आला श्रावण मनभावन

(1)
  • 61.1k
  • 1
  • 22.3k

आला श्रावण मनभावन भाग १ श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार वर्षातला पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावणामध्ये पावसाच्या दोन जोरदार सरींच्या दरम्यान चक्क ऊन्ह पडते. दिवसभर हा ऊन-पावसाचा खेळ चालू असतो. श्रावणाचे ऊन नेहमीच कोवळे असते.श्रावणाच्या आगमाने अवघी सृष्टी हिरवीगार झालेली असते . वेगवेगळी फुलेही उमललेली असतात . त्यांवर भिरभिरणारी फुलपाखरे बघतांना मन सुखावते. त्याचे मनमोहक रंग जणू सर्वांवर मोहिनीच घालतात. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा/सणांचा राजा म्हटले जाते. श्रावण महिन्यातील प्रत्येक वारी कोणत्या ना कोणत्या देवतेची पूजा वा व्रत करण्याची

Full Novel

1

आला श्रावण मनभावन भाग १

आला श्रावण मनभावन भाग १ श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार वर्षातला पाचवा महिना आहे. या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावणामध्ये पावसाच्या दोन जोरदार सरींच्या दरम्यान चक्क ऊन्ह पडते. दिवसभर हा ऊन-पावसाचा खेळ चालू असतो. श्रावणाचे ऊन नेहमीच कोवळे असते.श्रावणाच्या आगमाने अवघी सृष्टी हिरवीगार झालेली असते . वेगवेगळी फुलेही उमललेली असतात . त्यांवर भिरभिरणारी फुलपाखरे बघतांना मन सुखावते. त्याचे मनमोहक रंग जणू सर्वांवर मोहिनीच घालतात. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा/सणांचा राजा म्हटले जाते. श्रावण महिन्यातील प्रत्येक वारी कोणत्या ना कोणत्या देवतेची पूजा वा व्रत करण्याची ...Read More

2

आला श्रावण मनभावन भाग २

आला श्रावण मनभावन भाग २ यानंतर येतो मंगळवार या दिवशी मंगळागौर पूजन करतात . हे हिंदू धर्मातील एक व्रत ते श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी नवविवाहित महिलेने लग्नानंतर पहिली पाच वर्षे करावयाचे असते. यासाठी अशाच इतर नवविवाहितांनाही बोलावून सकाळी एकत्रित पूजा करतात. सकाळी स्नान करून पूजा करण्यात येते.त्यात मंगळागौर म्हणजे पार्वतीची धातूची मूर्ती (बहुधा, अन्नपूर्णा या पार्वतीच्या रूपाची) मांडण्यात येते. शेजारी महादेवाची पिंडही ठेवतात.मंगळागौरीची षोडषोपचार पूजा करतात. याला सर्व प्रकारची फुले व मिळतील तितक्या झाडांची पत्री अर्पण केली जाते . पत्री पूजा म्हणजे वेगवेगळ्या झाडांच्या पत्री (पाने) व फुले या पूजेत वापरली जातात. ही झाडे औषधीदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची म्हणून आयुर्वेदात ...Read More

3

आला श्रावण मनभावन भाग ३

आला श्रावण मनभावन भाग ३ मंगळागौरीची कथा अशी सांगतात . आटपाट नगर होतं. तिथं एक वाणी होता. त्याला कांहीं नव्हता. त्याच्या घरीं एक गोसावी येई. ‘अल्लख’ म्हणून पुकार करी. वाण्याची बायको भिक्षा आणी. पण “निपुत्रिकाच्या हातची भिक्षा घेत नाही, असें म्हणून तो निघून जाई . ही गोष्ट तिनं नवर्‍याला सांगितली. त्यानं तिला युक्ती सांगितली. “दाराच्या आड लपून बस, ‘अल्लख’ म्हणतांच सुवर्णाची भिक्षा घाल.” तिने अशी भिक्षा झोळींत घातली. गोसावीबुवाचा नेम मोडला. तो बाईवर फार रागावला. ‘मूलबाळ होणार नाहीं’ असा शाप दिला. तिनं त्याचे पाय धरले. गोसावीबुवांनी उःशाप दिला. ते म्हणालें, “आपल्या नवर्‍याला सांग. निळ्या घोड्यावर बस.निळी वस्त्रं परिधान कर. ...Read More

4

आला श्रावण मनभावन भाग ४

आला श्रावण मनभावन भाग ४ श्रावणातील प्रत्येक बुधवारी बुधाची आणि गुरुवारी बृहस्पतीची म्हणजे गुरुची पूजा केली धनसंपदा, बुद्धिचातुर्य, विद्याधन हे सर्वांनाच हवे असते. ते देण्याबद्दल ज्यांचा लौकिक आहे अशा बुध आणि बृहस्पती ह्यांची ही पूजा अनेक घरात पूर्वापार परंपरेने केली जाते. बुध ग्रहाला भाग्याचा म्हणजे नशिबाचा अधिपती असे म्हणतात, म्हणून या बुधग्रहाची भक्ती करावी. भक्ती किंवा उपासना मनापासून केल्याने अगदी अशक्य असलेल्या गोष्टीही शक्य होतात. चांगले भाग्य येण्यासाठी बुधाची उपासना करावी, आणि कोणतेही चांगले काम सिद्धीस जाण्यासाठी अकरा पांढरे बुधवार करावेत. बुधवार हा महालक्ष्मीचा वार आहे. अकरा बुधवारी पांढरी फुले वाहून महालक्ष्मीची पूजा केली जाते . हे अकरा ...Read More

