जय मल्हार

(5)
  • 33.6k
  • 2
  • 13.1k

चैत्रचाहूल भाग २ अक्षय्य तृतीया हा हिंदू दिनदर्शिकेतील एक शुभ आणि महत्वाचा दिवस आहे. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय्य तृतीया येते. अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. ह्या दिवशी नर-नारायण या जोडदेवाची जयंती, परशुराम जयंती, बसवेश्वर जयंती आणि, हयग्रीव जयंती असते.या दिवशी भगवान व्यास यांनी महाभारत ग्रंथाची रचना करायला प्रारंभ केला आणि त्यांना लेखनिक म्हणून गणपतीने कार्य केले अशी आख्यायिका प्रचलित आहे.चैत्र महिन्यात केले जाणारे हळदीकुंकू हे या दिवशी करण्याकडे महिलांचा जास्त कल असतो .नर-नारायण या जोडगोळीने या दिवशी अवतार घेतला होता.परशुरामाचे अवतरणसुद्धा याच दिवशी झाले होते असे मानले जाते. या दिवशी परशुरामाची पूजा केली

Full Novel

1

जय मल्हार - भाग १

चैत्रचाहूल भाग २ अक्षय्य तृतीया हा हिंदू दिनदर्शिकेतील एक शुभ आणि महत्वाचा दिवस आहे. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया दिवशी अक्षय्य तृतीया येते. अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. ह्या दिवशी नर-नारायण या जोडदेवाची जयंती, परशुराम जयंती, बसवेश्वर जयंती आणि, हयग्रीव जयंती असते.या दिवशी भगवान व्यास यांनी महाभारत ग्रंथाची रचना करायला प्रारंभ केला आणि त्यांना लेखनिक म्हणून गणपतीने कार्य केले अशी आख्यायिका प्रचलित आहे.चैत्र महिन्यात केले जाणारे हळदीकुंकू हे या दिवशी करण्याकडे महिलांचा जास्त कल असतो .नर-नारायण या जोडगोळीने या दिवशी अवतार घेतला होता.परशुरामाचे अवतरणसुद्धा याच दिवशी झाले होते असे मानले जाते. या दिवशी परशुरामाची पूजा केली ...Read More

2

जय मल्हार - भाग २

जय मल्हार भाग २ खंडोबा विषयी माहिती घेताना त्याच्या वेगवेगळ्या देवस्थानांची माहिती घेणे जरूरी आहे . व कर्नाटकांत खंडोबाची मोठ्या प्रमाणावर यात्रा भरणारी देवस्थाने प्रमुख अशी एकंदर अकरा आहेत. यातील काही ठिकाणी जिथे प्रत्यक्ष खंडोबाच्या जीवनातील घटना घडल्या त्या ठिकाणांना महत्व आहे . १) जेजुरी (पुणे) २) शेबुड (अहमदनगर) ३) निमगाव दावडी (पुणे) ४) सातारे (औरंगाबाद) ५) पाली-पेंबर (सातारा) ६) मंगसुळी (बेळगांव) ७) मैलारलिंग (धारवाड) ८) मैलार देवगुड्ड (धारवाड) ९) मृणमैलार (बल्लारी ) १०) मैलापुर-पेंबर (बिदर) ११) नळदुर्ग-धाराशी (उस्मानाबाद). १) श्री क्षेत्र जेजुरी( पुणे ): जेजुरी हे सह्याद्री च्या कुशीत वसलेले गाव साक्षात मल्हारीच येथे नांदतो आहे असे ...Read More

3

जय मल्हार - भाग ३

जय मल्हार भाग ३ ॥ चंपाषष्ठी दिवसी अवतार धरिसी मणी मल्ल दैत्यांचा संहार करिसी ॥ ॥ चंपाषष्ठी चा करिती करिती कुळधर्म त्याचे होत आहे परिपूर्ण धर्म ॥ चंपाषष्ठी श्रीखंडेरायाच्या उपासनेतील अत्यंत महत्वपूर्ण उत्सव.श्रीमल्हारी मार्तंडाचे षडःरात्रोत्सावाचा सांगता दिवस .या दिवशी मार्तंड भैरवाने मल्लासुर दैत्याचा संहार केला व भूतलावरील अरिष्ठ टाळले. विजायोत्सवामध्ये देवगणांनी मार्तंड भैरवावर भंडारा बरोबरच चंपावृष्टी अर्थात चाफ्याची पुष्पवृष्टी केली म्हणूनच मार्गशीर्ष शुद्ध षष्ठीला चंपाषष्ठी असे नाव मिळाले. आपल्या घरातील सर्वांना सुख, समाधान आणि आरोग्यपूर्ण जीवनाचा आनंद मिळावा, तसेच आपल्यावर येणारी संकटे नाहीशी व्हावीत यासाठी षडःरात्रोत्सव कालावधीत आपल्या घरामध्ये रूढी प्रमाणे कुळधर्म कुलाचार पाळावेत. मांसाहार, मद्यपान करू नये, विषयाच्या आहारी ...Read More