शुभमंगल सावधान

  • 948
  • 1
  • 330

शुभ मंगल ‘सावधान’             निरवडे हायस्कूलमध्ये गांगण बाई हजर झाल्या आणि शाळेचे जसं नंदनवनच झालं. हेमामालिनी-  रेखा अशा सिनेनट्यांइतकी नसेल पण गांगण बाई बघितल्यावर त्याच नट्यांची आठवण व्हावी इतपत नक्की वाटायची. अगदी नावापासुन तो केशभूषा- वेशभूषा, बोलणे, मोकळेपणे वागणं हे ‘मास्तरीण’ या बिरूदाला न शोभणारी ! मास्तरीण म्हणजे काळी ढुस्स, दात पुढे किंवा विरळ तरी!क्वचित  कुंदकळ्या वगैरे असल्याच तरी त्या कुणाला न दिसाव्यात या बेतानं हसणारी (?) कुणाकडेही बघताना लेट आलेल्या- गृहपाठ चुकवणाऱ्या, उत्तरं न देणाऱ्या मुलाकडे पहावं अशी नजर असणारी, लपेटून घट्ट पदर घेणारी, मुळाकडे मुटकाभर जाड आणि टोकाकडे विरळ होत जाणाऱ्या केसांची उंदराच्या शेपटी सारखी निमुळती आणि तेवढीच लांब