सीरियल किलर

(221)
  • 177.6k
  • 34
  • 87.6k

1प्रिया ही एक इंडिपेंडेंट जर्नलिस्ट होती . तिची स्वतःची ऑनलाईन वेबसाईट होती . ती तिच्या निडरपणासाठी आणि वेळोवेळी कोणालाही न घाबरता प्रसिद्ध केलेल्या बातम्यांसाठी नेहमीच चर्चेत असायची . आज तिच्या हातात एक पेन ड्राइव्ह होता . बऱ्याच दिवसापासून ती या पेनड्राईव्हच्या मागे होती . अशा इन्वेस्टीगेटिंग रिपोर्टिंग मध्ये तर तिचा हातखंडा होता . तिने चक्क एका पोलिसाच्या तिजोरी मधूनच हा पेन ड्राईव्ह चोरला होता . पेन ड्राइव लॅपटॉपला जोडून कानाला हेडफोन लावून तिने त्या पेन ड्राईव्ह मध्ये असलेला एकमेव एकमेव व्हिडिओ प्ले केला . भारदस्त आवाज असलेला , मजबूत शरीरयष्टीचा , पंचविशीतला तरुण गडी बोलत होता" मी हवलदार धनाजी निकम

Full Novel

1

Serial Killer - 1

1प्रिया ही एक इंडिपेंडेंट जर्नलिस्ट होती . तिची स्वतःची ऑनलाईन वेबसाईट होती . ती तिच्या निडरपणासाठी आणि वेळोवेळी न घाबरता प्रसिद्ध केलेल्या बातम्यांसाठी नेहमीच चर्चेत असायची . आज तिच्या हातात एक पेन ड्राइव्ह होता . बऱ्याच दिवसापासून ती या पेनड्राईव्हच्या मागे होती . अशा इन्वेस्टीगेटिंग रिपोर्टिंग मध्ये तर तिचा हातखंडा होता . तिने चक्क एका पोलिसाच्या तिजोरी मधूनच हा पेन ड्राईव्ह चोरला होता . पेन ड्राइव लॅपटॉपला जोडून कानाला हेडफोन लावून तिने त्या पेन ड्राईव्ह मध्ये असलेला एकमेव एकमेव व्हिडिओ प्ले केला . भारदस्त आवाज असलेला , मजबूत शरीरयष्टीचा , पंचविशीतला तरुण गडी बोलत होता" मी हवलदार धनाजी निकम ...Read More

2

Serial Killer - 2

2 मर्डर केसवरती ऑफिशियली पवार साहेब आणि इस्पेक्टर पाटील साहेब होते . मी मुद्दामून पवार साहेबांची दिवशी भेट घेतली ." काय मग पवार साहेब कुठवर आला आहे तपास...? त्यांच्या घरून काही कळलं का....? " काय सांगायचं कुणालाबी विचार सगळेजण असं बोलतेय जणू काही हा पत्रकार नाही संतच होता .…. " म्हणजे कोणावर संशय वगैरे आहे का त्यांच्या घरच्यांचा.." अरे न्यूज चॅनेल वाल्यांना सांगितले ना तेच आम्हालाबी सांगितलय वेगळं काहीच सांगितलं नाही ... " म्हणजे अजून तपास काही खास नाही झाला म्हणायचा.. " नाहीरे अजून फारशी म्हणावी अशी प्रगती नाही म्हणूनच त्याच्या ऑफिसमधून उचललेल्या पुरावा तपासायचं काम दिलय साहेबांनी . पोस्टमार्टम रिपोर्ट येईपर्यंत बऱ्याच गोष्टी ...Read More

