एडिक्शन

(154)
  • 159.6k
  • 34
  • 83.7k

मुंबई ...स्वप्ननगरी ...इथे प्रत्येक व्यक्ती काही स्वप्न घेऊन येतो ..काहींची स्वप्न पूर्ण होतात तर काहींना खाली हातानेच घरी परताव लागत ..तस या शहराने लोकांना खूप काही दिलं ..जेव्हा आयुष्यात काहीच करण्याची आशा उरत नाही तेव्हा तो मुंबईची वाट धरू लागतो ..स्वाभाविकच मुंबई कुठलाही भेदभाव न करता त्यांना सामावून घेते ..शिवाय इथे जो व्यक्ती हरतो तो देखील अनुभवाची सुंदर शिदोरी घेऊन नव्या प्रवसात स्वताला गुंफून घेतो ..अशी ही मुंबई .. अशाच एका दिवशी मी इथे आलो आणि याच मुंबईचा भाग होऊन बसलो ..मी प्रेम ...गेल्या 4 वर्षांपासून इथे राहतो आहे ..या शहराने तस मला खूप काही दिलं अगदी

Full Novel

1

एडिक्शन - 1

मुंबई ...स्वप्ननगरी ...इथे प्रत्येक व्यक्ती काही स्वप्न घेऊन येतो ..काहींची स्वप्न पूर्ण होतात तर काहींना खाली हातानेच घरी परताव ..तस या शहराने लोकांना खूप काही दिलं ..जेव्हा आयुष्यात काहीच करण्याची आशा उरत नाही तेव्हा तो मुंबईची वाट धरू लागतो ..स्वाभाविकच मुंबई कुठलाही भेदभाव न करता त्यांना सामावून घेते ..शिवाय इथे जो व्यक्ती हरतो तो देखील अनुभवाची सुंदर शिदोरी घेऊन नव्या प्रवसात स्वताला गुंफून घेतो ..अशी ही मुंबई .. अशाच एका दिवशी मी इथे आलो आणि याच मुंबईचा भाग होऊन बसलो ..मी प्रेम ...गेल्या 4 वर्षांपासून इथे राहतो आहे ..या शहराने तस मला खूप काही दिलं अगदी ...Read More

2

एडिक्शन - 2

मी हळूहळू पावले टाकत तिच्याकडे जाऊ लागलो ..ती काहीच अंतरावर होती ...तिला येताना पाहून मला माझ्याच डोळ्यांवर विश्वास बसत शेवटी नशिबाने देखील माझ्या प्रयत्नांसमोर हार मानली आणि आम्ही भेटलो ..पण ती येत असताना तिचे पाय लडखडू लागले.. बहुदा आज तिने फार जास्त प्रमाणात नशा केली होती अस तिच्या वागण्यावरून जाणवू लागल..कपड्यांवर चिखलाचे डाग स्पष्ट दिसत होते ..तरीही तिला त्याची काहीच पर्वा नव्हती ..मी पुन्हा समोर चालू लागलो ..त्याचक्षणी तिचा पाय अडखडावा आणि ती लगेच माझ्या मिठीत आली आणि शायर नसलेल्या मला लगेच शायरी सुचली .. लफजो से कैसे बया करू तेरे चेहरे की ये सादगी अब लगता ...Read More

3

एडिक्शन - 3

विवाहापूर्वी पाहिलेली तिची सारी स्वप्न आता गळून पडाली ..लग्नानंतर काही दिवस तरी मुलीच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यालायक असतो पण ईथे तो काही दिवसातच दूरवर उडून गेला ..सारी स्वप्न , साऱ्या अपेक्षा फोल ठरल्या आणि ते जीवन एक श्राप वाटू लागला तरीही ती जगत होती ..एक श्राप बनून एका दिवसाची गोष्ट ..ती राजकुमारी घरकाम करत बसली होती आणि तेवढ्यात तो राजकुमार आला ..आज त्याने खूप जास्त दारू प्यायली होती त्यामुळे त्याला स्वतःचाच भान नव्हतं ..समोर काही अंतरावरच त्याची आईदेखील बसून होती ..त्याने बॅग ठेवली आणि सरळ किचनमध्ये गेला ..ती काम करत असताना तिच्या शरीराच्या प्रत्येक भागाला तो स्पर्श करू ...Read More