5

आला श्रावण मनभावन भाग ५

आला श्रावण मनभावन भाग ५ श्रावणी शुक्रवार हा श्रावण महिन्यातील शुक्रवारचा दिवस आहे. या दिवशी जिवतीचा कागद पूजा केली जाते . जिवतीच्या चित्रात लेकुरवाळी सवाष्ण दाखवलेली आहे .तसेच पुराणातील नरसिंह व इतर कथांची पण चित्रे आहेत . आपल्या मुला बाळांच्या सुखासाठी व दीर्घ आयुष्यासाठी हे शुक्रवार केले जाते . महालक्ष्मीला पुरणावरणाचा नेवेद्य दाखवला जातो . पुरणाच्या दिव्यांनी तिची आरती केली जाते . सवाष्ण बाईला महालक्ष्मी समजून जेवायला घातले जाते व नंतर तिची ओटी भरली जाते . संध्याकाळी जवळच्या बायका हळदी कुंकवाला बोलावून त्याना फुटाणे व दुध साखर प्रसाद म्हणून दिला जातो . याची कहाणी अशी आहे आटपाट नगर ...Read More

6

आला श्रावण मनभावन भाग ६

आल श्रावण मनभावन भाग ६ हा श्रावणातला शनिवार असतो .या दिवशी शनिदेवाची उपासना केली जाते .आयुष्यातली पिडा दूर होण्यासाठी उपासना जरूर असते .या दिवशी उपास करून शनिमहात्म्य वाचले जाते .याची कहाणी अशी आहे आटपाट नगर होतं. तिथं एक आपला गरीब ब्राह्मण राहात होता. त्याला तीन सुना होत्या. पावसाळ्या दिवशीं तो लवकर उठे. सकाळींच जेवी, लेकी सुनांसोबत शेतावर जाई. धाकट्या सुनेला मात्र घरीं ठेवीं. एकदा तो आपला नित्याप्रमाणं शेतावर गेला. जातांना घरी सुनेला सांगितलं. “मुली मुली, आज शनिवार आहे. माडीवर जा. घागरीमडक्यांत कांहीं दाणे पहा. थोडेसे काढ. दळून त्याच्या भाकर्‍या कर. केनीकुर्डूची भाजी कर. तेरड्याचं बीं वाटून ठेव.” सुनेनं ...Read More

7

आला श्रावण मनभावन भाग ७

आला श्रावण मनभावन भाग ७ श्रावणातील प्रत्येक शनिवारी अश्र्वत्थाची पूजा करण्याची प्रथा आहे. दुधामध्ये बेलाचे पान घालून ते पिंपळाच्या मुळात घालावे. त्यामुळे त्या दुधाचा सुगंध पिंपळाला मिळतो. पिंपळाची पूजा करणे म्हणजे विष्णूपूजा करणे असे मानले जाते. पिंपळाच्या खाली मारुती असल्यास त्याचीही पूजा करण्याची प्रथा आहे. तसेच मारुती नसल्यास पिंपळाची आणि मारुतीची अशा वेगवेगळ्या पूजादेखील केल्या जातात. मारुतीचा वार शनिवार. त्यामुळे श्रावणात मारुतीरायाला न विसरता तेल, शेंदूर, रुईच्या पानांची माळ मोठ्या प्रेमाने घातली जाते. पिंपळाच्या पूजेने सर्व तऱ्हेच्या पीडांचा परिहार होतो असा समज आहे त्याबद्दलची एक कथा पद्यपुराणात आढळते. कथा अशी आहे एकदा भगवान विष्णूने धनंजय नामक विष्णूभक्त ब्राह्मणाची सत्त्वपरीक्षा ...Read More

8

आला श्रावण मन्भावान भाग ८ - अंतिम भाग

आला श्रावण मनभावन भाग ८ श्रावणातला रविवार या दिवशी सूर्यपूजा केली जाते श्रावणाच्या केवळ पहिल्या रविवारी हे व्रत करण्याची आहे. हे स्त्रियांनी करावयाचे व्रत आहे. स्नानानंतर विड्याच्या पानावर सूर्याचे चित्र रक्तचंदनाने काढावे. बाजूला एका वर्तुळात षट्‌कोण काढावा. नंतर सहापदरी दोऱ्याला सहा गाठी मारून मग (सूर्यचित्र, षइकोन आणि सहा गाठी मारलेला सहापदरी दोरा) ह्या सर्वांची एकत्रित पूजा करावी. एका सवाष्णीला जेवावयास घालावे. ह्या व्रताच्या देखील दोन कथा आहेत. राणूबाई ही सूर्याची पत्नी, तिची पूजा ह्या व्रतात केली जाते. तिची कथा न ऐकल्याने एका राणीला दारिद्र्यावस्था प्राप्त झाली. तिने पश्चात्तापदग्ध होऊन आदित्य राणूबाईची पूजा केल्यावर तिला पुन्हा गतवैभव लाभले. अशा ...Read More