्वांसोबत येऊन बसला... सर्वांच्या छान गप्पा रंगल्या होत्या.. मध्ये मध्ये selfies घेणंही चालूच होतं!! ? विहान ची आईही थोडावेळ त्यांच्यासोबत गप्पा मारत बसली..मग त्यांनी सर्वांना जेवून घ्यायला सांगितलं.. आणि त्या जेवण वाढण्यासाठी उठल्या... तसं सर्वजण म्हणाले.. आँटी तुम्ही अजिबात त्रास करून घेऊ नका... जेवण आम्ही इथेच घेतो आणि आमचं आम्ही घेऊ वाढून.. तुम्ही आराम करा हवं तर.. ? "हो आँटी... आम्ही अज्जिबात लाजणार नाही... तुम्ही टेंशन ...Read More

12

प्रेम हे..! - 12

............. मी वाट बघेन तुझी.... आणि तेव्हाच आपलं नातं प्रेमात बदलेल जेव्हा तू स्वतःहून माझ्याजवळ येशील.... " एवढं म्हणून उठला... आणि कार मध्ये जाऊन बसला... निहिरा ला कळलं तो नाराज झालाय... तिच्या बोलण्याने दुखावलाय...तीही त्याच्या मागोमाग जाऊन कार मध्ये बसली.... "विहान..... प्लीज..... " तिने बोलायचा प्रयत्न केला... त्याने तिच्याकडे न बघताच रागात सोनिया आणि अवनी साठी एकदा हॉर्न वाजवला... सोनिया आणि अवनी ने एकमेकींकडे बघून खांदे उडवले... काय झालं त्यांनाही कळेना... त्याही येऊन कार मध्ये बसल्या... मग तीही काहीच बोलली नाही... तिला वाटलं निदान रागाच्या भरात तरी तो माझ्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करणार नाही आणि त्यामुळे नकळत तोही बिझनेस मध्ये ...Read More

13

प्रेम हे..! - 13

...........एके दिवशी तो त्याच्या केबिन मध्ये chair वर बसून टेबल वर त्याची गोल्ड रिंग फिरवत कसला तरी विचार करत इतक्यात त्याला काहीतरी आठवलं...? आणि तो खुष होत chair वरुन उठला...... ??त्याने डॅड ना कॉल करून तो लवकर घरी जात असल्याचं सांगितलं... विहान पहिल्यांदाच असा लवकर घरी निघाला होता त्यामुळे त्यांनीही त्याला हसत हसत परमिशन दिली... ?त्याने पार्किंग ला जाऊन कार काढली... आणि थेट 'The Gold Lodge' शॉप समोर जाऊन थांबला.. कार पार्क केली आणि तो आतमध्ये गेला.... काही दिवसांपूर्वीच तो इथे त्याच्या मॉम सोबत तिच्यासाठी bangles घ्यायला आला होता...! मघाशी गोल्ड रिंग फिरवता फिरवता त्याला याची आठवण झाली.. म्हणून ...Read More

14

प्रेम हे..! - 14

............. ती सर्वांसोबत बोलत होती पण तिची नजर मात्र विहान ला शोधत होती.. आणि तिला हॉटेल च्या पायर्‍यांवर उभा विहान दिसला...? दोघांची नजरानजर झाली.. विहान तर पुरता घायाळ झाला होता तिला बघून...! निहिरा ही विहान ला बघून हरवून गेली... विहान ने ग्रे t-shirt त्यावर ब्लॅक लेदर जॅकेट आणि डार्क ग्रे जीन्स घातली होती...! इतक्यात मागून अदिती आली आणि हळूच निहिरा च्या कानात बोलली... " काय दिसतो हा यार ?.. लवकर हो बोल त्याला नाहीतर आम्ही सर्व लाईन मध्ये आहोतच ???" "काहीही काय तुझं... चूप!!" "अगं मी मस्करी करतेय... ?? आमचं सोड... पण लवकर officially हो बोलली नाहीस तर भलतीच ...Read More

