पत्र लिहितो मी...!

(42)
  • 120.2k
  • 1
  • 38.6k

●●●●●● प्रिय मातेस पत्र !●●●●●● माझी प्रिय आई, तुला शतशः नमन।तुझे अनंत उपकार. केवळ तुझ्यामुळेच मी या सुंदर, रमणीय, मनमोहक जगात पाऊल ठेवू शकले. पण, खरे सांगू का आई, तुझ्या उदरात घालवलेला काळ जणू माझ्यासाठी स्वर्गात विहार करत असल्याप्रमाणे होता. तुझ्या पोटात असतानाही मी तुला भरपूर त्रास दिलाय ग! पण आई, तू तो सारा त्रास मोठ्या आनंदाने सहन तर केलासच पण कधी तुझ्या चेहऱ्यावरील समाधान कमी होऊ दिले नाही. तुझ्या पोटात असताना मी मस्त बागडायचे, खेळायचे, तुला मधूनमधून लाथाही मारायचे पण तू कधीच राग केला नाहीस की कधी

Full Novel

1

एक पत्र - अटल व्यक्तीमत्वास 

------------------- एक पत्र 'अटल' व्यक्तीमत्वास ! ---------- आदरणीय अटलजी, साष्टांग नमस्कार तुम्हाला पत्र लिहिताना 'काय लिहू ? कसे लिहू? कशी सुरुवात करू?' अशी अवस्था झाली आहे. शब्द इकडे तिकडे झाले असतील परंतु तुम्ही अशीच भाषणाची सुरुवात करीत असत. तसेच काही प्रश्न मनालाच विचारून मी लिहितो आहे. मला आठवते, तुम्ही तुमच्या भाषणाची सुरुवात करताना अनेक वेळा 'क्या बोलू? कैसे बोलू? कहाँ से शुरूआत करू?' अशा आशयाचे प्रश्न विचारून करीत असत. अटलजी, खरे सांगू का, मलाच काय परंतु भारतातील कोट्यवधी जनतेला तुम्ही आमच्यामधून कायमचे निघून गेला आहात असे वाटतच नाही. घरातील एखादी व्यक्ती सोडून गेली यावर जसा ...Read More

2

प्रिय मातेस पत्र

●●●●●● प्रिय मातेस पत्र !●●●●●● माझी प्रिय आई, तुला नमन।तुझे अनंत उपकार. केवळ तुझ्यामुळेच मी या सुंदर, रमणीय, मनमोहक जगात पाऊल ठेवू शकले. पण, खरे सांगू का आई, तुझ्या उदरात घालवलेला काळ जणू माझ्यासाठी स्वर्गात विहार करत असल्याप्रमाणे होता. तुझ्या पोटात असतानाही मी तुला भरपूर त्रास दिलाय ग! पण आई, तू तो सारा त्रास मोठ्या आनंदाने सहन तर केलासच पण कधी तुझ्या चेहऱ्यावरील समाधान कमी होऊ दिले नाही. तुझ्या पोटात असताना मी मस्त बागडायचे, खेळायचे, तुला मधूनमधून लाथाही मारायचे पण तू कधीच राग केला नाहीस की कधी ...Read More

3

एक पत्र डिजिटल इंडियास

-------------------------------*एक पत्र डिजिटल इंडियास!* ---------------------- नागेश सू. शेवाळकर, थेरगाव, पुणे. ४११०३३ ...Read More

4

पोस्टमन काकास पत्र

॥॥॥॥॥॥॥ पोस्टमनकाकांना पत्र ! ॥॥॥॥॥॥ प्रिय पोस्टमनकाका,स. न. वि. वि. नागरिकांच्या मनात तुमचे काय स्थान आहे हे शब्दात नाही सांगता येणार. पण एक मात्र नक्की, देव जर खरेच असला ना तर त्यानंतर तुमचीच जागा आमच्या ह्रदयात असणार. आमच्या परिसरात तुमचे आगमन होताच, तुमच्याकडे सारे आशाळभूत नजरेने पाहतात. कुणी कितीही घाई-गडबडीत असला तरीही 'आपले काही पत्र ' आले तर नाही ना या आशेने तुमच्या समोरून जातांना रेंगाळतात. काही जण विचारतातही, 'साहेब, माझे काही आहे का?' ज्यांचे काही येणार आहे असे विद्यार्थी, नोकरीच्या शोधात असलेले तरुण, कामानिमित्ताने दूर गेलेल्या व्यक्तींंच्या ...Read More

