सकाळचे साडेदहा वाजत आले होते नुकतीच ती होस्टेल बाहेर पडली आणि झप झप बस कडे चालु लागली अगदी एक मिनिटाच्या वळणा वर होता बस स्टॉप तीचा ...तिथे पोचताच तिला बस दिसली आणि थोडे धावत तिने बस पकडली आज तीला निघायला थोडा उशीर च झाला होता तरी बस मिळाली त्यामुळे तिला हायसे वाटले आता फक्त दहा मिनिटे आणि मग अगदी ऑफिसच्या दारात उतरणे .मुंबईत राहत असुन सुद्धा ती खुप लकी होती ..!तो लोकल चा प्रवास .. फास्ट आणि स्लो लोकल चे गणित ती एक एक सेकंदाच्या हिशोबाने सुटणारी लोकल ..वगैरे वगैरे पासून ती दुर होती हॉस्टेल जवळ बस स्टॉप नित्यनेमाने ठराविक वेळेला सुटणारी अगदी रिकामी असणारी बस बसमध्ये गर्दी होऊ लागायच्या