मरण तुमचे सरण आमचे!

(53)
  • 102.7k
  • 1
  • 36.6k

* मी आणि माझी तब्येत!* 'नमस्कार! मी अमूक तमूक खमके! वय वर्षे पन्नास! मी आजपासून दररोज सायंकाळी सहा वाजता 'सरमिसळ' या लोकप्रिय वाहिनीवरुन स्वतःचेच 'मेडिकल बुलेटीन' अर्थात माझे प्रकृतीपत्र, माझा आरोग्य अहवाल सादर करणार आहे. तुम्ही म्हणाल, तुम्ही असे कोण टिकोजीराव की, तुमचे मेडिकल बुलेटीन दररोज प्रसारित व्हावे आणि काही काम नसल्याप्रमाणे आम्ही ते ऐकावे. बरोबर आहे. वैद्यकीय अहवाल केवळ नेते, थोर समाजसेवक, सिलेब्रेटी, कोणत्या ना कोणत्या कारणाने समाजप्रिय अशा लोकांचे असते. तसे पाहिले तर मी एक साधा कारकून ! माझ्या लेखणीशी प्रामाणिक असणारा, ना कधी लेखणी वा स्वतःचा

Full Novel

1

मी आणि माझी तब्येत

* मी आणि माझी तब्येत!* 'नमस्कार! मी अमूक तमूक खमके! वर्षे पन्नास! मी आजपासून दररोज सायंकाळी सहा वाजता 'सरमिसळ' या लोकप्रिय वाहिनीवरुन स्वतःचेच 'मेडिकल बुलेटीन' अर्थात माझे प्रकृतीपत्र, माझा आरोग्य अहवाल सादर करणार आहे. तुम्ही म्हणाल, तुम्ही असे कोण टिकोजीराव की, तुमचे मेडिकल बुलेटीन दररोज प्रसारित व्हावे आणि काही काम नसल्याप्रमाणे आम्ही ते ऐकावे. बरोबर आहे. वैद्यकीय अहवाल केवळ नेते, थोर समाजसेवक, सिलेब्रेटी, कोणत्या ना कोणत्या कारणाने समाजप्रिय अशा लोकांचे असते. तसे पाहिले तर मी एक साधा कारकून ! माझ्या लेखणीशी प्रामाणिक असणारा, ना कधी लेखणी वा स्वतःचा ...Read More

2

अशीही प्रवेश परीक्षा

°° अशीही प्रवेश परीक्षा! °° सुकन्यापुरी नावाचे एक गाव! परंतु या गावाची कीर्ती तशी देशभर पसरली होती. त्याला कारणही तसेच होते. मागील पंचवीस वर्षांपासून सुकन्यापुरीची ग्रामपंचायत निवडणूक कोणताही वाद, तंटा, भांडण न होता बिनविरोध होत होती. या गावाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे पंचवीस वर्षांपासून या गावावर महिलाराज होते अर्थातच ग्राम पंचायत सदस्य म्हणून नऊ महिलांची बिनविरोध निवड होत असे. या नवनिर्वाचित महिला त्यापैकी सरपंच, उपसरपंच यांची निवड करीत असत. या पंचवीस वर्षात गावाची न भूतो न भविष्यती अशी प्रगती झाली होती. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ...Read More

3

घरोघरी लखोपती

* घरोघरी लखोपती!* दुपारची वेळ होती. अचूक भविष्य सांगणारे, उत्तम सांगून आलेले संकट दूर करणारे अशी ख्याती असलेल्या त्या महाराजांकडे भरपूर गर्दी होती. दोन-दोन महिने आधी नोंदणी करावी लागायची. त्यादिवशीही महाराज भक्तांच्या समस्या निवारणार्थ उपाय सांगत असताना अचानक दहा-बारा वाहनांचा ताफा त्यांच्या आलिशान बंगल्यात शिरला. तो ताफा एका राष्ट्रीय पक्षाच्या अध्यक्षांचा होता. त्यांची ना पूर्व नोंदणी होती ना त्यांनी फोन करून येण्याची परवानगी मागितली होती. जणू तिथेही व्हीआयपी कोटा चालत होता. त्या अध्यक्षांना आणि इतरांना सन्मानाने दिवाणखान्यात बसवून ...Read More

4

सांगण्यापुरते ब्रह्मज्ञान

*सांगण्यापुरते ब्रह्मज्ञान !* जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक त्यांच्या कार्यालयात बसून महत्त्वाचे टपाल तयार करण्यात मग्न असताना केंद्रप्रमुखांचे आगमन झाले. नमस्काराचे आदानप्रदान होताच केंद्रप्रमुख म्हणाले,"सर, ते टपाल राहू देत. अगोदर शाळेचा परिसर स्वच्छ करावा लागेल. कार्यालयाची, वर्गखोल्यांची सफाई करून जाळेजळमटे काढून टाकावे लागतील.""का हो, साहेब? आज कुणी येणार आहे का?" मुख्याध्यापकांंनी विचारले."आज नाही, उद्या मंत्रीमहोदय आपल्या शाळेला भेट द्यायला येणार आहेत.""काय सांगता? चक्क मंत्री शाळेत येणार? अरे, बाप रे! आता हो कसे? हा सारा परिसर स्वच्छ करायचा म्हणजे दोन तीन माणसे ...Read More

5

दंड की भुरदंड!