15

प्रेम हे..! - 15

......... तिच्या वागण्याचं विहान ला खूप आश्चर्य वाटलं..सर्वांसमोर तिने पहिल्यांदाच तीचं प्रेम व्यक्त केलं होतं....!!! पण आज तिलाच काही नव्हता मग काय.... त्यानेही तिच्या भोवती आपल्या हातांचा विळखा घातला...!! ?❤️"का मला एकटीला सोडून निघून आलास ?" निहिरा अजूनही त्याच्या मिठीत होती...!"अगं मग तुला surprise कसं देता आलं असतं.. ?" विहान हसत म्हणाला.... "तू हे असं काहीतरी करतोस आणि मग मी आणखी ओढली जाते तुझ्याकडे...?" ती तक्रारीच्या सुरात म्हणाली.. "अगं मग चांगलंच आहे ना माझ्यासाठी.. ?" तो गमतीत आपली मिठी आणखी घट्ट करत म्हणाला .. "विहाsन... माझं अभ्यासात लक्ष कसं लागेल... मला मग सारखी तुझीच आठवण येत राहते.. ?" त्याच्या छातीवर आपलं मस्तक ...Read More

16

प्रेम हे..! - 16

............हॉर्नस् च्या आवाजाने ती भानावर आली... ग्रीन सिग्नल पडला होता... तिनेही स्कूटी सरळ तिला जायच्या असलेल्या दिशेने पुढे घेतली.... left साईड ने कधीच निघून गेला होता...!! विहान गेला त्या दिशेने तिने दोन तीन वेळा वळून बघितलं... तो कधीच पार पोहोचला होता..... तिचं मन अचानक उदास झालं.... ? कशीबशी ती घरी आली... रुम मध्ये येऊन बसली.... शरीरातील सर्व त्राण निघून गेल्यासारखं वाटत होतं तिला.... ? तिला तिच्या डोळ्यासमोर सारखी विहान च्या मागे बसलेली ती मुलगी दिसत होती... कोण असेल ती?? एवढी सुंदर!... Super hot कॅटेगरी मध्ये येणारी...!!?.. अगदी विहान सारखीच!!! पण मी का तिला विहान सोबत compare करतेय ?.. असेल ...Read More

17

प्रेम हे..! - 17

......... कुणीतरी म्युझिक बंद केलं... सर्वजण त्यांच्या बाजूला गोळा झाले.. काय झालंय कुणालाच काही कळेना... ? क्षणापुर्वी दंगामस्तीत गुंग फार्म हाऊस... एकाएकी शांत झाला... एक भयाण शांतता तिथे पसरली...... झालं ना तुझ्या मनासारखं..? आता समाधान झालं असेल ना मनाचं????की अजूनही काही शिल्लक आहे?? निहिरा खूप रागात होती... कशाबद्दल बोलतेयस तू?? काय झालंय?नीट सांगशील का ? विहान काहीही न कळून विचारत होता.. नेमका कसला सूड उगवलायस?? मूव्ही च्या वेळी सर्वांसमोर स्कूटी वरुन ओरडण्याचा..? तुला ऑफिशियली होकार न देण्याचा...? की माझ्या प्रोजेक्ट ला importance देऊन तुला दूर ठेवण्याचा???? ??... सांग ना....की प्रेमाचंच नाटक केलंस माझ्यासोबत??? ??? निहिरा खूपच संतापली होती... ...Read More