3

Serial Killer - 3

3 तो दुसरा खूनही हुबेहूब त्याच पद्धतीने झाला होता . त्याच्याही कपाळावरती आय द रेपिस्ट आणि तोंडामध्ये त्याचंच कापलेले लिंग घातलेलं होतं. तो एक कॉलेजचा विद्यार्थी होता . एवढ्याशा वयात त्याच्यावरती ही वेळ आलेली पाहून मनोमन मी त्या खून करणाऱ्या व्यक्तीचे आभार मानणार होतो याचं मला वाईट वाटलं . त्याच्या चेहऱ्याकडे बघून वाटतही नव्हतं की त्याने कोणता गुन्हा केला असेल . आता माझं स्पष्ट मत झालं की जो कोणी खून करणारा व्यक्ती आहे तो मानसिकदृष्ट्या स्टेबल नाही . बायपास रोडवरती असणाऱ्या एका शेतामध्ये त्याचे प्रेत सापडलं होतं . तो पूर्ण उघडा होता . त्याचे कपडेही त्याठिकाणी नव्हते ...Read More

4

Serial Killer - 4

4 फॉरेन्सिक रिपोर्ट वरून एक गोष्ट मात्र कळाली ती म्हणजे दोन्ही करण्याची पद्धत एकच होती . काहीही फरक नव्हता . ह्यावरून एक गोष्ट मात्र स्पष्ट होत होती ती म्हणजे दोन्ही होऊन एकाच व्यक्तीने केले होते किंवा दोघांनी मिळून दोन्ही खून केले असतील . दोन वेगवेगळ्या व्यक्तींना एकाच प्रकारचे एकाच पद्धतीने असे खून करणे कधीच शक्य नव्हते . त्यामुळे एक गोष्ट मात्र नक्की झाली ती म्हणजे पत्रकार व निखिल दोघांचा खून करणाऱ्या व्यक्ती शक्यतो एकच असावी . पण ह्या गोष्टीमुळे तर आमच्या पुढचा प्रश्न अधिकच गहन झाला , जर पत्रकार लोखंडेचा व निखिल कांबळेचा खून एकाच व्यक्तीने ...Read More

5

Serial Killer - 5

5 तीन खून झाल्यानंतर सारेजण आमच्या डिपार्टमेंटच्या डोक्यावरती बसले होते पत्रकार व न्युज चॅनलवाले वेगळं , राजकीय नेते वेगळे आणि सामान्य जनता वेगळच ओरडत होती . खून झालेली जरी गुन्हेगार असले तरी न्यायव्यवस्थेला काही किंमत आहे का नाही असे पत्रकारांची बोंबाबोंब चालू होती . नेत्यांचं आम्हाला काहीही न विचारता लवकरात लवकर तपास पूर्ण केला जाईल असे स्वतःच पत्रकारांना सांगत होते . तर सामान्य जनता वेगळ्याच मूडमधे होती . कोणी त्या खून करणाऱ्या सिरीयल किलरला सपोर्ट करत होती तर कोणी त्याला विरोध करत होते . एकंदरीत काय तर लवकरात लवकर तपास लागावा म्हणून आमच्यावरची दबाव आणला जात ...Read More

6

Serial Killer - 6

6 13 तारखेला संध्याकाळी अजून तीन खून झाले . गाव कामगार तलाठी बाबुराव माने , वकील शिंदे आणि चक्क आमदार सदाशिवराव ढोले यांचाही . हे तिघेही एकाच ठिकाणी होते . तिघांच्याही बॉडी एकाच ठिकाणी आढळल्या . त्याच्या केस संदर्भात काहीतरी चर्चा करण्यासाठी आमदार सदाशिवराव ढोले यांनी त्यांच्या स्पेशल फार्महाऊसवर त्या दोघांना बोलवलं होतं . त्याच वेळी त्या सिरीयल किलरने त्याचा डाव साधला . तिघांनाही उघड करण्यात आलं होतं . तिघांची लिंग कापून त्यांच्या तोंडात टाकली होती , आणि तिघांच्याही कपाळावरती आय एम द रेपिस्ट असं लिहिलं होतं . साधारणपणे आमदार साहेबांबरोबर त्यांचा ड्रायव्हर असतोच . पण त्यादिवशी ...Read More

