राजकारण कादंबरी अंकुश शिंगाडे आपल्या भारत देशात पाहुण्यांना विशेष महत्व आहे. पाहुण्यांना आपल्या भारत देशात अतिथी देवो भवं म्हणत देवांचा दर्जा दिला जातो. त्यांच्या सर्व गोष्टी ऐकल्या जातात. त्यांच्यासाठी विशेष असा पाहुणचारही केला जातो. कारण आपल्याला ते जर आले तर अतिशय आनंद होत असतो. त्याचं कारण आहे, हे जीवन. म्हणूनच पाहुण्यांची आपण इज्जत करतो. हे जीवन तसं पाहिल्यास बरंच कंटाळवाणं आहे. या कंटाळवाण्या जीवनात पाहुण्यांना विशेष स्थान आहे. कारण पाहूणे हे आपल्या कंटाळवाण्या जीवनात रंग भरत असतात. पाहूणे....... अलिकडील काळात भारतात पाहूण्यांना मोठा सन्मान