ऐतिहासिक कथा शिवरायांच्या

(48)
  • 132.2k
  • 45
  • 80.2k

(प्रस्तुत ऐतिहासिक कथा शिवरायांच्या अन त्यांच्या वीर मावळ्यांच्या पराक्रमांवर आणि इतिहासातील सत्य घटनांना कल्पनेची जोड देऊन लिहिलेली आहे. काही चुका अथवा आक्षेपार्ह आढळल्यास निदर्शनास आणून द्यावे आणि अभिप्राय कळवावे हि विनंती.) धो-धो बरसणारा पाऊस अन घोंघावणारा वारा आपल्याच तालात झाडाझुडपांना नाचवत होता. विजांचा कडकडाट अन ढगांच्या गडगडाटांसह बरसणाऱ्या शंभूरूपी निसर्गाने रौद्र रूप धारण करून जणू तांडवनृत्यच चालवले होते. डोंगर दऱ्यांतून अन कड्या-कपारीतून खळखळ वाहणारे पाणी पांढऱ्याशुभ्र दुधाप्रमाणे भासत होते. सकाळचा प्रहर अन मध्यरात्रीचा काही घटकांचा वेळ सोडला तर पावसाची रिपरिप अखंड चालू होती. गडावरून वेगाने वाहत येणारे पाणी आणि धो धो कोसळणाऱ्या पावसाच्या पाण्याचा बंदोबस्त

Full Novel

1

वेढ्यातून सुटका - भाग-१

भाग १ : वेढ्यातून सुटका (प्रस्तुत ऐतिहासिक कथा शिवरायांच्या अन त्यांच्या वीर मावळ्यांच्या पराक्रमांवर आणि इतिहासातील सत्य घटनांना कल्पनेची देऊन लिहिलेली आहे. काही चुका अथवा आक्षेपार्ह आढळल्यास निदर्शनास आणून द्यावे आणि अभिप्राय कळवावे हि विनंती.) धो-धो बरसणारा पाऊस अन घोंघावणारा वारा आपल्याच तालात झाडाझुडपांना नाचवत होता. विजांचा कडकडाट अन ढगांच्या गडगडाटांसह बरसणाऱ्या शंभूरूपी निसर्गाने रौद्र रूप धारण करून जणू तांडवनृत्यच चालवले होते. डोंगर दऱ्यांतून अन कड्या-कपारीतून खळखळ वाहणारे पाणी पांढऱ्याशुभ्र दुधाप्रमाणे भासत होते. सकाळचा प्रहर अन मध्यरात्रीचा काही घटकांचा वेळ सोडला तर पावसाची रिपरिप अखंड चालू होती. गडावरून वेगाने वाहत येणारे पाणी आणि धो धो कोसळणाऱ्या पावसाच्या पाण्याचा बंदोबस्त ...Read More

2

निरोप - भाग-२

भाग २ : निरोप (प्रस्तुत ऐतिहासिक कथा शिवरायांच्या अन त्यांच्या वीर मावळ्यांच्या पराक्रमांवर आणि इतिहासातील सत्य घटनांना कल्पनेची जोड लिहिलेली आहे. काही चुका अथवा आक्षेपार्ह आढळल्यास निदर्शनास आणून द्यावे आणि अभिप्राय कळवावे हि विनंती.) फुलाजीचा दरडावणीचा स्वर ऐकताच बाजीने फुलाजीचा आलिंगन दिले अन आपसूकच त्याच्या तोंडून, "दादा ss" शब्द बाहेर पडले अन डोळ्यांत अश्रू दाटले. बाजीने फुलाजीचा निरोप घेतला अन राजांची पालखी घेऊन पुढे धावू लागला. जौहरचा वेढा पार झाला होता. सोबतीचे पाच सहाशे वीर बहिर्जीने ठिकठिकाणी पेरून ठेवलेले नजरबाज दाखवतील त्या दिशेने अन त्यांच्या मागे मागे उर फुटेतो खेळणा गडाच्या दिशेने धावत होते. राजांच्या पालखीचे हशम त्याच ...Read More

