सखाराम रात्रीच्या वेळी पायवाटेने चालला होता. रात्र खुप झाली होती. काळाकुट्ट अंधार त्यात रातकिड्यांचा कर्रकस आवाज , केव्हा तरी जंगलातून एखाद्या स्वापदाची चित्कारी एकू येत असे.दोन्ही बाजूला किर्र झाडी होती, वाटेवर पालापाचोळा , कट्या-कूट्या साचल्या होत्या ते सर्व पायाने तुडवीत सखाराम चालला होता.चंद्राचा अंधूकशा स्वच्छ प्रकाश वाटेवर पडला होता, तस्यात सखारामला रात्री चालण्याची सवय होती.उद्या लेकीच्या गावी रामनगरला जत्रा आहे .ह्या कारणाने तो चालला होता . त्याला आपल्या कामामूळे लवकर निघता आले