फिरून नवी जन्मेन मी

(104)
  • 116.2k
  • 26
  • 61.8k

फिरूनी, नवी जन्मेन मी...  भाग १ By sanjay kamble                 आज तब्बल पाच वर्षानी मी माझ्या मामाच्या गावी जाणार होतो. शेवट वर्षाच्या परीक्षा संपल्या होत्या आणि आठ दिवसावर माझ्या मामेभावाचे लग्न होते... college चे मित्र आता पुन्हा भेटतील न भेटतील, पन what's app वर सगळ्यांचे नंबर मात्र आठवणीने घेऊन ठेवलेले...सर्व मित्राची भेट घेऊन घरी परतलो.. आणि प्रवासाची आवराआवर सुरु केली.मामाच्या घरच्यांसाठी खाऊचा डबा माझ्या bag मधे ठेवत आई सांगु लागली.. " मामाला सांग, बाबांना सुट्टी भेटलेली नाही त्यामुळे आम्ही लग्नाच्या दोन दिवस आधी येतो म्हणून. " आई माझी इस्त्री केलेली कपडे....?" अस थोडस आईवर ओरडत मी डबा

Full Novel

1

फिरून नवी जन्मेन मी - भाग १

फिरूनी, नवी जन्मेन मी... भाग १By sanjay kamble आज तब्बल पाच वर्षानी माझ्या मामाच्या गावी जाणार होतो. शेवट वर्षाच्या परीक्षा संपल्या होत्या आणि आठ दिवसावर माझ्या मामेभावाचे लग्न होते... college चे मित्र आता पुन्हा भेटतील न भेटतील, पन what's app वर सगळ्यांचे नंबर मात्र आठवणीने घेऊन ठेवलेले...सर्व मित्राची भेट घेऊन घरी परतलो.. आणि प्रवासाची आवराआवर सुरु केली.मामाच्या घरच्यांसाठी खाऊचा डबा माझ्या bag मधे ठेवत आई सांगु लागली.." मामाला सांग, बाबांना सुट्टी भेटलेली नाही त्यामुळे आम्ही लग्नाच्या दोन दिवस आधी येतो म्हणून. "" आई माझी इस्त्री केलेली कपडे....?"अस थोडस आईवर ओरडत मी डबा ...Read More

2

फिरून नवी जन्मेन मी - भाग २

फिरून नवी जन्मेन मी... तशी लहान असल्यापासुनच आमची मैत्री... मी येताच ओंजळ भरून करवंदे घेऊन यायची. दिवस भर आम्ही डोंगरावरून जांभळे, करवंदे खात हूंदडत फिरायचो. आंब्याच्या कच्च्या कै-या दगड मारून पाडायच्या आणि त्या खाण्यासाठी सोबत थोडी तीखट आणि मीठ ही खिशात असायच... पण कसे इतके जवळ आलो समजलच नाही. स्वता काट्यांमधुन वाट काढत माझ्यासाठी करवंदे जमवायची, स्वतासाठी नाही पण मला काटा लागला तर मनापासुन हळ हळायची. पण आता मीही तीला जपत होतो. तीला सोडून जावस वाटत नव्हत, रात्र कधी संपेल आणि कधी पुन्हा सकाळी या डोंगर द-यांमधुन हातात हात घालून फिरेन अस व्हायच.. ती सोबत असताना कसलीच तमा नसायची... पण ...Read More

3

फिरुनी नवी जन्मेन मी - भाग ३

*****दिवस कसातरी पुढे ढकलत संपला आणि रात्र पडायला लागली... शेजारच्या गावांमधे यात्रा, जत्रा सुरु होत्या रोज जवळ पासच्या एखाद्या यात्रेसाठी आर्केस्ट्रा, तमाशा, कलापथक असे कार्यक्रम असायचेत...मी पन मस्त फ्रेश झालो... सर्रर्रर कन बैगेची चेन ओढली आणी अलगद कागदात ठेवलेल ते गुलाबाच फुल हातात घेतल तस अंग मोहरून आल... आज तीला विचारायच , नक्की.. यात्रेच निमीत्त सांगुन घरातुन बाहेर पडलो...बाहेर तीच M80 दिसली... 'मामा' आजुनही स्वताला तरूणच समजत होता... आपन 'अपाचे' बाईक घेऊन तालुक्याला ऊसाच बिल आणायला गेलेला आणी आम्हाला ठेवली ही , खटारा.... ही गाडी घेऊन रस्त्यान जाताना जस सारं गाव जाग व्हायच.... पन नाईलाज... गाडीची चाके आमच्या ठरलेल्या ठिकानाकडे ...Read More