3

रणकंदन - भाग-३

भाग ३ - रणकंदन (प्रस्तुत ऐतिहासिक कथा शिवरायांच्या अन त्यांच्या वीर मावळ्यांच्या पराक्रमांवर आणि इतिहासातील सत्य घटनांना कल्पनेची जोड लिहिलेली आहे. काही चुका अथवा आक्षेपार्ह आढळल्यास निदर्शनास आणून द्यावे आणि अभिप्राय कळवावे हि विनंती.) सकाळचा प्रहर चालू झाला होता. इकडे बाजी आपल्या बांदल मावळ्यांना आपली योजना सांगू लागले. कोण दरडीवर चढु लागलं, तर कोण खालील दगडी गोळा करू लागले. पाच पन्नास मावळे दरडीवर चढून मोठं मोठाले दगड गोळा करू लागले. गोफणीसाठी लागणारे लहान दगडही जमा होऊ लागले. काही जण खालील मोठाले दगड दोरीने वर उचलून घेत होते. बघता बघता काही वेळातच मावळ्यांनी मोठ्या अन लहान दगडांचे ढिगारेच्या ढिगारे ...Read More

4

शर्थ - भाग-४

भाग ४ - शर्थ (प्रस्तुत ऐतिहासिक कथा शिवरायांच्या अन त्यांच्या वीर मावळ्यांच्या पराक्रमांवर आणि इतिहासातील सत्य घटनांना कल्पनेची जोड लिहिलेली आहे. काही चुका अथवा आक्षेपार्ह आढळल्यास निदर्शनास आणून द्यावे आणि अभिप्राय कळवावे हि विनंती.) खिंडीत घुसलेल्या चारशे सैनिकांचा धुव्वा उडाला होता. पन्नास एक कसेबसे जीव वाचवून पळून जाऊ लागले. तोवर मावळ्यांनी खिंडीत जखमी अन मेलेल्या मसुदच्या सैनिकांची हत्यारे अन घोडी गोळा करून आणले होते. शे दीडशे घोडी मिळाली होती. धावत जाऊन बाजींनी फुलाजीचा मिठी मारली. "आरं, दादा कुठं व्हता एवढा येळ ." "राजं ..?? राजं, कुठं हाईत??", फुलाजी इकडे तिकडे बघत म्हणाला. "त्यांना खेळणा गडावं फूडं पाठवून दिलंय. ...Read More

5

धडक - भाग-५

भाग ५ - धडक (प्रस्तुत ऐतिहासिक कथा शिवरायांच्या अन त्यांच्या वीर मावळ्यांच्या पराक्रमांवर आणि इतिहासातील सत्य घटनांना कल्पनेची जोड लिहिलेली आहे. काही चुका अथवा आक्षेपार्ह आढळल्यास निदर्शनास आणून द्यावे आणि अभिप्राय कळवावे हि विनंती.) घोडखिंडीतून निघून राजांना आता एक दिड प्रहर लोटला होता. लवकरात लवकर राजांना कुमक करण्यासाठी विशाळगडाचा पायथा गाठणं गरजेचं होतं. बाजी अन त्यांच्या सोबत असलेले शंभर दीडशे मावळे भरधाव घोडा दौडवत होते. घोडीही जीव खाऊन दौडत होती. जंगलातील खाचखळग्यांच्या वाटेवरून दौडताना घोड्यांची दमछाक होत होती. धावून धावून तोंडाला फेस आला होता. आता कोस दोन कोसांचा अंतर बाकी होतं. विशाळगड नजरेस पडू लागला होता. पण आधीच ...Read More

6

चक्रव्यूह भेदले - भाग-६

भाग ६ - चक्रव्यूह भेदले (प्रस्तुत ऐतिहासिक कथा शिवरायांच्या अन त्यांच्या वीर मावळ्यांच्या पराक्रमांवर आणि इतिहासातील सत्य घटनांना कल्पनेची देऊन लिहिलेली आहे. काही चुका अथवा आक्षेपार्ह आढळल्यास निदर्शनास आणून द्यावे आणि अभिप्राय कळवावे हि विनंती.) अन अचानक समोरील झाड झुडपांतून येणाऱ्या घोड्यांच्या खिंकाळयांनी आणि हर हर महावेदच्या आरोळ्यांनी शत्रूंची घोडी जागेवरच थबकली. क्षणभर बांदलही गोंधळले. मागे शत्रू अन समोर हे सिद्दी मसूदचे सैन्य आले कि काय? म्हणून राजांच्या मनात क्षणभर भीती दाटली. पण दुसऱ्याच क्षणी समोरून भरधाव येणाऱ्या घोड्यावर आरूढ असलेल्या बाजींना पाहून राजांच्या चेहरा आनंदानं फुलून गेला. पाठोपाठ घोड्यांवर स्वार असलेल्या बांदलांनी डावी अन उजवी कडून एकाच वेळी ...Read More

