देवी अन्नपूर्णा आणि इतर आठवणी

  • 570
  • 192

देवी अन्नपूर्णा आणि आणि आठवणी मध्यंतरी एका हॉटेलमध्ये गेले तेव्हा अन्नपूर्णेची एक दुर्मिळ तस्वीर दिसली फोटो पाहून मन अतिशय प्रसन्न झालेलगेच तो मोबाईल मध्ये कैद केला   अन्नपूर्णा याचा (शब्दशः अर्थ - अन्नाने भरलेली) ही एक हिंदू देवता आहे.  हिंदू धर्मामध्ये भक्ती आणि अन्नाचा नैवेद्य दाखवणे याला खूप महत्त्व आहे. त्यामुळे देवी अन्नपूर्णा ही एक लोकप्रिय देवता मानली जाते. अन्नपूर्णा देवी ही पार्वतीचा अवतार आहे, असे मानले जाते.स्वतः ,ज्याला पाच मुखे आहेत असा शंकर; गजमुख विनायक, आणि सहा मुख असणारा स्कंद, हे त्याचे दोन मुलगे अशी खाणारी बारा तोंडे घरी असताना भिक्षाटन करणाऱ्या दिगंबर शिवाचा संसार सुरळीत चालला आहे कारण त्याच्या घरी साक्षात अन्नपूर्णा (पार्वती) आहे.जिवाची प्रवृत्ती ऐहिक