4

एडिक्शन - 4

श्रेयसी स्वतःच्या आईला विसरून आता नव्याने जीवन जगू लागली ..आजीने तीच शाळेत नाव टाकलं आणि ती शाळेत जाऊ लागली शाळेत असली की तिला बर वाटायचं पण घरी आल्यानंतर वडिलांचा रागीट चेहरा पाहिला की मग मात्र अवसान गळायच ..सायंकाळी स्वयंपाक बनविताना थोडा वेळ मस्ती - मजाक करण्यात जायचा ..त्याच वेळात ती आजीकडून स्वयंपाक देखील शिकू लागली ..हे काही क्षण म्हणजेच तिच्यासाठी काय तो आनंद ..श्रेयसीची आई पळून गेली होती त्याचा संपूर्ण राग तिच्यावर निघायचा शिवाय ती आपल्यापेक्षा लहान मुलासोबत पळून गेल्यामुळे श्रेयसीसुद्धा त्याचीच मुलगी असल्याची शंका त्याच्या मनात निर्माण झाली होती आणि म्हणूनच तो पुन्हा - पुन्हा तिच्याशी वाईट ...Read More

5

एडिक्शन - 5

माझ्या प्रश्नावर ती हसत म्हणाली , " हो ...हो ..थांब जरा ..सांगते आहे ...बाबा तर गेले पण मी मात्र पोरकी झाले ..किरायाच घर असल्याने ते देखील खाली करावं लागलं ..त्यामुळे घराबाहेर पडण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नाही ..मी पहिल्यांदाच या चार भिंतीच्या बाहेर पडणार होते ..काय करू ? ...कुठे जाऊ ??.....असे कितीतरी प्रश्न समोर होते पण तरीही निघाले एकटीच ..एका अनोळखी जागेवर स्वताच अस्तित्त्व शोधण्यासाठी .. कधीतरी मुंबईच नाव एकल होत ..मुंबई म्हणजे स्वप्नांच शहर ..एकल होत की ईथे प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न पूर्ण होतात त्या स्वप्न पूर्ण करणार्यात मीही सामील झाले ..स्वतःकडे थोडे फार पैसे होते त्या भरवशावर ...Read More

6

एडिक्शन - 6

तीच सर्व काही बोलून झालं होतं आणि अचानक शब्द बाहेर आले , " रिअली ग्रेट यु आर !! फार तू आयुष्यात तरीही इतकी खंबीर आहेस हे पाहून फारच अभिमान वाटतो तुझा .." " अस काहीच नाही रे ..ए पण आज पहिल्यांदाच कुठल्यातरी मुलाला रडताना पाहिलं ..मूल पण रडतात का रे " , ती एकाच वाक्यात बोलून गेली .. त्यावर मी उत्तरलो , " हो रडतात ग !! त्यांना पण भावना असतातच की फक्त ते रडणं जगासमोर नको असत कारण लहानपापासूनच त्यांना कठोर राहण्याची शिकवण मिळाली असते सो एकट्यातच रडतात . " बोलता - बोलता बराच वेळ ...Read More

7

एडिक्शन - 7

सकाळी साडे दहापासून तर सायंकाळी पाचपर्यंत काम करावं लागायचं त्यामुळे जेमतेम अडीच तास कॉलेज करायचो ..आज कॉलेजचा पहिला दिवस तयारी करून सकाळीच कॉलेजला पोहोचलो ..पंकजने एम.ए.ला प्रवेश घेतला असल्याने तो माझ्यासोबत नव्हता आणि बरेच दिवस अभ्यासात खंड पडल्याने काहीच येणार नव्हतं हेदेखील माहिती होत त्यामुळे सर्वात शेवटचा बेंच पकडून बसलो ..बुक काढलं आणि काहीतरी लिहीत होतो ..तेवढ्यात ती येताना दिसली ..तिने लांबवर नजर टाकावी आणि मी दिसलो आणि तिची पावले माझ्याकडे वळू लागली ..कालच्या प्रसंगाने आधीच फजिती झाली होती त्यामुळे हृदयात आणखीच धडधड वाढू लागली ..आज पून्हा एकदा इज्जतीचा भाजीपाला होणार असल्याची खात्री पटू लागली आणि मान खाली ...Read More