7

वेदना - भाग-७

भाग ७ - वेदना (प्रस्तुत ऐतिहासिक कथा शिवरायांच्या अन त्यांच्या वीर मावळ्यांच्या पराक्रमांवर आणि इतिहासातील सत्य घटनांना कल्पनेची जोड लिहिलेली आहे. काही चुका अथवा आक्षेपार्ह आढळल्यास निदर्शनास आणून द्यावे आणि अभिप्राय कळवावे हि विनंती.) रात्रीचा पहिला प्रहर. सगळीकडे काळोख पसरला होता. पाऊसही थांबला होता. गार वारा सुटलेला होता. गडावर ठीक ठिकाणी असलेल्या मशाली फुरफुरत होत्या. सतत सात प्रहरांची पळापळ अन लढून दमलेले मावळे विश्राम गृहांमध्ये आराम घेत होते. राजेही त्यांच्या दालनात विश्राम करत होते. डोळ्यांची उघडझाप चालू होती, झोप मात्र येत नव्हती. बाजींच्या दालनात बाजी आपल्या पलंगावर तक्क्या गिरद्यांना रेलून बसले होते. पलंगाच्या डावीकडे असलेल्या झरोक्यातून येणाऱ्या वाऱ्यामुळे ...Read More

8

रक्तरंजित रणसंग्राम - भाग-८

भाग ८ - रक्तरंजित रणसंग्राम (प्रस्तुत ऐतिहासिक कथा शिवरायांच्या अन त्यांच्या वीर मावळ्यांच्या पराक्रमांवर आणि इतिहासातील सत्य घटनांना कल्पनेची देऊन लिहिलेली आहे. काही चुका अथवा आक्षेपार्ह आढळल्यास निदर्शनास आणून द्यावे आणि अभिप्राय कळवावे हि विनंती.) रात्रीचा दुसरा प्रहर, काळोखी रात्र, घनदाट वनराई, मिट्ट अंधार, रातकिड्यांची किरकिर अन सोबत पावसाच्या हलक्या सरी पडत होत्या. वाटा निसरड्या झालेल्या होत्या. नाईकांच्या हेरांनी आधीच निश्चित केलेल्या वाटेवरून मार्गक्रमण चालू होते. ठीक ठिकाणी आधीच हेर पेरून ठेवलेले होते. शिवाय, ठरवलेल्या वाटेवर थांबलेले मावळे हातात मशाली घेऊन उभे होते. जसे बाजी अन त्यांचे सोबती येताना दिसतील तेव्हाच मशाली पेटवायचे अन सगळे त्या वाटेवरून गेले ...Read More

9

विरह - भाग ६

भाग ६ - विरह प्रस्तुत शिवकालीन ऐतिहासिक प्रेमकथा हि इतिहासातील काही सत्य घटनांना कल्पनेची जोड देऊन लिहिलेली आहे. काही अथवा आक्षेपार्ह आढळल्यास निदर्शनास आणून द्यावे आणि अभिप्राय कळवावे हि विनंती. सदरेवर कारस्थानं शिजू लागली होती. राजांनी मुख्य सरदार अन कारभारी मंडळी यांच्यासोबत मसलती करून योजना नक्की केली होती. हजार दिड हजार मावळ्यानिशी लालमहालावर छापा घालून शास्ताखानाला संपवायचा कट नक्की झाला होता. आधीच एका सरदाराला शे दोनशे मावळ्यांसह शास्ताखानाच्या फौजेत सामील होण्यासाठी धाडून दिलेले होते. दिवस अजून ठरला नव्हता. इकडे शिवाला पारूला भेटायची आस लागली होती. एक एक दिवस कसाबसा ढकलत होता. सुभेदार येसाजी कंक यांच्याकडे दोन तीन वेळा, 'एकदा ...Read More