अष्टविनायक

(15)
  • 87.9k
  • 4
  • 36.7k

अष्टविनायक भाग १ श्री गणेशाची असंख्य रूपे आहेत .गणपतीची महाराष्ट्रातील प्रत्येक गावात एक-दोन मंदिरे हमखास पाहण्यास मिळतात. त्या मंदिरांतून गणेशाची हजारो रूपे भाविक अनुभवतात. असे असले तरी, महाराष्ट्रातील या विशिष्ट ‘आठ’ ठिकाणच्या गणेश मंदिरांना, मूर्तींना खास महत्त्व आहे. या आठ मंदिरांस मिळून ‘अष्टविनायक’ म्हटले जाते. गणपतीच्या अनेक नावांपैकी एक नाव म्हणजे विनायक,म्हणूनच या मंदिरांचा संच म्हणजे अष्टविनायक. अष्टविनायकांची मंदिरे महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहेत. गणपती ही विद्येची देवता असून तो, सुखकर्ता, दु:खहर्ता आणि रक्षणकर्ता आहे अशी गणेश भक्तांची भावना आहे.अष्टविनायक म्हणजे महाराष्ट्रातील आठ मानाची व प्रतिष्ठेची गणपतीची देवळे आहेत.हे नवसाला पावणारे गणपती आहेत असे मानले जाते.वर्षातून

Full Novel

1

अष्टविनायक - भाग १

अष्टविनायक भाग १ श्री गणेशाची असंख्य रूपे आहेत .गणपतीची महाराष्ट्रातील प्रत्येक गावात एक-दोन मंदिरे हमखास पाहण्यास मिळतात. त्या मंदिरांतून हजारो रूपे भाविक अनुभवतात. असे असले तरी, महाराष्ट्रातील या विशिष्ट ‘आठ’ ठिकाणच्या गणेश मंदिरांना, मूर्तींना खास महत्त्व आहे. या आठ मंदिरांस मिळून ‘अष्टविनायक’ म्हटले जाते. गणपतीच्या अनेक नावांपैकी एक नाव म्हणजे विनायक,म्हणूनच या मंदिरांचा संच म्हणजे अष्टविनायक. अष्टविनायकांची मंदिरे महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहेत. गणपती ही विद्येची देवता असून तो, सुखकर्ता, दु:खहर्ता आणि रक्षणकर्ता आहे अशी गणेश भक्तांची भावना आहे.अष्टविनायक म्हणजे महाराष्ट्रातील आठ मानाची व प्रतिष्ठेची गणपतीची देवळे आहेत.हे नवसाला पावणारे गणपती आहेत असे मानले जाते.वर्षातून ...Read More

2

अष्टविनायक - भाग २

अष्टविनायक भाग २ श्रींच्या मूर्तीची आख्यायिका अशी सांगितली जाते .. फार प्राचीन काळी गंडकी नगरीत चक्रपाणी नावाचा एक थोर राज्य करीत होता. त्याला सूर्याच्या उपासनेने एक पुत्र झाला. त्याचे नाव सिंधू. सिंधुनेही सूर्याची उपासना करून अमरत्वाचा वर मिळवला. त्यामुळे सिंधू उन्मत्त झाला. अवघ्या त्रैलोक्याचे राज्य आपणास मिळावे असे त्याला वाटले. मग त्याने पृथ्वी जिंकली. इंद्राच्या अमरावतीवर त्याने स्वारी केली. इंद्राचा अगदी सहज पराभव केला. त्याने स्वर्ग व्यापला तेव्हा विष्णूने त्याच्याशी युद्ध सुरु केले. पण विष्णूलाही सिंधूचा पराभव करता येईना. सिंधूने आपल्या अतुल पराक्रमाने विष्णूला वश केले व त्याला गंडकी नगरीत राहण्याची आज्ञा केली. मग सिंधूने सत्यलोक व कैलास यांवरही ...Read More

3

अष्टविनायक - भाग ३

अष्टविनायक भाग ३ याची कथा पुराणात अशी दिली आहे. पूर्वी ब्रह्मदेव सृष्टीरचना करत असतांना मधु व कैटभ या पराक्रमी ब्रह्मदेवांच्या कार्यात विघ्ने आणून त्यांना भंडावून सोडले. त्या त्रासाला कंटाळून ब्रह्मदेव विष्णुकडे आले. आणि त्यांनी या दैत्यांचा नाश करावा अशी प्रार्थना केली. भगवान विष्णू व मधु, कैटभ यांचे युद्ध झाले. पण विष्णुंना काही यश मिळाले नाही. ते मदतीसाठी शंकराकडे आले. आपल्या गायनाने त्यांनी भगवान्‌ शंकरांना प्रसन्न करून घेतले. शंकरानी वर मागण्यास सांगितले. तेव्हा विष्णुंनी मधु,कैटभाची सर्व कथा सांगितली. भगवान शंकर म्हणाले, श्रीविनायकाला प्रसन्न करून घेतले असतेस तर तुला यापूर्वीच जय मिळाला असता. नंतर विनायकाला प्रसन्न करून घेण्यासाठी भगवान शंकरांनी विष्णुला षडाक्षरी ...Read More

