तोच चंद्रमा..

(83)
  • 109.5k
  • 36
  • 40.3k

तोच चंद्रमा.. मी आणि मोनामी दोघे आमच्या जायंट टेलिस्कोपमागे होतो. "मोनू, ती बघ पृथ्वी.. अाणि आपले जुने घर.." "बघू दे . दिसतेय ना शाळा.." "परत बघू माला.. हे माला .. तिते राह्यचा तू बाबा..?" "हो. आणि त्या रस्ताच्या बाजूला बिल्डिंग आहे ना ती माझी शाळा.." "मंजे, तू शाळेत पण जायचा.. मंजे तुला शंबरपर्यंत आकडे पण येतात बाबा?" "हो गं मोनुली.. सोनुली रे काय बाबा..?" "काय झाले.. अगं ते घर माझे.." "तू टेलिस्कोप हलवलायस बाबा.. हा चांदोबा आहे.. आणि तितले एक घर दिसते माला.." "हो गं छकुली.. " "मंजे तू तिते पण राह्यचा.." "हो गं मोनुली.. चांदोबा वरचे घर आहे

Full Novel

1

 तोच चंद्रमा.. - 1

तोच चंद्रमा.. मी आणि मोनामी दोघे आमच्या जायंट टेलिस्कोपमागे होतो. "मोनू, ती बघ पृथ्वी.. अाणि आपले जुने "बघू दे . दिसतेय ना शाळा.." "परत बघू माला.. हे माला .. तिते राह्यचा तू बाबा..?" "हो. आणि त्या रस्ताच्या बाजूला बिल्डिंग आहे ना ती माझी शाळा.." "मंजे, तू शाळेत पण जायचा.. मंजे तुला शंबरपर्यंत आकडे पण येतात बाबा?" "हो गं मोनुली.. सोनुली रे काय बाबा..?" "काय झाले.. अगं ते घर माझे.." "तू टेलिस्कोप हलवलायस बाबा.. हा चांदोबा आहे.. आणि तितले एक घर दिसते माला.." "हो गं छकुली.. " "मंजे तू तिते पण राह्यचा.." "हो गं मोनुली.. चांदोबा वरचे घर आहे ...Read More

2

तोच चंद्रमा.. - 2

२ मामाच्या गावाला! आमचे साॅफ्ट लँडिंग झाले ते इंडिया मून स्टेशन होते.. गांधीनिवास नावाचे.. इंडिया म्हणायचे कारण असे पाच सहा देश अजून आहेत ज्यांची अशी अवकाश स्थानके आहेत. ती त्या त्या देशाच्या नावे ओळखली जातात. म्हणजे चीनचे 'चायना मून' तर युएसएचे 'मून अमेरिका' .. जपानी 'मून जापान' वगैरे. सुरक्षा व्यवस्था अगदी कडक आहे इथे. कुणी कुठल्याही देशात जाण्यासाठी स्पेस व्हिसा अाहे. पण तो इकडे चंद्रावर आल्यावर. तिकडून डायरेक्ट इतर देशात जायला परवानगी नाही. अर्थात पृथ्वीप्रमाणे भरमसाट देश नाहीत इथे हे खरे. लोकवस्ती हल्ली वाढलीय पण पृथ्वीइतकी नाही. फक्त चंद्रावर कित्येक खनिजे इतकी मुबलक नि स्वस्तात नि जास्त ...Read More

3

तोच चंद्रमा.. - 3

३ राॅबिन यान थांबले. थांबले म्हणजे गती शून्यावर आली. बाजूची शटर उघडली. आम्ही उतरलो. समोर तंबूरूपी घर होते. आतून एक जण बाहेर आला. "अरे, तू? बरा झालास?" बाबा म्हणाले. "हो.. मी स्वतःला आॅटो रिपेअर करून घेतले सर. आता ठणठणीत आहे. तुम्हाला त्यामुळे स्वतः यान चालवावे लागले.. साॅरी.." "अरे, डोन्ट वरी, ते काय आॅटो मोडवर चालते. तू बरा आहेस ना?" "यस्सर.. मी आॅटो मोड मध्ये अॅनालाईझ केले स्वतःला. थोडासा प्रोग्रामिंग मध्ये गोंधळ होता.. गाॅट मायसेल्फ करेक्टेड." "अरे राॅबिन, हा माझा मुलगा, अंबर.." राॅबिनने हस्तांदोलनासाठी हात पुढे केला. त्याचा हात बऱ्यापैकी थंडगार होता. "अंबर हा राॅबिन, आपला ह्युमनाॅईड, ही ...Read More

