भारतीय दीपावली

(1)
  • 11k
  • 0
  • 4.5k

भारतीय दीपावली भाग १ या सणाचा उगम फार प्राचीन काळी, आर्यांचे वास्तव्य उत्तर धृवप्रदेशात होतं, त्या काळात झाला, असं मानण्यात येतं. सहा महिन्यांची दीर्घ रात्र संपून सहा महिन्यांचा दिवस सुरू होताच त्या प्रदेशातील लोकांना नवीन आयुष्य सुरू झाल्यासारखे वाटत असणार आणि त्यासाठीच ते हा आनंदोत्सव साजरा करत असावेत. आर्यांच्या सात पाकयज्ञांपैकी पार्वण, आश्वयुजी व आग्रहायणी या तीन यज्ञांचे एकीकरण व रुपांतर होऊन दीपावलीचा उत्सव सुरू झाला असावा, अशी कल्पना आहे. काही लोकांची अशी श्रद्धा आहे की, चौदा वर्षांचा वनवास संपवून राम सीतेसह अयोध्येला परत आला, ते याच दिवसांत. या आनंदा प्रीत्यर्थ त्या वेळी अयोध्येतल्या प्रजेने दीपोत्सव केला

Full Novel

1

भारतीय दीपावली - भाग १

भारतीय दीपावली भाग १ या सणाचा उगम फार प्राचीन काळी, आर्यांचे वास्तव्य उत्तर धृवप्रदेशात होतं, त्या काळात असं मानण्यात येतं. सहा महिन्यांची दीर्घ रात्र संपून सहा महिन्यांचा दिवस सुरू होताच त्या प्रदेशातील लोकांना नवीन आयुष्य सुरू झाल्यासारखे वाटत असणार आणि त्यासाठीच ते हा आनंदोत्सव साजरा करत असावेत. आर्यांच्या सात पाकयज्ञांपैकी पार्वण, आश्वयुजी व आग्रहायणी या तीन यज्ञांचे एकीकरण व रुपांतर होऊन दीपावलीचा उत्सव सुरू झाला असावा, अशी कल्पना आहे. काही लोकांची अशी श्रद्धा आहे की, चौदा वर्षांचा वनवास संपवून राम सीतेसह अयोध्येला परत आला, ते याच दिवसांत. या आनंदा प्रीत्यर्थ त्या वेळी अयोध्येतल्या प्रजेने दीपोत्सव केला ...Read More

2

भारतातील दीपावली - भाग २

भारतातील दीपावली भाग २ काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत संपूर्ण भारतात दिवाळीच्या उत्सवाचे स्वरूप साधारणपणे सारखंच आहे. घरं स्वच्छ झाडून, सारवून, रंगवून फुलांच्या माळा, पताका, तोरणे वगैरे लावून सजवणे, अभ्यंगस्नान करून नवीन कपडे, दागिने घालणे, नातलगांसह फराळ करणे दिव्यांची रोषणाई, लक्ष्मीपूजन, दीपदान करणे वगैरे .याशिवाय, प्रत्येक प्रदेशाची काही पारंपारिक वैशिष्ट्ये आहेत. गुजरातेत आश्विन वद्य द्वादशीपासून दिवाळी सुरू होते. त्या दिवसाला वाघवारान असं म्हणतात. त्या दिवशी स्त्रिया सकाळी उठून सडासंमार्जन करून रांगोळ्या काढतात. त्यात वाघाचं चित्र हमखास असतं. ते चित्र भाऊबीजेपर्यंत ठेवतात. आश्विन वद्य चतुर्दशीला रूपचतुर्दशी म्हणतात. त्या दिवशी लवकर स्नान करून नवीन कपडे घातले जातात. मात्र त्या रात्री सर्वत्र भूतांचा संचार असतो ...Read More