8

एडिक्शन - 8

रोज डे ..आमच्या कॉलेजमयीन जीवनातला सर्वात सुंदर दिवस ...प्रत्येकाला त्या दिवसाची आवर्जून वाट असायची ..तसा तो आमच्या जीवनातही खास ...निशा कॉलेजमध्ये सर्वात फेमस त्यामुळे सर्वांच्या नजरा तिच्यावर असायच्या तर मी तिची शेपटी ..कुठेही असलो की दोघे सोबत दिसायचोच ..त्यामुळे कपल नसताना देखील लोक आम्हाला कपल म्हणत होते ..रोज डे असल्यामुळे मी तिचा पिऊन म्हणून काम सांभाळत होतो ..तिला येणारा प्रत्येक मुलगा गुलाब देऊन जायचा आणि तीही तो प्रत्येक गुलाब माझ्याकडे सोपवायची ..गुलाब देणारे आणि गुलाब यांची संख्या इतकी वाढली की हातात गुलाब मावेना ..त्या दिवसाचा रंग तिच्या चेहऱ्यावर पुरेपूर खुलला होता आणि मी अगदी जवळून ते पाहू लागलो ...Read More

9

एडिक्शन - 9

हळूहळू दिवस जाऊ लागले आणि शेवटी कॉलेज संपण्याच्या वाटेवर आल..कॉलेज जीवनातला शेवटचा आणि आठवणीतला प्रसंग म्हणजे स्नेहसंमलेन ..मला लहानपणापासूनच गायला आवडत असे त्यामुळे गितार वाजवायला शिकून घेतली होती ..निशाही बऱ्याचदा स्टेजवर गायली होती ..मी तिच्यासोबत एकदा गावं अशी तिची इच्छा असल्याने मी तिच्यासोबत गायला तयार झालो होतो ..एक्ससायटमेंट तर होतीच पण भरपूर दिवसाने गाणार असल्याने भीतीही वाटत होती आणि शेवटी नाव अनाउंस झालं आणि आम्ही स्टेजवर पोहोचलो ..मी माझी पोजिशन घेतली आणि एक लांब श्वास घेऊन गायला सुरुवात केली ..थोडा सा प्यार हुआ है थोडा है बाकीथोडा सा प्यार हुआ हैथोडा है बाकी ..हम तो दिलं दे ही चूकेबस ...Read More

10

एडिक्शन - 10

काही दिवसावरच निशाचा साखरपुडा येऊन ठेपला होता ...लग्न लवकरच असल्याने लग्नाची आणि सगाईची एकत्रच तयारी सुरू झाली होती त्यात कपडे खरेदी करायला जाणार होते ,..लग्नपत्रिका असो की ऑफिसच काम सध्या मी बराच व्यस्त झालो त्यामुळे त्यादिवशी ऑफिसलाच काम करत बसलो होतो ..तेवढ्यात निशाचा फोन आला..तिने कपडे खरेदी करण्यासाठी मला बोलविल होत पण मला तिच्यापासून दूर राहायचं असल्याने मी कामाचा बहाणा देऊन जाण्यास नकार दिला आणि तिने रागाने फोन खाली ठेवून दिला ..थोड्याच वेळात सरानी मला केबिनला बोलविल आणि शॉपिंगला जाण्याचा वरून आदेशच आला त्यामुळे नाईलाजाने का होईना जावं लागलं ..या संपूर्ण काळात मी निशाच्या फॅमिलीच्या फारच जवळ ...Read More

11

एडिक्शन - 11

माझी कथा एकूण तिच्या डोळ्यात देखील पाणी आलं होतं ..माझ्या मनाची दशा ती फार उत्तम रीतीने समजून घेऊ शकली ..तिनेही आयुष्यात भरपूर दुःख सहन केले असल्याने ती माझ्याशी समरस झाली होती ..ती डोळ्यातले अश्रू पुसत मला पुन्हा एकदा म्हणाली , " निशा नाही बोलत का आता तुझ्याशी ? " आणि मी शांत होत म्हणालो .. , " बोलतो ग !! आताच काही दिवसाआधी तिने मला फोन केला होता ..तू मामा होणार आहेस ही खूषखबरी द्यायला ...योगेशला देखील तिने याबद्दल आधी सांगितलं नव्हतं ..आई होण्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर त्याक्षणी प्रत्यक्ष जाणवत होता ..ती कितीतरी वेळ एकटीच बोलत होती आणि मी ...Read More

