भाग 44जुली ने तिच्या रूमचा दरवाजा खोलला. तेव्हा दरवाज्याच्या थोड्याशा बाजूलाच असलेली मायरा जॅकच्या दृष्टिक्षेपात आली... आणि तो जुली कडे पाहून म्हणाला..."सगळी मस्ती जिरवून ठेवणारे मी....मग पाहतो काय करते ही..."असं म्हणून तो....बाहेर गेला............तिकडे पोलिसांना संध्याकाळ होत असताना .... फोनच्या लोकेशन मुळे.... मोहितचा पत्ता मिळाला... आणि त्याला पोलिसांनी शोधून काढले....पोलिसांना मोहितने सर्व जे काही घडले ते सांगितले...त्यामुळे लगेच त्यांनी बाबाराव यांच्याकडे तसे कळविले...बाबाराव मनातून हादरून गेले... काय... कसे... कुठे..झाले हे सर्व त्यांनी पोलिसांकडून माहीत करून घेतले पण लीला यांना अजिबात त्याची कल्पना येऊ दिली नाही...फौजदार साहेबांनी त्यांना ...मोहितला अंत्यसंस्कार विधीसाठी घेऊन येतोय असे सांगितले....बाबाराव यांनी सुद्धा समर्थन केले कारण कितीही म्हटलं तरी त्याचे ते