4

तोच चंद्रमा.. - 4

४ कृत्रिम बागेत दोन आठवड्यात मी बऱ्यापैकी रूळलो होतो चंद्रावरच्या आमच्या घरात. जेटलॅग मधून बाहेर यायला तेवढा तरी लागतोच. तरीही मेलॅटोनिनच्या गोळ्या घेत होतो. बाॅडी क्लाॅक सेट झालेले आता. इकडे सलग चौदा तासाचा दिवस नि चौदाची रात्र. मी पोहोचलो तो चांद्रदिवस होता. दिवस म्हटले की प्रचंड उष्णता.. इकडे सारी घड्याळे पृथ्वीवरच्या वेळानुसार अॅडजस्ट केलेली. त्यामुळे बारा तास झाले.. सहा वाजले.. की संध्याकाळ झाली असे समजायचे. मग अंधार पडो न पडो! घराच्या आत खास अंधाऱ्या खोल्यांची रचना केली जाते इथे. चौदा दिवसांच्या रात्रीत तर बारा तास अती तीव्र दिवे लावून दिवस केला जातो! अशी चांदरात कवी कल्पनेत किती रोमँटिक ...Read More

5

तोच चंद्रमा.. - 6

६ पुन्हा राॅबिन घरी आलो तर आई वाट पाहात होती. उगाच. अाई लोकांची ही सवयच असावी. पोर पडले.. करा काळजी. लहानपणापासूनच पाहिलेय मी. आईच्या गळ्यातला ताईत मी. मला हवे ते आई देत असेच. लाडावले होते तिने मला कदाचित पण मीच बिघडणाऱ्यांतला नव्हतो. म्हणून मी बिघडलो नसावा! आई आम्हाला सोडून इथे वर्षभर आधी कशी अाली असेल? मला आश्चर्य वाटायचे. पण बहुधा बाबांची इकडे एकटेपणाची निकड कळली असावी तिला. त्यामुळे चक्क चंद्रावर चालण्याची कसरतही शिकायला तयार झाली असणार ती. आम्ही आलो तर म्हणाली, खूप वेळ झाला रे.. हुं. बागेत बसलो होतो. गप्पा मारत. ती कृत्रिम बाग आहे ना तिकडे. छान ...Read More

6

तोच चंद्रमा.. - 7

७ पार्टी! दोनएक दिवस गेले. बाबांचा रेड अॅलर्ट संपला एकदाचा. तिकडे आॅफिसात बसून कंटाळले म्हणावे, तर आले तेव्हा एकदम खुशीत होते. काय अंबू.. अंबुजा सिमेंट .. हाऊ आर यू? बाबांची ही जुनी सवय होती.. अंबर नावाचा जमेल तितक्या पद्धतीने अपभ्रंश करायचे खुशीत आले की. कधी अंबुजा, कधी आंबोळी तर कधी अांबिल.. अंबाबाई .. अंबालिका.. कधी समानार्थी शब्दांनी मारायचे हाक.. ख.. आकाश.. नभ.. गगन.. स्काय वगैरे! असे झाले की समजावे, त्यांचा मूड चांगला आहे! मी काय.. मजेत आहे. इंटरव्ह्यूची तयारी करतोय. गुड. आज संध्याकाळी तयार रहा.. राॅबिन .. यस्सर.. अरे आज वेलकम पार्टी अाहे ह्या अंबीहळदीची. बी रेडी! यस्सर ...Read More

7

तोच चंद्रमा.. - 8

८ इंटरव्ह्यू आठवडा उलटून गेला मध्ये. म्हणजे पार्टी नंतर. दोन तीन वेळा बाहेर गेलो मी. बागेत .. एकदा असेच भटकत.. नि काहीवेळा अख्ख्या रेसिडेंशियल काॅलनीत. उगाच वर्षा कुठे भेटतेय का ते पहायला. हे चूक आहे हे कळत होते मला पण वळत नव्हते. शेवटी मला एकट्याला गाठून राॅबिन ने कानउघडणी केली.. ब्रो, व्हाॅट आर यू अप टू? कुठे काय? मी जस्ट इकडे तिकडे हिंडतोय.. अंबर, डिअर, डोन्ट लाय टू मी. तू मला नाही फसवू शकत आणि स्वत:ला ही. हे बघ तुला नव्याने सुरूवात करावीच लागेल. ज्या गावाला जायचेच नाही त्याचे तिकिट काढतोच कशाला? ज्या गोष्टीचा लाॅजिकल शेवट माहित ...Read More