18

प्रेम हे..! - 18

........... साधारण एक च्या नंतर तिच्या फोन ची मेसेज टोन वाजली.. तसा तिने पट्कन मेसेज open करून बघितला... ? m home.. Don't worry I m OK Good night.. विहान चा मेसेज होता...! तिला हायसं वाटलं!... आणि थोड्यावेळासाठी ती शांत झोपली... रात्री उशीरा झोपूनही तिला सकाळी लवकरच जाग आली...! तिने लवकर आवरून विहान ला भेटायचं ठरवलं... तिने पटापट अंघोळ वगैरे उरकली... भूक तर नव्हतीच.. तिला विहान ला भेटायची ओढ लागली होती... कसा असेल तो.. ?कुठे गेला असेल काल?.. खूप सारे प्रश्न तिच्या डोक्यात फिरत होते... तिने आईला विहान कडे जात असल्याचं सांगितलं.. पण आईने 'आधी नाश्ता कर ...Read More

19

प्रेम हे..! - 19

............. सोनिया तरी काय सांगणार होती त्याला... तीही त्याच्यासोबत मूकाश्रू ढाळत होती...! ? कितीतरी वेळ तो तसाच तिच्याजवळ रडत ? "विहान.. शांत हो... आँटी येतील... ?" सोनिया म्हणाली.. तसे त्याने डोळे पुसले.. सोनिया ने त्याला विचारलं.. "विहान तू आँटींना विश्वासात घेऊन का सांगत नाहीस सर्व ?? त्यांनाही किती काळजी वाटते तुझी... त्यांनी जर कधी मला विचारलंच तर काय सांगू मी त्यांना...?? किती वेळ खोटं बोलणार मी तरी आणि तू तरी... ? शिवाय तुलाही ऑफिस तर जॉईन करावंच लागेल.. हे असे किती दिवस घालवणार आहेस तू..? " "ह्म्म्म.. ऑफिस तर जॉईन करावंच लागणार... पण डोन्ट वरी तुला कुणालाही काही सांगायला ...Read More

20

प्रेम हे..! - 20

............ Sunday म्हणून निहिरा आज जरा उशीराच उठली... जेमतेम आंघोळ करून ती पेपर वाचत बसली होती... इतक्यात तिचा फोन स्क्रीन वरचं नाव बघून ती चकित झाली...... सोनिया...!!!???? निहिरा ला आश्चर्य वाटलं... एवढ्या महिन्यानंतर सोनिया चा फोन? ?... तिने कॉल रिसीव्ह केला... "हाय निहिरा... कशी आहेस.....?".... सोनिया ने जरा चाचरतच विचारलं... त्या पार्टी नंतर तिने आज पहिल्यांदा निहिरा ला कॉल केला होता.. आणि त्यानंतर पहिल्यांदाच ती तिच्यासोबत बोलत होती... "मी ठीक आहे... तू कशी आहेस.. आणि आज अचानक कॉल कसा केलास?" "मी पण ठीक आहे.. अगं थोडं बोलायचं होतं... माझ्या घरी येतेस का आत्ता?? ?" सोनिया ने विचारलं... "काय झालं... म्हणजे... अचानक.... ?" "ये तर... आल्यावर सांगते..." "OK.. ...Read More

21

प्रेम हे..! - 21

....... " विहान इथे नाहिये.... ?" " म्हणजे..... कुठे आहे तो??? ?" " बँगलोर.......! ?" निहिरा ला गरगरायला लागलं.. पण का???" तिने कसबसं सोनिया ला विचारलं... सोनिया ने तिला सर्व सांगायला सुरुवात केली.. "त्यादिवशी पार्टी मध्ये जे काही झालं... त्यानंतर एक एक करून सर्व निघून गेले.. फक्त मी आणि विहान आम्ही दोघेच होतो तिथे... विहान ने स्वतःला अडकवून घेतलं होतं आतल्या रूम मध्ये...पंधरा वीस मिनिटांनी तो बाहेर आला.. आणि मला घरी सोडलं.. एक शब्द ही बोलला नाही माझ्याशी.. मला खाली गेट जवळ सोडून तो कुठेतरी निघून गेला.. मी त्याला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला पण तो माझ्यावरच चिडला... त्या रात्री ...Read More

