अनुष्काने केली अप्पूची स्वारी

(16)
  • 13k
  • 2
  • 3.5k

छोटी अनुष्का खूप गोड मुलगी आहे. गोबरे गाल, मोठे डोळे, रेशमी सोनेरी केस- जणू बाहुलीच! अनुष्का दिसायलाच सुंदर नाही !अभ्यासात हुशार आणि मनाने दयाळू आहे.सगळ्यानाच ती हवीहवीशी वाटते.नेत्राला मुके प्राणी फार आवडतात.घरी पाळलेल्या मोती कुत्र्याला ती रोज फिरायला नेते,त्याच्याशी खूप खेळते.मनी मांजरीला दूध पाजते. त्याना तिचा इतका लळा लागला आहे, की दिवसभर तिच्या पायाशी घोटाळत असतात.