4

फिरून नवी जन्मेन मी - भाग ४

ती माणवी आकृति आता झाडामागून पुर्ण बाहेर येऊन उभी माझ्याकडे पहात होती... मी पन त्याच्या कडे पाहू लागलो, तसा एक विचार चमकुन गेला की काल रात्रि हीच आकृति माझ्या मागे होती.. आणि सर्रर्रर्रर्रर्र कन अंगावर काटा आला... ते कोणतीही हलचाल करत नव्हते तरी माझ्या डोळयाच्या लवणा-या पापणीसोबत ते पुढ येत असल्यासारख वाटु लागल. पापणी मिटुन उघडली की अंतर कमी होऊ लागले... खुपच विचित्र वाटू लागल तसा मी तीथुन जायच ठरवल. तोच मागुन एक हाक ऐकु आली... आणि माझ अंग शहारल "संजु...... " थंड वा-याची एक लहर अंगाला स्पर्श करून गेल्यासारख वाटल..तो गौरीचा आवाज होता... मी मागे वळतच म्हणालो... "गौरी ........ किती ...Read More

5

फिरून नवी जन्मेन मी - भाग ५

मी प्रतिकार करायच्या आत पाठीमागून येणारा बारीक आवाज कानावर पडला..." शुssssssssssss....इथच थांब... एकही पाउल पुढ टाकु नग..आन काय बी नग..." आवाज ओळखला तस मी गर्रर्रर्रर कन मागे फिरलो..." ग........ग.....गौरी......तु..."तीला पहाताक्षणी तीला गच्च मीठी मारली, माझ्या डोळ्यातुन घळाळा आनंदाश्रु वाहु लागले... ती ठीक होती.. दुस-याक्षणी मनात विचार आला, मग ती जखमी आहे ती कोण...? तसच समोर पाहिल. ती जख्मी अवस्थेत पडलेली मुलगी गाडीचा स्टर्टर लागावा तशा आवाजासारखी हसत उठुन उभी राहीली. र्खी खी खी खी करत तीीच हसण ऐकून जसं डोकच बधीर होऊ लागल.. क्षणाक्षणााााला तीचा विद्रुप होऊ लागला तसा मी हादरलो...गौरीन माझा हात मागे ओढला आणि आम्ही दोघे गावाच्या दिशेने धावत ...Read More

6

फिरून नवी जन्मेन मी - भाग ६

सर्व मित्राना फोन केला आणि जर घरचे लग्नाला नाही म्हणनार ठाऊकच होत त्यामुळे पुढची फिल्डिन्ग लावायला सांगितले, सगळे खुश शेवटी मित्रच ते, सुखाता आणि दु:खात साथ देणारे..*****कधी सुर्यास्त होतो आणि कधी गौरीला हे सांगतो अस झालेल, रात्र झाली तस आणखी एक कारण दीलं आणि ती खटारा एम८० घेऊन मी बाहेर पडलो... टर्रर्रर्रर्रर्र आवाज करत रस्त्यावरून येताना कधी कधी लोक पहायचे पन मी लय हुशार . तोंडावर रूमाल बांधलेला... पन नंबर प्लेटवर काय बांधणार...? काही वेळातच आमच्या ठिकाणावर पोहोचलो . गाडी रस्त्याच्या कडेला जरा आडोसा बघूनच उभी केली आणी शर्टच्या वरच्या खिशात कागदात गुंडाळून ठेवलेला गजरा हातात घेऊन चालू लागलो.... ...Read More

7

फिरून नवी जन्मेन मी - भाग ७ - अंतिम भाग

****" गौरी इथच आहे, या जंगलात रहाते. लोक त्रास देतील म्हणून ती गावात येत नाही...आज तु सोबत चल... आणि मी लग्न करणार आहे तीच्या सोबत....वाट्टेल ते झाल तरी..." अस म्हणत त्याच्या पाठीवर थाप दिली... माझ बोलन ऐकुन तो मात्र अस्वस्थ झाल्यासारखा वाटला...*****रात्र झाली तस आम्ही दोघेही त्याच्या गाडीवरून बाहेर पडलो..मी खुपच उतावळा होतो...मागे बसुन माझ बडबडन भाऊ मात्र शांत बसुन ऐकत होता....आम्ही नेहमीच्या ठीकाणी आलो तस भावाला गाडी लावायला सांगुन मी धावतच वर गेलो... गाडी लाऊन तो ही माझ्या मागे आला...गौरी अजुन आली नव्हती. त्या दगडाला तक्या देत मी भावाला सांगु लागलो.. "हे बघ आम्ही इथच भेटतो पन इथ एक ...Read More