5

एका निर्भयाचे पत्र

:::::::::::::::::::::::::::एका निर्भयाचे पत्र :::::::::::::::::::प्रति,नीच दुष्क्रुत्य करणारांनो,यापेक्षा दुसरी उपमाच सूचत नाही रे तुमच्यासाठी! मी एक निर्बल निर्भया! गल्लीपासून दिल्लीपर्यंत कुठेही लांडग्यांच्या तावडीत सापडणारी, तुमच्या अत्याचाराला, अनैतिक वासनेला बळी पडणारी, विक्रुत चाळे सहन करणारी ! जशी मी कुठेही असते, कुठेही तुम्हाला सहजासहजी सापडू शकते तसेच वासनांधानो तुमचाही वावर सर्वत्र असतो. तुमची सावध, शोधक नजर एखाद्या पाखराला शोधत असते. तुमचे सुदैव आणि आम्हा निष्पाप निर्भयांचे दुर्दैव असे की, मनी वसे ते समोर दिसे याप्रमाणे आम्ही तुमच्या तावडीत सापडतो. भुकेल्या वाघाने एखाद्या शेळीवर तुटून पडावे तसे तुम्ही आम्हा निर्भयांवर तुटून पडता. तुम्हाला स्थळ, वेळ, काळ यापैकी कशाचेही भान राहात नाही. आपले नीच काम ...Read More

6

वाहिनीवाल्यांना पत्र

****************** वाहिनीवाल्यांना पत्र ! **************प्रति,मराठी वाहिनी मालिका निर्माते,स. न. वि. वि.वास्तविक पाहता गेली बारा-पंधरा वर्षे झाली आहेत, विविध वाहिन्यांंचे घरोघरी पोहोचले आहे. हळूहळू वाहिन्यांवरील कार्यक्रमांनी आणि विशेषतः त्यावरील मालिकांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवायला सुरुवात केली, एक प्रकारे मोहित केले. सिनेमागृहात जाऊन, प्रचंड धक्काबुक्की सहन करून जे आम्हाला बघायला मिळत होते ते गेली अनेक वर्षे आम्हाला घरबसल्या सहकुटुंब पाहायला मिळते आहे. सिनेमा, नाटक यापेक्षा निराळे माध्यम म्हणजे तुम्ही प्रसारित करीत असलेल्या मालिका! एका अर्थाने जे सिनेमागृहाच्या पडद्यावर पाहायला मिळत नाही किंवा दोन अडीच तासात जे तिथे अत्यंत त्रोटक, धावत्या समालोचनाप्रमाणे पाहायला मिळते ते सविस्तरपणे, बारीकसारीकरितीने चार भिंतीच्या आत घरी बसून ...Read More

7

मी आहे... तुमची लाडकी

मी आहे....... तुमची लाडकी!मा. वाचक,खंदे पुरस्कर्ते आणिकट्टर विरोधक, सर्वांना नमस्कार. लोकशाहीच्या या अत्यंत पवित्र, मंगलमय महोत्सवात मी आपले मनापासून स्वागत करते. त्याचबरोबरीने असेही आवाहन करते की, या लवकर या. सर्वांनी माझ्याशी हस्तांदोलन करा. मी तुमच्याशी हस्तांदोलन करायला उतावीळ झाले आहे. तुम्हाला बघितले की, भेटले की, मला या जगातील सर्वात प्रिय अशा व्यक्तीला भेटल्याची जाणीव होते. माझे तुमच्यावर अतिशय पवित्र असे प्रेम आहे. नाही ओळखले? माझा वीट, कंटाळा तर आला नाही ना? मला ओळखले नसणार कारण कुणी कितीही बोटे मोडो, नाक मुरुडो, कपाळावर आठ्या पाडो, इतकेच काय माझ्या नावाने शिमगा करो पण मी माझे पवित्र ...Read More