8

तोच चंद्रमा.. - 9

९ ब्रुनी! नव्या नोकरीचा पहिला दिवस! सकाळ सकाळी माझा खास टाय आणि जाकिट घालून गेलो. कृष्णन माझी वाट पाहात असावेत. हॅलो यंग मॅन. वेलकम टू न्यू आॅफिस. लोढा आणि गुंदेचा बिल्डरच्या या आॅफिसात तुझे स्वागत आहे. आज आपला खास दिवस. वेलकम टू द न्यू एम्प्लाॅयी मि. अंबर राजपूत. एवढे बोलून त्यांनी बेल वाजवली. त्याबरोबर आॅफिसातून सारा स्टाफ येऊन उभा राहिला. त्यात हर्ली तर होतीच अाणि दोन मुलं नि चार मुली होत्या. बाकी सारे ह्युमनाॅईड्स. सगळ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत केले माझे. वेलकम स्पीच झाले. आॅफिसबद्दल नि कामाच्या पद्धतीबद्दल भाषणे झाली. मग समोसे आले.. चहा आला.. एक तास असा ...Read More

9

तोच चंद्रमा.. - 10

१० पुन्हा ब्रुनी! दोन दिवसांनी संध्याकाळी कृष्णन सरांनी बोलावून घेतले. यंग मॅन.. अजून गेला नाहीस? सर इट्स जस्ट फाईव्ह ओ क्लाॅक.. आय नो. पण तुझी ती पार्टी आहे ना? यस सर.. पण तुम्हाला कसे माहिती? इट्स मून यार. सगळ्यांना सगळे माहिती असते इथे. मि. कांदळगावकर इज माय गुड फ्रेंड. ही इज अ यंग टॅलेंट इन द गव्हर्नमेंट जाॅब. आहे एंटरप्रायझिंग अगदी. हीज वाईफ मस्ट बी व्हेरी लकी टू गेट समवन लाईक हिम! बिचारे कृष्णन.. किती सीधेपणाने सांगत होते! तेही वर्षाबद्दल. आणि माझ्यासमोर. इथे जुन्या मराठीत 'हाय रे दैवा' म्हटले असते कुणी. पण काय गंमत बघा.. माझ्याच ( वन वे ...Read More

10

तोच चंद्रमा.. - 11

११ एलियन! पार्टी खूपच छान झाली. ब्रुनीशी बऱ्यापैकी ओळख झाली त्या निमित्ताने. रात्री निघायला उशीर पार्टीतून. रघुवीर आणि वर्षाचा निरोप घेऊन निघालो. त्या आधी ब्रुनीशी बोलणे झाले. तिला म्युझिकची आवड फार. त्यात गिटार प्रिय तिला. माझ्या गिटारवादनावर खूश झाली ती खूपच. म्हणाली, "तुझ्या बोटांत जादू आहे. इकडे जास्त कोणी वाजवत नाहीत गिटार." वर्षा त्यात म्हणाली, "अगं ही वाॅज फेमस फाॅर हिज गिटार इन काॅलेज. आणि ते चुरा लिया है गाणं.. इट्स अ व्हेरी ओल्ड साँग.. बट ही युज्ड टू प्ले दॅट.." "ही इज टू गुड अॅट दॅट.. पण अामच्याकडे नाहीच हे वाद्य!" ब्रुनी निघता निघता म्हणाली. आमच्याकडे ...Read More

11

तोच चंद्रमा.. - 12

१२ तोच चंद्रमा नभात! घरी आलो तर आई वाटच पाहात होती. उशीर झाला रे? हो ना! अगं हा राॅबिन आला होता आॅफिसात. त्याच्या बरोबर बागेत गेलो.. गप्पा मारत बसलो तर थोडा उशीर झाला. असू देत. तुझे बाबा आज बाहेर गेलेत. त्या मून चायनाच्या मून इंडिया काऊन्सलेटमध्ये. मग तिकडे उशीर झाला तर कदाचित उद्या सकाळी येतील. आणि तू आलास ते बरे झाले.. पुस्तक लिहून झालेय माझे एकदाचे. पहिला ड्राफ्ट. वाच एकदा. मग अजून सुधारेन.. वा! बघू.. वाचतो लवकरच. जेवून घे आधी नि मग.. राॅबिन .. यस मॅडम.. डिनर मॅडम. हुं.. अंबर थकलेला दिसतोय .. एरवी राॅबिन काही न काही ...Read More