4

अष्टविनायक - भाग ४

अष्टविनायक भाग ४ आपला मुलगा इतक्या लहान वयात भक्तिमार्गाला लागला आणि त्याने आपल्याबरोबर इतर मुलांनाही वाईट नादाला लावले या कल्याण शेठजींना राग आला. त्या रागाच्या भरातच ते एक भलामोठा सोटा घेऊन बल्लाळ ज्या रानात होता तेथे गेले . तेथे बल्लाळ आपल्या सवंगड्यांसह गणेशमूर्तीची पूजा करीत होता. सारेजण गणेशाचे भजन करीत होते. बल्लाळ गणेशाच्या ध्यानात अगदी रंगून गेला होता. ते पाहून कल्याण शेठजींच्या पायाची आग मस्तकाला गेली, त्यांनी धावत जाऊन ती पूजा मोडून टाकली. गणेशाची मूर्ती फेकून दिली. इतर मुले भीतीने पळून गेली,पण बल्लाळ मात्र गणेश ध्यानात मग्न होता. कल्याण शेठजीने बल्लाळास सोट्याने झोडपून काढले. बल्लाळ रक्तबंबाळ झाला, बेशुद्ध पडला, ...Read More

5

अष्टविनायक - भाग ५

अष्टविनायक भाग ५ इकडे त्या मुकुंदेची अवस्था लक्षात घेऊन इंद्राने रुक्मांगदाचे रूप घेतले व मुकुंदेची इच्छा पूर्ण केली. त्याच्यापासून पुत्र झाला. त्याचे नाव गृत्समद. हाच तो ऋग्वेदातील प्रसिध्द मंत्रदृष्टा व द्वितीय मंडळाचा कर्ता. गृत्समदाच्या जन्माची कथा सर्वांना माहित झाली होती. त्यामुळे त्याचा पदोपदी पाणउतारा होऊ लागला. मातेच्या पापाचरणामुळे सर्वजण गृत्समदाला हीन लेखू लागले. तेव्हा गृत्समदाने आईकडून सत्य जाणून घेतले व तिला शाप दिला. मग तो पापक्षालनार्थ पुष्पक (भद्रक) वनात तप करू लागला. त्याने विनायकाची आराधना केली. त्यामुळे विनायक प्रसन्न झाला. विनायकाने त्याला वर मागण्यास सांगितले. तेव्हा तो म्हणाला, ''तु याच वनात वास्तव्य करून भक्तांच्या इच्छा पूर्ण कर.'' विनायकाने ते ...Read More

6

अष्टविनायक - भाग ६

अष्टविनायक भाग ६ १०० वर्षांनंतर पेशव्यांनी तेथे भव्य व आकर्षक मंदिर व सभागृह बांधले. हे मंदिर पूर्णपणे लाकडापासून बनवले त्याकाळी हे मंदिर बांधायला ४० हजार रूपये लागले होते. युरोपीयन लोकाकडून पेशव्यांना पितळाच्या दोन मोठ्या घंटा मिळाल्या होत्या. त्यातील एक महाडला असून दुसरी येथे आहे. चिंतामणी हे श्री माधवराव पेशवे यांच्या घराण्याचे कुलदैवत आहे. पेशव्यांच्या घरातील अनेक जण थेऊरला सतत येत असत. पेशवे घराणे खूप मोठे गणेशभक्त होते. थोरले माधवराव पेशवे या गणपतीच्या दर्शनास वारंवार येत असत . त्यांनी आपल्या काळात या मंदिराचा सभामंडप बांधला आणि मंदिराचा विस्तार केला .देवाचे सानिध्य लाभावे म्हणून देवळाजवळच राहण्यासाठी एक वाडाही त्यांनी बांधला होता ...Read More

7

अष्टविनायक - भाग ७

अष्टविनायक भाग ७ असेसुद्धा मानले जाते की पांडवांनी या गुहा त्यांच्या वनवास काळात घडविल्या. इथे मुख्य मंडप असून त्याला मंडप म्हणतात आणि त्याला १८ लहान खोल्या असून यात्रेकरू इथे बसून ध्यान करू शकतात. येथील गणेशमुर्तीच्या डोळ्यांमध्ये माणिक आहेत. हा श्री गणेश डाव्या सोंडेचा आहे. गणपती मंदिरा बाहेरील कुंडात बाराही महिने थंड पाणी असते. अष्टविनायकांपैकी हे एकच मंदिर आहे जे पर्वतावर असून ते १८ गुहा असलेल्या एका बौद्ध गुहांच्या संकुलात स्थित आहे. हे गणेश मंदिर ८ व्या गुहेत आहे. या मंदिरामुळे या गुहांना गणेश लेणी असेसुद्धा संबोधिले जाते. श्री क्षेत्र गिरिजात्मकाची कथा अशी आहे .. गणेश पुराणानुसार देवी सतीने पार्वतीचा ...Read More

8

अष्टविनायक - भाग ८ (अंतिम भाग)

अष्टविनायक भाग ८ विघ्‍नासूराची ही विनंती गणपतीने मान्य केली व तो या ठिकाणी विघ्नहर या नावाने वास्तव्य करू लागला. येथील दर्शनाची वेळ सकाळी ५ ते रात्री ११. अंगारकी चतुर्थीला सकाळी ४ पासून रात्री ११ पर्यंत. महाआरती सकाळी ७.३०, मध्यान्ह आरती दुपारी १२ आणि शेजारती रात्री १० वाजता असते. महाप्रसाद सकाळी १०, दुपारी १ आणि संध्याकाळी ७.३० ते १०.३० असतो . भाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थी आणि माघ महिन्यात गणेश जयंती यादिवशी उत्सव साजरे केले जातात. कार्तिक पौर्णिमेला दीपमाळांची रोषणाई बघण्यासारखी असते. अष्टविनायकापैकी सर्वात श्रीमंत गणपती म्हणून श्री विघ्नेश्र्वराला ओळखले जाते. आठवा गणपती अष्टविनायक यात्रेतील आठवे मंदिर हे महागणपतीचे असून ते ...Read More