12

एडिक्शन - 12

तारीख 3 जून ..तिने गिफ्ट दिलेला पांढरा शर्ट परिधान करून मी अगदी सकाळी - सकाळीच तिच्या घरी पोहोचलो ..सकाळची असल्याने ती झोपूनच असेल याची खात्री होती आणि झालं देखील तसच ..मी कितीतरी वेळेपासून दरवाजावर बेल वाजवत होतो पण ती होती की दरवाजा काही खोलेना ..काहीच क्षणात दरवाजा खोलल्या गेला आणि आळस देतच ती म्हणाली , " काय आहे राव !!! किती वेळ आणखी बेल वाजवणार ..सुखाने झोपू पण देत नाही लोक .." तिने माझ्याकडे पाहिलं देखील नाही आणि बोलू लागली आणि मला हसू आवरेना कारण मॅडम आज अगदी भूतनिसारख्या दिसत होत्या ..मी जोराने हसू लागताच तीच माझ्याकडे लक्ष ...Read More

13

एडिक्शन - 13

इकडे मला समाधानाची झोप लागली होती तर दुसरीकडे श्रेयसी काही झोपणार नव्हती ..आज घडलेला प्रत्येक प्रसंग तिच्या डोळ्यांसमोर उभा लागला होता ..काकूच्या शब्दांनी तिच्यावर जादू केली होती ..गेली कित्येक वर्षे ज्या भावनेपासून ती दूर होती ..त्याच भावनांनी तिच्या मनावर संपूर्ण मनावर ताबा मिळविला होता ..वैश्येलाही प्रेम होऊ शकत का ? ..हा राहून - राहून तिला प्रश्न पडून जात होता ..तीच माझ्यावर नक्कीच प्रेम होतं पण मी एका वैश्येला स्वीकारेल का हा प्रश्न तिला सतावू लागला होता ..तिचा माझ्यावरचा विश्वास सांगायचा की मी तिला नक्कीच स्वीकारेल पण त्याच्या घरच्यांचं काय , त्याने मला स्वीकारल्यावर हे जग त्याला ना ...Read More

14

एडिक्शन - 14

डॉक्टर बाहेर आले आणि त्यांनी तोंडावरून मास्क काढला ..मी लगेच त्यांच्या जवळ पोहोचलो आणि ते ओरडतच म्हणाले , " काय आहे हे ? ..किती ड्रग्स घेतले तिने आणि तुला पाहता पण आलं नाही का तिच्याकडे ? " " सॉरी सर मी बाहेर होतो.. काही वेळापूर्वीच आलो ..ती अशा अवस्थेत दिसली आणि लगेच तिला इकडे घेऊन आलो ..मला याबद्दल काहीच माहिती नव्हतं ..सॉरी सर ..पण तिला काही झालं तर नाही ना ? " , मी म्हणालो ..आणि डॉक्टर म्हणाले , " यावेळी तर वाचली पण पुढच्या वेळी वाचणार नाही हे लक्षात घे शिवाय पोलिस कंप्लेट पण करावी लागेल ड्रग्सची ...Read More

15

एडिक्शन - 15

मी 5 दिवसासाठी घरी जानार असल्याने आवश्यक तेवढे कपडे बॅगमध्ये भरले होते ..फ्लाइटला भरपूर वेळ होता त्यामुळे आरामशीर बसून तेवढयात श्रेयसीचा फोन आला आणि म्हणू लागली , " प्रेम आहेस तरी कुठे ? मी केव्हाची तुझी वाट पाहत आहे आणि तू आहेस की आलाच नाहीस .." मी घड्याळात बघितलं तर फक्त 10 .30 वाजले होते त्यामुळे तिच्यावर हसू लागलो ..मला हसू आवरणच होत नव्हतं तरीही स्वताला आवरत म्हणालो , " काय ग एवढ्या लवकर कुठे गेलीस तिथे ..12 .30 ला आहे न फ्लाइट .." आणि ती रागावत म्हणाली , " शहाण्या आधी हसन बंद कर ..मलाही माहीत आहे ...Read More