22

प्रेम हे..! - 22

"काssय...? मी येतेय.." म्हणून सोनिया ने फोन ठेवला.. आणि जेवायचंही सोडून ती धावतच विहान च्या घरी जायला निघाली... ती तिथे पोहोचली... आत येऊन बघते तर अंकल फोन वर बोलण्यात बिझी होते.. आणि आँटी सोफ्यावर बसून रडत होत्या... ती आँटींजवळ गेली.. त्यांच्या हातावर हात ठेवत तिने त्यांना धीर दिला... आणि विहान च्या रूम मध्ये गेली... "विहान काय चाललंय तुझं?? आँटींची काय अवस्था झालीय बघ रडून रडून....?" सोनिया म्हणाली.. "सोनिया प्लीज.. I request you... नको अडवू मला..." "का नको अडवू.. आमचा विचार नाही करावासा वाटला का तुला..?? तुझ्याशिवाय आमची अवस्था काय होईल कल्पना तरी केलीस का?? ??" " सोनिया प्लीज... जीव ...Read More

23

प्रेम हे..! - 23

....... अखेर Coimbatore express स्टेशन वर आली... आणि निहिरा आणि टीम त्यात चढली... तिने आई बाबांचा निरोप घेतला आणि जागेवर येऊन बसली... आपण विहान ला भेटणार या कल्पनेनेच तीचं अंग शहारलं...!!! ❤️ इकडे विहान बँगलोरला आला होता.. त्याने स्वतःला कामामध्ये बिझी करून घेतलं होतं... पण तो एक क्षण ही निहिरा ला विसरू शकला नव्हता... ? बाकी बिझनेस तो उत्तम सांभाळत होता.. त्याच्या वडिलांना आता इकडची अजिबात चिंता राहिली नव्हती... त्या दोघांनाही विहान ची खूप आठवण यायची... ते बर्‍याचदा त्याला परत येण्यासाठी विचारायचे.. पण विहान अजूनही त्याच्या निर्णयावर ठाम होता... ? म्हणूनच त्याच्या मॉम, डॅड ने त्याच्या लग्नाचं मनावर घेतलं ...Read More

24

प्रेम हे..! - 24

............. निहिरा ने घाबरतच त्याच्या डोळ्यांमध्ये बघितलं... ? दोघांच्याही डोळ्यांत आसवे जमा झाली?...काही क्षण दोघेही एकमेकांच्या डोळ्यांत तसेच हरवून स्काय ब्लू कलर चा प्लेन शर्ट त्यावर नेव्ही ब्लू पट्ट्यांवाली टाय.. नेव्ही ब्लू कलर चा सुट मागे चेअर ला अडकवलेला.. विहान आजही खूप हँडसम दिसत होता...!! ❤️ निहिरा ला त्याच्या डोळ्यांत तिच्याबद्दल चं प्रेम..काळजी..ओढ सर्व दिसत होतं.... पण काही क्षणच.....! विहान लगेच भानावर आला... त्याच्या डोळ्यांतील तिच्या प्रेमाची जागा आता रागाने घेतली होती... ? त्याचे रागाने लाल झालेले डोळे बघून निहिरा घाबरली.. ? विहान ला पहिल्यांदाच ती एवढं चिडलेलं बघत होती.. " सोनिया चं नाव वापरून तू इथपर्यंत आलीस.. खोटं ...Read More

25

प्रेम हे..! - 25

........ एवढा रागावलाय का विहान आपल्यावर?? त्याच्यासाठी एवढ्या लांबून आलो पण तो मुद्दामच आज आला नाही... का केलंस विहान असं??? म्हणून ती रडायला लागली.... त्याला तरी कशी दोष देऊ... आपण ही हेच केलं होतं त्याच्यासोबत!! ??? आता त्याच्या घरी जावं तर पंधरा मिनिटे जायला लागतील... त्यातही तो घरी सुद्धा नसेल तर.... जाऊन तसंच परत यावं लागेल.... आणि मग कालच्या सारखा उशीर होईल आणि अंधार पडल्यावर जिवात जीव राहणार नाही... ? सोनिया ला ही विचारू शकत नाही.. आपल्यामुळे तिच्या सोबतही तो बोलत नाहीये?.. त्यापेक्षा मी उद्याच परत येईन... असं स्वतःशीच ठरवून ती पाणावलेल्या डोळ्यांनी मागे फिरली... रूम वर पोहोचल्यावर तिने ...Read More

