नियती - भाग 48

भाग 48त्यावर मोहितने.... पाणावलेल्या डोळ्यांनी.... वरखाली मान हलविली....ताराआजी पुढे बोलल्या...."बापू आता जास्त विचार करू नकं... ज्याचं आयुष्य जेव्हळ लिहिलं आहे तेवढंच त्याले भेटतं.तवा... लवकरात लवकर पुढच्या शिक्षणाले लाग..."मायराला एक नजर पाहून मोहित स्मशानभूमीकडे गेला.तिथे गेल्यावर त्याला आपले आई वडील आजूबाजूलाचआहे असा भास होत होता....तिथेच थांबून यांची चिता जिथे जाळली होती तिथे एकटक पाहत उभा राहिला.......मायरा तीथे आली... आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवला तेव्हा मनामध्ये चाललेल्या विचारांमधून तो बाहेर आला आणिमायरा म्हणाली....."मोहित.... मला माफ कर ... मी तुझ्या आयुष्यात आले.. आणि तेव्हापासून तुझ्या आयुष्यात उलथा पालथ झालीय ना..... आई बाबा पण...... आपल्यापासून दूर निघून गेले.. "मोहित....." नाही...नाही...मायू...असं काही नाहीये. त्यांना दूर