आली दिवाळी भाग १ भारतात अनेक पद्धतीने दिवाळी साजरी केली जाते. वसुबारस, धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज हे दिवस दिवाळीचे असतात . घर-अंगणात दिवे लावत अंध:कार दूर करणारा, अज्ञात मृत्यूचे भयनिवारण करणारा, इच्छा आकांक्षा बाळगणारा असा हा आल्हाददायक सण आहे.महाराष्ट्रात मात्र दिवाळी सुरु होते ती "वसु - बारस" या दिवसापासून. गाई-गुरांबददल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस !!आश्विन कृष्ण द्वादशीस, म्हणजेच गोवत्सद्वादशीस साजरा केला जातो.भारत हा कृषिप्रधान देश आहे. येथे पशुधनाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. हिंदू संस्कृतीत गाईला मातेसमान दर्जा देण्यात आला असून ती पूजनीय मानली गेली आहे. तिच्या प्रती कृतज्ञतेतून वसुबारस या दिवशी गाय आणि तिचे वासरू यांची पूजा केली जाते. हिंदू
Full Novel
आली दिवाळी - १
आली दिवाळी भाग १ भारतात अनेक पद्धतीने दिवाळी साजरी केली जाते. वसुबारस, धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज हे दिवाळीचे असतात . घर-अंगणात दिवे लावत अंध:कार दूर करणारा, अज्ञात मृत्यूचे भयनिवारण करणारा, इच्छा आकांक्षा बाळगणारा असा हा आल्हाददायक सण आहे.महाराष्ट्रात मात्र दिवाळी सुरु होते ती "वसु - बारस" या दिवसापासून. गाई-गुरांबददल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस !!आश्विन कृष्ण द्वादशीस, म्हणजेच गोवत्सद्वादशीस साजरा केला जातो.भारत हा कृषिप्रधान देश आहे. येथे पशुधनाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. हिंदू संस्कृतीत गाईला मातेसमान दर्जा देण्यात आला असून ती पूजनीय मानली गेली आहे. तिच्या प्रती कृतज्ञतेतून वसुबारस या दिवशी गाय आणि तिचे वासरू यांची पूजा केली जाते. हिंदू ...Read More
आली दिवाळी - २
आली दिवाळी भाग २ दिवाळीचा पहीला दिवस ,आश्विन वद्य त्रयोदशी म्हणजेच धनत्रयोदशी . पावसाळा संपून नवी पिके हाती शरद ऋतूच्या ऐन मध्यात, आश्विन व कार्तिक या महिन्यांच्या संधिकालात दिवाळी हा सण येतो. आश्विन वद्य त्रयोदशी ते कार्तिक शुद्ध प्रतिपदा हे चार दिवस दीपोत्सवाचे असतात. या दिवशी वस्त्र आणि अलंकाराची खरेदी करणं शुभ मानलं जातं. या दिवशी उपवासही केला जातो. घरातले अलंकार तिजोरीतून काढून स्वच्छ करून ते पुन्हा जागेवर ठेवले जातात. कुबेर, विष्णू, लक्ष्मी, योगिनी, गणेश, नाग यांची विधिवत पूजा केली जाते. त्यांना नैवेद्य दाखवला जातो. या दिवशी शक्य असले तितकं दान करण्यात येतं. सायंकाळी तेलाने भरलेला एक दिवा प्रज्वलित ...Read More
आली दिवाळी - ३