* दंड की भुरदंड! * शहरातील एक मध्यवर्ती भाग! त्या भागाला शहराचा आत्मा 'हर्ट ऑफ द सिटी' असे समजण्यात येत असे. नगरातील फार मोठी बाजारपेठ असल्यामुळे ती वसाहत सकाळी नऊ वाजल्यापासून रात्री अकरा-बारा वाजेपर्यंत कायम गजबजलेली असे. धावपळ ही तेथील नित्याचीच बाब. नुकतेच बाप्पाचे आगमन झाले होते आणि महालक्ष्मीचा सण तोंडावर होता. कोणताही सण म्हटलं की, त्या भागातील गर्दी आटोक्यात आणणे फार मोठे कठीण काम होते. तिथे पोलिसांची तुकडी कायम तैनात असे परंतु शेवटी गर्दी ती गर्दीच! तिला ना चेहरा ...Read More

6

चांद्रयान-२१

* चांद्रयान -२१! * चांद्रयान २० पाठोपाठ चांद्रयान मोठ्या आत्मविश्वासाने, दिमाखाने, अभिमानाने, तेजाने चंद्राकडे झेपावले. भारतात सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले. वैज्ञानिकांना खूप खूप आनंद झाला. चंद्राच्या त्या भूभागावर यापूर्वी दहावेळा फक्त भारतीयांनी पाय रोवत तिरंगा फडकावला होता. इतर कुण्याही देशाच्या अगोदर भारतीय वैज्ञानिक चांद्रयानाच्या आधीच चंद्रावर पाय ठेवते झाले त्यामुळे त्यांना होणारा आनंद हा साहजिक, नैसर्गिक होता. एखाद्या गोष्टीवर जो कुणी रात्रंदिवस, तहानभूक विसरून यश मिळवितो त्यावेळी मिळणाऱ्या फळाची चव तो सर्वांआधी चाखण्याची इच्छा, आकांक्षा बाळगून असतो, तो त्याचा ...Read More

7

वाढला टक्का मिळेल मुक्का !

वाढला टक्का मिळेल मुक्का ! विलासपूर नावाचे एक गाव. तसे मोठे होते. गावात नगरपालिका होती. नगराध्यक्ष होते. तसेच नगरसेवकही होते. सहा महिन्यानंतर नगरपालिकेच्या निवडणुका होत्या. गावातील पुढारी आणि बरेचसे नागरिक गावाच्या नावाप्रमाणेच विलासी होते. कदाचित पूर्वजांच्या विलासी वृत्तीमुळे गावाला विलासपूर हे नाव मिळाले असावे. साडेचार वर्षांपूर्वी झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत फार कमी म्हणजे बारा टक्केच मतदान झाले होते. निवडून आलेले नगरसेवक जेमतेम दहा-वीस मतांनी जिंकून आले होते. कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नव्हते. निकालानंतर विलासपूर गावामध्ये कविवर्य विंदा करंदीकर यांची 'सब घोडे ...Read More

8

मी विकत घेतले ... रा-फेल!

मी विकत घेतले ... रा-फेल! 'अग, मी विकत घेतले रा-फेल.......विकत घेतले रा-फेल....' असे पुटपुटत माझ्या घरात शिरलो. परंतु बैठकीत बायको नाही हे पाहून मी हिरमुसलो परंतु मी एवढा आनंदित होतो की, त्या किंचित नाराजीचा माझ्या आनंदावर काहीही परिणाम झाला नाही. उलट मी जरा जास्त उल्हासित अवस्थेत आवाज दिला,"अग, अग बायकोबाई, कुठे आहेस?" तुम्हाला एक गुपित सांगतो, ज्यावेळी मी अतिशय आनंदात असतो ना त्यावेळी सौभाग्यवतीला 'बायकोबाई' याच नावाने बोलावतो. त्यापुढे जाऊन सांगतो, माझे हे संबोधन, ते व्यक्त करण्याचा खास अंदाज माझ्या पत्नीलाही खूप आवडतो. अगदी आमचे लग्न झाले ...Read More

9

चला धोंडे खाऊया! ॥ 

॥ चला धोंडे खाऊया! ॥ 'नमस्कार! मी चंद्रकांत, चंदू, चंद्या, चंद्र्या इत्यादी अनेक नावांनी गौरवान्वित झालेला. नावात काय असते? असे कुणी तरी म्हटले असले तरीही नावाच्या अपभ्रशांत बरेच काही दडलेले असते. अनेकदा आत्यंतिक लाडाने अपभ्रंश होत असला तरी काही वेळा मिळालेली नावे वैतागून, चिडून, रागाने दिलेली असतात. असो. हे झाले माझ्या पाळण्यातल्या, टोपणनावांचे! आता मी तुम्हाला माझ्या एका अत्यंत लाडक्या, आवडत्या, जीव की प्राण असलेल्या एका व्यक्तीच्या नावाचा इतिहास सांगणार आहे. अहो, असे बघताय का? आता ...Read More

10

मरण तुमचे, सरण आमुचे

** मरण तुमचे, सरण आमचे !** शहरातील मध्यवर्ती ठिकाणी सर्व सुख सोयींनी युक्त असलेल्या भव्य अशा इस्पितळातील अतिदक्षता विभागात नानासाहेब अत्यंत चिंताजनक अवस्थेत बसले होते. मधूनच इकडून तिकडे फेऱ्या मारताना कधी भिंतीवरील घड्याळाकडे, कधी भ्रमणध्वनीवर वेळ पाहत तर कधी खोलीतल्या पलंगावर आत्यंतिक वेदनांनी तळमळणाऱ्या पत्नीकडे... कमलाबाईंकडे बघत होते. नानांनी नुकतीच वयाची साठी पार केली होती. तर कमलाबाई साठी गाठत होत्या. दोन दिवसांपूर्वी पत्नीचे पोट अचानक फुगले म्हणून नानांनी त्यांना दवाखान्यात शरीक केले होते. डॉक्टरांनी आवश्यक त्या सर्व तपासण्या करून औषधोपचारही सुरू ...Read More