वडा पाव

वडा पांव .. नुसता शब्द म्हणला तरी ती मोठी वडे तळणाची कढाई आणि त्यात उड्या मारणारे वडे आठवून तोंडाला पाणी सुंटते . कोल्हापुरात वडा म्हणजे दोन गोष्टी अपरिहार्य .. एक म्हणजे हा वडा नेहेमी पावासोबतच येतो आणि तो सुद्धा पेटी पाव स्लाइस सोबत ..दुसरे म्हणजे त्यासोबत दिल्या जाणाऱ्या तळलेल्या मिरच्या वडे तळणीच्या झाऱ्यात हिरव्या मिरच्या तळून त्यावर मीठ टाकतात .. विशेष म्हणजे ही मिरची अजिबात तिखट लागत नाही माझी पहिली वड्याची आठवण माझ्या शालेय जीवना पासुनचीआहे . माझ्या वडिलांना वडा खूप आवडत असे ...कधीही वडा खायला कुठल्या गाडीवर ते गेले की न चुकता वडा घरी कायम बांधुन आणत असत . .अगदी माझ्या लग्नानंतर माझ्या घरी ते वड्याचे