माझा सिंह गेला

(8)
  • 25.2k
  • 4
  • 10.8k

भाग 1 - गड आला पण माझा सिंह गेला(प्रस्तुत ऐतिहासिक कथा शिवरायांच्या अन त्यांच्या वीर मावळ्यांच्या पराक्रमांवर आणि इतिहासातील सत्य घटनांना कल्पनेची जोड देऊन लिहिलेली आहे. काही चुका अथवा आक्षेपार्ह आढळल्यास निदर्शनास आणून द्यावे आणि अभिप्राय कळवावे हि विनंती.) तानाजीच्या अन त्याच्या शूर मावळ्यांच्या रक्ताने गडाला आधीच अभिषेक झाला होता, आता त्याच मावळ्यांच्या अश्रूंच्या जलधारा मातीत मिसळून कोंढाणा कृतकृत्य पावत होता. तानाजीच्या निश्चल देह पालखीमध्ये चिरविश्रांती घेत होता. राजे आपल्या लाडक्या तानाजीच्या देहाला बिलगून धाय मोकलून रडत होते. तानाजीच्या देहाला घट्ट बिलगून हमसून हमसून रडणाऱ्या राजांना पाहून तिथं उभा असणाऱ्या एकूण एक मावळ्यांचे डोळे अश्रू धारांनी भरून वाहत होते. 'ताना

Full Novel

1

माझा सिंह गेला - भाग-१

भाग 1 - गड आला पण माझा सिंह गेला(प्रस्तुत ऐतिहासिक कथा शिवरायांच्या अन त्यांच्या वीर मावळ्यांच्या पराक्रमांवर आणि इतिहासातील घटनांना कल्पनेची जोड देऊन लिहिलेली आहे. काही चुका अथवा आक्षेपार्ह आढळल्यास निदर्शनास आणून द्यावे आणि अभिप्राय कळवावे हि विनंती.) तानाजीच्या अन त्याच्या शूर मावळ्यांच्या रक्ताने गडाला आधीच अभिषेक झाला होता, आता त्याच मावळ्यांच्या अश्रूंच्या जलधारा मातीत मिसळून कोंढाणा कृतकृत्य पावत होता. तानाजीच्या निश्चल देह पालखीमध्ये चिरविश्रांती घेत होता. राजे आपल्या लाडक्या तानाजीच्या देहाला बिलगून धाय मोकलून रडत होते. तानाजीच्या देहाला घट्ट बिलगून हमसून हमसून रडणाऱ्या राजांना पाहून तिथं उभा असणाऱ्या एकूण एक मावळ्यांचे डोळे अश्रू धारांनी भरून वाहत होते. 'ताना ...Read More

2

माझा सिंह गेला - भाग-२

भाग २ - वाघ(इतिहासातील सत्य घटनांना कल्पनेची जोड देऊन कथेमध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही चुका किंवा आक्षेपार्ह आढळल्यास प्रतिक्रियांमध्ये सांगावे आणि मोठ्या मनाने माफ करावे हि विनंती.) भल्या पहाटे शिवबा अन त्याच्या मावळ्यांनी गावाला निरोप दिला अन पुण्याकडे परतीचा प्रवास चालू झाला. हवेतला गारवा अंगाला झोबत होता. शिवबाने अंगावर शाल घट्ट बांधून घेतली होती. घोड्यांच्या टापांचा आवाज अन त्यामुळे मागे उडणारी धूळ हवेत मिसळून जात होती. हळू हळू सूर्य नारायणाचे दर्शन होऊ लागले होते. अंगावर सूर्याची सोनेरी कोवळी किरणे पडू लागली होती. पक्षांचा किलबिलाट आता ऐकू यायला लागला होता. ...Read More

3

माझा सिंह गेला - भाग-३

भाग ३ - शिकार (माझा सिंह गेला या ऐतिहासिक हा शेवटचा भाग. काही ऐतिहासिक प्रसंग कल्पनाशक्तीची जोड देऊन रंगवलेले आहेत. आपला अनमोल अभिप्राय मिळावा ही अपेक्षा. ) शिवाबराजेंनी धनुुष्यातील बाण भक्षावर ताणला होता. त्यांची नजर फक्त त्या वाघावर खिळली होती. अन अचानक, कोंडाजीला दोरीचा हिसका बसला. झुडपात खसखस वाढू लागली तशी कोंडाजीने दोरी वर ओढायला सुरुवात केली. बहिर्जी वर वर जाऊ लागला. आता, वाघ त्या शेळीवर झडप घालण्याच्या पवित्र्यात असतानाच.. अचानक, शिवबा अन त्यांच्या साथीदारांनी सप सप बाण वाघाच्या दिशेने सोडले. एका बाण वाघाच्या डोक्यावरून गेला. ...Read More