आली दिवाळी भाग ३ दीपावलीच्या पांच दिवसातील हा दुसरा दिवस नरक चतुर्दशी असतो काली चतुर्दशी, रूप चतुर्दशी, छोटी आणि नरक निवारण चतुर्दशी या नांवाने देखील संबोधले जाते. हा सण हिंदू कॅलेंडरप्रमाणे अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला (चौदावा दिवस) असतोया दिवशी भल्या पहाटे उठायचा रिवाज आहे .हे व्रत केल्यावर नरकापासून मुक्ती मिळते. रामभक्त हनुमानाचा जन्म याच दिवशी झाला होता.नरकासुर राक्षसाच्या वधाप्रित्यर्थ साजरा केला जाणार्या दिवाळीतील या सणाच्या निमित्ताने पहाटे सूर्योदयापूर्वी उठून अभ्यंगस्नान केले जाते. या दिवशी यमदीपदान करून ब्राह्मणांना भोजन आणि वस्त्रांचे दानही दिले जाते.कुटुंबातील आई बायको बहिण या प्रत्येक नात्याचा दिवाळीत एक दिवस असतो .या दिवशी आईचा मान असतो ...Read More
आली दिवाळी - ४
आली दिवाळी भाग ४ दिवाळीचा तिसरा दिवस असतो लक्ष्मीपूजन नेहेमी अमावस्या अशुभ मानली जाते पण ही अमावास्या हा दिवाळीतील महत्त्वाचा दिवस मानला जातो. त्या दिवशी महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वती यांची पूजा करतात. शाईची दौत, रुपया आणि वही ही त्यांची प्रतिके मानली जातात. याची पुजा खालील प्रकारे करतात एका चौरंगावर लाल रंगाचा कापड घालतात . चौरंगाच्या बाजूला रांगोळी काढतात . चौरंगावर अक्षतांचे अष्टदल कमल किंवा स्वस्तिक काढतात . एक चांदीचा तांब्याचा अथवा मातीचा कलश गंगा जल युक्त पाण्याने भरुन घेतात . कलश चौरंगावर ठेवून कलशावर नारळ ठेवून आंब्याच्या पानानी सजवतात . कलशाभोवती ताजी फुलं सजवतात. कलशाच्या डाव्या बाजूला लक्ष्मीसाठी हळदीने कमलाचे ...Read More
आली दिवाळी - ५
आली दिवाळी भाग ५ दिवाळीचा चौथा दिवस म्हणजे पाडवा कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा दिवस बलिप्रतिपदा म्हणून पुराणातील बळीराजाच्या स्मरणार्थ होतो. तो दिवाळी पाडवा म्हणून ओळखला जातो. दिवाळीतील पाडवा हा साडेतीन मुहुर्तांपैकी एक मानला गेला आहे. पुराणकथेनुसार, प्राचीन काळी बळी नावाचा राजा फार बलाढ्य झाला. त्याने सर्व पृथ्वी जिंकली व लक्ष्मीसह सर्व देवांना बंदी केले. मग विष्णूने वामनावतार घेतला व बळीच्या यज्ञात जाऊन त्याच्याकडे त्रिपादभूमीची याचना केली. बळीने ती मान्य केली. वामनाने दोन पावलांतच पृथ्वी व स्वर्ग व्यापला. तिसरे पाऊल कोठे ठेवू, असे विचारताच बळीने त्याचे स्वत:चे मस्तक नमवून त्यावर तिसरे पाऊल ठेव असे वामनाला सांगितले. वामनाने बळीच्या मस्तकी ...Read More
आली दिवाळी - ६
आली दिवाळी भाग ६ दिवाळीचा शेवटचा दिवस असतो भाऊबीज .दिवाळीच्या सर्व दिवसात स्त्री शक्तीला मान दिलेला आपण पाहतो .वसुबारस गोमाता , नरकचतुर्दशीला आई ,लक्ष्मीपुजनला देवी लक्ष्मी ,पाडव्याला पत्नी आणि भाऊबीजेला बहिण भाऊबीज हा हिंदुधर्मीय भाऊ-बहीण साजरा करीत असलेला एक सण आहे. हा सण कार्तिक शुद्ध द्वितीया (यमद्वितीया) या दिवशी असतो. हा महाराष्टीय पद्धतीच्या दिवाळीतला सहावा दिवस असतो. या सणास हिंदीत भाईदूज म्हणतात.ब्रह्मदेवाने पृथ्वी निर्माण केली. या सर्व गोष्टींची परतफेड म्हणून सर्व ऋषी मुनींनी मोठा यज्ञ केला. मग या यज्ञात बळी काय द्यायचे हा प्रश्न पडला. यमराज तयार झाला आणि यज्ञात उडी घेतली. यमाने यज्ञात उडी घेतली, असे कळताच बंधू ...Read More