**रामूच्या गोष्टीतून शिकलेला सायबर धडा** रामू शेतकरी, गावातल्या छोट्याशा शेतात मेहनत करून कुटुंब चालवतो. मागच्या हंगामात चांगला नफा झाला म्हणून रामूने ठरवलं की, बियाणं आणि खतं ऑनलाईन खरेदी करावी. एका सोशल मीडियाच्या जाहिरातीत त्याला एक चांगली ऑफर दिसली – "50% डिस्काउंटमध्ये खतं आणि बियाणं!" रामूला ऑफर आकर्षक वाटली. त्याने लगेच दिलेल्या लिंकवर क्लिक केलं, एक फॉर्म भरला आणि 10,000 रुपये ऑनलाईन ट्रान्सफर केले. पैसे भरल्यानंतर काही दिवस वाट पाहूनही वस्तू आल्या नाहीत. शेवटी रामूने कंपनीला फोन लावला, पण तो नंबर बंद होता. तेव्हा त्याला कळलं की, तो एका ऑनलाईन फसवणुकीचा बळी ठरलाय.ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार रामूसारख्या अनेक लोकांना या प्रकारची फसवणूक होते. ऑनलाईन जगात