प्रितिलता-एक परिसस्पर्श

(5)
  • 23.4k
  • 1
  • 7.4k

पुर्वी लोक एक-एकटे फिरत होते.नंतर ते एकत्र राहू लागले.समाज निर्माण झाला.जे शिकले त्यांनी प्रगती केली.तो समाज उच्च स्तरावर पोहचला.पण अशिक्षित लोक स्वतःची आणि पर्यायाने समाजाची प्रगती करू शकले नाहीत.त्यापैकीच एका समाजातील शाम आणि शंकर.एका खेडे गावात हजार-पंधराशे लोक राहत असतील.गावात शाळा सातवी पर्यंत होती.गावकऱ्यांचा प्रमुख व्यवसाय शेती.शेती गावातून दोन-तीन किलोमीटर अंतरावर असल्याने कांही समाजाने शेतातच घरं बांधली.गावातून बाहेर शेतात राहतात त्या घरांच्या समुहाला 'वस्ती' म्हणतात. शिक्षणासाठी त्यांच्या मुलांना वस्तीवरून शाळेत दोन-तीन किलोमीटर अंतर चालून जावं लागायच.शाम आणि शंकर हे दोन मित्र होते.इयत्ता- तिसरीचा निकाल लागल्यानंतर उन्हाळी सुट्टी लागली.उन्हाळी सुट्टी नंतर चौथीचा वर्ग चालू झाला.पण गावापासून दूर राहीलेल्या अशिक्षित पालकांना काय

Full Novel

1

प्रितिलता - एक परिसस्पर्श - 1

पुर्वी लोक एक-एकटे फिरत होते.नंतर ते एकत्र राहू लागले.समाज निर्माण झाला.जे शिकले त्यांनी प्रगती केली.तो समाज उच्च स्तरावर पोहचला.पण लोक स्वतःची आणि पर्यायाने समाजाची प्रगती करू शकले नाहीत.त्यापैकीच एका समाजातील शाम आणि शंकर.एका खेडे गावात हजार-पंधराशे लोक राहत असतील.गावात शाळा सातवी पर्यंत होती.गावकऱ्यांचा प्रमुख व्यवसाय शेती.शेती गावातून दोन-तीन किलोमीटर अंतरावर असल्याने कांही समाजाने शेतातच घरं बांधली.गावातून बाहेर शेतात राहतात त्या घरांच्या समुहाला 'वस्ती' म्हणतात. शिक्षणासाठी त्यांच्या मुलांना वस्तीवरून शाळेत दोन-तीन किलोमीटर अंतर चालून जावं लागायच.शाम आणि शंकर हे दोन मित्र होते.इयत्ता- तिसरीचा निकाल लागल्यानंतर उन्हाळी सुट्टी लागली.उन्हाळी सुट्टी नंतर चौथीचा वर्ग चालू झाला.पण गावापासून दूर राहीलेल्या अशिक्षित पालकांना काय ...Read More

2

प्रितिलता - एक परिसस्पर्श - 2

भाग-I पासून पुढे..."चल, तिला येवढं काय झालंय माझ्या पोराला येवढं मारोस्तवर", असे म्हणून रागात तावा- तावानं शामची आई शंकरच्या आईजवळ आली आणि म्हणाली,"चल गं कमळे ,त्या मास्तरणीचं एवढं काय बिनसलंय बघू चल."शामची आई शंकरच्या आईला जशीच्या तशी घेऊन शाळेकडे निघाली.शाम रस्त्याकडेला बसला होता.शामच्या आईने शामला उठून पोटाशी कवटाळले.रडूनरडून सुकलेल्या तोंडावरून हात फिरवला आणि शाम, शंकर आणि शंकरची आई शाळेकडे चालू लागल्या.शाळेसमोर येऊन एका मुलीला शामची आई बोलली,"कुठाय मास्तरीन?,बोलव तिला.पोराला येवढं मारत्या,काय झालंय तिला"इतक्यात वर्गातून खबाले बाई आल्या.बाईंचा स्वभाव शांत आणि प्रेमळ होता.बाई दिसताच शामची आई," ये हिकडं.तुच का ती मास्तरीन, काय झालंय गं तुला, पोराला येवढं मारत्यास?तुझी साडीच फिडती,ये."बाई घाबरुन ...Read More