12

तोच चंद्रमा.. - 13

१३ भेट ब्रुनीची.. सात अाठ दिवस गेले मध्ये. आॅफिसच्या कामाचा डोंगर उभा समोर. इतक्या वर्षांत उंट कसे हाकावेत याची माहिती नसलेल्या कुणी मेन्टेन केलेली बुक्स. त्यातून हवी ती माहिती काढून तिची व्यवस्था लावणे कर्मकठीण. त्यामुळे ती शिस्त लावेतोवर मान मोडून कामाला पर्याय नव्हता. आणि माझ्या आवडीचे काम ते, त्यामुळे मी तसा खूश होतो. मी सारे हिशेब सांभाळण्यात सारे विसरून गेलो की काय असे वाटले एका क्षणी. राॅबिनशी पण जास्त बोलणे नाही नि ब्रुनीबद्दलही फारसा विचार नाही. रात्री येईपर्यंत थकायला होई नि मी जास्त विचार न करता ताणून देई. बिचाऱ्या राॅबिनशीही फारसे बोलणे झाले नव्हते.. त्यामुळे त्याला काय ...Read More

13

तोच चंद्रमा.. - 14

१४ नॅचरल गार्डन मध्ये दोनचार दिवस गेले असावेत. मध्ये वाटले की ब्रुनी येईल कधी, तर आली ती. तिचे आॅफिस कुठेय ठाऊक नव्हते मला. नि असते तरी मी गेलो असतो की नाही कुणास ठाऊक. अशा बाबतीत पुढाकार घ्यायचा स्वभावच नाही माझा. त्यामुळे मी बदललो कितीही तरी किती बदलणार होतो? आॅफिसच्या कामांना अंत नव्हता हे खरे. बिल्डरचे आॅफिस, त्यात बिझी प्रोजेक्ट्स. हिशेब असणारच मोठमोठे. त्यात ब्रुनीची आठवण आली तरी वेळ कुठला मिळायला. असाच कंटाळून बसलेला असताना अशातच मला रघुवीरचा फोन आला.. "कसं काय? अॅडजस्टिंग वेल?" "हुं." "काय गप्प एकदम .." "गप्प नाही, थोडा कामात बिझी.." "ओके शुड आय काॅल ...Read More

14

तोच चंद्रमा.. - 15

१५ टायटॅनियन भेट टायटन आणि आमच्या घरचे काय नाते असावे? टायटनचे शिष्टमंडळ आॅफिसच्या कामासाठी आलेले. वाकडी वाट करून आमच्या घरी यायचे काही कारण नव्हते खरेतर. पण बाबांना दुसऱ्या दिवशी सकाळी काॅल आला त्यांचा. इकडच्या लोकांशी संबंध जोडणे म्हणजे डिनर डिप्लोमसी आली! आईने आजवर टायटनचे नावही ऐकले नव्हते! खरेतर त्यांची ही पहिली भेट नव्हती चंद्रावर पण आईला ते माहिती असायचे कारण नसावे.. हे टायटन काय आहे हो? कुठल्या देशात आहे? ओळख? मी काय ओळखणार.. फार पूर्वी म्हणजे मी काॅलेजात असताना टायटन नावाची घड्याळे असायची एवढीच माहिती आहे मला. मला माझ्या बाबांनी बक्षीस दिलेले एक बीए झाले तेव्हा. राॅबिन ...Read More

15

तोच चंद्रमा.. - 16

१६ पुन्हा पुन्हा ब्रुनी! आता गोष्ट बरीच पुढे सरकली होती. विशेषतः ब्रुनी घरी आली न जे नेत्रकटाक्ष एक्सचेंज झाले त्यामुळे तर आम्ही अजून जवळ आल्यासारखे मनातून वाटत होते मला, काहीही न बोलता. तिलाही ते तसे वाटले हे मला नंतर कळाले. म्हणजे राॅबिन म्हणतो तशी आग दोन्ही बाजूंनी लागलीय तर.. ब्रुनी अाणि ते टायटॅनियन्स निघून गेले त्या दिवशी. पुढे दोन तीन दिवस असेच गेले. ब्रुनी बिझी असावी. मला पण अाॅफिसच्या रूक्ष हिशेबांत हे दिलाचे हिशेब मांडायला वेळ नाही मिळाला. मग एके दिवशी दुपारी वेळ मिळाला मला. आजवर ब्रुनीच इकडे येत होती मला भेटायला. आता माझी पाळी .. ...Read More