26

प्रेम हे..! - 26

........विहान ने तिच्या भोवतीची मिठी सैल केली आणि तो सरळ चालायला लागला... सरळ जाऊन कार मध्ये बसला आणि निघून निहिरा मात्र गोंधळून त्याच्याच कडे बघत राहिली...!! विहान घरी आला.. आणि एखाद्या निर्जीव पुतळ्यासारखा सोफ्यावर बसला.. तो निहिराचाच विचार करत होता... ? गेले दोन दिवस तो निहिरा सोबत जे वागला होता त्याचं त्याला खूप वाईट वाटत होतं... आपण असं कसं वागू शकतो तिच्यासोबत...?? ती आपल्यासाठी इथपर्यंत आली...आपल्याला भेटण्यासाठी ऑफिस च्या फेर्‍या मारल्या... तिने तिची चूक मान्य केली तरीही आपण तिला हर्ट केलं... ?? ती कधीपासून आलीये इथे .. कुठे राहते.. सोबत कोणी आहे की एकटीच आहे.. आपण साधी चौकशी ही ...Read More

27

प्रेम हे..! - 27

......... " नाही.... ते निहिरा चं सरप्राईज होतं..... माझं सरप्राईज अजून बाकी आहे.... " सोनिया म्हणाली... आणि दोघीही एकमेकींकडे खळखळून हसल्या..... ??? विहान गोंधळून आळीपाळीने त्या दोघींकडे बघत होता.....! ? "Wait....." म्हणुन सोनिया मोबाईल हातात घेऊन थोडी पुढे चालत गेली... विहान गोंधळलेल्या अवस्थेत तिच्याचकडे बघत होता... सोनिया त्याच्याच घरात असल्याचं त्याच्या लक्षात आलं... आणि तेवढ्यातच तिने मोबाईल त्याच्या मॉम समोर धरला.... "मॉम.... तू??? ?" म्हणुन विहान शहाण्या बाळासारखा पटकन निहिरा पासून बाजूला झाला.. ?? "काय मग बेटा... कधी घरी येतोयस माझ्या सुनेला घेऊन?? ?" "काय??..... म्हणजे.....? ?" विहान गोंधळलेल्या अवस्थेत म्हणाला.. आणि त्याने निहिरा कडे बघितलं.. निहिरा लाजून हसत ...Read More

28

प्रेम हे..! - 28 - अंतिम भाग

.............. तिने डोळे मिटून घेतले... विहान मात्र कितीतरी वेळ तिला किस करत होता....? एवढ्या महिन्यांचा विरह आज संपला होता......!!! विहान च्या स्पर्शाने नखशिखांत मोहरली....! विहान ने एकदा तिच्याकडे बघितलं.. आणि तिला गच्च मिठी मारली...! त्या मिठी मध्ये प्रेम होतं.. विश्वास होता.. ओढ होती.. विरहात सोसलेल्या यातना होत्या... मनाला झालेल्या वेदना होत्या... निहिरा पर्यंत ते सर्व सर्व पोहोचलं होतं..... त्याच्या मिठीमध्ये ती आज स्वतःला खूप भाग्यवान समजत होती.... त्याने मनात आणलं असतं तर कोणतीही मुलगी त्याच्या मागे पुढे करायला एका पायावर तयार झाली असती...! पण त्याने त्याचा निश्चय ढळू दिला नव्हता... तो इतक्या दिवसांनंतरही निहिराच्याच आठवणींत झुरत होता... निहिरा ला ...Read More