8

राष्ट्रध्वजाचे पत्र

* राष्ट्रध्वजाचे पत्र! *प्रति,प्राणप्रिय राष्ट्रभक्तांनो,जयहिंद। किती छान वाटतेय तुमच्याशी संवाद साधताना. किती नशिबवान आहे ना तुम्ही माझी राष्ट्रीय प्रतीक म्हणून निवड केली तेव्हा खूप खूप आनंदलो होतो मी. फार मोठा सन्मान आहे हा माझा! तुम्ही निवडलेले तीन रंग माझे सौंदर्य खुलवतात. माझ्या छातीवर असलेले अशोक चक्र माझा फार मोठा गौरव आहे असे मी मानतो. हे तुम्ही मला प्रदान केलेले रुप तुम्हाला तुमच्या जीवाहून प्रिय आहे हे मला माहिती आहे. किती प्रेम करता तुम्ही सारे माझ्यावर! केवढा अभिमान आहे, तुम्हा सर्वांना ...Read More

9

दंगलताईस पत्र

नागेश सू. शेवाळकर, ११०, वर्धमान वाटिका, फेज०१ क्रांतिवीरनगर, लेन ०२, थेरगाव, पुणे ४११०३३ ...Read More

10

हास्येश्वरास पत्र

**************** हास्येश्वरास पत्र ! ************प्रति,हास्येश्वरा,तुला मनापासून हसऱ्या चेहऱ्याने स.न. वि. वि.आम्हा मानवाच्या जीवनात तुझे स्थान जणू आत्म्यासारखे! नव्हे तू आत्माच आहेस. जिथे तू नाहीस तिथे राम नाही, त्या वातावरणात जिवंतपणा नाही. अगदी आमचा जन्म झाल्यापासून ते थेट आम्ही चितेवर जाईपर्यंत तू आमची साथ करतोस.... इमानदारीने... प्रामाणिकपणे! अगदी बाळ जन्माला आले की, पहावयास येणारे बाळाला पाहताच म्हणतात, 'व्वा! हसरा चेहरा आहे. जीवनात आनंदी असेल हो.'त्याचप्रमाणे मृत्यूनंतर अंत्यदर्शनासाठी येणारे कुणीतरी म्हणते, 'आनंदी जीवन जगले हो. आताही चेहऱ्यावर समाधान, हसरी छटा आहे.'असा आहे हास्यसम्राटा तुझा महिमा. आमच्या शरीराच्या प्रत्येक अणूमध्ये तुझे वास्तव्य आहे. डोळे असोत, ओठ असोत, चेहरा असो ...Read More

11

एक पत्र... संकल्पास

** एक पत्र...संकल्पास !**प्रती,अतिप्रिय संकल्प,स. न. वि. वि. अनेक महिन्यांपासून तुला पत्र लिहावे असा केला होता. परंतु संकल्पपूर्तीचा योग साधला जात नव्हता. नेहमीप्रमाणे 'आता लिहू, थोड्या वेळाने लिहू, आज....उद्या लिहू...' असे करताना संकल्पपूर्तीसाठी आजचा दिवस उजाडला. लिहायला तर सुरुवात केली आहे पण पूर्तता कधी होईल, पूर्णत्वास जाईल का?, जाईल किंवा नाही हे मी तरी सांगू शकत नाही. कारण आम्ही माणसं 'आरंभशूर!' कोणत्याही गोष्टीची सुरुवात नेहमीच धूमधडाक्यात करतो परंतु आमच्या आरंभशूरतेला 'आळस' हा वैरी कायम चिकटलेला असतो. कोणत्याही गोष्टीची सुरुवात अगदी मोठमोठ्या योजनांची सुरुवातही आम्ही वाजतगाजत ...Read More