बी.एड्. फिजीकल - 11

  • 792
  • 1
  • 228

बी.एड्.फिजीकल कॉलेज, कांदिवली भाग ११या शिंदें प्यूनची एक मजा होती. ते जेमतेम सही पुरते शिकलेले. पण सरावा सरावाने  फाड फाड  इंग्रजी पाजळून दाखवीत. “ सुपेकर सुप्रिटेण्ड क्वॉलिंग  यू  प्रभू  अ‍ॅण्ड काळे सर. कोन्सुलेट लेटर यू टेक. गो  व्हिटी  स्टेशण निअर ब्रिंगिंग  पिक्चर फिलिम फ्रेंच कान्स्युलेट.” असा प्रकार होता. पण बोले असा काही धडकावून की  इंग्रजी न येणारा सर्द व्हायचा.  प्रभू त्याला त्याच भाषेत, “ यस यस मिष्टर शिंदे गोईंग  सुपेकर साहेब  अ‍ॅण्ड टेकींग लेटर. ”               असेंब्लीचं रेकॉर्ड शिंदे सर ठेवीत. त्याना ते पत्र दाखवलं की ते त्यांच्या डायरीत लिहून ठेवीत. आम्ही व्हीटीला जावून मॅटिनीला