तिकड़े तशीच स्थिती ही त्या दोन पुरुषांची सुद्धा होती. त्यांनी अंगात कमरेचा वर सदरा आणि खाली पैजामा घातलेला होता. त्यांचे ते दोन्हीही वस्त्र हे घामाने चिंब ओले होऊन गेलेले होते. त्यातल्या त्यात एक एक विशेष गोष्ट म्हणजे त्यांचा घाम हा जे संबंधित व्यंजन होते त्यात मिसळू लागले होते, ज्या स्त्रिया कणिक भिजवत होत्या त्यांचा डोक्याचा टप टप टपकणारा घाम हा त्या कणिक मध्ये मिसळून एकमेव होऊन गेलेला होता. त्याचप्रमाणे बूंदी गाळणारे ते दोन पुरुष त्यांचाही घाम हा बूंदी मध्ये मिसळून एकमेव झालेला होता. त्याबाबत मी त्या लोकांनाम्हटले तर त्या स्त्रिया सरळ म्हणाल्या, "आम्ही काय करू तुम्ही व्यवस्था अशा ठिकाणी केली