विश्वनाथ नेरूरकर -एक स्फूर्तिस्थान

(19)
  • 12.5k
  • 3
  • 2.7k

१९८५ सालची गोष्ट आहे.आमच्या सोसायटीचा पाणीपुरवठा खूप कमी झाला होता. ५-६ वर्षांपूर्वी आम्ही नवीन फ्लॅट घेतला तेव्हा २४ तास पाणी मिळत होते. कमी -कमी होत दिवसातून फक्त १५ - २० मिनिटे पाणी मिळू लागले. आॅफिसला जाणा-या स्त्रियांपुढे तर मोठे प्रश्नचिन्ह होते. आॅफिसला जायला निघेपर्यंत नळाला पाणी नाही आणि घरी आल्यावरही नळ कोरडे. नवीन घर बघावे लागेल असे वाटू लागले.