16

तोच चंद्रमा.. - 17

१७ जुळले सूर.. रस्ता आता सरळसोट दिसत होता. मी आणि ब्रुनी .. तिला ही मान्य माझा तर प्रश्नच नाही .. घरून माझ्या तरी काहीच प्राॅब्लेम नाही. तिच्याकडे? देवास ठाऊक, पण कॅन बी मॅनेज्ड. आता फक्त तिला गिटारीवर तिच्यासाठी म्हणून खास गाणी वाजवून दाखवणे.. आणि हिंदीत म्हणतात ना तसे चुपकेसे तिच्या दिलमें उतरणे! म्हणजे आधीच उतरलोय पण अजून ठाण मांडून बसणे! म्हणजे मुक्काम ठोकणे! माझे काय.. ती आधीपासूनच बसलीय माझ्या दिलमें. शनिवार संध्याकाळ ही अजून एक आठवणीत राहिल अशी मंतरलेली संध्याकाळ असणार .. मी ती आणि माझ्या गिटारीचे सूर. त्यातून सारी प्रेमगीते ऐकवणार मी तिला.. मी ...Read More

17

तोच चंद्रमा.. - 18

१८ ब्रुनीची होम व्हिजिट सकाळ सकाळी उठलो.. सुट्टीचा दिवस माझा. कालच्या रात्रीतले सारे आठवत होतो.. मी ब्रुनीला माझ्याच नकळत फोन लावला .. अर्धवट झोपेत असावी ती.. "हाय ब्रुनी!" "हाय.." "स्टिल स्लीपी? झोपेत आहेस?" "यस.." "कालची संध्याकाळ किती छान गेली ना?" "यस.." "मी गिटार छान वाजवतो ना?" "हो.." "राॅबिन आणि हॅवन ग्रेट आहेत ना?" "हो.." "वाटत नाहीत रोबोसारखे.." "हो ना.." "केक पण छान होता.." "हो ना.." "रघुवीर आणि वर्षा आर ग्रेट .." "यस्स.." "मी तुला काल विचारलेला प्रश्न.. त्याचे उत्तर.." "यस्स .." "थ्यांक्स ब्रुनी .. आता तू म्हणू नाही शकत की मी प्रपोज केले नि तू उत्तर ही ...Read More

18

तोच चंद्रमा.. - 19

१९ पहिले पत्र एके दिवशी सकाळी उठलो तर फॅक्स आलेला.. चांद्रभारत सरकारचा. बाॅम्बच म्हणाना. तो माझ्या नावाने. इकडची सरकारी व्यवस्था थोडी वेगळी. त्यामुळे पत्र आलेले ते अगदी डिटेलमध्ये. पृथ्वीवरच्या सरकारांची पत्रे सरकारी भाषेत नि अगदी मोजक्या शब्दांत येतात. हे पत्र आपल्याकडे असते तर.. प्रति, श्री. अंबर श्रीराम राजपूत, विषय: पृथ्वीवर परत पाठवणे बाबत चांद्रभारत सरकारच्या आदेशानुसार आपणांस सरकार विरोधी कारवायांना अनुलक्षून आपणांस पृथ्वीवर परत का पाठवणेत येऊ नये या संबंधात सक्षम अधिकारी यांचेसमोर वरील पत्राचे दिनांकापासून दहा दिवसांत उत्तर देणेचे निर्देश वरील सरकार देत आहे. याची तातडीने अंमलबजावणी न झाल्यास आपणास पृथ्वीवर परत पाठवणेचे आदेश सक्षम ...Read More

19

तोच चंद्रमा.. - 20

२० दुसरे पत्र पुढे दोन तीन दिवस असेच टेन्शन मध्ये गेले. आमच्या घराबाहेर नि ब्रुनीच्याही पाळत ठेवत होते कुणी. ब्रुनी म्हणालेली, कर नाही तर डर कशाला .. त्यामुळे धीर येत होता. पण तिला पृथ्वीवरचे वास्तव ठाऊक नाही. इथे चोर सोडून संन्याशीही सुळावर चढवू शकतो आम्ही, सोयीचे असेल तर. त्यामुळे हे असेच होईल याची खात्री नव्हती. तशातच एकदा दुसरे पत्र अाले. पूर्ण तपशीलवार होते ते.. ते पत्र टायटन वरून आलेले. टायटनच्या दूतावासातून. होते इंग्लिश मध्येच. आणि पृथ्वीवासियांच्या वागणुकीचे विश्लेषण होते त्यात.. प्रिय अंबर राजपूत यांस, मूळ पृथ्वी निवासी आणि आता चंद्रावर स्थायिक असलेल्या आपणाबद्दलच्या सकारात्मक ...Read More