7

Serial Killer - 7

7साधना बोलत होती .... आतापर्यंत झालेल्या सहा खुनामुळे तुम्हाला बराच त्रास झाला असेल तुम्हाला तपास करावा लागला असेल , पुरावे गोळा करावे लागले असतील . पण मी माझ्या गुन्ह्यांची कबुली देत आहे . हे सहा खून फक्त मी आणि मी एकटीनेच केले होते . यामध्ये दुसऱ्या कोणाचाही समावेश नाही. मी हे खून का केले या मागचे कारण म्हणजे हे सहाही लोक माझ्या दृष्टीने फारच मोठ्या गुन्ह्याचे गुन्हेगार होते , आणि त्यांना शिक्षा मिळणे न्यायव्यवस्थेत शक्य नव्हतं . त्यामुळे मी स्वतः यांना शिक्षा देण्याचं ठरवलं आणि शिक्षा दिली . आता तुमच्या पुढे सगळ्यात मोठा प्रश्न असेल तो म्हणजे मी हे सगळं कसं ...Read More

8

Serial Killer - 8

8 १३ तारखेला एकाच दिवशी चार खुन झाले होते . तीन खूण म्हणजे रेपिस्ट किलरने ( तोपर्यंत सिरीयल किलरचे नामांकन करून टाकलं होतं , रेपिस्ट किलर म्हणून ) केलेले आणि एक खूण म्हणजे साधना परांजपेचा . साधना परांजपेचा खून कोणी केला हा मात्र प्रश्न होता . मृतदेह व्यवस्थित होता . कुठे काही जखम झालेली नव्हती . प्रथम दर्शनी पाहिले असता विषप्रयोग झाल्यासारखा वाटत होता . बॉडी पोस्टमार्टम साठी पाठवण्यात आली . आता रात्री काही तपास करणे शक्य नव्हते . आम्ही आपापल्या घरी गेलो , पण दुसर्‍या दिवशी मात्र पोलीस स्टेशन वरती वादळ धडकणार होतं . दुसऱ्या दिवशी पाटील साहेबांकडून ...Read More

9

Serial Killer - 9

9 साधना परांजपेचा खून कोणी केला ही कल्पना घोळत मी घरी आलो नि सहजपणे न्यूज चॅनल . मीडिया , आजच्या काळात मीडियाचे किती महत्त्व आहे हे सांगायलाच नको . लोकांचे ब्रेन वॉशिंग करण्यापासून लोकांच्या मनात एखादी कल्पना रुजवण्यार्यंत सारे काही मीडिया करू शकते . आजची पत्रकारिता ही कशी आहे हे काही मला माहीत नाही , पण पत्रकारिता ही मनोरंजन छान करते हे मात्र मला माहित आहे. सिरीयल किलरचं नामांकन रेपिस्ट किलर म्हणून अगोदरच झालं होतं . वेगवेगळ्या चित्रपटातील वेगवेगळे सिन्स , सांडणारे रक्त , उडणारे शिंतोडे वेगवेगळे कार्टून ग्राफिक्स दाखवून न्यूज चॅनल वाले जून एक सस्पेंस थ्रिलर चित्रपटच ...Read More

10

Serial Killer - 10 - Last Part

10 १६ तारखेला सकाळी हा मृतदेह सापडला होता . हा मृतदेह आतापर्यंत सापडलेल्या सहा मृतदेह पेक्षा पूर्णपणे वेगळा . हा मृतदेह पूर्णपणे उघडा ठेवण्यात आला होता . त्याचे हात कोपरापासून कापून त्याच्या गळ्यात फुली करून अडकवण्यात आले होते . त्याच्या तोंडात कापलेले लिंग तर होतच आणि त्याच्या पोटावरती " आय एम द रेपिस्ट अँड मर्डरर "असं लिहिलं होतं . मृत व्यक्तीचे नाव होतं घनश्याम थोरात . तालुक्यातून बराच वेळ तडिपार केलेला गुंड होता . त्याच्यावर हाफ मर्डरच्या आणि बलात्काराच्या बऱ्याच केसेस होत्या , पण राजकीय नेत्यांची मदत घेऊन वेळोवेळी सुटला होता . साऱ्यांना माहित होतं त्यांनी आतापर्यंत एकूण चार खून ...Read More