16

एडिक्शन - 16

गावावरून परत आल्यावर श्रेयसीच्या स्वभावात फार फरक जाणवला होता ..तिने बऱ्याच दिवसांनी भरलेलं कुटुंब पाहिल्याने ती त्यातच गुंतली होती ऑफिसच काम नियमित सुरू झालं होतं ..श्रेयसीला आधी जगण्याची इच्छा नव्हती पण आता तिला प्रत्येक क्षण जगावासा वाटत होता ..मी सावलीप्रमाणे तिच्यासोबत असायचो आणि ती माझ्या सोबत असायची .. ऑफिसच काम सुरू होऊन काही दिवस झालेच होते की एक खूषखबरी मिळाली ..निशाणे एका गोंडस बाळाला जन्म दिला होता ..सरांना जशी बातमी मिळाली तसच त्यांनी मला बोलवून घेतलं आणि आम्ही दोघेही हॉस्पिटलला पोहोचलो ..तिच्या कुटुंबातले सर्व लोक तिला येऊन भेटत होते आणि मी बाहेरून तिला पाहू लागलो ..योगेशच्या हातात ...Read More

17

एडिक्शन - 17

वरून जो नकार वाटत होता तो मुळात नकार नव्हताच ..तिने मला त्रास होऊ नये म्हणून स्वतःच्या अथांग प्रेमाचा त्याग होता ..त्यामुळे तिच्या शब्दांसमोर मी काहीच बोलू शकलो नाही परंतु मला विश्वास होता की तिचा नकार काही दिवसात होकारात बदलणारच आहे ..तिच्या प्रेमात तडफडणारा मी दिसतोय की बोलणं देणारा समाज यावरच आता आमचं भवितव्य अवलंबून होत ..त्यामुळे वाट पाहण्याशिवाय माझ्या हाती काहीच उरलं नव्हतं .. तिला मनातलं संगीतल्यापासून सर्व काही बदललं होत ..श्रेयसी जी मला रोज फोन करायची तिने आता फोन करनच सोडून दिलं होतं ..बहुतेक ती माझ्यात गुंतत जाईल आणि गुंतली की बाहेर निघता येणार नाही ...Read More

18

एडिक्शन - 18

जे काम मी करू शकलो नव्हतो तेच काम करण्यास नशिबाने साथ दिली आणि ती माझ्या घरी आलीच ..ती आल्यानंतर कोर्टात अर्ज दिला आणि एका महिन्याने दोघांनी लग्न देखील केलं ..तिने निर्णय जरी घेतला असला तरी ते निभावणं तिला इतकं सोपं कधीच जाणार नव्हतं ..तिला घरी आणलं आणि हक्काचं स्थान दिल ..आमच्या नात्याबद्दल फक्त आम्हा दोघांनाच माहिती होत ..काही दिवसात घरच्यांना सांगणं भाग होत पण त्याआधी श्रेयसीला सांभाळणं फार गरजेच होत ..मला जमेल तशी तिची काळजी घेऊ लागलो पण तिला ड्रग्सची सवय झाली असल्याने तिला राहणं अशक्य होऊ लागलं होतं ..मी रात्री तिच्या सोबत असायचो पण दिवसभर ती ...Read More

19

एडिक्शन - 19

बंगलोरवरून फोन आला होता पण त्यांनी श्रेयसीबद्दल काहीच सांगितलं नव्हतं ..त्यामुळे मनात भीती होती ...आजची रात्र मला काही झोप नव्हती त्यामुळे मागे घडलेल्या दोन वर्षांच्या आठवणीत रमू लागलो ..जेव्हा निशा आयुष्यातून निघून गेली तेव्हा कधीच वाटलं नव्हतं की मलाही पुन्हा एकदा प्रेम होईल ..पण ते झालं आणि श्रेयसी माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग झाली ..आपल्याला समजून घेणारी एखादी व्यक्ती पुन्हा आयुष्यात आली की नक्कीच व्यक्ती नव्याने प्रेमात पडू शकतो हे मात्र पटलं ..आणि समाजाच्या मर्यादा ओलांडून प्रेमाला जपायला शिकलो ..प्रेम असतच अस ..कुछ होश नही रहताकुछ ध्यान नही रहताइनसान मोहब्बत मे इनसान नही रहता सकाळच्या सुमारास कशीतरी झोप लागली ..सकाळी ...Read More